एखाद्या राजकीय नेत्याची किती लग्ने झाली आहेत?
एखाद्याचे लग्न का झाले नाहीये?
एखाद्याचे लग्न झाले नसूनही तो बारा गावच्या भानगडी कश्या करतो?
एखाद्याने आपल्या पहिल्या बायकोला का सोडले?
एखाद्याने दुसर्याच्या बायकोला जवळ का केले?
एखाद्याला किती मुले आहेत?
ती मुले कोणत्या शाळेत शिकायला जातात?
त्या शाळेचे मिडीयम काय आहे?
एखादा नेता किती लाखांचा सूट घालतो?
एखादीकडे किती हजार साड्या आहेत?
तर एखाद्याच्या बूटाचा रंग काय?
एखाद्याचा धर्म काय? एखाद्याची जात काय?
एखादा सुट्टीत बायकापोरांना फिरायला कुठे घेऊन जातो?
जेवणात काय खातो?
व्यायामात किती सुर्यनमस्कार मारतो?
सोबत दारू पितो की गांजा मारतो?
की फक्त आणि फक्त लस्सी पितो?
का बरे असे करतो?
त्याला शाळेत किती मार्क होते?
आणि पोरांच्या लग्नाला किती खर्च करतो?
कुठल्या देवाला मानतो? कुठल्या देवासमोर प्रसाद ठेवतो?
आणि पत्रिका बघतो की नाही?
बघतो तर का बघतो?
काय? कुठे? केव्हा? कधी? कश्याला? किती? आणि का? का? का? ...
अरे या राजकीय नेत्यांना खाजगी आयुष्य असते की नाही?
सेलिब्रेटींच्या धाग्यावरूनच हा विचार मनात आला असला तरी पडलेला प्रश्न प्रामाणिक आहे.
सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य जपू द्या. त्यांनी वैयक्तिक जीवनात काय घालायचा तो गोंधळ घालू द्या. असे एकीकडे म्हणणारे आपण, राजकीय नेत्यांनी मात्र आदर्शवादाचा पुतळा बनून राहिले पाहिजे अशी अपेक्षा का ठेवतो नेहमीच? भले ती पुर्ण करणारा हजारात एखादाच असेल, तरीही ठेवतो हे विशेष. आणि मग ते तसे खरेच आहेत का हे जाणून घ्यायला त्यांच्या दर दुसर्या वैयक्तिक गोष्टीत नाक खुपसत असतो. हे योग्य की अयोग्य?
असे बरेच जण आहेत. तुम्ही
असे बरेच जण आहेत. तुम्ही माहिती करुन घ्यायला हवी.
>>>>>
हे मला म्हणत आहात की वर श्रीराम आणि शिवाजी महाराजांची उदाहरणे देणारयांना?
मलाही बरेच आदर्श नेते ठाऊक आहेतच. किंबहुना म्हणूनच मी त्यांना म्हणालो की त्यासाठी पुराणात किंवा ईतिहासात डोकवायची गरज काय पडली.
Pages