Submitted by अजय on 3 January, 2017 - 16:38
नेटफ्लिक्स अॅमेझॉन, हुलू सारख्या अधिकृत , पायरसीमुक्त स्ट्रिमिंग सर्विसेस वर उपलब्ध होणार्या मराठी चित्रपटांबद्दलची चर्चा.
नेटफ्लिक्स वर मधूनच मराठी चित्रपट उपलब्ध होत असतात. काही चित्रपटांची टायटल्स इंग्रजीत असल्यामुळे जर चित्रपट माहीती नसेल तर नुसते पोस्टर पाहून तो मराठी असेल याचा पत्ताही लागत नाही. इथे लिहण्याचा आणखी कि उद्देश म्हणजे इंग्रजीत सबटायटल असतील तर परदेशात वाढलेल्या आणि मराठी कच्चे असणार्या मुलांबरोबरही पाहता येतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री लिहायच्या आधीच लिहून
श्री लिहायच्या आधीच लिहून घेतो 'सैराट'
१००० रूपयांची नोट हा देखील
१००० रूपयांची नोट हा देखील आला आहे. ( आता त्याचे नाव बदलून २००० ची करावे का )
१००० रु.ची नोट मी पाहिला. वन
१००० रु.ची नोट मी पाहिला. वन टाईम वॉच आहे पण आवडला.
गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर
गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर मराठी सिनेमा नेटफ्लिक्स वर पाहिला.
एक हजाराची नोट.
खूप दिवसांनी इतका सुंदर मराठी सिनेमा पाहिला. अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन, चित्रिकरण, गाणी सगळ्याच बाबतीत सुंदर.
इंग्रजी सबटायटल आहेत पण २-५ मिनिटाची पोलीस चौकितली भाषा पीजी-१३ रेटींग मधे बसेल अशी आहे. मुलांबरोबर पहायला हरकत नाही.
अजिबात चुकवू नका.
नेटफ्लिक्सवर 1000 Rupee Note नावाने आहे.
(पीफ, प्रभात पुरस्कार याबद्दल २०१४, २०१५ मधे मायबोलीवर जे लिहून आले आहे त्यात अनेकांना हा चित्रपट खूप आवडल्याचे उल्लेख आहेत. पण परदेशात राहणार्या मायबोलीकरांना हा आताच अधिकृत रितीने नेटफ्लिक्स वर ऑनलाईन पाहण्याची संधी मिळते आहे. )
उपयुक्त धागा. अजून इतर
उपयुक्त धागा. अजून इतर स्ट्रिमिंग सर्विसेस मधे (उदा: अॅमेझॉन प्राइम) मराठी दिसलेले नाहीत पण दिसले तर लिहायला हवे येथे.
नेफिवर फॅण्ड्री अनेक दिवसांपासून आहे.
फारएण्ड, योग्य सूचना. वर बदल
फारएण्ड,
योग्य सूचना. वर बदल केला आहे.
चांगला धागा. काही
चांगला धागा.
काही वर्षांपुर्वी (नेटफ्लिक्स नविन होते तेव्हा) "हरिश्चंद्राची फॅक्टरी" ही उपलब्ध होता. आता अर्थात ही माहिती आऊटडेट झाली आहे. पण नोंद असायला हरकत नाही म्हणून लिहीते आहे.
आता नेटफ्लिक्स भारतातही आहे.
आता नेटफ्लिक्स भारतातही आहे. तिथे जास्त मराठी चित्रपट असतात का याबद्दल कोणी भारतात सबस्क्राईब करत असतील त्यांनीही लिहा.
अमोल पालेकर आणि शर्मिला
अमोल पालेकर आणि शर्मिला टागोरचा 'समांतर' हा चित्रपट काही वर्षांपुर्वी पाहिला होता.
एक हजाराची नोट आवडला.
अमेझॉन प्राईम व्हिडिओ इथे आहे
अमेझॉन प्राईम व्हिडिओ इथे आहे उपल्ब्ध पण लेटेस्ट मराठी मूव्हीज नाहीत. त्यापेक्षा थेट्रात सोपं पडतं... नपेक्षा काही दिवसांनी टिव्हीवर येतातच त्या...
एक हजारांची नोट अतिशय सुरेख
एक हजारांची नोट अतिशय सुरेख सिनेमा आहे
नवीन नाही, पण अॅमेझॉन
नवीन नाही, पण अॅमेझॉन प्राईमवर भेट हा २००२ सालचा सुंदर चित्रपट आहे. टीव्हीवर कधी लागत नाही. जरूर पहा.
अरे वा! बरं झालं धागा काढलात
अरे वा! बरं झालं धागा काढलात ते. कैतरी खराब प्रिंट ऑनलाईन बघण्यापेक्षा मराठी पिक्चर पैसे देऊन बघायला नक्कीच आवडेल.
अरे वा छान धागा. मला वजनदार
अरे वा छान धागा. मला वजनदार पाहयचा आहे.
श्री | 4 January, 2017 -
श्री | 4 January, 2017 - 20:51
काय यार असामी, पत्ता कट केलासं लगा !
>>>
असु दे..म्य तरी पण परत लिहनार... सैराट.. त्यांचा फॅन्ड्री पण आहे नेटफ्लिक्स वर..
(माझ्य काही स्वीडिश मित्रांना सजेस्ट केलेला मी तो... त्यानी पाहीला आणि खुप आवडला त्याना...)
आपला "श्वास" आहे का कुठे ? तो
आपला "श्वास" आहे का कुठे ? तो पण त्याना सजेस्ट करायचा आहे..
एक हजाराची नोट पाहिला.
एक हजाराची नोट पाहिला. सुरुवातीला संथ आहे, गावातले सगळे लोक कसे सज्जन, कनवाळू (नक्की अर्थ माहित नाही या शब्दाचा), व सचोटीने वागणारे असतात!
नंतर मात्र पोलीस चौकी तले लोक कसे साफ वेगळे हे कळते. ते लोक ट्रंपपेक्षा हुषार आहेत. पैसा केला नि प्रकरण दाबून टाकले. आता बुढी नि सुदामा अशिक्षित, गरीब होते म्हणून त्यांचे हाल झाले पण तो त्यांचाच दोष!!!
शेवट फारच चांगला आहे.
नेट्फ्लिक्सवर काही हिंदी
नेट्फ्लिक्सवर काही हिंदी सिनेमे आहेत जे फक्त ABCD category साठी बनवलेले आहेत असे वाटते:
'अमरिका'
' today's special'
अजुन एक शबानाचा आहे. नाव लक्षात नाही. उद्या पाहुन अपडेट करते.
मला एक मदत हवी आहे.
मला एक मदत हवी आहे. नेटफ्लिक्स कसं काम करतं? म्हणजे, आपल्याला हवी ती मूव्ही आपण ऑर्डर/खरेदी करू शकतो की त्यांनी त्या त्या वेळेस ज्या मूव्हीज उपलब्ध केल्या असतील त्यातून निवडावं लागतं? मराठी मालिका पण आहेत का उपलब्ध...प्लीज कोणी सांगा.
ज्या मूव्हीज उपलब्ध केल्या
ज्या मूव्हीज उपलब्ध केल्या असतील त्यातून निवडावं लागतं. पण जसेजसे आपण पाहत जातो. आपल्या आवडीचा ट्रॅक ठेवुन नवीन मुव्हीज अॅड होतात. मराठी मालिका युएसमध्ये तरी नाहीत. ईंग्रजी मालिका आहेत. हिंदी आहेत. (सिआयडी का कुठली तरी आहे). बाकी असतील तर ठाउक नाही.
ओके. तत्पर प्रतिसादासाठी
ओके. तत्पर प्रतिसादासाठी धन्यवाद राया.
यु ट्युब* पण ॲड करा, आफ्टरआॅल
यु ट्युब* पण ॲड करा, आफ्टरआॅल दे आर पायनियर्स इन विडियो स्ट्रिमींग. आणि त्यांचा मराठी चित्रपटांचा संग्रह बराच मोठा आहे - नेटफ्लिक्स, हुलु, ॲमेझान कंबाइन्ड टुगेदर...
* = आॅथरायझ्ड डिस्ट्रीब्युशन आणि पे पर व्यु
हुलुवर ० आहेत.
हुलुवर ० आहेत.
अजुन एक शबानाचा आहे. नाव
अजुन एक शबानाचा आहे. नाव लक्षात नाही. उद्या पाहुन अपडेट करते.>> A Decent Aarrangement.
हा धागा "मराठी
हा धागा "मराठी चित्रपटांबद्दल" आहे.
राज ला अनुमोदन. युट्युब मुळे
राज ला अनुमोदन.
युट्युब मुळे खरंच खूप मराठी चित्रपट, जुने विशेषतः परत बघणं शक्य झालं.
admin | 5 January, 2017 -
admin | 5 January, 2017 - 09:28 नवीन
हा धागा "मराठी चित्रपटांबद्दल" आहे. >>>
मला पण हेच म्हणायच होत..!!
१. संहिता -
१. संहिता - https://www.youtube.com/watch?v=PvgnHggnhII
अमितव, अधिकृत आणि मराठी.
अमितव,
अधिकृत आणि मराठी.
हा वाद करू इच्छित नाही.
हा वाद करू इच्छित नाही. कायद्यात अडकायचं नसेल तर त्या तिकडे आलंय असं लिहू.
असो. जाउद्या.
Pages