२) गुप्तहेर बबन बोंडे - सदा सर्वदा योग तुझा असावा!

Submitted by सखा on 29 December, 2016 - 21:16

(ज्याच्या बद्दल आपण हे बोलतो आहोत तो लोकनायक, दिल का बादशाह,यारो का यार,कुदरती चमत्कार  मायनस १०१ आत्ता नेमका आहे तरी कुठे? ढ्याण टे ढ्याण!!!!)

(आकाशात कुठे तरी)

कुठल्याही देशाचे असो आकाश सगळी कडे तसे सारखेच दिसते त्यामुळे ते अत्याधुनिक सेसना विमान सध्या टांझानियाच्या हवाई हद्दी मध्ये आहे हे केवळ माहिती असलेलीच व्यक्ती सांगू शकली असती. या वेळी त्या विमानात हे माहित असणार्या बबन व्यतिरिक्त दोन व्यक्ती होत्या एक विमानाचा पायलट आणि दुसरी मिस लोबोवसकी. सौंदर्यवती मिस लोबोवसकी अर्थातच रशियन हेर होती हे जसे तुम्हाला माहिती आहे तसे बबनला माहित असण्याचे काहीच कारण नव्हते कारण त्याला दिल्ली विमानतळावर देण्यात आलेल्या लिफाफ्या मध्ये सांकेतिक भाषेत एव्हढेच लिहिले होते कि "टिपू मान खपा खप " याचा अर्थ "तात्काळ टांझानियाला जावून बारा वाजून सात मिनिटाने विमानातील सुंदरीस अटक कर". बबनने लगेच दिल्ली ते झांझिबार फ्लाईट घेतली आणि नंतर तिथून या छोट्या सेसना विमानात चढला.  बबनने आपल्या घड्याळात पहिले  बाराला अजून वीस मिनिटे होती. लेबोने पाचवा पेग भरला आणि मधाळ आवाजात ती बबनला म्हणाली मी अनेक पुरुष पहिले पण यु आर दीफ्रंत. यू आर यानिमल य़ु आर लाईक डोंकी. भारतात जरी गाढवाला एव्हडा मान नसला तरी जगात इतरत्र आहे हे आंतरराष्ट्रीय वातावरणात काम करून बबनला चांगलेच माहिती होते . त्याने नम्र पणे तिच्या complements चा स्वीकार केला आणि तिला म्हणाला "यस आय येम वेरी बिग डोंकी" तशी चेकाळून लेबो म्हणाली लेट्स प्ले डोंकी डोंकी आणि तिने आपला आकर्षक पाय लांब करून एक लाडिक लाथ बबन ला मारली आणि मग एक आकर्षक कोलांटी मारून बबनच्या मांडीवर बसत त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि जोरात सेल फोन वाजला. बबनने मोठ्या मुश्किलीने स्वताची लेबोच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि म्हणाला सोरी माझ्या आईचा फोन. बाथरूमचे दार बंद करून बबनने फोन कानाला लावला पलीकडून आवाज आला
"एजन्ट -१०१ please identify"  
"तेरी माका बोका मारू"
"दिल्या घरी सुखी राहा"
"शीलाकि जवानी मुन्नी बदनाम"
"सदा सर्वदा योग तुझा असावा"
"थान्क्स -१०१ please listen carefully तुमची  मिशन abort करा. तुम्हाला चुकून वेगळा संदेश मिळाला आहे. तुम्हाला इराक ला जायचे होते.
"पण कोड मध्ये टिपू होते इपू नव्हे"  
"इपू च्या ऐवजी चुकून टिपू टाइप झाले. इट इज अ मिस्टेक.  ओवर and आउट."
संतप्त बबन ने दार उघडण्या आधी गुरा सारखे मनसोक्त ओरडून घेतले, दाणदाण डोके भिंती वर आपटले मग चित्त शांत करून प्रसन्न चेहेर्याने त्याने दार उघडले  तो हवेचा प्रचंड झोत त्याच्या अंगावर आला. पाहतो तो काय पायलट आणि सुंदरी दोघेही गायब आणि विमानाचा दरवाजा उघडा. दूर वर दोन पराशुत त्याला दिसले. विमान चालवणे हा बबन चा आवडता छंद चला  या निमित्ताने विमान चालवायला मिळाले असा विचार करून बबन cockpit मध्ये आला आणि त्याच्या लक्षात आले कि विमानाचे इंधन पार संपले आहे आणि जेमतेम दहा मिनिटे इतकेच उरले आहे. तो त्वरित आतल्या भागात आला आणि मोठ्या मुश्किलीने त्याला एक पराशुत सापडले आणि बबनने विमानातून अंधारात उडी घेतली. दोनच मिनिटात विमानाचा स्फोट झाला आणि त्याची वेताळ पंचविशीत कवटीची असतात तशी  पंचवीस हजार शकले होवून आभाळाच्या पायाशी लोळू लागली.

(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण मोठा भाग टाकत चला. पोस्टकार्डावरच्या मजकुराइतका नको.>>>> + १००००००००००००००००

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद. मित्रानो रमेश मंत्री हे खूप थोर लेखक होते. जगात जेम्स बॉण्ड सटायर अनेक देशात आणि भाषांत झाले आहे. माझी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे की 'बबन बोन्डे' ला एक स्वतंत्र कॅरेक्टर म्हणून कृपया स्वीकारावे. जसा जसा बबन आपल्या पर्यंत पोचेल तसे आपल्याला त्याचे काही अफलातून गुण दिसतील जे की ओरिजिनल बॉन्ड कडे पण नाहीत उदाहणार्थ शाळेत असताना बबनने तीन वेगळ्या घटक चाचण्यांना आपले आडनाव बोन्डे, बोनडे,बोंडे असे लिहून मास्तर चे धपाटे खाल्ले होते. Proud Proud Proud

उदाहणार्थ शाळेत असताना बबनने तीन वेगळ्या घटक चाचण्यांना आपले आडनाव बोन्डे, बोनडे,बोंडे असे लिहून मास्तर चे धपाटे खाल्ले होते. >>>> Lol

एक छोटी शंका. हवाई सुंदरीने बबन मध्ये किंवा बबनचे असे काय पाहिले, किती असे म्हणाली की मी अनेक पुरुष पाहिले बत यू आर डिफरंट
यु आर ला इक दोंकी(?)

नवीन प्रतिसाद लिहा