मित्र आणि मैत्रिणिनो विसाव्या शतकात जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय जासूस बबन बोंडे हे नाव माहित नसेल तर हा दोष बबनचा नाही आपल्या फेसबुक वर कमी टाइमपास करण्याचा आहे हे मला खेदाने नमूद करावे लागेल.
फेसबुक, व्हाटस अेप वर रजनीकांत आणि संस्कारी बाबाच्या दुप्पट जोक्स आज बबनच्या नावावर जमा आहेत हे फेसबुक वरचे कालचे पोर देखील सांगेल.
उदाहरणार्थ आता हे आजचे ताजे जोक्स बघा:
"सिगारेट पेटवायला लायटर नव्हते म्हणून रजनीकांत एकदा ज्वालामुखी जवळ गेला तर तिथे बबन आणि त्याचा मित्र मकरंद अनासपुरे बियर पीत ज्वालामुखीवर पापड भाजत होते. भाजताना चुकून एका पापडाला आग लागली म्हणून वीजवण्यासाठी बबनने फुंक मारली तर पापडा ऐवजी ज्वालामुखीच विझला."
किवा
"आपल्या भविष्या मधल्या घोटाळ्यात बबन आपल्याला पकडणारच या खात्रीपोटी सतरा खासदार निवडून येताच क्षणी आणि पुढे दोन वर्षांनी प्रत्यक्ष घोटाळा करण्याच्या आधीच आजच स्वतःला अटक करवून घेवून आजन्म कारागृहात जावून बसले."
किवा
"बबनला पहिल्यांदा पाहिल्यावर साक्षात मदनाने आपल्या आईला विचारले, माताश्री सांगा माझा जुळा भावू लहानपणी जत्रेत हरवला होता का?"
किवा
"बबनच्या मागे किती मुली पागल झाल्या हे गणित करण्या साठी शकुंतला देवीला सुध्धा दहा मिनिट लागले"
मित्रहो भारतीय गुप्तहेर मायनस १०१ अर्थात बबन बोंडे च्या या असामान्य लोकप्रियतेचे कारण त्याची अफाट बुद्धिमत्ता, गालावरची खळी,सदाबहार चावटपणा, सेलिब्रिटी स्टेट्स किवा बारा PHD डिग्र्या नसून त्याची असामान्य देशभक्ती आणि त्याने देशासाठी केलेल्या चित्तथरारक मिशन्स आहेत.
नुकत्याच विकी लिक्स वर त्या उपलब्ध झाल्या मुळे माझ्यासह सगळ्या जगाला त्या फुकटात वाचता आल्या आणि एका रात्रीत पोरीबाळी सलमान खान च्या ऐवजी "बबन १३ मेरा ७" , "हॉर्न ओके टाटा बबन चक्की मै आटा" असे टाटू नको नको तिथे काढून घेवू लागल्या.
सर जेम्स बॉंड तर खाजगीत परवा अत्यंत भावूक होत म्हणाले की माझ्या मध्ये बबन च्या एक दशांश चार दोन एव्हढे जरी गुण असते तर मी धन्य झालो असतो. माझ्या मते मायनस १०१ अर्थात एजन्ट बबन बोंडे इज इंडियाज आन्सर टू मी आणि ऑस्टिन पौवेर टूगेदर.
आता चक्क एका गोर्या माणसाने असे सर्टिफिकेट दिल्याने आपसूकच बबनला राजमान्यता आणि लोकमान्यता न मिळाल्यास काय नवल? बबनने मात्र एका गुप्तहेरास एव्हढी प्रसिद्धी योग्य नाही आणि मेडीयाने माझ्या कडे दुर्लक्ष करावे अशी विनंती आपली गर्लफ्रेंड आणि भारताची नंबर एक हॉट चिकणी अक्ट्रेस प्रियांका मस्का हिच्या तर्फे केली.
थोडक्यात काय तर गणपती दुध प्रकरणा नंतर पहिल्यांदाच आख्या भारतात बाब्नो मानिया नावाचा मास हिस्टेरिया पसरला आहे - चांगल्या अर्थाने! एक ऐतिहासिक सत्य हे आहे कि ब-ब-न हे नाव ऐकल्यावर महाराष्ट्रीयन मुली बहुदा नाके मुरडत असत. शी हे काय नाव आहे, नो चार्म वगैरे. सुपरस्टार प्रियांका मस्काने जेव्हा बबन हे फार क्युट नाव आहे असे एका बबनच्या जाहीर चुम्बना पूर्वी ओठांचा "बू" करून सांगितले तेव्हा बर्याच मुलींचे तत्काळ मत परिवर्तन झाले असे सर्व्हे सांगतात. बबन नावाच्या बऱ्याच मुलांना चांगली स्थळे गेल्या काही वर्षात मिळाली असेही सर्व्हे सांगतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात जपानी, latin, रशियन आणि अमेरिकन मुलीना हे नाव लक्षात ठेवायला तसेच गोंदवून घेण्यास सोपे आणि त्यातही पहिली दोन अक्षरे रिपीट असल्याने खूपच सेक्सी वाटते असेहि सर्व्हे सांगतात. युरोपिअन मुलीना बी बी एन हे बी बी सी सारखे वाटते त्यामुळे खूप आवडते असे आंतरराष्ट्रीय सर्व्हे सांगतात. सुप्रसिध्ध मानसरोग तज्ञ डॉक्टर फील गुड म्हणाले कि मनुष्याचा मेंदू हा सोप्या गोष्टी लौकर आत्मसात करतो त्या मुळे धुम्रविक्रीडीत,पर्णकेशी अशा कोम्प्लेक्स पुणेरी नावा पेक्षा ब-ब-न हे नाव कानाला गोड वाटते आणि त्यामुळे मना मध्ये एक नादल लहर उठून छान वाटते. आता परिस्थिती अशी आहे कि अमेरिकन सरकार एका मुलाचे नाव बबन असल्यास दुसर्याचे ठेवू नये असा कायदा करण्याचा विचार करत आहे म्हणे. हे सगळे पाहून वाटते कि शेक्सपियर खरोखरच नावात काय असते असे म्हणाला होता का? कि अनेक ऐतिहासिक असत्या पैकी हे पण एक आहे?
हे वाचून चतुर वाचकांच्या मनाला इतर अनेक प्रश्न पडले असतील आणि मला खात्री आहे कि त्यातील एक प्रश्न आहे:
ज्याच्या बद्दल आपण हे बोलतो आहोत तो लोकनायक, दिल का बादशाह,यारो का यार,कुदरती चमत्कार मायनस १०१ आत्ता नेमका आहे तरी कुठे? ढ्याण टे ढ्याण!!!!
(क्रमश:)
पुढील भाग
१) गुप्तहेर बबन बोंडे - शानदार सलामी
Submitted by सखा on 29 December, 2016 - 02:58
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ता नेमका आहे तरी
आत्ता नेमका आहे तरी कुठे?>>>सांगा ना मग कुठे आहे ते??
ते सध्या वरद येथे
ते सध्या वरद येथे आहेत.
http://164.100.128.68/netnrega/citizen_html/musternew.aspx?state_name=%E...
ओके ओके,धन्यवाद पद्मजी
ओके ओके,धन्यवाद पद्मजी
सुरवात तर भारी झाली आहे,
सुरवात तर भारी झाली आहे, पुढचे भाग लवकर लवकर येऊ द्या.
भारी लिहिलयं. "बबन १३ मेरा
भारी लिहिलयं.
"बबन १३ मेरा ७" , "हॉर्न ओके टाटा बबन चक्की मै आटा" असे टाटू नको नको तिथे काढून घेवू लागल्या. >>>
(No subject)
छान सुरवात !
छान सुरवात !
रमेश मंत्री यांनी जेम्स बॉण्ड
रमेश मंत्री यांनी जेम्स बॉण्ड प्रमाणे मराठीमधे जनू बाण्डे ही व्यक्तिरेखा लिहिली होती, त्याची आठवण झाली.
छान आहे, येऊ द्या अजुन.
धमाल सुरुवात. <<<<<"बबन १३
धमाल सुरुवात.
<<<<<"बबन १३ मेरा ७" , "हॉर्न ओके टाटा बबन चक्की मै आटा" असे टाटू नको नको तिथे काढून घेवू लागल्या.>>>>>
मस्तय
मस्तय
मस्तंय.. आन दो !! बब्बन
मस्तंय.. आन दो !!
बब्बन बोल्लं की मला डायरेक्ट चंकी पांडेच आठवतो.... कुठचा ते विचारू नका
धम्माल क्रमशः पाहून बरं
धम्माल
क्रमशः पाहून बरं वाटलं... म्हणजे हे इतक्यात संपतंय कि काय असं वाटत होतं शेवटच्या ओळीला !
धम्मालेय
धम्मालेय
सानदार .. जबरजस्त !! मझेऽदार
सानदार .. जबरजस्त !!
मझेऽदार !
भारी! लवकर येऊ देत पुढचे भाग!
भारी! लवकर येऊ देत पुढचे भाग!
गर्दा उडा दिये बॉस !!
गर्दा उडा दिये बॉस !!
मजेदार आहे. बबन-मस्का हे
मजेदार आहे. बबन-मस्का हे कॉम्बो आवडले
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतिम विनोद
अप्रतिम विनोद बुद्धी...काहीक्षण स्तुतीपात्र ओसंडुन तर जाणार नाही ना असे वाटले.
छानच....खुप आवडले लेखन. चालु ठेवा लिखाण.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
भारी आहे
भारी आहे
छानच!!
छानच!!
ये बबन है कौन???
ये बबन है कौन???
भारी आहे आवडले.
भारी आहे आवडले.
धन्यवाद!
धन्यवाद!
भारी आहे
भारी आहे