एखाद्या राजकीय नेत्याची किती लग्ने झाली आहेत?
एखाद्याचे लग्न का झाले नाहीये?
एखाद्याचे लग्न झाले नसूनही तो बारा गावच्या भानगडी कश्या करतो?
एखाद्याने आपल्या पहिल्या बायकोला का सोडले?
एखाद्याने दुसर्याच्या बायकोला जवळ का केले?
एखाद्याला किती मुले आहेत?
ती मुले कोणत्या शाळेत शिकायला जातात?
त्या शाळेचे मिडीयम काय आहे?
एखादा नेता किती लाखांचा सूट घालतो?
एखादीकडे किती हजार साड्या आहेत?
तर एखाद्याच्या बूटाचा रंग काय?
एखाद्याचा धर्म काय? एखाद्याची जात काय?
एखादा सुट्टीत बायकापोरांना फिरायला कुठे घेऊन जातो?
जेवणात काय खातो?
व्यायामात किती सुर्यनमस्कार मारतो?
सोबत दारू पितो की गांजा मारतो?
की फक्त आणि फक्त लस्सी पितो?
का बरे असे करतो?
त्याला शाळेत किती मार्क होते?
आणि पोरांच्या लग्नाला किती खर्च करतो?
कुठल्या देवाला मानतो? कुठल्या देवासमोर प्रसाद ठेवतो?
आणि पत्रिका बघतो की नाही?
बघतो तर का बघतो?
काय? कुठे? केव्हा? कधी? कश्याला? किती? आणि का? का? का? ...
अरे या राजकीय नेत्यांना खाजगी आयुष्य असते की नाही?
सेलिब्रेटींच्या धाग्यावरूनच हा विचार मनात आला असला तरी पडलेला प्रश्न प्रामाणिक आहे.
सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य जपू द्या. त्यांनी वैयक्तिक जीवनात काय घालायचा तो गोंधळ घालू द्या. असे एकीकडे म्हणणारे आपण, राजकीय नेत्यांनी मात्र आदर्शवादाचा पुतळा बनून राहिले पाहिजे अशी अपेक्षा का ठेवतो नेहमीच? भले ती पुर्ण करणारा हजारात एखादाच असेल, तरीही ठेवतो हे विशेष. आणि मग ते तसे खरेच आहेत का हे जाणून घ्यायला त्यांच्या दर दुसर्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसत असतो. हे योग्य की अयोग्य?
हा धागा अपेक्षितच होता. तो पण
हा धागा अपेक्षितच होता. तो पण तुमच्याकडूनच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी हव्या त्या सोडून नसत्या चौकश्या करत फिरणे + त्याचा 'इश्यू' करणे हे मिडिया (न्युज चॅनल्स) नी अंगवळणी पाडून दिले आहे.
अय्या, ऋ सरकार चा धागा..
अय्या, ऋ सरकार चा धागा..
खाजगी आयुष्य असावे, पण ते
खाजगी आयुष्य असावे, पण ते "आदर्श" असावे. नेत्यांनी आधी "नेता" या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
इतिहासात रामाने आधीच उदाहरण स्थापित करून दिले आहे; म्हणून जास्त सांगण्याची गरज नाही.
पद्म, आदर्श शोधायला आपल्याला
पद्म, आदर्श शोधायला आपल्याला थेट रामायणापर्यंत जावे लागले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरं कोणी सापडलं नाही!
दुसरं कोणी सापडलं नाही!
अय्या, ऋ सरकार चा धागा..>>>
अय्या, ऋ सरकार चा धागा..>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी सध्या John C Maxwell यांचं
मी सध्या John C Maxwell यांचं The 21 Indispensable Qualities of Leader हे पुस्तक वाचत होतो. त्यात पहिल्याच प्रकरणाचं(क्वालिटीचं) नाव आहे,
CHARACTER: Be A Piece of the Rock
ऋ सरकार? .. नाही हं! ऋ पद्म
ऋ सरकार? .. नाही हं! ऋ पद्म सरकार.. पूरा नाम![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एक काळ होता, जेव्हा मी नवा नवा येत धपाधप धागे काढू लागलेलो. तेव्हा जुन्या आयडींचे लेबल माझ्या नावावर चिपकवले जायचे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता काळ बदललाय. आता मी जुना मान्यताप्राप्त सदस्य झालो आहे. आता नवीन धागा काढणार्या आयडींवर माझे लेबल चिपकवले जातेय
मेरा देश बदल रहा है.. कालाय तम्स्मै नमः
शुभरात्री अन शब्बाखैर !!!
उद्या मात्र धाग्याच्या विषयावर बोलूया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
{{{ ऋन्मेऽऽष | 27 December,
{{{
ऋन्मेऽऽष | 27 December, 2016 - 00:40 नवीन
पद्म, आदर्श शोधायला आपल्याला थेट रामायणापर्यंत जावे लागले स्मित
पद्म | 27 December, 2016 - 00:42 नवीन
दुसरं कोणी सापडलं नाही!
}}}
शिवाजी महाराज आदर्श राज्यकर्ते होते.
भारतीय लोक तरी नेत्यांच्या
भारतीय लोक तरी नेत्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बरेच लिबरल आहेत.
उलट नेत्यांना 'खाजगी' आयुष्य असणारच असं आपण धरून चालतो.
प्रॉब्लेम केव्हा होतं की 'कथनी आणि करनी' मध्ये फरक जास्त उठून दिसतो तेव्हा.
एखादे सरकार पॉर्नवर बंदी आणू पहातोय आणि त्यांचेच नेते संसदेत्/विधानसभेत पॉर्न बघतायत.
एखादे सरकार लग्नाचा खर्च अडीच लाखाच्या मर्यादेत करा म्हणतंय आणि त्यांचे नेते स्वतःच्या मुलामुलींच्या लग्नावर करोडो रुपये उधळतायत तेव्हाच लोक चर्चा करतात.
एखाद्याचे कॅरॅक्टर खराब, त्याला चार रखेल्या आहेत किंवा दहा बयका आहेत म्हणून जरासा धुरळा उडाला तरी त्याचा इश्यू करून बदनामी करण्याचे फारसे इश्यूज भारतात घडत नाहीत.
म्हणजे गाव / तालुका पातळीवर होतही असतील, पण राज्य्/केंद्र पातळीवर हे कोणी पहात नाहीत.
भारतीयांची ही लिबरल मानसिकता मला उलट फार आवडते.
उगाच अमेरिकनांसारखं व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून नाचायचं आणि राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवाराने तरूणपणात /बालपणात काय सेक्स स्कँडल केलेत ते उकरून काढायचे असा प्रकार आपण भारतीय करत नाही.
आपण तर एकदम बलात्कारी/खूनी वगैरेंनापण छान निवडून देतो.
शेवटी खून /बलात्कार त्यांनी आपल्या 'खाजगी' आयुष्यात केलेले असतात.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51563 जुना आहे पण relevant आहे
अपल्या कडे नेते / इतर
अपल्या कडे नेते / इतर सेलिब्रेटी खाजगी जिवनात सुद्धा "सेलिब्रेटी" असल्याचे फायदे घेतातच. त्या मुळे उलटा प्रभाव हा सहाजिकच आहे.
खाजगी आणि व्यवसायीक बाबी वेगाळ्या ठेवल्या तर लोक नाक खुपसत नाहित. हा मात्र नेते / इतर सेलिब्रेटी यांनी माध्यमांना चघळायला विषय स्वता: हुन दिला किंवा त्यांना हवाच असेल तर गोष्ट वेगाळि.
जर तुम्हि डोहाळ जेवण सार्वजनिक केले तर लोक बारशाला (किंवा बारश्या नन्तरची) "नाव" ठेवायला येणारच ना...
शिवाजी महाराज आदर्श
शिवाजी महाराज आदर्श राज्यकर्ते होते.>>>>>>> होते! पण मला सर्वात आधी रामाची आठवण आली.
होते! पण मला सर्वात आधी
होते! पण मला सर्वात आधी रामाची आठवण आली.>>>
राम होता की नाही ह्याची ग्यारंटी नाही. छत्रपती होते! हा फरक आहे
देवादिकांच्या गोष्टी तुलनेसाठी न घेतलेल्या बर्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिवाजी महाराज हे उदाहरण
शिवाजी महाराज हे उदाहरण जुनेच म्हणायला हवे. किंबहुना ते राजे होते. आपण लोकशाहीतील नेत्यांबद्दल भाष्य करत आहोत. स्वातंत्र्य काळानंतर किंवा त्यातही गेल्या तीनेक दशकातील आदर्श नेते येतील तर मजा येईल. नसेल कोणी तर राहू द्या, वेगळे काहीतरी बोला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपण तर एकदम बलात्कारी/खूनी
आपण तर एकदम बलात्कारी/खूनी वगैरेंनापण छान निवडून देतो.
शेवटी खून /बलात्कार त्यांनी आपल्या 'खाजगी' आयुष्यात केलेले असतात.
>>>> >>>
नक्कीच हे त्यांच्या खाजगी आयुष्यात येते. म्हणून तर घटनेने त्यांना निवडणूक लढवायचा हक्क दिला आहे.
सेलिब्रीटी / राजकीय नेते जाऊ
सेलिब्रीटी / राजकीय नेते जाऊ द्या. भारतात तर कुणालाच खाजगी आयुष्य नसतं. शेजारी-पाजारी, नातेवाईक, ईतर लोक काय म्हणतील ह्या दबावाखाली बर्याच लोकांचं आयूष्य जातं. दबाव नाही घेतला म्हणून तुमच्या आयुष्यात डोकावणारे लांब जात नाहीत.
बाकी राजकीय नेते आणी फिल्मी सेलिब्रीटींना ही पब्लिसीटी हवीच असते. तो सगळा 'अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी' चा प्रकार असतो.
आता हाच प्रतिसाद मी त्या सेलिब्रीटी च्या धाग्यावर पण कॉपी-पेस्ट करणार आहे म्हणजे फक्त ऋन्मेष च्या धाग्याला झुकतं माप दिल्याचा 'ईतर लोकांचा' आरोप नको![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अय्या, ऋ सरकार चा
अय्या, ऋ सरकार चा धागा..>>>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अय्या टार्झन ओ ओ ओ ओ ....... बाळाराम मार्केट
बाळाराम मार्केट ?
बाळाराम मार्केट ?
सेलिब्रीटी / राजकीय नेते जाऊ
सेलिब्रीटी / राजकीय नेते जाऊ द्या. भारतात तर कुणालाच खाजगी आयुष्य नसतं. शेजारी-पाजारी, नातेवाईक, ईतर लोक काय म्हणतील ह्या दबावाखाली बर्याच लोकांचं आयूष्य जातं. दबाव नाही घेतला म्हणून तुमच्या आयुष्यात डोकावणारे लांब जात नाहीत.
>>>>>
कमॉन, हा तिसरया धाग्याचा विषय आहे. याची चर्चा तुम्ही ईथे करू शकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण सहमत आहे, आपल्यातीलच डोकावायची खाज याला जबाबदार आहे. मी तर थिएटरमध्ये सुद्धा पिक्चर सुरू व्हायच्या आधी किती प्रेमी युगुलं आलीत, कुठे बसलीत, आणि काय करताहेत हे बघतो. तसेच ईंटरव्हलला देखील कोण काय खातेय हे आजूबाजूला डोकावून बघतो.
"कमॉन, हा तिसरया धाग्याचा
"कमॉन, हा तिसरया धाग्याचा विषय आहे. याची चर्चा तुम्ही ईथे करू शकत नाही" - घे हाफ-व्हॉली दिलाय, मार सणसणीत स्ट्रेट ड्राईव्ह - लाईक अ ट्रेसर बुलेट.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेरफटका, तुला काय करायचेय
फेरफटका,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला काय करायचेय मित्रा ..
तुम्हाला नाही म्हणत हा, या नावाचा आणि याच आशयाचा माझा धागा होता एक .. तो या खाजगी जीवनात लुडबुडणार्यांना लागू
ही लिंक - http://www.maayboli.com/node/57704
ऋन्मेऽऽष तुझा अॅटीट्यूड
ऋन्मेऽऽष![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुझा अॅटीट्यूड बेस्ट आहे मित्रा!
फेफ, ऋन्मेष जबरी. आता मला
फेफ, ऋन्मेष![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जबरी. आता मला समजले ऋन्मेष इतके विविध धागे का काढतो ते (फुल डिस्क्लोजर - मी कधीच विरोधात नव्हतो. हवे तर त्याबद्दल प्रोटेस्ट करणार्या धाग्यावर माझे मत पाहा. इंटरेस्ट वेळ आणि उत्साह असेल तर
). तो विविध विषयांवरचे धागे तयार ठेवतोय. कारण एखाद्या विषयावरच्या धाग्यात लोक अवांतर लिहू लागले यापुढे तो सरळ "त्या" विषयावरच्या धाग्याची लिन्क देउन पोस्टात किंवा कुरियर मधे करतात तसे "सॉर्टिंग" सहज करू शकेल. म्हणजे "शाखा? संघाची? मग इकडे लिहा. शाहरूख? तिकडे लिहा". चायना जसे आफ्रिकेतून सगळी मिनरल्स खरेदी करते त्यात काहीतरी फ्युचर प्लॅन असतो, तसा हा प्लॅन आहे :).
फारेण्ड मी सुद्धा आता वरचा
फारेण्ड![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सुद्धा आता वरचा धागा माझ्या लेखनात शोधताना ईतर धागे जे बघत होतो तेव्हा विचार करत होतो. गेल्या दोन वर्षात कुठले कुठले धागे काढलेत. येत्या काही वर्षांत भर पडून ईतके विविध विषयावर होतील की माझ्या म्हातारपणात जेव्हा माझी बोटं थकतील तेव्हा मला कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद लिहायची गरज नाही पडणार. माझ्या त्या विषयावरच्या जुन्याच धाग्याची लिंक वा मजकूर कॉपीपेस्ट केले की झाले
हितगुज प्रमाणे ऋन्मेष नावाचा
हितगुज प्रमाणे ऋन्मेष नावाचा एक पॉप अप मेन्यु मायबोलीने उपलब्ध करून द्यावा. ऋन्मेष विषयाप्रमाणे आणि ठिकाणाप्रमाणे असेही पर्याय द्यावे लागतील काही दिवसांनी. त्यामुळे त्या त्या ग्रुप्समधे ऋन्मेषचे धागे शोधायला सोपे पडेल. (उदा. ऋन्मेष - ध्यासपंथी पाऊले किंवा ऋन्मेष - तेथे कर माझे जुळती ) नवीन कुणी धागा काढला तर त्या त्या वेळचे सीनीयर्स लगेचच ऋन्मेष ग्रुप्सची लिंक देतील नवीन सदस्याला अपराधाची जाणीव करून देतील.
या 'विषयावरून 'लोक प्रशासनाचे
या 'विषयावरून 'लोक प्रशासनाचे डोके 'ठिकाणावर' आहे का? असे 'हितगुज' करतील!
{{{ आपण लोकशाहीतील
{{{ आपण लोकशाहीतील नेत्यांबद्दल भाष्य करत आहोत. स्वातंत्र्य काळानंतर किंवा त्यातही गेल्या तीनेक दशकातील आदर्श नेते येतील तर मजा येईल. }}}
ही नावे कधी वाचली किंवा ऐकली आहेत का?
राम मनोहर लोहिया
जयप्रकाश नारायण
ज्योति बसू
मधू लिमये
श्रीकांत जिचकार
असे बरेच जण आहेत. तुम्ही माहिती करुन घ्यायला हवी.
आता ते हे म्हणतील की हे सगळे
आता ते हे म्हणतील की हे सगळे 'खम्युनिस्ट' आहेत.
मधू दंडवते
मधू दंडवते
Pages