डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
ब्रेकिंग न्यूज़ सर्वात मोठी
ब्रेकिंग न्यूज़
सर्वात मोठी आनंदाची बातमी
भारतासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे,
अमेरिकेने घोषित केले की १९ फेब्रुवारी हा दिवस जागतिक "छत्रपती दिन" म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगत विख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. या बद्दल अमेरिकेचे विशेष आभार. हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल तेवढा पसरवा. भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे.
जय शिवराय
हे एक फॉरवर्ड काल वाचण्यात आले.
मला अालेला एक फाॅरवर्ड : यात
मला अालेला एक फाॅरवर्ड : यात किती तत्थ आहे माहीत नाही.
*साप चावल्यावरचा रामबाण उपाय* ...
तुम्हाला माहिती असेल की, *साप चावला की त्याच्या
दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विष
मनुष्याच्या शरिरात सोडतो*. ते विष रक्तात
सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण
शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते
*विष आधी हृदयापर्यंत जातं* नंतर पूर्ण शरिरात
पसरतं. *हे विष पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी
साधारण तीन तास लागतात* असे मानले जाते.
(परंतू) ...
*म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलाय तो ३ तास
तरी मरणार नाही*. जेव्हा मेंदूसह शरिराती सर्वच
अंगांमध्ये विश पोहचलं तरंच तो व्यक्ती मरण पावतो.
त्यामुळे तुमच्याकडे *त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी
तीन तास आहेत*. या तीन तासात तुम्ही काही करू
शकाल तर चांगलंच आहे.
तुम्ही काय करू शकता ?
*एक मेडिसीन तुम्ही तुमच्या घरात नेहमी ठेवू शकता.
*हे मेडिसीन होमिओपॅथी असून स्वस्त आहे*. त्याचं
नाव आहे *NAJA २०० (N A J A )* हे औषध
कोणत्याही होमिओपॅथी मेडिसीन शॉपमध्ये तुम्हाला
मिळेल. या औषधाने तुम्ही तब्बल १०० लोकांचा जीव
वाचवू शकता. आणि याची किंमत केवळ पाच रूपये
इतकी आहे. ...
*NAJA हे औषध जगातील सर्वात खतरनाक
मानल्या जाणा-या सापाचं विष आहे*. त्या सापाचं
नाव आहे *क्रॅक*. या सापाचं विष सर्वात घातक
मानलं जातं. हे विष दुस-या सापाचं विष
उतरवण्यासाठी कामात येतं. ...
*या औषधाचा एक थेंब जीभेवर ठेवा आणि १०
मिनिटानंतर पुन्हा एक थेंब ठेवा आणि पुन्हा एकदा १०
मिनिटांनी एक थेंब. तीनदा थेंब टाकून सोडून द्यावे*.
बस इतके करून त्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ
शकतो.
हा धागा आरोग्यम धनसंपदा
हा धागा आरोग्यम धनसंपदा विभागात आहे ना ?
सर्पदंशावरील इलाज | नाजा २००
सर्पदंशावरील इलाज | नाजा २०० | एक सुंदर अफवा
------------
माझ्या गेल्या तेरा चौदा वर्षातल्या सोशल मिडीयावरच्या वावरातून एक मला गोष्ट चांगलीच कळलीय. ती म्हणजे 'फुकट ज्ञान'. मग ते खरं आहे की खोटं याची शहानिशा न करता कुठेही न जाता केलेल्या समाजसेवेच्या निव्वळ मानसिक समाधानासाठी फॉरवर्डस पाठवत राहणे हा सोशलमिडियावरच्या गोमागणेशांचा आवडता उद्योग आहे.
पण खरं सांगू का? स्पायडरमॅन मुव्हीमधलं वाक्य सोशल मिडीयासारख्या व्हर्च्युअल जगालाही तंतोतंत लागू होतं.
"विथ ग्रेट पॉवर कम्स गेट रिसपॉन्सिबिलीटी". त्यामुळेच की काय या सोशल मिडीया नामक देशाचा एक जबाबदार नागरीक म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन करणं हा मी माझा जन्मसिद्ध अधिकार समजतो.
तर आजचा विषय आहे 'नाजा २००'. एखाद्या चिवट आजारासारखी ह्या पोस्टची उबळ अधून मधून व्हॉट्सअॅपला येत असते. आता हे सुदैव म्हणा की वैताग, पण दरवेळी काही नवे जागरूक मित्र या पोस्टची सत्यता विचारतात आणि मलाही तेच तेच सांगावं लागतं. अर्थात हे म्हणजे रोज दाढी करणं, नखं कापणं यासारखंच आहे. कर्तव्य आणि शुचिता म्हणून करावं लागतं.
तर आता मुद्द्याकडे येतो.
मुळात नाजा २०० या विषयाचा उगम कुठे आहे हे पाहू. राजीव दिक्षीत नामक कुणी 'सत्पुरूषाने' (ज्याला आमचे फॅमिली डॉक्टर (आयुर्वेदिक) नेहमी खास ठेवणीतल्या कोकणी शिव्या घालतात) त्याच्या कुठल्यातरी एका भाषणात सर्पदंश, विंचू दंश आणि असेच अनेक आजार चुटकीत बर्या करणार्या, केवळ पाच रूपयात मिळणार्या पृथ्वीवरील या अमृताचा साक्षात्कार लोकांना घडवला. तो व्हिडीयो युट्युबवर आला आणि मग काय विचारता हो. परमानंदाने उत्तेजित होऊन ही बातमी पसरवण्याच्या नादात 'कोणी कोणाच्या गळ्यात, कोणी कोणाच्या पायाशी, कोणी मांडीवर' अशा अलौकिक अवस्थेत ही मंडळी येऊन पोहोचली. एकाने तर मला हेही विचारलं की "सापाला हे औषध पाजलं तर सापाचंच विष गायब नाही का होणार? म्हणजे नागपंचमीला दुधाऐवजी 'नाजा' का पाजू नये?" याला म्हणतात डायरेक्ट मुळावर घाव!
तर, माझ्यासारख्या काही अतिबुद्धिमान आणि अतिशाहाण्या लोकांना हे काही पटलं नाही आणि त्यांनी मोरीतल्या अंधारात झुरळ शोधायला सुरवात केली. दिवसरात्र कीबोर्ड बडवून आणि होमीओपथी वगैरेचा अभ्यास केलेल्या डॉक्टरनामक फालतू लोकांशी बोलल्यानंतर पुढील गोष्टी उघड झालेल्या आहेत.
सदर औषध हे खरोखरच नागाच्या विषापासून बनवलेलं औषध आहे. पण हे औषध सर्पदंशावर इलाज म्हणून काम करत नाही. तर सर्पदंशामधे जी लक्षणं दिसतात त्यातली जर काही लक्षणं जुळत असतील तर त्यावर काम करतं. ही लक्षणं व्यक्ती व्यक्तीमधे वेगळी दिसू शकतात. अनेकदा निव्वळ सर्पदंशाच्या आणि विषबाधेच्या भीतीपोटी काही प्राथमिक लक्षणं रुग्णात दिसतात. त्यामुळे विषबाधा झालीय का याची खात्री डॉक्टरांना करावी लागते. सापाचं विष हे शेकडो विविध विषारी घटकांनी मिळून बनलेलं द्रव्य असून ती अतिशय किचकट केमिस्ट्री आहे. अगदी भारतापुरतचं बोलायचं तर रोम्युलस व्हिटेकर यांच्या २०१२ मधील संशोधन निबंधानुसार (याची पी.डी.एफ सुद्धा गुगल केल्यावर मिळेल), उत्तरेतील नाग हे दक्षिणेतील नागांपेक्षा जास्त विषारी आहेत. म्हणून कुठलंही प्रतिविष देताना अतिशय काळजीपूर्वक द्यावं लागतं नाहीतर रिअॅक्शन येऊन पेशंट दगावू शकतो. नाजा २०० हे औषधसुद्धा नागाच्याच विषापासून बनवलेलं असल्यामुळे डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाने ते घेतलं गेलं पाहिजे नाहीतर उलटा परिणाम होऊ शकतो. तसंच हे औषध सर्दी, मायग्रेन, खोकला, हृदयाचे आजार, यकृताचे आजार, खांद्याचे आजार अशा विविध आजारांवरती काम करतं. होमियोपथीमधे सर्पदंशावर इतरही औषधं आहेतच पण तीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायची आहेत.
मित्रांनो, अपार्ट फ्रॉम जोक्स अॅण्ड सरकॅझम एक लक्षात घ्या, सर्पदंश म्हणजे काही पावसात भिजून येणारा ताप नाही. की घेतली क्रोसीन आणि झाला बरा. कुठलंही जैविक विष हे करोडो वर्षांच्या उत्क्रांतीतून बनलेलं अतिशय अॅडव्हान्स्ड असं टूल आहे. त्यातल्या सापाच्या विषावर तूर्तास तरी सापाच्याच विषापासून बनलेलं अँटीव्हेनीन हाच खात्रीलायक उपाय आहे. तेव्हा विषारी सापाचा दंश झाल्यास पेशंटला जवळच्या सरकारी रूग्णालयात वा जिथे सर्पदंशावर उपचार होतात अशा हॉस्पिटलमधे नेणे हेच प्रेफरेबल आहे. विषारी साप कसे ओळखायचे याचीसुद्धा गुगलवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. ती वाचा, चार तज्ञांकडून व्हेरीफाय करून आत्मसात करा आणि स्वत:सोबतच इतरांना आणि या सोशल मिडीया नामक समाजालाही अफवांच्या विषबाधेपासून सुरक्षीत ठेवा.
--
मकरंद केतकर.
व्हिएतनाम आणि शिवाजी
व्हिएतनाम आणि शिवाजी महाराज
महाराजांचा आयुष्य हे तर संपूर्ण मानव जातीलाच आशादायी, प्रेरणादायी आणि यथोचित मार्ग दाखवणार आहे. महाराज हे रयतेचे राजे होते. आणि त्यांनी रयतेचं राज्य उभं केलं तेच स्वराज्य. महाराजांच्या आयुष्याचा त्यांचा आयुष्यातील घटनांचा दुर्घटनांचा अभ्यास आता पर्यंत खूप अभ्यासू मंडळींनी केला लिहला आणि सांगितला. पण तो अभ्यास कसा करायचा आणि महाराजांच्या आयुष्य कडे तटस्थ पणे कसं पाहायच हे मात्र कोणी शिकवलं नाही किंवा खूप कमी जणांनी शिकवलं. इंग्रजीत एक म्हण आहे "give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime" (तुम्ही माणसाला मासा द्या तुम्ही त्याच एक दिवस पोट भराल, तेच तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवा तुम्ही त्याच आयुष्यभरासाठी पोट भराल) ही म्हण महाराजांच्या अभ्यासकांनी कधीच अवलंबली नाही. त्याचा कारण ....... तेच जाणो असो.
त्या दिवशी आमचे चुलत बंधू एका मोठ्या अभ्यासकांचे /व्याख्यात्याचे व्याख्यान ऐकून आले. त्यांचा चेहऱ्यावर व्याख्यानाचा नूर दिसत होता. एक वेगळाच भावनिक अभिमान चेहरयावर ठेवत ते म्हणाले "आरे तुला माहित आहे का व्हिएतनाम देशात महाराजांचा पुतळा आहे. तो देश आपल्या मुंबई जिल्या पेक्षा छोटा आहे. आणि त्या देशाने अमेरिकेला यौद्धात धोबीपछाड दिली. कोणामुळे माहित आहे का ? शिवाजी महाराजां मुळे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला आणि त्याचा वापर अमेरिकन विरुद्ध केला. होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ' छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे '." मी म्हणजे फुल्ल शॉक
सगळ्यात कहर म्हणजे ही माहिती एका कडून दुसरीकडे व्हाट्सअँप वर सगळी कडे फिरते . तरुण मावळे अभिमानाने फुगतात, महाराज व्हिएतनाम मध्ये पण फेमस हायती तिकडे त्यांचा पुतळा हाय . असाच एकाला मी एकदा विचारला तुला काय माहिती महाराज आणि व्हिएतनाम बद्दल तर तो म्हणे त्या अभ्यासकांनी सांगितलं, ते पण एवढ्या लोकात, वर एवढे पैसे घेऊन. मग ते काय खोटा बोलत्यात का ? मी आपला गप कारण विषय भावनिक झाला होता आणि विषय भावनिक झाला की चर्चा बंद. म्हणून हा लिखाणाचा घाट.
मी स्वतः व्हिएतनाम मध्ये भरपूर भटकलोय . महाराजांचा पुतळा शोधलाय आणि मला जे सापडला ते तुमचा समोर मांडतोय.
आता हे एके एक मुद्यांची उकल करूया
१) व्हिएतनाम हा देश मुंबई जिल्ह्यापेक्षा छोटा आहे.
खरंच का अजिबात नाही मुंबई जिल्ह्याचा क्षेत्रफळ आहे ४४६ किमी वर् (446 km²). आणि व्हिएतनामच क्षेत्रफळ आहे ३३१,२१० किमी २ (331,210 km²), जगात क्षेत्रफळात किंवा आकारमानात व्हिएतनामचा ६५ वा क्रमांक आहे. आता तुम्हीच ठरवा काय ते.
अधिक माहिती साठी व्हिएतनामचा नकाशा सोबत जोडला आहे
२) महाराजांचा गनिमीकावा अभ्यासून / वापरून व्हिएतनाम ने अमेरिकेला युद्धात हरवलं
व्हिएतनाम हे राष्ट्र देखील पारतंतत्र्यात होतं. व्हिएतनाम वर राज्य केला फ्रेंच लोकांनी. २ सप्टेंबर १९४५ ला व्हिएतनाम स्वतंत्र झाला आणि अलगत शीत युद्धाच्या कात्रीत सापडला. व्हिएतनामचे दोन भाग पडले नॉर्थ व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम. नॉर्थ व्हिएतनाम ला पाठिंबा होता सोविएत रशियाचा आणि चीनचा म्हणजे कॉम्युनिस्ट देशांचा. पण त्यांनी कधीही प्रत्येक्ष युद्धात भाग घेतला नाही. तेच साऊथ व्हिएतनामला पाठिंबा होता अमेरिकेचा आणि अमेरिकेने या यौद्धात प्रत्यक्ष भाग देखील घेतला म्हणून ते युद्ध व्हिएतनाम व अमेरिका यांच्यातच झाल. तसेच अमेरिकेच्या बाजूने होते ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, न्यूझीलंड हे देश . हे युद्ध १९५४ ते १९७५ पर्यंत चालू होते.
व्हिएतनामने ने हे युद्ध गनिमी काव्याने जिंकले, हेय १००% बरोबर. पण त्यांचा गनिमीकावा आणि युद्ध करायची पद्धत खूप खूप वेगळी आहे. हे युद्ध झाल साऊथ व्हिएतनाम मध्ये. हा प्रदेश सदाहरित जंगलांचा त्यामूळ भरपूर घनदाट जंगल हे त्या प्रदेशाचे वैशिष्ठे. या सर्वांचा उपयोग तीथल्या स्थानिक लोकांनी युद्धात केला. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या शरीर रचनेचाही भरपूर उपयोग करून घेतला
व्हिएतनामी स्थानिक लोक हेय उंचीने आणि बांध्याने खूप छोटे. तेच अमेरिकन भरपूर हट्टे कट्टे. व्हिएतनामी लोकांनी जमिनीखाली भरपूर लांबीची भुयार खोदली होती. त्या पैकी १२१ किमीची भुयार सध्या चांगल्या स्थिती आहेत. याभुयाराना चू ची टनेल म्हणून ओळखलं जात. ही सारी भुयार या लोकांनी हाताने उकरून खोदलेली आहेत. हे लोक या भुयारं मध्ये लपून राहत. आणि त्याच भुयारातून लपत छपत अमेरिकन सैनिकांवर हल्ले करत. हि भुयार एकमेकांना जोडलेली होती. हि भुयारे आणि या भुयारांची तोंडे एवढी छोटी असत कि त्यात अमेरिकन सैनिकांना शिरताच येत नसे. बऱ्याचवेळा हि तोंडे अशा शिथाफीने झाकलेली असे की कोणालाच कळणार नाही इथे भुयार आहे. हि भुयार जमिनीखाली खोलवर असल्याने बऱ्याचवेळा त्याच्यावर बॉम्बचा वा भूसुसुरुंगाचा परिणाम होत नसे. अशाच भुयारं मध्ये व्हिएतनामी राहत त्यांचा शस्रगार चालवत शाळा चालवत हॉस्पिटल चालवत. काही भुयारांची तोंडं एखाद्या पाण्याचा स्त्रोता जवळ उघडे त्या मुळे पाण्याचा प्रश्न मिटायचा. खाण्यासाठी ते लोक बांबू, शेंगदाणे, आणि ग्रीन टी याच वापर करीत आणि ते सगळं जंगलात मुबलक प्रमाणात उपलब्ध होत.
तसेच जंगलात वेगवेगळ्या पद्धतीचे फासे हे व्हिएतनामी लोक लावून ठेवायचे ज्याच्यात अमेरिकन सैनिक नकळत अडकायचे आणि मरायचे. शत्रूच्या रस्त्यातील सगळे पाण्याचे स्रोत या व्हिएतनामी लोकांनी पिण्यलाक ठेवले नव्हते. या सर्व प्रकार मुळे अमेरिकन सैन्याला कधीही समोर शत्रू सापडला नाही आणि त्या मुळे लढाईचा काळ वाढला. ज्या वेळेस लढाईचा काळ वाढतो त्यावेळेस बलाढय राष्ट्राला हि खर्च झेपेनासा होतो त्यात अमेरिकेतूनच या युद्धासाठी वीरोध वाढू लागला आणि १९७५ साली अमेरिकेने माघार घेतली. अशा प्रकारे सध्याचं अखंड व्हिएतनाम उदयाला आले. उदयाला आलेल्या व्हिएतनामने रशियाच्या पाऊलावर पाऊल ठेवत साम्यवादाचा (कम्युनिसीम) पुरस्कार केला.
गनिमी कावा ही एक युद्धकला आहे, या युद्ध कलेचा वापर आता पर्यंत बऱ्याच लोकांनी, देशांनी केलाय तसाच व्हिएतनामने ही .
व्हिएतनामचा यौद्धात त्यांच्या इतिहासात महाराजांचा कुठेही उल्लेख नाही. तेथील लोकांना शिवाजी महाराज माहितही नाहीत . प्रथम आपण डोक्यातून एक काढून टाकला पाहिजे कि गनिमीकाव्याचा शोध महाराजांनी लावला. महाराजांनी फक्त त्याचा यथोचित उपयोग केला. गनिमी काव्याचा प्रथम उल्लेख इ स पूर्व ६०० ते ५०१ एका चाइनीस पुस्तकात येतो ज्याचा नाव आहे 'आर्ट ऑफ वॉर', खूप वाचनीय पुस्तक आहे हे. याचाच अर्थ महाराजांचा आणि व्हिएतनाम युद्धाचा काही ही संबंध नाही.
३) व्हिएतनाम मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा
आता जर व्हिएतनामी लोकांना महाराज माहित नाहीत तर त्यांचा पुतळा ते का उभारतील. मी स्वतः व्हिएतनाम भटकलोय पण मला स्वतः ला एकदाही तो पुतळा दिसला नाही वा खुद कोणत्या व्हिएतनामी माणसाला दिसला नाही. आपल्या अभ्यासकांना कसा दिसला माहित नाही असो.
गूगलवर 'shivaji staue in vietnam' शोधल्यावर लांबून एक घोड्यावर बसलेल्या योध्याचा फोटो दिसतो. तो एका माणसाने तो ट्विट केलेला आहे. तो पुतळा दक्षिण व्हिएतनाम मधील एक शहर होचिमिन सिटी (जुनं नाव सैगोन) मधील आहे त्याच्या मागे एक फुलाच्या कळी सारखी काचेची इमारत दिसते तिचा नाव आहे 'Bitexco Financial Tower'. तो एक व्हिएतनामी राज्याचा पुतळा आहे त्याचा नाव आहे 'Trần Nguyên Hãn'. आणि त्याच्या हातात कबुतर आहे. जास्त माहितीसाठी सोबत छायाचित्र जोडली आहेत. याचा अर्थ तो पुतळा महाराजांचा नाही .
४) होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता आणि शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ' छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे'
होची मिन यांचा कार्यकाळ १९ फेब्रुवारी १९५१ ते २ सप्टेंबर १९६९. यांना व्हिएतनामचे राष्ट्रपिता म्हणतात. त्यांच अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे एक्दम साधी राहणी. या माणसाचं सगळ्यात मोठा वैशिष्ठ्य म्हणजे ते व्हिएतनामचा खुपमोठा ऊर्जा स्रोत होते आणि आजही आहेत. आणि तो ऊर्जास्रोत कायम राहावा म्हणून व्हिएतनामच्या लोकांनी त्यांचा देह आजून ही जपून ठेवला आहे. रोज हजारो लोक आजही त्यांचं दर्शन घेतात. त्यांच्या नावावरून दक्षिण व्हिएतनाम मध्ये एका शहराचा नाव ठेवलेले (होची मिन सिटी )आहे त्या शहराचा जुना नाव आहे सैगोन.
त्यांची कबर हनोइ नावाच्या शहरात आहे. तेथे त्यांचा देह प्रक्रिया करून लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे. तेथे कुठे ही असा काहीलीहलेले नाही. होची मिन यांनी लेनिन, कम्युनिसम (comunisum) चा अभ्यास केला शिवाजी महाराजांचा नाही.
होचि मिन यांची मला आवडलेली काही वाक्य
"Remember, the storm is a good opportunity for the pine and the cypress to show their strength and their stability."
"You can kill ten of our men for every one we kill of yours. But even at those odds, you will lose and we will win."
जि• अहमदनगर ता •
जि• अहमदनगर
ता • श्रीगोंदा
येथील शेडगाव या गावात
झुंबरराव जांभळे यांच्याकडे वैशिश्ट्य पुर्ण मलम मिळ्तो
उदा• 10 ते 80% पर्यंत भाजलेल शरीर पुर्णतह: 1 महिन्यात नीट होते
आत्तापर्यत त्यांच्या कडे हजारो माणसे ,जनावरे नीट झाली आहेत
(कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत)
कृपया हा मेसेज दुसर्या ग्रृपवर Send करा कोणाला त्याचा फायदा होईल
संपर्क- 9822808609
=9545487093
पण व्हिएतनाम मधे शिवाजी
पण व्हिएतनाम मधे शिवाजी महाराजांचा खरोखर पुतळा आहे का? नेटवर तर कुठे सापडला नाही.
अरे वरची पोस्ट अर्धीच पेस्ट
अरे वरची पोस्ट अर्धीच पेस्ट झाली का?
आता आलीये पुर्ण पोस्ट, ही फेसबुकवर Abhijit Wagh यांनी टाकली आहे
पुर्ण पोस्ट नाही आहे पण
पुर्ण पोस्ट नाही आहे पण शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्यापासून पर्यटन, सागरी संरक्षण इतकेच नव्हे तर मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांसाठी उर्जानिर्मीती घडेल असा फॉरवर्ड आला होता. अर्थात हे सर्व मोदीजींच्या कृपेने होणार आहे हे ओघाने आलेच.
हा धागा आरोग्यम धनसंपदा या
हा धागा आरोग्यम धनसंपदा या विभागात का उघडला असावा ?
शिवाजी महाराजांशी संबंधित अफवांसाठी दुसरा धागा उघडणे अशक्य आहे का ? कि धागा कसा उघडतात हे माहीत नाही म्हणून इथेच ?
एकदम ताजा (नया है यह
एकदम ताजा (नया है यह कॅटेगरी): डच सरकारने कायदा करून शाळेतून भगवद्गीता पठण सक्तीचं केलय!
छत्रपती संभाजी राजे.. वजन -
छत्रपती संभाजी राजे..
वजन - 220 किलो
ऊंची - 7 फुट 8 इंच
जेवण - 35-40 भाकरया दिवसातून
दोनदा
तलवारीचे वजन - 65 किलो
पराक्रम - 203 युद्ध लढले एकही न हरता
सर्वात मोठे युद्ध- समोर शत्रूचे 5 लाख
सैन्य
उभे व आपले सैन्यबळ फ़क्त 37 हजार असून
सुद्धा स्वराज्याला विजय प्राप्त करून
देणारा एकमेव शुर.
एकाच युद्धात जवळ जवळ 2 लाख शत्रुंना
एकटाच मृत्युमुखी पाडणारा जगातील
एकमेव
योद्धा.
अरे आपल्याला साधा 15 किलो चा
सिलिंडर
उचलवत नाही तर विचार करा आपल्या
वजनाइतक्या जड़ तलवारि उचलून कसे काय
युद्ध जमत असेल या मावळ्यांना.. गर्व बाळगा
की असे शूरवीर आपल्या महाराष्ट्राच्या
मातीत जन्माला आले.
आता मला सांगा खरा हीरो कोण
बाहुबली की
आपले संभाजीराजे.....!
Next
Marathi Jokes
बहुतेक हा धागा आरोग्य या
बहुतेक हा धागा आरोग्य या ग्रुपमधून हलवलेला दिसतोय. सर्वांनीच लाभ घ्यावा. सर्वच विषयावरचे फॉर्वर्ड्स डकवण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
आता मला सांगा खरा हीरो
आता मला सांगा खरा हीरो कोण
बाहुबली की
आपले संभाजीराजे.....! >>>
आता मधेच "बाहूबली" कुठून आला?
मी कालच एका कुठल्यातरी
मी कालच एका कुठल्यातरी राजस्थानातल्या अंबाबाई प्रसन्न असलेल्या बाबाबद्दल वाचलं. तो म्हणे काहीतरी ६०-७० वर्षं काहीही न खाता-पिता आणी तदनुषंगाने येणारे बाकी शारिरीक विधी न करता जगतोय.
हे ऋन्मेशला सांगा नविन
हे ऋन्मेशला सांगा नविन धाग्याची सोय होईल
ऋन्मेष ला धाग्यांच्या कल्पना
ऋन्मेष ला धाग्यांच्या कल्पना देणारे आपण कोण पामर? त्या बाबतीत तो स्वयंभू आहे.
तो स्वयंभू आहे पण विस्तव
तो स्वयंभू आहे पण विस्तव पेटवायला काडीची गरज लागते ना
मी कालच एका कुठल्यातरी
मी कालच एका कुठल्यातरी राजस्थानातल्या अंबाबाई प्रसन्न असलेल्या बाबाबद्दल वाचलं. तो म्हणे काहीतरी ६०-७० वर्षं काहीही न खाता-पिता आणी तदनुषंगाने येणारे बाकी शारिरीक विधी न करता जगतोय.
>>> ह्या बाबाची हॉस्पिटलमधे काही दिवस ठेवून डॉक्टरांनी रितसर तपासणी केली होती म्हणे,,,,
अवश्य वाचा... .
अवश्य वाचा... .
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?( गल्ली बोळातील नाही)
अध्यात्म आणि सायन्स
!! श्री !!
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभिगातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस वभवतालात पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरातजरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हामोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..
शुभंम् भवतू !!
होय, कॅन्सरच्या उपचारासाठी
होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.
कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो.
सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.
धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.
आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.
विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.
बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे. सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.
का दडपले गेले विटॅमिन बी-१७
विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.
कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.
याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.
आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते.
कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा
एकंदरीतच प्राचीन भारतीय
एकंदरीतच प्राचीन भारतीय संस्कृतीत (ते ऋषी-मुनी, त्या ऋचा, ते वेद - उपनिशदं, एकंदरीतच महान संस्कृती) जगातल्या जुन्यातल्या जुन्या, अगदी काल-परवा निर्माण झालेल्या आणी अजून निर्माण हे न झालेल्या सर्व क्षेत्रातल्या, सर्वच समस्यांवर उपाय आहेत हे व्हॉट्सअॅप आल्यापासून सिद्ध झालेलच आहे.
अय्या, सफरचंदाच्या बियांचा
अय्या, सफरचंदाच्या बियांचा मुरांबा/चटणी? ती ही महाराष्ट्रात? पिढ्यानुपिढ्या आधी?
तुम्ही पण ना...आपले म्हंटल कि
तुम्ही पण ना...आपले म्हंटल कि लगेच फक्त महाराष्ट्रीयन असा संकुचित अर्थ घेता,
आपल्या स्त्रिया म्हणजे या भारत वर्षातील स्त्रिया.
पण सफरचंदाच्या बिया खातात हे मला नवीन आहे.
Warning from Indian Oil !!
Warning from Indian Oil !!!Due to increase in temperature in the coming days, please don't fill petrol to the maximum limit. It may cause explosion in the fuel tank. Please fill the tank about half and allow space for air. This week 5 explosion accidents have happened due to filling petrol to maximum. Don't just read the message and stop. Let others and your family members who drive also know about it so that they can avoid this mistake...Please DO SHARE THIS MESSAGE.
पाश्च्यात्यांनी टाकलेलं ते ते
पाश्च्यात्यांनी टाकलेलं ते ते आपण घ्यायचं हा प्रकार व्हॉट्स अॅप जनहितार्थ लेखक मंडळींनीही सुरू केला?
https://www.quackwatch.org/01QuackeryRelatedTopics/Cancer/laetrile.html
धोक्याचा इशारा! दुर्लक्ष करू
धोक्याचा इशारा! दुर्लक्ष करू नका
काळजी घ्या.
P/500 असे लिहलेल्या गोळ्यांचे तापाचे औषध घेऊ नये... हे नवीन औषध एक अत्यंत पांढरी शुभ्र आणि चमकदार Paracetamol(तापाची गोळी) आहे.
डॉक्टरांच्या माहीतीप्रमाणे सिद्ध केले आहे की यात "Machupo Virus व्हायरस(विषाणू) जो जगातील सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक मानला जातोय आणि या औषधामुळे मृत्युचे प्रमाण खूप जास्त आहे .
सर्व लोकांना आणि कुटुंबांना हा संदेश शेअर करा, आपल्या या कार्यामुळे त्यांचाही जीव वाचू शकतो ..... माझं कर्तव्य मी पूर्ण केले, चालूच राहील... आता आपली वेळ आहे ...
लक्षात ठेवा, देव त्यांनाच मदत करतो जे इतरांना मदत करतात.
*Cholesterol* is finally
*Cholesterol* is finally officially removed from Naughty List
The US government has finally accepted that *cholesterol* is not a _nutrient of concern_. doing a U-turn on their warnings to us to stay away from high-cholesterol foods since the 1970s to avoid heart disease and clogged arteries.
This means eggs, butter, full-fat dairy products, nuts, coconut oil and meat have now been classified as *safe* and have been officially removed from the _nutrients of concern_ list.
The US Department of Agriculture, which is responsible for updating the guidelines every five years, stated in its findings for 2015: "Previously, the Dietary Guidelines for Americans recommended that cholesterol intake be limited to no more than 300 mg/day.
"The 2015 DGAC will not bring forward this recommendation because available evidence shows no appreciable relationship between consumption of dietary cholesterol and serum (blood) cholesterol, consistent with the AHA/ACC (American Heart Association / American College of Cardiology)
The Dietary Guidelines Advisory Committee will, in response, no longer warn people against eating high-cholesterol foods and will instead focus on sugar as the main substance of dietary concern.
US cardiologist Dr Steven Nissen said: _It's the right decision_. _We got the dietary guidelines wrong. They've been wrong for decades_."
"When we eat more foods rich in this compound, our bodies make less. If we deprive ourselves of foods high in cholesterol - such as eggs, butter, and liver - our body revs up .
The Real Truth about Cholesterol
The majority of the cholesterol in you is produced by your liver. Your brain is primarily made up from cholesterol. It is essential for nerve cells to function. Cholesterol is the basis for the creation of all the steroid hormones, including estrogen, testosterone, and corticosteroids. High cholesterol in the body is a clear indication
which shows the liver of the individual is in good health.
Dr. George V. Mann M.D. associate director of the Framingham study for the incidence and prevalence of cardiovascular disease (CVD) and its risk factors states: _Saturated fats and cholesterol in the diet are not the cause of coronary heart disease_. _That myth is the greatest deception of the century, perhaps of any century_
*Cholesterol is the biggest medical scam of all time*
There is no such thing as *bad Cholesterol*
So you can stop trying to change your Cholesterol level. Studies prove beyond a doubt, cholesterol doesn't cause heart disease and it won't stop a heart attack. The majority of people that have heart attacks have normal cholesterol levels.
OUR BODY NEEDS 950 mg OF CHOLESTEROL FOR DAILY METABOLISM AND THE LIVER IS THE MAIN PRODUCER.
ONLY 15% OF CHOLESTEROL IS BEING DONATED BY THE FOOD WE EAT. If the fat content is less in our food we eat, our liver
Got to work more to maintain the level at 950 mg. If the cholesterol level is high in our body, it shows the liver is working perfect.
Experts say that there is nothing like LDL or HDL.
…………..
….. *Cholesterol is not found to create block any where in human body*.
Please share the recent facts about CHOLESTEROL
https://www.washingtonpost.com/news/wonk/wp/2015/02/10/feds-poised-to-wi...
From whatsapp university.....
From whatsapp university.....
❤
*Heart Attacks And Drinking Warm Water:*
```This is a very good article. Not only about the warm water after your meal, but about Heart Attack's . The Chinese and Japanese drink hot tea with their meals, not cold water, maybe it is time we adopt their drinking habit while eating. For those who like to drink cold water, this article is applicable to you. It is very Harmful to have Cold Drink/Water during a meal. Because, the cold water will solidify the oily stuff that you have just consumed. It will slow down the digestion. Once this 'sludge' reacts with the acid, it will break down and be absorbed by the intestine faster than the solid food. It will line the intestine. Very soon, this will turn into fats and lead to cancer . It is best to drink hot soup or warm water after a meal. Drink one glass of warm water just when you are about to go to bed to avoid clotting of the blood at night to avoid heart attacks or strokes.
A cardiologist says if everyone who reads this message sends it to 10 people, you can be sure that we'll save at least one life. ...```
*Please share this article to people you care about.*
ऍसिडीटी कमी करायचा हमखास उपाय
ऍसिडीटी कमी करायचा हमखास उपाय, आचमन करणे,
पण ऍसिडिटी कमी करायचा हा उपाय केवळ ब्राह्मवृन्दापर्यंतच का सीमित राहिला न कळे,
>>>>>>>
आचमन का करायचे?
समाजात गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत २५ ते ३० वेळा आचमन सांगितले आहे. स्नानाअगोदर लघुशंका आचमन सांगितले आहे. (कामतांच्या गुरुचरित्रात) माझ्या दृष्टीने गुरुचरित्र लिहिणारे सामान्य लेखक किंवा कवी नव्हते. त्यामुळे शेकडो वर्षे गुरुचरित्र टिकून आहे. हल्ली ५० वर्षापूर्वीचे लेखकांचे साहित्य मिळत नाही. गुरुचरित्र मात्र टिकून आहे. म्हणून मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले . शरीर हलके वाटू लागले. असिडिटी कमी झाली. नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे ? तसेच आहे.
आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच वापरले. फक्त आम्हाला ते माहीत नाही म्हणून टाकाऊ म्हणून आम्ही ते सोडून दिले.
>>>>>
Pages