Submitted by वृन्दा१ on 27 December, 2016 - 02:57
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान !!! काय लिहू ,शब्दच
खूप छान !!!
काय लिहू ,शब्दच नाही ...
अगदी मनाला भिडतात हो तुमचे शब्द..
धन्यवाद म्हणणे फारच कृत्रिम
धन्यवाद म्हणणे फारच कृत्रिम वाटते.असेच प्रेम राहू दया.एक शेर आठवलं,'हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को खुश रखने को ग़ालिब ये ख्याल अच्छा है।'
शेर पण छान ! ! ! असेच लिहीत
शेर पण छान ! ! !
असेच लिहीत रहा तुम्ही...
एकाच धाग्यात का नाही लिहीत
एकाच धाग्यात का नाही लिहीत तुम्ही? दर २-४ ओळींसाठी नविन धागा? काय लिहीत आहात त्याची अजिबातच लिंक लागत नाही त्यामुळे.
गिरि+१
गिरि+१
असं नका हो बोलू
असं नका हो बोलू गिरिदा..त्यांचं दुःख समजून घ्या ..
आणि हो ते तडका प्रमाणे करू शकतात??
अजून मी नवीन आहे.एकाच धाग्यात
अजून मी नवीन आहे.एकाच धाग्यात कसं लिहायचं?
edit करा धागा अन लिहून
edit करा धागा अन लिहून पुन्हा पुन्हा सेव्ह करा, म्हणजे सगळ्या चारोळ्या एकत्र राहातील.
धन्यवाद.प्रयत्न करते.
धन्यवाद.प्रयत्न करते.
डोळयांसमोर झळाळतं तुमचं राजस
डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप
खूपच सुंदर .........
खूपच सुंदर .........
प्रत्यक्षाहूनही उत्कट तुमचे
प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस....
उठल्यावर पहिला नमस्कार
उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला
तो पोहोचला हे लगेच कळतं
त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप
प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस...
आता कसली कोजागिरी
आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर
आठवांची साय....
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
या असल्या शिक्षेपेक्षा
परवडला तुमचा राग
कशानेच शांत होत नाही हो
ही अंतरातली आग.....
कृपया,अशी एक सलग कविता एकाच धाग्यात देता येईल तर पहा!
तुमच्या भावना सहज कळताहेत
तुमच्या भावना सहज कळताहेत वृंदा१.
सहज ओघाने आल्या
आणि त्याच ओघाने प्रतिसादपण.
लिहीत रहा.
आणि ओघाने यातून बाहेरपण या
शुभेच्छा!
इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल
इतक्या छान प्रतिक्रियेबद्दल आभार काकेपांदाजी.बाहेर येण्याबाबत सांगता नाही येत.
सत्यजितजी,प्रयत्न करते.
सत्यजितजी,प्रयत्न करते.
स्मरणातल्या बाप्पा बाप्पाला
स्मरणातल्या बाप्पा
बाप्पाला आणायचात तुम्ही
भक्तीनं अन् हौसेनं
तुम्ही देखणे आणि बाप्पाही
आम्ही पळायचो मस्तीनं
आताच्यासारखी तेंव्हा
सजावट नसायची खूप
जुन्याच मोत्याच्या माळेने
बाप्पांचं खुलायचं रूप
एक रंगीत लाईटचा दिवा
तुम्ही सांभाळून लावलेला
बाप्पांपुरताच कोनाडा
डिस्टेम्परने सजलेला
मोठमोठ्यानं म्हणायची
तुमच्यासोबत आरती
शब्द विसरायचा एखादा
नजर जायची खालती
भूलवायचा आम्हाला
मोदकांचा ढीग
घरोघरच्या प्रसादाची
लावायची रीघ
जुनाच कागदाचा पंखा
आणि टिकल्यांचे तोरण
त्या रत्नांच्या क्षणांचे
सतत होते स्मरण
दहा दिवस जायचे
कसे भुर्रकन उडून
विसर्जनाच्या दिवशी
घ्यायचे गुपचूप रडून
बाप्पांचा निरोप घ्यायला
मुद्दाम लावायचा वेळ
कळायचा नाही ना तेंव्हा
सुखदुःखाचा अजब खेळ
तुमच्या गोऱ्यापान कांतीवर
मुकटा तेजानं शोभायचा
बाप्पासुद्धा हसतमुखानं
फक्त तुम्हाला न्याहाळायचा
स्मरणातल्या बाप्पा
आता एकच मागणं
आमच्या दादांना
सतत सुखी ठेवणं ......
हे असच लिहीत रहा.... खूपच
हे असच लिहीत रहा....
खूपच मनाला भिडतात हो तुमचे शब्द....
हात कामात असतात मन तुमच्याशी
हात कामात असतात
मन तुमच्याशी बोलत बसतं
सगळंच खोटं असेल तर
खरं तरी काय असतं ?