Submitted by ऋन्मेऽऽष on 29 December, 2016 - 22:21
जर ठरला असेल तर आजच आताच सांगा..
ईतरांना आयड्या मिळतील ..
त्या ईतरांमध्ये एक मी आहे, कारण ३० ची सकाळ उजाडली तरी
मी अजून ठरवू शकलो नाही की फ्रेंडस, फॅमिली की गर्लफ्रेंड..? कोणासोबत किती वेळ घालवायचा आणि त्या वेळेत काय काय करायचे?
तुम्ही तुमचा सांगा, मी माझा ठरवतो. जर मलाही ठरवायला मदत केली तर येणारे अखंड वर्ष मायबोलीचा आभारी राहीन
तळटीप - मी दारू पित नाही !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज रात्री मोदुकाका काय
आज रात्री मोदुकाका काय भाषणतात त्यावर आहे.
एका क्लबमधे न्यू इयर पार्टीचे
एका क्लबमधे न्यू इयर पार्टीचे निमंत्रण आहे.
फॅमिली घरीच मस्त जेवण करतो.
फॅमिली
घरीच मस्त जेवण करतो. पार्टी करतो. उद्याचा मेनु- स्टार्टर चिकन ६५, चिकन लॉलीपॉप, चिकन हरीयाली टिक्का, कोबी मंचुरीयन. त्यांच्या त्यांच्या चटण्या.
ड्रिंक्स मधे हार्ड ड्रिंक पप्पांसाठी आणि बाकीचे आम्ही सॉफ्ट ड्रिंक्स.
जेवणात एखादी ग्रेव्ही (बहुतेक चिकनच. मुलं चिकन शिवाय दुसरं काही खात नाहीत.) पुरी, जीरा राइस.
अजुन काय मधे घरी बेकलेला केक, आईने केली असेल तर खीर किंवा काहीतरी गोडाचं.
ऋ, तुझं काही ठरत नसेल तर ये तुही. बायको मुलांना घेउन. गफ्रेला ही घेउन ये.

सस्मित, भारी मेनू! बायको,
सस्मित,
भारी मेनू!
बायको, मुले, गर्लफ्रेंड इतक्यांसह ऋला आमंत्रण!
मज्जाय बॉ!
तुम्ही पण या की आक्का.
तुम्ही पण या की आक्का. डॉक्टरांना आणि मुलांना पण घेउन या.
obviously family.... आम्ही
obviously family.... आम्ही थर्टी फस्टला बाहेर जाणे बर्यापैकी टाळतो ... कारण बेवडे वगैरे नाही सहन होत त्यापेक्शा घरीच कुटुंबासोबत धमाल करायची.
संध्याकाळी मम्मा पिझ्झा करणारआहे, डिनर अजुन गुलदस्त्यात.
काही ऑर्डर करणार आहे की तीच काही बनवणार आहे माहीत नाही.
बायको, मुले, गर्लफ्रेंड एकत्र
बायको, मुले, गर्लफ्रेंड एकत्र आलेत तर ऋ च २०१७ येईल का ?
सस्मित धन्यवाद! फोटू टाक
सस्मित धन्यवाद!
फोटू टाक फेबुवर, तीच आम्हाला मेजवानी!
>>ईतरांना आयड्या मिळतील
>>ईतरांना आयड्या मिळतील ..
म्हणजे डुआयड्या का रे भाऊ ?
घरीच असणार आणि टीव्ही नाहीतर
घरीच असणार आणि टीव्ही नाहीतर ऍमेझॉन प्राईम वर कसलीतरी मॅरेथॉन नाहीतर सिनेमे.
खायला काय ते मलाच ठरवायचं. मी काही केले नाहीतर आहेच order out
मी स्वच्छ घर अभियान राबवणार
मी स्वच्छ घर अभियान राबवणार आहे, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी..
मी फिरायला चाललेय... तिकडे
मी फिरायला चाललेय... तिकडे रात्री डाऊन टाऊन मधे अतिषबाजी बघायला जाणार
३० रात्री ट्रॅव्हल
३१ डाऊन टाऊन ट्रिप
१ ला पत्ते, ड्रिंक्स, डान्स, क्लब आणि मग दुसर्या दिवशी बॅक टू होम
>>मी स्वच्छ घर अभियान राबवणार
>>मी स्वच्छ घर अभियान राबवणार आहे, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी..
म्हणजे एवढे ५० दिवस झाले तरी जुन्या नोटा काढल्याच नाहीत बाहेर, आता बसा
फोटू टाक फेबुवर, तीच आम्हाला
फोटू टाक फेबुवर, तीच आम्हाला मेजवानी!
>>>>>
ईकडे पण एखादा टाका. सगळं खाऊ खाऊस वाटावे असे आहे. मलाही पार्टी म्हटले की पोटभर स्टार्टर्स. दोन अडीच तास चवीचवीन खात राहायचे. मेन कोर्स बाकी रोजच्या जेवणासाठी असतो.
पार्टी म्हटले की पोटभर
पार्टी म्हटले की पोटभर स्टार्टर्स. >>>>>> +१
२ जानेवारीला पुढचा बाफ. २०१७
२ जानेवारीला पुढचा बाफ.
२०१७ चे संकल्प काय?
२ फेब्रुवारीला
२०१७ संकल्प मंथली रिव्यू.
२ एप्रिल
२०१७ संकल्प फेल्युअर अनॅलिसिस/ सक्सेस पार्टी क्वार्टरली.
गफ्रे, शाखा स्वजो सई एम एन सी फोडणी लागेल तशी द्यावी.
आम्हीपण थर्टी फस्टला बाहेर
आम्हीपण थर्टी फस्टला बाहेर जाणे बर्यापैकी टाळतो आणि कुटूंबासोबतच थर्टी फस्ट सेलिब्रेट करतो. मोठे दिर, जाऊबाई आणि त्यांची दोन मुले येतात घरी.
तरीही ऐनवेळी अजुन पदार्थ वाढणार हे नक्की
)
आमचा उद्याचा मेनु ( हा आताच फायनल झाला त्यासाठी मगापासुन नवर्याचे ४ फोन झाले
तर मेनु - नॉनव्हेज - चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, कलेजी-पेठा फ्राय, कोलंबी फ्राय रव्यात घोळवलेली, भेजा फ्राय.
व्हेज - कोबी मंचुरीयन, पनीर पकोडा, चीज पकोडा.
सटरफटर - चणे-शेंगदाणे, चकली, चीझ, आलु भुजीया, मुगडाळ.
ड्रिंक्स - साबु, दिर आणि नवर्यासाठी - व्हिस्कि, मला आणि जाऊबाईला - व्हाईट वाइन, साबा आणि मुलांना - स्लाइस.
तसेच सोसायटीत सगळ्यांनी मिळुन गच्चीवर कार्यक्रम ठेवलेत तिथे पाणीपुरी, पॅटीस आणि केक आहे
एव्हढं सगळं खाऊन / पिऊन जर भुक लागलीच तर जेवणात व्हेज आणि नॉनव्हेज बिर्यानी पार्सल
आम्हीही बहुतेक घरीच असू .
आम्हीही बहुतेक घरीच असू . बाहेर जायला फारसे नाही आवडतं .
नणंद आणि तिचे कुटुम्ब येइल बहुतेक डीनर साठी .
चिकन तंदूरीचा प्लान बनतोय . बाहेरूनच मागवणार .
मग रात्री , बरेच दिवसानी पत्त्यान्चा डाव लावू म्हणतोय .
वॉव! एकेक मेनू बघून मलाही
वॉव! एकेक मेनू बघून मलाही असेच वाटतेय की बाहेर कुठे जीवाची ओढाताण करण्यापेक्षा घरीच नॉनवेज स्टार्टरचे सात आठ प्रकार मागवून फॅमिली, फ्रेंडस, गर्लफ्रेण्ड यांना गोळा करावे. मुजिक सिस्टीम मित्राकडून मागवता येईल. आमच्या फॉल सिलिंगला हौसेने बसवलेल्या डिस्कोलाईटचाही कधी नव्हे तो वापर होईल. आपली होणारी सून कशी नाचते आणि तिच्या तालावर आपला मुलगा कसा हे देखील घरच्यांना समजेल. बेस्ट प्लान आहे. प्रस्ताव टाकतो घरी. बघूया परवानगी मिळते का. शेवटी घर त्यांच्या नावावरच आहे. आपल्या मर्जीने मी त्याच डिस्को करू शकत नाही.
आपली होणारी सून कशी नाचते आणि
आपली होणारी सून कशी नाचते आणि तिच्या तालावर आपला मुलगा कसा हे देखील घरच्यांना समजेल. बेस्ट प्लान आहे. >>

बेस्ट प्लान आहे. प्रस्ताव
बेस्ट प्लान आहे. प्रस्ताव टाकतो घरी. बघूया परवानगी मिळते का.>>> सोमवारी सांग, काय झाल ते
आमच्या फॉल सिलिंगला
आमच्या फॉल सिलिंगला हौसेने
<<
फॉल्स.
झाडू, ईंग्रजी भाषेत काही
झाडू, ईंग्रजी भाषेत काही अक्षरे सायलेंट ठेवली तर चालतात.. तुम्ही बहुधा नवीन आहात माबोवर
स्वस्ति, आईला हा प्लान सांगताच तिची पहिलीच प्रतिक्रिया - रात्रीचे उगाच कश्याला ना.. रविवारी सकाळी बोलव ना नववर्षाला......... डोंबलं माझं. अरे काय दिवाळीचा फराळ आहे का हा
वडील हौशी असल्याने अजून आशा आहे, आईला कदाचित रात्रीचे कोणी पिणारे येईल, दंगा करेल याची भिती असावी .. अन्यथा क्रिकेटचा सामना बघायला आमच्या घराचे स्टेडियम झालेले असते.
रविवारी सकाळी बोलव ना
रविवारी सकाळी बोलव ना नववर्षाला......... डोंबलं माझं. अरे काय दिवाळीचा फराळ आहे का हा >>>>
मस्त झोप काढणार. रात्रीच्या
मस्त झोप काढणार. रात्रीच्या आरडा ओरडी अन् फटाक्यांच्या आवाजाने जाग येअु नये यासाठी झोपेची हलकीशी गोळी घेणार,
साडे दहाला फोन्स बंद करुन मस्त ताणुन देणार.
१ ता. ला जमल्यास दंगल चित्रपट बघणार.
यंदाचा असा प्लान आहे.
पार्टी म्हटले की पोटभर
पार्टी म्हटले की पोटभर स्टार्टर्स. >>>>> रुन्म्या: माझ्याकडे ये. ३१ ला माझ्या घरीच पार्टी आहे. भरपूर स्टार्टर्स आणि ड्रिन्क्स. आणि त्याच बरोबर New Year special Fireworks across the river.
१ ता. ला जमल्यास दंगल चित्रपट
१ ता. ला जमल्यास दंगल चित्रपट बघणार.
>>>
१ नंबर ! सेम पिंच! मी तर तिकीटेही काढली दोघांची आजच, १ च तारखेची
बस्स आता थर्टीफस्सचा प्लान ठरत नाहीये ..
New Year special Fireworks
New Year special Fireworks across the river. >>>> हे कुठे नक्की?
बाकी दोन वर्षांनी तुमच्याकडे नक्की..... साधारण तेव्हा माझे लग्न झाले असेल असे गृहीत पकडून
हे कुठे नक्की? >>>>>
हे कुठे नक्की? >>>>> न्युयॉर्कात ............
अरुण, अरे वा! मग हेच आमंत्रण
अरुण, अरे वा! मग हेच आमंत्रण समजून येतोच आम्हीही
कुऋ पेक्षा तरी लवकरच पोहोचू .
Pages