मायबोलीच्या सॉफ्टवेअरची डागडूजी करण्यासाठी मायबोली २.५ दिवस बंद राहील.

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

या विकांताला मायबोलीच्या सॉफ्टवेअरचे उर्ध्वश्रेणीकरण (अपग्रेड) करणार आहोत. हे तुलनेने मोठे काम आहे. इतके मोठे उर्ध्वश्रेणीकरण या अगोदर आपण २००७ मधे केले होते.

त्या कामासाठी शुक्रवार १३ जानेवारी २०१७ संध्याकाळ ५ वाजेपासून (युस बॉस्टन वेळ) रविवार १५ जानेवारी रात्री १० वाजेपर्यंत मायबोली बंद राहील.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मी नेह्मी रोमात असते... खूप मिस करेन मायबोलीला..
उत्सूकता आहे नवीन बदल बघण्याची..
Admin-team ला कामासाठी शुभेच्छा..!

कामाला शुभेच्छा !! नविन सॉफ्टवेअरला पण शुभेच्छा

<<< मग लिम्ब्या ट्री व्युच्याऐवजी काय मागणार? <<<<
मी अजुनही ट्री व्ह्यू मागतोच आहे. Happy मस्त होता तो.... ठराविक विषय, ठराविक आयडीज फॉलो करता यायच्या.

अरे वा! माबोच्या नवीन रूपाची उत्सुकता आहे.
(गेल्या वेळच्या अपग्रेडेशनच्या वेळीच मी इथे सभासद झाले होते. आधी नवीन मेम्बर म्हणून काही कळत नव्हतं. आणि जरा अंदाज येईयेईतोवर नवीन रूप समोर आलं होतं. त्यावरून आताही नवीन रूप समोर येणार असं गृहित धरलंय.)

२.५ दिवस बंद ! हमारा क्या होगा Uhoh
उर्ध्वश्रेणीकरणाला शुभेच्छा !

आणि सगळ्या मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या गोड शुभेच्छा !

अरे ए हे काय.. आता मी काय करू.. Sad Sad Sad

आणि हे युस बॉस्टन वेळ काय आहे.. Uhoh
कोणीतरी भारतीय वेळेत रुपांतर करून द्या ना

म्हणजे आज पुर्ण रात्र आणि पहाटे ४ पर्यंत का?
जागरणच करतो आज.. आणि बरोबर ३.५९.५९ ला धागा टाकून झोपतो Happy

मागच्या वेळी नवीन मायबोलीवर रूळायला खूप त्रास झाला होता . आवडत नव्हतं.
जुन्या ( आधीच्या ) मायबोलीची आठवण येत होती . त्याची आठवण झाली
त्यावेळी बऱ्याच लोकांनी ऍडमिन कडे त्रास होतो म्हणून गोड तक्रारी केल्या होत्या
ऍडमिनने छान शब्दात समजूत घातली होती त्याची आठवण झाली
तरी उर्ध्वश्रेणीकरणासाठी आणि मकर मकसंक्रांती साठी शुभेच्छा Happy

२.५ दिवस बंद ! हमारा क्या होगा अ ओ, आता काय करायचं
उर्ध्वश्रेणीकरणाला शुभेच्छा !

आणि सगळ्या मायबोलीकरांना मकरसंक्रांतीच्या गोड शुभेच्छा !>>> +१

पेताडांना दारु मिळाली नाही तर ते सारखे गुत्त्याच्या आठवणी काढत बसतात तसे आमचे होईल ,असो मकरसंक्रांतीच्या व उर्ध्वश्रेणीकरणाच्या पेताड शुभेच्छा.

>>> अरे ट्री व्हियू आत्ताही होता. हवा तो युजर आयडी टाक. अन त्याने कुठे कुठे प्रतिसाद दिले ते सर्व बाफ दिसतील. <<<
हो तो माहित आहे, पण पूर्वीच्या ट्रीव्ह्युची सर त्याला नाहि.

या निमित्ताने "कशी असेल नवी मायबोली?"

असा धागा काढण्याचे अजून कुणाच्या लक्षात कसे नाही आले? Uhoh
माबोचा बुध्यांक घसरतोय की सुप्त प्रतिंबध (latent inhibition) वाढतोय?

अरे वा, चांगला निर्णय. अपग्रेडेशनसाठी शुभेच्छा.

त्या निमित्ताने इथे पडीक असणार्या लोकांची चार कामे होतील. मधल्या वारी केलं असतंत तर ऑफिसची कामं पण झाली असती. Wink

पण पूर्वीच्या ट्रीव्ह्युची सर त्याला नाहि.>>
लिंब्या, तुझ्याइतकी पुरातनप्रेमी मीही नाहीये Proud तो ट्री व्यू काळाच्या ओघात वाहून गेला आता

उर्ध्वश्रेणीकरण कामासाठी शुभेच्छा ... आणि ते करताना इथल्या धाग्यांचा गुंता होऊ नये, ह्यासाठी खास शुभेच्छा !

अडिच दिवस माबो बंद राहणार हे वाचल्यावर जरा खट्टू झाले, पण वीकेन्ड आहे त्यामुळे बरं झालं.
हापिसात माबोशिव्वाय पान हालत नाही.

बाके नेक्स्ट वीक मध्ये येणारे धागे Wink

* अडिच दिवस माबोशिवाय
* माझ्या आयुष्यातले माबोचे स्थान
* तेरे बिन मैं युं कैसे जिया

Baap re......2 Divas Maayboli nhi...kse honaar yaaar...bt

उत्सूकता आहे नवीन बदल बघण्याची..Admin-team ला कामासाठी शुभेच्छा..!

उर्ध्वश्रेणीकरणाला खूप खूप शुभेच्छा !!!!!!!!!!
हापिसात माबोशिव्वाय पान हालत नाही.>>>>>>>>>>सगळी माबोचीच पाने वापरतेस? Proud

Pages

Back to top