फारा वर्षांपूर्वी मराठी साहित्यात एक जोशी होऊन गेले. धोंडो भिकाजी जोशी ह्या नावाने वावरणारी ही असामी मनाचा साधेपणा, आणि गमतीशीर अनुभव, ह्यांमुळे सगळ्यांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. तुलनेने स्मार्ट असलेली त्यांची बायको, त्यांची ओव्हरस्मार्ट वाटणारी मुलं, चाळीत राहणारे चाळकरी, हपिसातल्या वल्ली, ही सगळी माणसे अगदी आपल्यातलीच होऊन गेली. पिफमधला `लेथ जोशी' हा चित्रपट पाहताना फार दिवसांनी त्या जोश्यांची आठवण आली, हीच गोष्ट बरेच काही सांगून जाते.
ते जोशी `असामी' होते, हे जोशी थोडे `तसा मी' आहेत. अगदी धोंडू नाव नसलं, तरी ह्या जोश्यांना `दिनू' म्हणावे, असेच ते आहेत. हेही जोशी मध्यमवर्गीय आहेत. पुण्यातल्या एका वाड्यात राहतात. चाळींसारखेच तिथेही सगळे `कॉमन' आहे. ह्या जोश्यांनाही एक स्मार्ट, मोठ्यांच्यात उठबैस असलेली बायको आहे. एक मोठा झालेला शंकर्यासारखा कधीकधी वाह्यातपणा करणारा मुलगा आहे. एक प्रेमळ पण बडबड करणारी आई आहे. त्यांच्या आईचा लकी नंबर ७८८ आहे बरं का! हेही जोशी अनेक वर्षे एकाच हपिसात एकाच मशिनवर काम करत आहेत. अगदी कायकिणी गोपाळरावांसारखे लखलखीत नसले, तरी ह्याही जोश्यांचे एक कायम चालणारे अध्यात्म आहे. हेही जोशी कुटुंबियांपुढे फारसे बोलत नाहीत. एकंदरीत ह्या जोश्यांच्या घरात बरीच गंमत आहे. बायको-मुलगा मॉडर्न म्हणून मस्त जगतात, आजी तिच्या ढंगात टुणटुणीत राहते, आणि ह्या जोश्यांचा मात्र कधीकधी अगदीच `मोरू' होतो, असे एकंदरीत चित्र आहे.
ह्या जोश्यांना त्या जोश्यांसारखा थोडा प्रॉब्लेमही आहे. यंत्रयुग त्यांच्या घरी अचानक दार ठोठावत आले आहे. ह्यांचा प्रॉब्लेम जरा जास्तच सिरीयस आहे खरे तर. लेथ मशीनवर माणूस काही यंत्रांएवढा वेगात जॉब करू शकत नाही. अगदी जोश्यांसारखा वर्षानुवर्षे कला जोपासणारा कलाकारही नाही. इतके जोखमीचे काम इतक्या चोखपणे सांभाळणारे जोशी यंत्राच्या साचीव एकसुरी कामापुढे हतबल आहेत. पण ते यंत्राच्या पूर्णतः विरोधी आहेत, असेही नाही. कारण त्यांनीही आयुष्य एका यंत्राबरोबरच घालवलेले आहे. मग पुढे काय होते? जोश्यांना त्यांच्या आयुष्यातला हरवलेला आनंद पुन्हा मिळतो का? जोश्यांच्या घरचे ह्या सगळ्यामध्ये कशी साथ देतात? की देतच नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा.
खरे तर चित्रपट महोत्सवात माझा भर बहुतांशी परदेशी चित्रपटांवर होता, पण सबटायटल्स वाचून वाचून कंटाळा आला, म्हणून जरा मराठीकडे वळायचे ठरवले. आणि हा चित्रपट पाहून तो निर्णय योग्यच ठरला. दोन तास निखळ आनंद बर्याच दिवसांनी अनुभवायला मिळाला. ह्या गोष्टीत सुख आहे, दु:ख आहे, जल्लोष आहे, शांतता आहे, सगळे काही आहे. दिग्दर्शक मंगेश जोशी स्वतः `जोशी' असल्याने त्यांना जोशीपण काय असते ते बहुधा चांगलेच ठाऊक आहे, आणि त्यांनी ते प्रत्येक फ्रेममध्ये पुरेपूर उतरवले आहे. सगळीच पात्रे म्हणजे वसंत सरवट्यांच्या कुठल्या तरी कॅरिकेचर्सची जिवंत रूपे असल्यासारखी एन्ट्री घेतात, आणि पुढचे दोन तास मनाचा पडदा व्यापून उरतात. `पंधरा मायक्रॉननी करतो' म्हणताना जोश्यांच्या आवाजातूनच त्यांची छाती कशी फुगली असेल, ह्याची कल्पना येते. `हे स्किलचं काम आहे बॉस' म्हणताना त्यांचा मुलगा मनातल्या मनात कसा हसला असेल, हे जाणवते. जोश्यांच्या बायकोचा मेकओव्हर होताना ती कशी मनातल्या मनात प्रफुल्लित होत असेल, हे तिच्या चेहर्यावर दिसते. ह्यात त्या अॅक्टर्सचे क्रेडिट आहेच, त्याचबरोबर आपल्याला प्रेक्षकांना नक्की काय दाखवायचे आहे, हे दिग्दर्शकाला पूर्ण माहित असल्याशिवाय अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून चित्र उभे करता येत नाही. चित्रपटाचे पार्श्वसंगीतही इतक्या बारकाईने रचले आहे, की बस! असे सगळे धागे कलापूर्णरीत्या एकत्र गुंफले गेले, की मजा आल्यावाचून राहत नाही.
जोश्यांचे काम करणारे चित्तरंजन गिरी ह्यांनी फार न बोलताच ते समर्थपणे पेलले आहे. वर म्हटल्याप्रमाणे पंधरा मायक्रॉनचा प्रसंग, त्याचबरोबर बायकोकडे, मुलाकडे, आईकडे नुसतं बघण्याचे प्रसंग, अशा सगळ्यांतून त्यांचे पाणी किती खोल आहे, ते कळून येते. त्यांचा चेहरामोहराही `तसा मी' असण्याला एकदम फिट आहे. त्यांच्या बायकोचे काम करणार्या अश्विनी गिरी ह्यांचेही काम एकदम चपखल. `आमचे हे म्हणजे शुंभ!' असे अगदी म्हणणार्यातली बायको नाही ही, पण एकदम चटपटीत, नवनवीन गोष्टी शिकायला तत्पर वगैरे असलेली आहे. त्यात मग नवर्याचे नवरेपण काही तिला थांबवेल असे नाही. ते त्यांनी हावभाव आणि बॉडी लँग्वेजमधून छान दाखवले आहे. आजी तर रॉकस्टार आहे ह्या चित्रपटाची. तिच्यामुळे चित्रपटाला वेगळाच कूल कोशंट येतो. अगदी शेवटपर्यंत तो टिकवून धरला आहे. आजीची बडबड वगैरे ऐकून तर एकदम माझ्याच आजीची आठवण झाली. नाटकासिनेमातल्या फंडे मारत बसणार्या आज्यांविषयी माझे मत काही फारसे चांगले नाही, पण ही आजी बेस्ट आहे. ह्या आजीचा लाडका नातू म्हणजे इरसाल वल्ली आहे. ओम भुतकरने घरातल्या सगळ्यांबरोबरच जी केमिस्ट्री बनवली आहे, तीच ह्या घराचा `ग्लू' होऊन जाते. कुठे आजीलाच थोडेसे उकसव, कुठे वडलांनाच कोपरखळी मार, कुठे आईबरोबर नवीन पाककृतीबद्दलच बोलायला लाग, असे करणारा हा मुलगा वेळप्रसंगी हळवादेखील होतो, हे सगळे त्याने मस्त वठवले आहे.
थोडक्यात काय, तर हे लेथ जोशी एकदम सेट जोशी आहेत. पिफसारख्या महोत्सवांत मराठीची मान उंचावर ठेवणारे आहेत. आणि मुख्य म्हणजे मनमिळाऊ आणि कूल आहेत. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा येईल, तेव्हा चुकवू नका. मी तर बहुधा तिकीट काढून पुन्हा एकदा बघेन. ही एक जोरदार असामी आहे!
इंटरेस्टिंग वाटतोय. छान
इंटरेस्टिंग वाटतोय. छान लिहीलं आहेस.
धन्यवाद. :)
धन्यवाद.
नावावरूनच इंटरेस्टिंग वाटला, म्हणूनच मीही पाहायला गेलो.
अरे वा ! पिफ मधले अनुभव असेच
अरे वा ! पिफ मधले अनुभव असेच निराळे असतात. कधी कधी आपण मनात नसताना फक्त वेळ जुळतेय म्हणून एखादा पिक्चर पहायला जावा आणि एक आगळा वेगळा खजिनाच हाताला लागावा असे झालेले आहे. पहिल्या पाहिलेल्या पिफ मध्येच एक कोरियन चित्रपट निखळ आनंद देणारा हातास लागला आणि त्यामुळे माहिती नसलेले उत्तम कोरिनय चित्रपटांचे एक दालनच ओळखिचे झाले.
हा चित्रपट पण मिळाला की पाहिला जायिल. उत्तम परिक्षण लिहीले आहेस भाचा !
इन्टरेस्टिंग वाटतोय मूव्ही.
इन्टरेस्टिंग वाटतोय मूव्ही. (पण बघायला कुठे मिळणार इथे! )
मस्त लिहिलं आहेस.
मस्त लिहिलं आहेस.
आजीचं काम करणार्या अभिनेत्री म्हणजे सेवा चौहान.
ओम भूतकरचा 'सुखन' हा कार्यक्रमही प्रत्येकाने बघावा असा आहे.
मस्त ओळख. :)
मस्त ओळख.
मस्त लिहीले आहे. नक्कीच
मस्त लिहीले आहे. नक्कीच पाहणार. अश्विनी गिरी ने 'एक कप च्या' मधे जबरी काम केले होते. त्यामुळे इथेही उत्सुकता आहे.
धन्यवाद सर्वांना. आजीचं नाव
धन्यवाद सर्वांना. आजीचं नाव मला कलाकारओळखीत नीट कळलं नव्हतं. त्यासाठी धन्यवाद चिनूक्स.
मै, आजकाल असतात ना शोज कधीकधी?
मस्त. बघायलाच हवा असं दिसतंय.
मस्त. बघायलाच हवा असं दिसतंय.
इंटरेस्टिंग वाटतोय, बघायला
इंटरेस्टिंग वाटतोय, बघायला हवा.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
असं आवडलेल्या एकेका सिनेमाबद्दल लिहा की उपस्थितांनी...
(‘लेथ जोशी’ - हे नाव फार्फार ओळखीचं वाटतंय. पण कुठे वाचलंय ते अजिबात आठवत नाहीये.)
ललिता-प्रीति, मीच लिहिणार आहे
ललिता-प्रीति, मीच लिहिणार आहे अजून.
एकाच दिवशी माबोवर धाग्यांचा पूर नको, म्हणून हळूहळू टाकेन.
ओम भुतकर माझा चुलत भाऊ आहे.
ओम भुतकर माझा चुलत भाऊ आहे. त्याच्या फेसबूक पेज वर या लेखाची लिंक दिली तर चालेल का?
वैष्णवीका, अगदी चालेल. काहीच
वैष्णवीका, अगदी चालेल. काहीच हरकत नाही. मला त्याचं काम खूप आवडलं. वर चिनूक्सने उल्लेख केलेला सुखन कार्यक्रमही आता बघायचा आहे कधीतरी.
मस्त लिहिलंय. आवडलं
मस्त लिहिलंय. आवडलं
अजून लिहिणार आहेस हे अजून आवडलं
धन्यवाद. कळवते त्याला. सुखन
धन्यवाद. कळवते त्याला. सुखन कार्यक्रमही नक्की बघा.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
छान परिचय, मस्त लिहिलंय.
छान परिचय, मस्त लिहिलंय. बघणार हा पिच्चर!
परीचय आवडला. सुखन, कधी , कुठे
परीचय आवडला. सुखन, कधी , कुठे पहावा ? बाकी परीक्षणाच्या प्रतिक्षेत ....
युट्युबवर आहे सुखन.
युट्युबवर आहे सुखन.
छान परीचय भास्कराचार्य
अरेरे. माझे खूप चांगले सिनेमे
अरेरे. माझे खूप चांगले सिनेमे हुकले. सही लिहिलंय.
आज पण चिनुक्सची पोस्ट वाचून सेल्समन बघायचा होता पण उशीर झाला.
पिफच्या निमित्ताने तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली ते भारी!
Lathe Joshi wins the Best
Lathe Joshi wins the Best Movie Award at PIFF.
Sevatai Chauhan receives Special Jury Award for the movie.
सुंदर ओळख !
सुंदर ओळख !
वा ..नक्कीच बघेन. लेथवर काम
वा ..नक्कीच बघेन. लेथवर काम केले आहे शाळेत टर्नर म्हणून आठवी ते दहावी
फार आठवणी आहेत लेथ मशिनच्या.. नक्कीच बघणार.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
(‘लेथ जोशी’ - हे नाव फार्फार ओळखीचं वाटतंय. पण कुठे वाचलंय ते अजिबात आठवत नाहीये.)
>>>
+१११
इंटरेस्टिंग वाटतोय. छान
इंटरेस्टिंग वाटतोय. छान लिहीलं आहेस. >> +१ बघायला मिळेल अशी आशा धरतो.
मस्त परिचय. इकडे आला तर नक्की
मस्त परिचय. इकडे आला तर नक्की बघणार.
लेथ जोशी हे नाव मला पण ओळखीचं वाटतंय. संदर्भ नाही आठवते मात्र.
मस्त आहे ...
मस्त आहे ...
लेथ जोशी हे नाव मला पण ओळखीचं वाटतंय. संदर्भ नाही आठवते मात्र. -->
बेफिकिर यन्च्या एका कथे मधे वच्ल्यसरखे वतते आहे
सई, द सेंटिमेंट इज म्युच्युअल
सई, द सेंटिमेंट इज म्युच्युअल.
माहौल मस्त जमल्याने धमाल आली. बाकी ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला, त्यामुळे मला चांगलं वाटतंय. (आमचे घोडे विनमंदी आले.) 
Pages