दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील?
जरा आपल्या स्मरणशक्तीवर जोर द्या! दृश्ये आठवा!
आणि दंगलच्या निमित्ताने काय काय धागे काढता येतील ते सुचवा.
उदा:
१. दंगलच्या निमित्ताने ....मुलगा व्हावा म्हणुन:
(जे उपाय दंगल चित्रपटात दाखवल्या गेले, त्यांचे वर्णन, तुमचे याबाबत काय विचार आहेत?
आणि खाली पोलः)
१. मला फक्त मुलगेच आहेत, मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरील पैकी कोणताच उपाय केला नाही.
२. मला फक्त मुलगेच आहेत मी किंवा माझ्या जीवनसाथीने वरिल पैकी किमान एक तरी उपाय केला आहे.
३. मला अद्याप अपत्य नाही आणि माझा किंवा माझ्या जीवनसाथीचा.......
४. मला एक मुलगी आहे आणि मी किंवा......
५. मला दोन मुली आहेत आणि...
६. ...
७..
..
..
२. दंगलच्या निमित्ताने.... केसांची लांबी आणि डोक्यातील उवां बाबतः
(लहानपणी माझे जावळे काढलेच नव्हते, मी मातीत खेळायचो, माझी शेजारची बाल मैत्रीण माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान, माझे केस तिच्या पेक्षा जास्त लांब, आम्ही मातीत शिर्षासन करायचो, इत्यादि तपशील..
मग दंगल चित्रपटात नॅशनल लेव्हलला आणि पुढे इतर मुलींचे केस एवढे बारीक नव्हते वगैरे,,
चित्रपटातील दाखवलेल्या कालावधीत सुद्धा अस्तित्वात असलेल्या लायसिल या उवानाशक औषधा बाबत आणि त्याच्या खेडोपाडी वापराबद्दल माहिती...)
मग फोगट भगिनींवर हा अन्याय नव्हता का?
३. दंगलच्या निमित्ताने.... किती पाणीपुर्या खाउ शकता?
(मी, माझी गर्लफ्रेंड, तिची एक मैत्रीण... वगैरे वगैरे)
४. दंगलच्या निमित्ताने .. सगळा अभ्यास पहाटे उठुनच करावा लागतो का?
(काकड आरतीला जाणार्या शेजारच्या काकू......पहाटेच अभ्यास करणारी त्यांची मुलगी,.माझ्याच वर्गातली..वगैरे... )
५. दंगलच्या निमित्ताने... म्हणजे तो भ्रष्टाचार झालाच नव्हता का ?
( सत्यघटनेवर आधारीत चित्रपट असूनही विनाकारण कोचला बदनाम केले पण खर्या भ्रष्टाचाराला का वाचा फोडली नाही.. (खाली कॉमनवेल्थ घोट्याळ्याच्या काही बातम्यांचे स्क्रिनशॉट्स))
असेच अजून काय काय धागे काढता येतील बरे?
द्या जरा स्मरणशक्तीवर जोर... आणि सूचवा विषय.....
त्या मुलींचे वडील त्या
त्या मुलींचे वडील त्या स्ट्रॉंग होतात म्हणून पाण्यात टाकतात. उद्या या पासून स्फुर्ती घेऊन मुलींना स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यांना पाण्यात उड्या मारायला लावायचे फॅड आले तर....
आपल्याला पदक मिळण्याच्या आशा वाढतील का कमी होतील.
सर्दी आणि खोकल्याच्या डॉक्टरांना चांगले दिवस येतील का
या आयडीने काढलास होय धागा ?
या आयडीने काढलास होय धागा ? मग जौ दे..
मानव, तुम्हीसुद्धा?
मानव, तुम्हीसुद्धा?
तुम्हीसुद्धा भर घाला साती
तुम्हीसुद्धा भर घाला साती
>>दंगलच्या निमित्ताने .. सगळा
>>दंगलच्या निमित्ताने .. सगळा अभ्यास पहाटे उठुनच करावा लागतो का?
(काकड आरतीला जाणार्या शेजारच्या काकू......पहाटेच अभ्यास करणारी त्यांची मुलगी,.माझ्याच वर्गातली..वगैरे... )---
हे आवडलं.
दंगलच्या निमित्ताने - एक
दंगलच्या निमित्ताने - एक सिरीअस टॉपिक - स्त्री ही फक्त पुरुषांना त्यांचे स्वप्न पुर्ण करून द्यायला अपत्य जन्मास घालणारी मशीन आहे का? आणि मुलगा नाही देऊ शकल्यास स्वत:कडे कमीपणा घ्यायचा? का? कोण्या पुरुषाला x chromosome y chromosome समजते का? आमच्या शाळेत जेव्हा आम्ही हे शिकलो तेव्हा म्हणायचो, तुमच्याच वाय मध्ये ताकद नव्हती तर त्याचे खापर आमच्यावर कशाला फोडता? पण स्वत:कडे कमीपणा घेईन ती पुरुषाची जात कसली. मग यांना समानता सुचते.
मला तुम्हा लोकांचा हेवा
मला तुम्हा लोकांचा हेवा वाटतो. एवढे चांगले टॉपिक, तुम्ही त्यावर स्वतंत्र धागा न काढता असेच उधळतात. किती ही विचारांची आणि मनाची श्रीमंती
बाकी तुम्ही कितीही टॉपिक फोडलेत तरी मी या पलीकडे जाऊन काहीतरी आणणारच
अवांतर - सपनाजी, मानव यांचेही नाव माझ्याशी जोडू नका हो. माझी हरकत नाही. हे त्यांच्यासाठी बोलतोय. ते एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि विचारी व्यक्तीमत्व आहेत. एक मनोरंजनाची आवड वगळता आमच्यात काही साम्य नाही की आमची तुलनाही नाही.
ऋन्मेष फीवर! अर्चना सरकार |
ऋन्मेष फीवर!
अर्चना सरकार | 10 January, 2017 - 00:36
<<<<<<<<<<<<<<<कोण्या पुरुषाला x chromosome y chromosome समजते का? आमच्या शाळेत जेव्हा आम्ही हे शिकलो तेव्हा म्हणायचो, तुमच्याच वाय मध्ये ताकद नव्हती तर त्याचे खापर आमच्यावर कशाला फोडता?>>>>>>>>>>
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/61335
ऋ, तुमच्या कालच्या धाग्यावर कॉमेंट करता येत नाहीये! असं कसं?
सपनाजी, मानव यांचेही नाव
सपनाजी, मानव यांचेही नाव माझ्याशी जोडू नका >>> तब्येत बरी नाही का? तुझेे नाव तरी लिहीले आहे का?
Double post
Double post
सई, तो लॉक केलाय एडमिनने
सई, तो लॉक केलाय एडमिनने
एखादा दुसरा मांसाहाराचा वा दंगलचा धागा पकडून त्यात लिहू शकता आपण..
ऋ विपु बघ
ऋ विपु बघ
सस्मित, विज्ञानशाखेशी संबंध
सस्मित, विज्ञानशाखेशी संबंध शालेय जीवनानंतर संपला. पण माझ्या माहितीप्रमाणे मुलगा की मुलगी हे क्रोमोझोम्सच्या जोडी नुसार ठरते. एक्स आणि वाय असेल तर मुलगा आणि दोन्ही एक्स असतील तर मुलगी.
आता यातील एक क्रोमोजोम वडिलांकडून येते तर एक आईकडून. आई ही एक स्त्री असल्याने तिच्या स्वतःकडे दोन्ही एक्स क्रोमोजोम्सच असतात. याचा अर्थ बाय डिफॉल्ट तिथून एक्सच येणार. राहता राहिले वडिल. तिथून एक्स येतेय की वाय यावर सारा खेळ अवलंबून असते.
थोडक्यात मुलगा होणे की मुलगी होणे हे सर्वस्वी वडिलांवर अवलंबून असते. अर्थात हातात त्यांच्याही नसते. पण स्त्रियांचा तर तितकाही संबंध येत नाही. पण आपल्याकडे दोषी मात्र आईलाच ठरवले जाते. तू आमच्या घराण्याला वंशाचा वारस देऊ शकली नाहीस अॅण्ड ऑल...
विशय कय... तुम्हि बोल्ताय कय
विशय कय... तुम्हि बोल्ताय कय ? कसल क्रोमोसोम समजवतय विनोदि ध्यग्यवर