प्रस्तावना
८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० रूपयांच्या नोटांच्या Demonetization ची घोषणा केली, आणि सारा देश ह्या घोषणेमुळे निर्माण झालेल्या उलाढालीत बुडून गेला. काळ्या पैशांच्या व नकली नोटांच्या विरोधात घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. ह्या अकस्मात् सांगितलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसांचे विस्कळीत झालेले जीवन आता दोन आठवड्यांनी थोडे जास्त सुरळीत झाले आहे, परंतु अजूनही ते पूर्वपदावर आलेले नाही. किंबहुना ते काही महिने येणार नाही, अशी चिन्हे आहेत. सरकारच्या ह्या निर्णयाचे नजीकच्या काळातील परिणाम दिसून येत आहेत, बहुतांशी ते गैरसोयीचे आहेत असे वाटते, परंतु अजूनही प्रामुख्याने जनता शांत आहे. विरोधकांनी बंदची हाक दिलेली असली, तरी उत्स्फूर्तरीत्या लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेले नाहीत. मोदी सरकारच्या जनाधाराचा आणि काळ्या पैशाविरोधात लोकांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाचा हा परिपाक आहे, असे नि:संशय म्हणायला हरकत नाही. परंतु मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या वर्गाने ह्या निर्णयाची पिसे काढलेली आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी सरकारच्या ह्या पावलाची संभावना 'महान कुव्यवस्थापन' व 'संघटित लूट' अशा शब्दांत केलेली आहे. एकंदरीतच ह्या सर्व प्रकारातून मतांचा मोठा गलबला निर्माण झाला आहे. मी स्वतः 'ह्यावर काही दिवस विचार केल्याशिवाय निष्कर्ष काढू शकत नाही' ह्या मताशी आलो होतो. आता ती वेळ आली आहे असे मला वाटते, आणि म्हणूनच हा लेख. मी काही अर्थशास्त्रज्ञ नाही, किंवा अर्थशास्त्राशी निगडित क्षेत्रांत माझे विधीवत शिक्षण झालेले नाही. त्यामुळे ह्यात काही चुका अर्थातच असू शकतात. त्याबद्दल आधीच क्षमा मागतो. सर्व वाचायचा कंटाळा आल्यास उपोद्घातात सारांश वाचायला मिळेल.
काळी संपत्ती आणि काळे उत्पन्न (Black Wealth and Black Income)
काळा पैसा म्हणजे काय, ते आतापर्यंत बर्याच वेळा उगाळून झाले आहे, त्यामुळे तो विषय काही मी पहिल्यापासून मांडत नाही. पण त्या अनुषंगाने आलेले काही विचार महत्वाचे, आणि म्हणून मांडावेसे वाटतात. इन्कम अर्थात उत्पन्नाचा काही भाग आपण वाचवून त्याचे संपत्तीत रूपांतर करत असतो. इन्कम टॅक्स हा आपण उत्पन्नावर भरत असतो, तर संपत्तीवर आपण मुख्यत्वे अप्रत्यक्षरीत्या सर्व्हिस टॅक्स, सेस, व्हॅट इ. कर खर्च करत असताना भरत असतो. निश्चलनीकरणाच्या चालीने काळ्या संपत्तीचा काही (किती त्यावर पुढे विवेचन येईलच) भाग पुन्हा कधीच वापरात येणार नाही, असा अंदाज आहे. परंतु काळ्या उत्पन्नाच्या निर्माणाचे मार्ग ह्या चालीने बंद होत नाहीत, हा एक मुद्दा आहे. काळे उत्पन्न निर्माण करणार्यांवर ह्यायोगे नजर ठेवता येऊ शकेल, हा एक मुद्दा आहे, परंतु ते आधीच का करता आले नव्हते, आणि हे काम अधिक अचूकतेने करण्यासाठी काय पावले उचलली गेली आहेत, ह्याविषयी सरकारने काही सांगितलेले नाही. त्यामुळे नवीन काळे उत्पन्न निर्माण होतच राहिले, तर सरकारच्या हा निर्णय कमी क्षमतेचा ठरेल.
काळी संपत्ती ही सर्वच रोख स्वरूपात असत नाही. सोन्यातील गुंतवणूक, जमिनीतील गुंतवणूक, परकीय चलन, असे अनेक पाय तिला फुटलेले असतात. ब्रिफकेसमध्ये नोटाच्या नोटा घेऊन जाणारे स्मगलर हे चित्र १९७०-८०च्या चित्रपटांत जास्त शोभून दिसते, व तेव्हा तसे ते व्हायचेही, परंतु आता लोकांकडे जास्त जटिल मार्ग आहेत, असे वाटते. ह्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेचा एक अंदाज 'मनी' येतो. (श्लेष करण्याचा मोह आवरत नाही.) रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार १३ लाख कोटी रुपये हे ५०० व १००० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात वापरात असावेत. त्यातील २ ते ३ लाख कोटी रुपये ह्या निर्णयाअंतर्गत अडकले असावेत, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.[१] भारतीय लोकसंख्येच्या सर्वोच्च श्रीमंत स्तराच्या म्हणजे प्रोव्हर्बियल १% लोकांकडे, म्हणजेच जवळपास १-१.२५ कोटी लोकांकडे. ह्यातली बरीच संपत्ती आहे, असे गृहीत धरले, तरी ऑन अॅन अॅव्हरेज त्या प्रत्येकाकडे
३ लाख कोटी / १ कोटी = ३ लाख रुपये
अडकले असावेत. गेल्या काही दिवसांत पुढे आलेली 'लूपहोल्स' (जनधन अकाउंट्स, सोनारांकडे बॅकडेटेड खरेदी, बॅकडेटेड लॅण्ड अॅग्रीमेंट्स, इ.), तसेच एक्झिस्टींग लूपहोल्स (पेट्रोलपंप इ.) पाहता ही इतकी रक्कम पांढरी करणे कितपत कठीण आहे, असे मनाला वाटल्याशिवाय राहत नाही.
ह्या संदर्भाने भारताच्या जीडीपीशी ब्लॅक इकॉनॉमीची तुलना करावीशी वाटली. थोड्याशा इंटरनेट सर्चनंतर एक रेफरन्स मिळाला, ज्यानुसार २०१४ सालात ब्लॅक इकॉनॉमीचा आकार जवळपास ९० लाख कोटी एवढा होता. [२] जीडीपीशी तुलना करता हा आकडा भीतीदायकच आहे (जवळपास ६०-८०%, जीडीपी कसे मोजतात त्या पद्धतीवर अवलंबून), परंतु वरील ३ लाख कोटींचा आकडा हा जवळपास ९० लाख कोटींच्या ३-४% असेल, हे लक्षात येते. त्यावरून रोख रकमेचा ब्लॅक इकॉनॉमीत वाटा किती, हे कळते, आणि ह्या निर्णयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.
कॅशलेस इकॉनॉमी
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार ऑगस्ट २०१६ मध्ये नंबर ऑफ आउटस्टँडिंग डेबिट कार्ड्स इन इंडिया हा जवळपास ७१ कोटी होता. ह्या कार्डांनी ७५ कोटी एटीएम ट्रान्झॅक्शन्स आणि १३ कोटी स्वाईप/ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स झाली. [३] ह्यावरूनच खरेतर भारताच्या कॅश-बेस्ड इकॉनॉमीचा आवाका लक्षात येतो, कारण बहुतांशी लोक एकदातरी एटीएममध्ये जाऊन कॅश काढतात, परंतु तेच पेमेंट स्वाईप करून होण्याची संख्या लक्षणीयरीत्या कमी आहे असे दिसते. ८६% चलनाचे निर्धनीकरण केल्यानंतर हे आकडे कसे बदलतील, हे पाहणे महत्वाचे आहे. सध्यातरी माझा (वैयक्तिक आडाख्यांवर आधारित, अॅनेकडोटल) अंदाज आहे, की जवळपास ५०% ट्रान्झॅक्शन्स कमी झालेली आहेत (दुकाने निम्म्याने रिकामी?). असा अंदाज बहुधा गणितानेही वर्तवता येईल, व एक ढोबळ गणित मनात करून बघता तो बरोबरही वाटतो, पण मी ते खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. ही दरी कार्ड ट्रान्झॅक्शन्स कितपत भरून काढतील, हे भविष्य मी तरी वर्तवू शकत नाही. परंतु सामाजिक जडत्व बघता एकदम काही महिन्यांत हे होणे अशक्यप्राय वाटते. त्यामुळेच पुढचे काही क्वार्टर्स तरी क्रयशक्तीवर परिणाम होऊन जीडीपी कमी होईल, हे बरोबर वाटते. मनमोहन सिंगांनी त्यांचा २%चा अंदाज कसा आला, ते सांगितलेले नाही, हे त्यांच्या भाषणाचे एक न्यून आहे. अशाच सगळ्या फॅक्टर्सचा त्यांनी विचार केला असावा, असे वाटते.
ह्या सर्वांचा परिणाम इकॉनॉमिक अॅक्टिव्हिटीवर झाला असावा. मोठी शहरे सोडून इतर शहरांत इलेक्ट्रॉनिक पेमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही चांगले नाही. एका स्टडीनुसार २०१३मध्ये हाऊसहोल्ड एक्स्पेन्सेसच्या १.३८% खर्च हे नॉन-कॅश मेथड्सने झाले असावेत. (शहरी भागातदेखील हे प्रमाण फक्त २.९२% आणि ग्रामीण भागात ०.५५% असावे.) [४] हे प्रमाण लगेच बदलणार नाही. अगदी युरोपातदेखील २००८मध्ये रिटेल खरेदीपैकी जवळपास ७८% खरेदी ही कॅशमध्येच झाली. [५] ह्यावरून रोख रकमेचा मानवी समाजावर किती पगडा आहे, हेच दिसते. ह्या सर्वांवरून, आणि विविध अनुभवांवरून, ग्रामीण भागात सध्या जीवन कठीण झाले असावे, असे वाटते. विशेषतः शेतकर्यांना शेतमालाची खरेदी, मजुरांना मजुरी देणे, वाहतूकदारांना पैसे देणे, हे कठीण होऊन बसले असावे, असे दिसते. ह्याचे दूरगामी परिणाम ह्यावर्षीच्या पिकावर होणार नाहीत, अशी आशा मनात आहे.
सामाजिक किंमत
हा मुद्दा तसा अप्रत्यक्ष आहे, परंतु महत्वाचा वाटतो. सरकारचा निश्चलनीकरणाचा निर्णय वरकरणी योग्य आणि धाडसी वाटला, तरी त्यासंदर्भात अनेक उलटसुलट निर्णय पश्चात घेतले गेले आहेत. ८ नोव्हेंबरला ३० डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याची घोषणा केली गेली असता आता २४ नोव्हेंबरला ते पैसे फक्त बँकेत जमा करता येतील, अशी काहीशी घोषणा केली गेली. ह्याव्यतिरिक्त रक्कम काढण्याची मर्यादा, जुन्या नोटा अजूनही वापरता येतील अशी ठिकाणे, ह्यांबद्दल वेळोवेळी निर्णय बदलले गेले. सरकारने निर्णय जाहीर करूनही लिखित ऑर्डर न आल्याने त्याप्रमाणे लगेच अंमलबजावणी न झाल्याने गोंधळाचे चित्र उभे राहिले. असे असताना सरकारच्या निर्णयावर व विशेषतः त्याच्या अंमलबजावणीवर प्रश्न करणे, म्हणजे देशद्रोह, किंवा तसे करण्यामागे कारण म्हणजे असलेला काळा पैसा, असे चित्र उभे करण्यात येत आहे. कोणा अमुकतमुक माणसाने असे म्हटलेले नसून प्रत्यक्ष मोदी ह्यांनी असे म्हटलेले आहे - "Those who are criticising the demonetisation don't have problem with the government's preparedness, they have a problem because they didn't get time to prepare (to turn their black money into white)," PM Modi said. [६] त्यामुळे हे विधान इग्नोर करता येणार नाही. ह्यामुळे भारतीय समाजात असलेली दरी अजून वाढली, तर त्याची एक 'सोशल कॉस्ट' अर्थात सामाजिक किंमत देशाला भोगावी लागेल, अशी भीती वाटते. समाजातील विविध घटकांचे मार्जिनलायझेशन अशाने वाढीस लागेल. 'आपल्याशी असहमत असलेली व्यक्ती देशद्रोही आणि काळाबाजारवाली' ही व्याख्या अत्यंत चुकीची, घातक, आणि निषेधार्ह आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे गोरगरिबांवर आणि आर्थिकदृष्ट्या अशक्त असलेल्या घटकांवर ह्या निर्णयाचा परिणाम उल्लेखनीय होणार नाही, हे मानणे चुकीचे आहे. ह्या घटकांचे म्हणणे मांडणार्यांवर लेबलांचा वर्षाव होणे, हे खेदजनक आहे.
ह्याचबरोबर न्यायाच्या Innocent Until Proven Guilty ह्या तत्वाचा कळतनकळत भंग झाला आहे, असे वाटते. (मोदींच्या वाक्यातूनही हे दिसते.) रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असलेली नोट सरसकट रद्दबातल ठरवून 'जोपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवत नाही, तोवर दोषी' असे काहीसे म्हटल्यासारखे वाटते. ह्या तत्वाची पायमल्ली मुक्त समाजव्यवस्थेसाठी आणि लोकशाहीसाठी 'इन प्रिन्सिपल' घातक आहे. 'निर्दोष व्यक्तीला शिक्षा नको' असे म्हणता 'दोषींना शिक्षा देण्यासाठी निर्दोष व्यक्तीनेही त्रास भोगावा' असे म्हणण्यासारखे आहे. एकंदरीतच ह्यामुळे व तडकाफडकी निर्णयांमुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ नये, अशी आशा.
टॅक्स आणि बँकांवर परिणाम
बर्याच महानगरपालिकांमध्ये ह्यानिमित्ताने जवळपास चौपटीने, १३००० कोटी इतका, टॅक्स जमा झाला.[७] हा नक्कीच ह्या निर्णयाचा शॉर्ट टर्म फायदा आहे, हे विरोधकांनाही नाकारता येणार नाही. त्याचबरोबर बँकांमध्ये पैसा जमा होऊन लिक्विडीटी वाढली, ज्यामुळे मीडियम टर्ममध्ये व्याजदर कमी होतील, अशी आशा वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे, आणि कॅशफ्लो कमी झाल्यामुळे इन्फ्लेशन कमी होईल, असेही भविष्य वर्तवण्यात येत आहे.[८] हे सर्व आडाखे खरे ठरले, तर मध्यमवर्गीयांसाठी ह्या निर्णयाचा इम्पॅक्ट परिणामकारक ठरेल. त्याचबरोबर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये किंमती कमी होतील, असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तो बरोबर ठरावा, असा (वैयक्तिक अंदाजावर आधारित, अॅनेकडोटल) माझाही अंदाज आहे, परंतु हेही आकडे कसे दिसतात, त्यावरूनच भविष्यात ठरवता येतील.
मॅन्युफॅक्चरर्सना पैसे देणे जास्त सोपे झाले, व भ्रष्टाचार कमी झाला, तर भारतात व्यापार करणे मिडीयम टर्ममध्ये जास्त सोपे जाऊ शकेल, असेही 'मूडीज' ह्या संस्थेने म्हटलेले आहे.[९] मात्र त्यातच
" In the nearer term, however, Moody's expects asset quality to deteriorate for banks and non-bank finance companies, as the economic disruption will significantly impact the ability of borrowers to repay loans, in particular in the loans against property, commercial vehicle and micro finance sectors.
A prolonged disruption could also have a more significant impact on asset quality, as both corporate and small- and medium-sized enterprise customer have a limited ability to withstand a sustained period of economic weakness. "
हा इशाराही दिलेला आहे. त्यामुळे सरकारचे मॅनेजमेंट येत्या काही महिन्यांत खूपच महत्वाचे ठरणार आहे. सध्यातरी त्याबद्दलचा माझा दृष्टिकोन सद्यपरिस्थितीवरून स्केप्टिकल आहे. ह्या बाबतीत डेटा हातात आल्यावरच त्यावर विचार केला जाऊ शकतो.
उपोद्घात
एकंदरीत वरील सर्व विश्लेषणावरून असे वाटते, की काळा पैसा व त्यामागील लोकांना पकडणे हे सरकारला ह्या मूव्हवरून साध्य होणार नाही. त्याबाबतीत निर्धनिकरणाचा निर्णय व नंतरचे त्याचे इम्प्लीमेंटेशन तुघलकी वाटते. मात्र भारतीय बँकिंग सेक्टर, व्यापार, आणि क्रेडिट रेटींगला ह्याचा पुढील काही महिन्यांत योग्य पावले उचलल्यास व लोकांनी कॅशलेस इकॉनॉमीला योग्य प्रतिसाद दिल्यास फायदा होऊ शकतो. ते तसे होईल का, हे काळच ठरवेल. मात्र उपरोल्लेखित सोशल आणि इकॉनॉमिक कॉस्ट्स (ह्यात अजूनही फॅक्टर्स येतात - नोटा छापणे, त्या वितरित करणे, इ.)चे पारडे ह्या बेनिफिट्सपेक्षा जड आहे, असे माझे मत पडते.
--------------------------------------------------------------------------------------------------------
[१] http://www.financialexpress.com/economy/rs-500-rs-1000-note-ban-heres-wh...
[२] http://www.thehindu.com/news/national/black-economy-now-amounts-to-75-of... - मी दिलेल्या माहितीनुसार तेव्हाच्या जीडीपीनुसार गणना करून आकडा काढलेला आहे. आकडा २०११-१२ च्या चलनात आहे, जो खरेतर इन्फ्लेशनने अजून वाढेल, व वरील रोख रकमेचा टक्का अजूनच कमी येईल, पण २०११-१२ व सध्याच्या इन्फ्लेशनमध्ये फार फरक आहे, असे न वाटल्याने मी तो फॅक्टर अॅड केलेला नाही.
[३] https://rbidocs.rbi.org.in/rdocs/ATM/PDFs/ATMPC17112016311BE3CCA94143DAA... - आधीच्या महिन्यांची माहिती https://rbi.org.in/Scripts/ATMView.aspx येथे मिळेल.
[४] https://www.researchgate.net/publication/262144523_Moving_from_Cash_to_C...
[५] http://www.europeanpaymentscouncil.eu/pdf/EPC_Article_112.pdf
[६] http://timesofindia.indiatimes.com/india/Demonetisation-PM-Modi-slams-cr...
[७] http://timesofindia.indiatimes.com/india/Demonetisation-Windfall-for-mun...
[८] http://www.cnbc.com/2016/11/21/india-demonetization-news-expect-short-te...
[९] https://www.moodys.com/research/Moodys-Indias-demonetization-has-mixed-i...
हीरा, एकाने असं (म्हणजे
हीरा, एकाने असं (म्हणजे थकवलेल्या खात्यात पैसे भरणं) केल्याचं, तेही अगदी ८ तारखेच्या संध्याकाळी उशिरा बँकेत काम करणार्या परिचिताकडून ऐकलं.
पैसे थकवले की कर्ज लगेच राइट ऑफ करत नाहीत. त्याचंही वेळापत्रक असतंच.
<रद्दबातल केलेल्या चलनातून केलेली परतफेड अधिकृत परतफेड होऊ शकते का?> याचं उत्तर हो असंच आहे. वर दिलीय ती रिझर्व्ह बँकेची प्रश्नावली आहे.
भरत. ,धन्यवाद. नॉन
भरत. ,धन्यवाद. नॉन पर्फॉर्मिंग अकाउंट्स् वर भविष्यात आकारले जाऊ शकणारे व्याज फायद्यात धरता येत नाही. त्याची वेगळी कॅटेगरी करतात. मग वसुलीचे सर्व पर्याय म्हणजे कोणी जामीन असेल, कुठल्या वित्तसंस्थेने थोडा भार उचलला असेल किंवा काही तारण मालमत्ता असेल तर त्यातून मिळतील तेव्हढे पैसे मिळवून शेवटी ते भरणा न झालेले कर्ज निकाली काढले जाते हे माहीत होते. पण ही नेहमीची कार्यपद्धती असल्याने तसेही कर्जदार न फेडलेल्या कर्जातून सुटतच असतात. बँकेने मालमत्ता विक्रीस काढली तरी ती अगदी कमी किंतीस विकली जाते. ते कर्जदारास परवडते, कारण त्याचे कर्ज व्याज धरून कितीतरी अधिक फुगलेले असते. आणि एव्हाना तेच कर्ज वापरून त्याने दुसर्या मालमत्ता उभ्या केलेल्या असतात. तेव्हा मला म्हणायचे होते की आपोआप थोड्या रकमेत सुटका होणारी असेल तर विलफुल डिफॉल्टर कर्जदार मोठ्या रकमेचे जुने चलन खात्यात भरून आयकरखात्याच्या नजरेत येण्याचा धोका का पत्करेल?
आपोआप थोड्या रकमेत सुटका
आपोआप थोड्या रकमेत सुटका होणारी असेल तर विलफुल डिफॉल्टर कर्जदार मोठ्या रकमेचे जुने चलन खात्यात भरून आयकरखात्याच्या नजरेत येण्याचा धोका का पत्करेल?>>
नायतर काय!
लहान मासे करतील असं.
लहान मासे करतील असं.
आरबीआय ने सी आर आर १००% केला.
आरबीआय ने सी आर आर १००% केला. टोटल वेड्याचा बाजार आहे. एवढे पैसे मिळून सगळे पैसे RBI मध्ये भरा म्हणजे सगळं मुसळ केरात. बँकांची परिस्थिती पूर्वीपेक्षा बेकार होईल व्याज दर कमी होणे हे केवळ अशक्य.
यातून काळा पैसा बाहेर येत नाही हे सरकारने मान्य केलं, कारण काळा पैसा पांढरा करायला यट अनदर योजना आणली.
आता नव्या ५०० आणि २००० च्या नोटा रद्द केल्या नाही तर कॅशलेस इकॉनॉमीही येणार नाही. एवढा गोंधळ घालून पहिले पाढे पंच्चावन्न.
>>आरबीआय ने सी आर आर १००%
>>आरबीआय ने सी आर आर १००% केला.<
नो ब्रेनर, इंटरेस्ट रेट कमी होण्याची पूर्वसुचना आहे ती...
तो ही सप्टेंबरपासूनच्या
तो ही सप्टेंबरपासूनच्या सगळ्या सेविंगला केलाय.
आरबीआय ने सी आर आर १००% केला.
आरबीआय ने सी आर आर १००% केला. हाहा टोटल वेड्याचा बाजार आहे. एवढे पैसे मिळून सगळे पैसे RBI मध्ये भरा म्हणजे सगळं मुसळ केरात. बँकांची परिस्थिती पूर्वीपेक्षा बेकार होईल व्याज दर कमी होणे हे केवळ अशक्य.
यातून काळा पैसा बाहेर येत नाही हे सरकारने मान्य केलं, कारण काळा पैसा पांढरा करायला यट अनदर योजना आणली.
आता नव्या ५०० आणि २००० च्या नोटा रद्द केल्या नाही तर कॅशलेस इकॉनॉमीही येणार नाही. एवढा गोंधळ घालून पहिले पाढे पंच्चावन्न. खो खो >> एक्झॅक्टली अमित. सगळी लिक्विडीटीच नाहीशी करून टाकली. व्याजदर तर सोडाच, असलेल्या डिपॉझिट्सवर इंटरेस्ट पेमेंट करण्याचेसुद्धा वांधे होतील की काय काय माहीत.
Interest rates decreased to 6
Interest rates decreased to 6 % .... FD.
भास्कराचार्य, लेख आणि चर्चा
भास्कराचार्य, लेख आणि चर्चा वाचली. पुढील घडामोडींकडे डोळे लागलेत.
नो ब्रेनर, इंटरेस्ट रेट कमी होण्याची पूर्वसुचना आहे ती... <<< राज, ते कसे?
आरबीआय ने सी आर आर १००%
आरबीआय ने सी आर आर १००% केला.>> its a short term measure.
व्याज दर कमी होणे हे केवळ अशक्य.>>
Its not possible to reduce loan interest rate the moment fd rates are reduced. It will take some time. But it " should" reduce. Not saying "will" because right now, all are theories.
saving rates will down loan
saving rates will down
loan rates will be same
जेवढी लिक्विडीटी काढून घेतली
जेवढी लिक्विडीटी काढून घेतली असेल तेवढे रोखे बाजारत विकण्यासाठी येतिल. सी आर आर हे केवळ ३० डीसेंबर पर्यंत किंवा त्या पेक्षा कमी दिवसांसाठी असलेली उपाय योजना असेल. उत्ताविळपणे निश्कर्ष काढणे बरोबर नाही.
१४ लाख कोटी ची लिक्विडीटी जर एका दिवसात काढून घेतली तर ती एका दिवसात परत आणता येणार नाही हे आर बी आय ला माहित आहे. त्याबद्द्ल त्यांनी अजीबात विचारच केला नाही अस म्हणणे बरोबर नाही. पैसा बदलुन मिळणार नाही तो आकाउंट मधे भरायला सांगितला आहे याचा अर्थ बॅंका.कांचे डीपॉझी वाधणार हे काही सरप्राईज नाही.
खरे तर सगळी लिक्विडीटी म्हणजे १४ लाख कोटी परत कधीच येणार नाही नाही तर डी मॉनिटाय्झेशन करण्याचा उपयोगच काय?
किती लिक्विडीटी परत आणायची हा अंदाcजा चा भाग नाहे तर हा M३ शी सल्ग्न इश्यु आहे.
M३ जर कायम मोट्या डीनोमिनेशन मधे वाढत असेल तर ती नक्किच चिन्तेची गोष्ट आहे.
सतत केलेल्या रोखीच्या व्यवहारांमुळे मनी लॉंड्रींग किती प्रमाणात वाढते आणि असे सरक्युलर पैसे फ़्रीरवल्यामुळे एक रोखीच्या व्यवहारातुन कीती काळा पैसा तयार होतो याबद्दल काहीच भाष्य नाही.
एकूण भारतात व्याजदर कमी
एकूण भारतात व्याजदर कमी करण्याचा ट्रेण्ड आहे का? पूर्वी ती सेव्हिंग सर्टिफिकेट्स वगैरे असत त्यावर १२-१३ टक्के मिळे ("६ वर्षांत दुप्पट" वगैरे म्हणत). तो बराच कमी झाला आहे तसेच बँक सेव्हिंग्ज चे ही होत आहे का? आणि मुख्य म्हणजे नोटाबंदी वगैरे चा त्यावर काय परिणाम होउ शकतो?
दुसरा स्ट्राईक सोन्यावर
दुसरा स्ट्राईक सोन्यावर होणार पण त्यामुळे बायकांना लॉटरी लागली. ५० तोळे सोने घेऊन द्यावे लागेल आता नव-यांना !
https://www.google.co.in/amp/
https://www.google.co.in/amp/m.economictimes.com/news/politics-and-natio...
केंद्राने पाठवलेल्या समितीची निरीक्षणे.
हे बऱ्यापैकी कॉमन मॅन च्या निरीक्षनाशी जुळत आहेत.
एकीकडे सरकार असा फीडबॅक घेऊ इच्छित आहे हे पाहून बरे वाटतेय,
पण असा फीडबॅक घेऊन ते उपाय योजना न करता फक्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलत आहेत हे पाहून चिडही येतेय
रब्बीची पेरणी
रब्बीची पेरणी गेल्यावर्षीपेक्षा जास्तच झालीय असं एका सरकारी तोंडातूनच ऐकलंय. ते हे पाहणी अहवालाच्या आधी की नंतर ते माहीत नाही. पण तसंही सरकारने दाखवलेल्या धान्यउत्पादनाच्या आकड्यांवरही काही देशद्रोही तज्ञांनी शंका घेतलीय.
नोटाबंदीच्या निर्णय घेण्याआधी
नोटाबंदीच्या निर्णय घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर देशातील काळ्या पैशाच्या आकड्याबद्दल कोणताही अधिकृत अंदाज केला नसल्याचं अ र्थमंत्री अरुण जेटली यांनी एका प्रश्नाच्या उत्तरार्थ लोकसभेत सांगितलं.
(अर्थात यात नवीन काही नाहे. पण नोंदवून ठेवूया)
90% of scrapped notes back in
90% of scrapped notes back in system, big dividend unlikely
वर ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे बराच पैसा हा परत आलेलाच आहे. सरकारचे ३ लाख कोटींचे एस्टिमेट गंडलेले आहे. आता सरकारचे भाट आणि ट्रोल्स काहीतरी जिम्नॅस्टीक्स करून ह्याला कुठलातरी स्पिन द्यायचा प्रयत्न करतीलच, परंतु आपण हे नोंदवून ठेवूया.
नोटाबंदीच्या ५० दिवसात
नोटाबंदीच्या ५० दिवसात बँकांमध्ये ९० टक्के म्हणजे १४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. अंदाजापेक्षा अधिक जुन्या नोटा जमा झाल्याने काळ्या पैशाला अंकुश लावण्याच्या केंद्र सरकारच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे.
दहशतवाद्यांकडून होणारा बनावट नोटांचा वापर आणि काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. एकूण १५.४ लाख कोटी मुल्यांच्या या नोटा होत्या. या नोटा बंद केल्याने किमान तीन ते चार लाख कोटी रुपये काळा पैसा आपोआप व्यवस्थेबाहेर फेकला जाईल, असा केंद्र सरकारचा कयास होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेली रक्कम चलनातून बाद झाली तर त्याचा रिझर्व्ह बँकेलाच फायदा होणार होता. म्हणूनच नोटा बदलीसाठी सरकारने ५० दिवसाची मुदतही दिली होती. तसेच उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम जाहीर केल्यास त्यावर टॅक्स लावून बाकी रक्कम परत करण्याची योजनाही सरकारने जाहीर केली होती. मात्र सरकारच्या या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे.
http://m.maharashtratimes.com/business/business-news/90-of-scrapped-note...
Holding old notes a criminal
Holding old notes a criminal offence post 31 March
those who hold old notes after 31 March is likely to face 4-year jail term and also those who transact in old notes is likely to face a penalty of Rs 5,000
काही लोक म्हणे जुन्या नोटांचा संग्रह करतात. तो पण नाही करायचा ना? मला एक नोट ठेवायची होती पतवंडांना दाखवायला, ती नाही ठेऊ शकत तर! परदेशी लोकांकडे जर राहिल्या नोटा बदलायला मिळाल्या नाहीत म्हणून तर त्यांनी जाळाव्यात का? ट्रंपकाकांनी तिथल्या लोकांची नावे जाहीर केली आणि १०-१२ नोटा असलेल्या लोकांना पकडून आणण्यासाठी विमान पाठवलं इकडच्या पोलिसांनी तर?
संग्रह म्हणून एका व्यक्तीला
संग्रह म्हणून एका व्यक्तीला १० नोटा बाळगायला परवानगी आहे.
स्टॅटिस्टिशिअन प्रणब सेन
स्टॅटिस्टिशिअन प्रणब सेन ह्यांची मुलाखत -
"Modi 'miscalculated the Indian ability for jugaad': Statistician Pronab Sen on demonetisation fiasco"
https://scroll.in/article/825464/modi-miscalculated-the-indian-ability-f...
-----
मुलाखतीतले काही विचार - (मुलाखत वाचायचा कंटाळा आला तर , TL;DR - अॅडमिन, जर हे कुठल्या प्रताधिकाराचा भंग करत असेल, तर उडवून टाका. लोकांना इथेच महत्वाचे काही उतारे वाचायला मिळाले, तर कदाचित जास्त बरे म्हणून देत आहे.)
काळ्या पैशावर :
प्रश्न - Much of the old Rs 500 and Rs 1,000 currency notes seem to have come back to banks, perhaps beyond the government’s expectation. Does this imply a large percentage of black money was converted into new currency notes? Or was it that the government miscalculated the amount of black money in the economy?
उत्तर - The government’s estimate of black money and ours was roughly the same – about Rs 3.5 lakh crores. What they miscalculated was the Indian ability for jugaad [innovation]. You had old notes trading at a discount. What was happening was redistribution among agents. I give you Rs 100, you give me Rs 60 and make a profit of Rs 40. But the Rs 100 note remains intact. It is redistribution from me to you, but not to the government.
So what you have is a new category – perhaps it is an old category, I don’t know – of people who have black money. If you look at Jan Dhan account holders, they, technically, now have black money. They didn’t have black money earlier because they weren’t liable to pay tax. But now they have. So you have created a new category of black money holders. And this amount is not unsubstantial. We are talking of somewhere between Rs 2.5 lakh crores and Rs 3 lakh crores of such transfers happening. That means a lot of new black money holders are now in the system.
प्रश्न - Could such a thing have been predicted?
उत्तर - We are Indians. At the very least, you should understand your own people. If there’s one thing we are good at, it is jugaad. This was predictable, we knew dalals would come up.
...
प्रश्न - So the primary goal of flushing out black money hasn’t been achieved?
उत्तर - It hasn’t been successful.
कॅशलेस/डिजिटल इकॉनॉमीवर -
... उत्तर - Then comes digital money, PayTM and other such eWallets. Here the charges are phenomenally high.
प्रश्न - Like?
उत्तर - From 5% to 60%.
प्रश्न - No. My neighbourhood grocer tells me that every time he transfers money from his eWallet to his bank account, he is charged 1%.
उत्तर - You see, it works like this. I put money in my eWallet, usually through debit card. The bank charges 1%. That 1% is paid by PayTM. I transfer Rs 100 to my PayTM wallet, but what it gets is Rs 99. Then, whenever I use the eWallet at the merchant’s, PayTM charges the merchant. And that rate goes from 5% to 60%.
प्रश्न - Does this 60% depend on the quantum of money spent at the merchant’s?
उत्तर - It depends on the nature of transactions. So if you buy an air ticket, the maximum charge of 60% would be levied. This is the reason why PayTM is advertising that it would give you 50% cash back. Where do you think that 50% is coming from? Well, what is happening is that the moment I indicate I am going to buy my ticket through PayTM, the airline ups the ticket price by 60%. I pay for the ticket, PayTM gives me back 50% and hangs on to the remaining 10%. Really, 10% isn’t a joke.
प्रश्न - I wonder how many people know this.
उत्तर - They don’t.
-----
प्रणब सेन हे मोठे स्टॅटिस्टिशिअन आहेत. इथे त्यांच्याही क्रिडेन्शिअल्सवर राळ उडवली जाण्याची शक्यता आहे, परंतु सुज्ञांनी ही मुलाखत जरूर वाचावी. जिथे त्यांना माहिती नाही, तिथे 'मला हे माहीत नाही' इतके प्रांजळपणे सांगणारी ही व्यक्ती आहे. ते भारताचे चिफ स्टॅटिस्टिशिअनही होते. त्यांच्याविषयी माहिती पुढील दुव्यावर वाचायला मिळेल. - http://www.theigc.org/person/pronab-sen/
संग्रह म्हणून एका व्यक्तीला
संग्रह म्हणून एका व्यक्तीला १० नोटा बाळगायला परवानगी आहे. >>
होय पण ते मी संग्रह करत आहे हे दाखवणार्याला. त्यांच्याकडे अजूनही बर्याच नोटा संग्रही असतात. माझ्याकडे नाही. यांचे नियम कधी बदलतील सांगता येत नाही त्यामुळे रिस्क न घेणच चांगलं. देशासाठी जेल मधे जाण्याएवढी देशभक्ती माझ्याकडे नाही त्या ५००+१००० रुपयांसाठी. माझ्यासारखे लोक म्हणूनच विरोध करत नाहीयेत. चूक दिसतेय, ते लोक जे म्हणताहेत ते करायचं पण नाहीय. पण तसं केलं तर हे लोक मुसक्या बांधून तुरुंगात टाकतील नी आपलीच शक्ती व वेळ फुकट जाईल. त्यापेक्षा गेलं खड्ड्यात सगळं म्हणायचं जोवर जीवावर येत नाही तो पर्यंत.
प्रणब सेन यांचा पेटीएम बद्दलचा मुद्दा बर्याच लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला पण त्यांचं म्हणणं असंच की कॅशबॅक मिळतेय तर घेणार तेच. मी नाही वापरलंय अजून पेटीएम आणि वापरेन असं पण वाटत नाही.
नक्की किती पैसे होते जुन्या
नक्की किती पैसे होते जुन्या नोटा मध्ये ? १४.५ लाख कोटी कि १५.५ लाख कोटी ?
बहुतेक जमलेल्या पैशा पेक्षा १ / १. लाख कोटी ने जास्त आकडा सांगून सरकार आपली लाज वाचवत आहे.
१५ ते २० नोव्हेंबर च्या आसपास ५००/१००० मध्ये फक्त बारा लाख कोटी आहेत असे म्हणत होते. ९ लाख कोटी जमा झाले बँक मध्ये म्हणून सरकारची हवा टाईट झालीय असे वाचले. नंतर जुन्या नोटा मध्ये १४. लाख कोटी आहेत असे वाचले. ते पण बँक मध्ये जमा झाले. आता १५. लाख कोटी जुन्या नोटा मध्ये आहेत असे म्हणत आहेत. सगळी धूळफेक चालू आहे.
हे घ्या एक -
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/rbi/articl...
नेमक्या किती नोटा छापल्या ते माहित नाही!
Maharashtra Times | Updated: Dec 29, 2016, 10:15 PM IST
पेमेंट मोड पेटीएम म्हणुन
पेमेंट मोड पेटीएम म्हणुन सिलेक्ट केल्यावर तिकीटाची किंम्मत बदलली तरी लोकांना कळणार नाही?
भीम हे अॅप्लिकेशन अवघ्या २४
भीम हे अॅप्लिकेशन अवघ्या २४ तासात लोड वाढल्याने सर्वर डाऊन झाले. पण प्रश्न हा नाही आहे...
प्रश्न हा आहे की जेव्हा ताणाचा अंदाज घेऊन बनवण्यात आलेल्या सरकारी अॅप्लिकेशनचे सर्वर डाऊन होऊ शकते.
तर खाजगी कंपनीचे अॅप्लिकेशन अचानक आलेल्या ताणामुळे का बंद पडले नाही.?? पेटीएम चे सर्वर ८ नोव्हेंबर नंतर आलेल्या अचानक १५००% अधिक ताणामुळे अजिबात बंद पडले नाही. जेव्हा मार्केट मधे अशा प्रकारचे ते एकमेव अॅप्लिकेशन होते. परंतू नोटबंदीच्या ५० दिवसामधे तसे बरेच अॅप्लिकेशन्स लाँच झाले. एका अॅप्लिकेशन वर येणारा ताण सुध्दा बर्याच प्रमाणात कमी झाला. लोक किती ऑनलाईन ट्रांस्फर करतात किती वापर होतो. याचा संपुर्ण डाटा या ५० दिवसात उपलब्ध होता. याचा वापर भीम अॅप्लिकेशन तयार करताना केला गेला असणार.
तरी सुध्दा जर "भीम" सारखे अॅप्लिकेशनचा सर्वर डाऊन होऊ शकतो. पण "पेटीएम" सारख्या अॅप्लिकेशनचा नाही.
कुणाला काहीच नवल वाटत नाही?
Well, what is happening is
Well, what is happening is that the moment I indicate I am going to buy my ticket through PayTM, the airline ups the ticket price by 60%. I pay for the ticket, PayTM gives me back 50% and hangs on to the remaining 10%. Really, 10% isn’t a joke. >>> असं होत नसतं , एअर टिकट परचेस करताना तुम्हाला त्याची प्राईस माहीत असते विथ टॅक्सेस आणि नंतर पेमेंट्चा ऑप्शन येतो.
आणि क्रेडिट/ डेबिट कार्ड असणारा PayTM ने का एअर टिकट परचेस करेल ?
त्याची प्राईस माहीत असते विथ
त्याची प्राईस माहीत असते विथ टॅक्सेस >> बरोबर परंतू जेव्हा तुम्ही डेबिट कार्ड , नेट बँकिंग इत्यादी ऑप्शन्स निवडतात तेव्हा त्यांच्या वापरा बद्दल लागणारे टॅक्स वेगळे असतात ते दाखवले सुध्दा जातात.
उदा. नेटबँकिंग सिलेक्ट केल्यास बँकिंग चार्जेस १०-१५रुपये एक्स्ट्रा दाखवतात आणि जेव्हा तुम्ही बँकच्यासाईटवर "ओके" क्लिक करायला जातात तेव्हा खाली चार्जेस अजुन कुठला लागणार आहे ते ही दाखवतात.
त्यामु़ळे सुरुवातीला दिलेली प्राईज आणि विथ टॅक्सेस निव्वळ हेच खात्यातून वजा होत नाही. इतर टॅक्सेस सुध्दा लागतात.
उदा. नेटबँकिंग सिलेक्ट
उदा. नेटबँकिंग सिलेक्ट केल्यास बँकिंग चार्जेस १०-१५रुपये एक्स्ट्रा दाखवतात >>> अगदी बरोबर पण < the airline ups the ticket price by 60%> असं म्हटलयं त्यांनी.
Pages