चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच नावाचे नाटक होते, दिलीप प्रभावळकर , सुहास जोशी , निर्मिती सावंत यांचे,
लग्नाच्या वाढदिवशी दिलीप प्रभावळकर आपली गुपिते उघड करतो, आणि शेवटी सुहास जोशी बॉम्ब टाकतात,

सुकन्या ज्युनिअर वाटते दि.प समोर. बायको न वाटता सुन वाटते त्यान्ची. सुहास जोशी किव्वा नीना कुळकर्णी हवी होती.

दोन प्रोमो पाहिले. पहिला, सुकन्या प्रभावळकरांना चकली देते खायला! त्यांचं वय ८३!!! इतके म्हातारे मुळीच नाही वाटत ते. ७३ चाललं असतं. सुकन्या तर ७० च्या पुढचीही वाटत नाही. मेकप साफ गंडलाय! प्रभावळकरांची बॉडी लॅन्ग्वेजही ८३ वर्षाच्या आजोबांसारखी नाहीये.
दुसरा प्रोमो लिफ्टमधला. तो तर सरळ ढापलाय 'मेन विल बी मेन' जाहिरातीतून, पण तो जरा बरा जमलाय चकली प्रोमोपेक्षा.

अरे पण ८३ किंवा ते ज्या काही वयाचे दिसतायेत त्यांना आजोबा नैतर काय म्हणणार? अपेक्षा काये त्या आजोबांची काय म्हणावं?

चुक भुल द्यवि घ्यावी नावानेच नाट्क प्रथम दुरदर्शनवर झालेल.
त्यात नीना कुलकर्णी होती. लेखन प्रभावळकरांच आहे.

सेल्सगर्ल-आजोबा सीन खूप लांबवला काल. एकंदर पहिला भाग सो-सो वाटला. पण सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर दोघांसाठी आणखी काही दिवस तरी बघणार.
त्या तिघांची जी वयं दाखवली आहेत, त्या वयाचे ते कुणीच वाटत नाहीत. विशेषत: नानी तर अजिबात शंभरीच्या वाटत नाहीत. नुसतं व्हील-चेअर आणि अंगात स्वेटर इतकं पुरेसं नाही.

छे... पहिला भाग नाही आवडला.
मी कुठलीच मालिका पाहत नाही, मात्र ही आवर्जून वेळ लक्षात ठेवून पहिली.बात जमी नही,
सध्या सोप्या संवादातून आणि रोजच्या घटनांतून विनोद निर्मिती करणे खूप कठीण आहे . गंगाधर टिपरे मध्ये ती भट्टी जमून गेली होती. नंतर केदारचिच अजून एक सिरिअल आली होती पण त्यात काही जमले नव्हते.

सुमो टोटल diaappointment, त्यांनी जडे दिसायला पॅकिंग केलेय असे वाटले.
संवाद नसताना ओठांची हालचाल करायची लकब घेतली आहे, ती विचित्र वाटते. आणि त्या म्हातारीची अक्टिंग करत आहेत हे जाणवत राहते.
नानी कॅरॅक्टर ओव्हर बोर्ड झालंय.
इंफॅक्ट सगळीच पात्र 10-15 वर्ष कमी वयाचे बेअरिंग घेऊन आहेत असे वाटते.

आजच्या सीन मधले, सेल्स वू मन ने दिप्र ला तरुण म्हणणे, आणि त्याने पाउदर खरेदी वाढवत नेणे हा घासून गुळगुळीत झालेला कन्सेप्ट होता.

2-3 एपीओड मध्ये फाईन ट्युनिंग होईल अशी अपेक्षा.

फालतु वाटला पहिलाच भाग. गंडलीय पात्रनिवडीमध्ये.
सुकन्या कुलकर्णी ह्यांना ओढून ताणून अभिनय करावा लागतोय. त्यांचा खाजगी प्रॉबलेम असेल म्हणून लिहिणार न्हवते पण शरीर इतकं बोजड का केलेय? ( कृपया वाद नकोय) पण खूपच खटकतं.
अभिनयाचा सबंध नसला रूपाशी किंवा शरीराशी तरी हा प्रश्ण पडतो. आता बरेच उपचार, नियम आणि संतूलन करून वजन राखतात्येतं. असो. इथेच थांबवते.

बाकी पात्रांविषयी, दिलिप प्रभावळकर ८३ वयाचे आणि त्यांची आई काय मग १००( पुर्वीचे लग्न लवकर होवून १७ व्या वयात "बोक्या" झाला असे समजले तरी) अतिच आहे.
ती आई झालेली नटी एकदम बेकार.. केकाटते काय, खोटा विग आणि चेहरा १०० च्या मानाने तुकतुकीत...

साडेनवाला येते.

मला दोन्ही नवीन सिरियलींचे टायमिंग उलट वाटल्याने मी नकटीची साडेनऊला असेल असे समजून टिव्ही पावणेदहाला लावला. तर ही बघायची ठरवलेली सिरियल अर्धी मिसली.

बाकी तीन जेष्ठ नागरिक, आधिच्या १० आणि आत्ताच्या २० किलो डिटर्जंट पावडरीच काय करणारेत काय माहित?

अरे मी येईपर्यत इथे सगळे मुद्दे मांडुन झाले की......
मला पण कालचा भाग नाही आवडला. सुमो तर ओठांची हालचाल करते म्हातारी वाटायला ते तिला अजीबात जमत नाहीये. घरात तिघेही म्हातरे असताना घराचा दरवाजा सताड उघडा ठेवलाय. आणि ती मी मुलगी पण किती वेळ थांबुन होती दारत.
कालचा भाग पुर्ण नाही बघितला . आज बघु काय होतय ते.
नाहीतरी सिरीयल पेक्षा माबो वर ती वाचायला जास्त मजा तेते Wink

Pages