Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आतां जितकी पहिल्या डांवाची
आतां जितकी पहिल्या डांवाची आघाडी अधिक, तितकी जिंकण्याची निश्चिती अधिक !>>>>
+१
पुढील प्रत्येक धाव इंग्रजांचे दडपण वाढवेल!
इंग्रजांनी दुसरा नवीन चेंडू
इंग्रजांनी दुसरा नवीन चेंडू चक्क १२९ ओव्हर्स नंतर घेतला!!
आपल्या टीम मध्ये झालेली
आपल्या टीम मध्ये झालेली सगळ्यात मोठी इम्प्रूव्हमेंटअसेल तर ती लोअर ऑर्डरची बॅटींग (त्याना आता टेल म्हणण त्यांचा अपमान होईल)
आजही ६/३०७ वरून जर ३२० सर्व बाद झाले असते तर सामनाच पलटला असता . पण नंतरच्या या १५० धावा अन अजूनही ३ गडी आहेत . अन हे कंसिस्टंटली कितीतरी सामन्यात होतय .
रच्याकने जयंत यादव ची टेक्निक ९ नंबरच्या मानान जरा जास्तच उच्च आहे . अजून १० वर भूवी आहे .
मांजरेकर ची कॉमेंट्री
मांजरेकर ची कॉमेंट्री ऐकण्यापेक्षा चायनीज पॉप संगीत ऐकावं. ईसीबी कडून तनखा वगैरे येतो का त्याचा? >>
फेरफटका खरच . त्याचा सचिन वरचा राग (जेलसी) एकवेळ समजू शकतो , पण उगाच हल्ली कोहली वरही खार खाऊन असतो . अन उगाचच कसल्याही गोष्टीचा किस पाडत बसतो
ज्या खेळाडूने याच वर्षीच्या
ज्या खेळाडूने याच वर्षीच्या सर्व टी -२० मॅच मधे तब्बल ६४ षटकार मारले. त्याच खेळाडूने यावर्षी टेस्ट मॅच खेळताना एकही षटकार मारला नाही.
कोहलीचा फोकस उत्तम आहे
<< कोहलीचा फोकस उत्तम आहे >.>
<< कोहलीचा फोकस उत्तम आहे >.> शतक झाल्यावर आज त्याने इंग्रजाना खुन्नस दाखवणारे हातवारे केले नाहीत, ही देखील दखलपात्र सुधारणा आहे !
जयंत यादव नशिबवान ठरला. तसा
जयंत यादव नशिबवान ठरला. तसा इंग्रजांचे दोन रिव्ह्यु त्याच्या विरुद्ध वाया गेले. तिसर्यांदा पंचांनी नाबाद दिले तर नेमके त्यांचे रिव्ह्यु संपलेले! पण चांगली साथ दिली त्याने कोहलीला!
कोहलीची इनिं<ग जबरदस्तच होती.
कोहलीची इनिं<ग जबरदस्तच होती. अॅटक नि काऊंटर अॅटकचे चे परफेक्ट मिक्स. बेस्ट प्रकार विजयबरोबर धावताना केलेली अॅडजस्ट्मेंट. He has matured into perfect test player fast.
कोहलीचे अॅक्सीलरेशन डोळे
कोहलीचे अॅक्सीलरेशन डोळे भरून पाहत राहण्यासारखे होते. पलीकडच्या विकेट्स पडत होत्या, पण कोहलीकडे पाहाल तर जडेजाबरोबरच्या आणि यादवबरोबरच्या भागीदारीत "शेवटच्या ३६ बॉलमध्ये ३३ धावा" ह्यासारखे स्टॅट्स दृष्टीस पडतील. (स्टेडियममध्ये माझ्या नजरेस त्या पडत होत्या.) त्याचबरोबर त्याने एरीअल शॉट्स खूपच कमी मारले. लाँगऑन-लाँगऑफ एरीयामध्ये तशा भरपूर धावा त्याला मिळाल्या असत्या, पण त्याने पेनस्टेकिंग फोकस करून ते अजिबात मारले नाहीत. मलाच बघताना थोडेसे फ्रस्ट्रेट व्हायला झालेले, बट आय थिंक ही नेव्हर वॉन्टेड एनी रिस्क्स अॅट ऑल.
"हीं पोरं तुमचं खरं ठरवायला
"हीं पोरं तुमचं खरं ठरवायला आणि मला धपाटा घालायलाच निघालीत ! २२१-२ !! पण त्यांतही मला आनंदच आहे !!!" - भाऊ, तुमचा आनंद बहुदा द्विगुणीत होणार असं दिसतय.
कोहली च्या मनगटात स्टील च्या वायर्स बसवल्या आहेत असं वाटतं. चाबूक शॉट्स असतात त्याचे.
"पण jealous व snobbish नव्हता; तेंव्हां, वारसा हक्काचा याबाबतीत तरी दाखला संजयला देणं योग्य नसावं " - मान्य.
"त्याचा सचिन वरचा राग (जेलसी) एकवेळ समजू शकतो , पण उगाच हल्ली कोहली वरही खार खाऊन असतो . अन उगाचच कसल्याही गोष्टीचा किस पाडत बसतो" - 'वैषम्ययोगावर जन्मला असावा (संदर्भः पु. लं. चं काही नवीन ग्रहयोग).
चांगली सुरुवात, मिडल ऑर्डर
चांगली सुरुवात, मिडल ऑर्डर कोलॅप्स, लांबलचक शेपटाचा जोरदार तडाखा .. हा बहुधा आपला गेमप्लान झालाय.
आणि हे एकदा उरकले की मग आश्विनकडे बघून गालातल्या गालात हसायचे की त्याला समजते पुढे काय करायचेय ते
कोहली टिकून असल्याने उद्या स्कोअर अगदी कितीहीपर्यंत जाऊ शकतो. उद्या 200 तर मला मारायचेच आहेत हे ठरवूनच तो आज झोपणार !
मस्त भा. सध्या फिरत असल्याने
मस्त भा. सध्या फिरत असल्याने इथे लाइव्ह आलेलो नाही पण वाचल्या बर्यासश्या पोस्ट्स.
आज प्लॅन काय आहे - आत्ताच १४४ ला लीड आहे. अजून ५० ओव्हर्स आजच्या बाकी दिसत आहेत. अजून १०० पटकन मारून डिक्लेअर? तेवढ्यात कोहलीच्या २००+ होउन जातील, आणि भागीदारीच्याही २००.
आठव्या विकेटसाठी विक्रमी
आठव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी !कोहली द्विशतकाच्या उंबरठ्यावर, यादवची शतकाच्या दिशेने आगेकूच, सारंच कसं स्वप्नवत !! धन्य जे वानखेडेमधे बसून हें पहाताहेत !!!
कोहली द्विशतकाच्या
कोहली द्विशतकाच्या उंबरठ्यावर>>> झाले २०० !!!
यादवची शतकाच्या दिशेने आगेकूच>>> हे झालं की डिक्लेयर करेल असं वाटतंय.
यादव ला कोहलीने सपोर्ट चांगला
यादव ला कोहलीने सपोर्ट चांगला केला. किमान २०० ची लीड जरी घेतली तरी पुरेसे आहे
चहापानानंण्तर त्यांना खेळायला जरी दिले तर त्यांच्या कडे अवघे ४ सत्र राहतील त्यात त्यांना लीड ओलांडून परत लीड चढवून खेळायला द्यावे लागणार. १०० एका सत्र मधे तर त्यांचा पाचव्या दिवसाचा लंच नंतरच्या २० ओवर नंतर जरी २००च्या लीडला क्रॉस केले तरी शेवटच्या सत्रात भारताला खेळू देता येणार नाही एका सत्रात ऑल आऊट कोणी झाले नाही
भाऊ, ५५० झाले. पुढच्या ईंडीया
भाऊ, ५५० झाले. पुढच्या ईंडीया ट्रीप ला तुमच्याकडून चहा घेणार आहे मी.
रहाणे आत्ता पाणी घेऊन आला
रहाणे आत्ता पाणी घेऊन आला होता. बोट प्लॅस्टर मधे होतं. व्हॉट अ टीम स्पिरीट!
कोहली पेटलाय ! कसोटी
कोहली पेटलाय !
कसोटी फलंदाज
20-20 फलंदाज
एकदिवसीय फलंदाज
आणि
कसोटी कर्णधार ..
सर्व आघाड्यांवर नंबर वन !
जयंत यादवचे टेकनिक पाहता पहिल्याच सामन्यात समजलेले की हा सर जडेजापेक्षा चांगला कसोटी फलंदाज आहे. आज शिक्कामोर्तब करतोय.
<< भाऊ, ५५० झाले. पुढच्या
<< भाऊ, ५५० झाले. पुढच्या ईंडीया ट्रीप ला तुमच्याकडून चहा घेणार आहे मी.>> आनंदाने ! ह्यापुढे सगळ्या सामन्यांचं 'स्क्रिप्ट'च तुम्हीच आधीं लिहून ठेवावं हें उत्तम !
"ह्यापुढे सगळ्या सामन्यांचं
"ह्यापुढे सगळ्या सामन्यांचं 'स्क्रिप्ट'च तुम्हीच आधीं लिहून ठेवावं हें उत्तम !" - अर्थाचा अनर्थ होईल भाऊ
आता ६०० करून डिक्लेअर करेल का कोहली?
कोहलीने डिक्लेअर न करता
कोहलीने डिक्लेअर न करता मारण्यात का आऊट झाला आणि त्यानंतरही का खेळत बसलेत हे अनाकलनीय..
कोहलीने डिक्लेअर न करता
कोहलीने डिक्लेअर न करता मारण्यात का आऊट झाला आणि त्यानंतरही का खेळत बसलेत हे अनाकलनीय.. >> डोन्ट वॉन्ट टू बॅट ट्वाईस, आणि जयंत व कोहलीला रेस्ट मिळावी. फास्ट बॉलर्स आर एनीवेज नॉट गोईंग टू लिफ्ट द बल्क ऑफ वर्क व्हाईल बोलिंग, आणि तेवढ्याच क्विकफायर २०-३० रन्स जरी एक्स्ट्रा मिळाल्या, जे आता उमेश करतो आहे, तर चांगली टोटल अशक्यच टोटल होऊन जाईल.
बोलता बोलता कुमारनेही वोक्सला
बोलता बोलता कुमारनेही वोक्सला फोर मारून घेतली त्याच ओव्हरमध्ये.
बॉल मस्त वळताहेत.. डावाने मात
बॉल मस्त वळताहेत..
डावाने मात खाणार वाटते..
बॅटरी कमी होती, त्यामुळे आधी
बॅटरी कमी होती, त्यामुळे आधी काही म्हणू शकलो नाही. व्हॉट ऍन एपिक परफॉर्मन्स फ्रॉम विराट! ट्रू लीडर. जयंतसुद्धा सॉलिड. ४ पेक्षा जास्त रेटने ठोकला, तिथेच सिरीज डिसाईड झाली!
आश्विनचे बॉल्स आज मीडिया एंडने जास्तच वळत होते, व बाऊन्स होत होते. त्यामुळे विकेट मिळत नव्हती. त्याने एंड बदलून रेव्ह्ज कमी केले. बॉलची विकेट तशीच मिळाली. जडेजादेखील त्याच एंडने त्यामुळे जास्त इफेक्टिव्ह ठरला. रूटचा काउंटर-अटॅक बघायला ब्रेथटेकिंग होता. ऍट पार विथ कोहली. आउट झाल्यावर त्याने बॅट जमिनीवर आपटली, व नंतर बाहेर गेल्यावर ती तिथेच फेकून ड्रेसिंग रूममध्ये गेला.
कोहलीने डिक्लेअर न करता
कोहलीने डिक्लेअर न करता मारण्यात का आऊट झाला आणि त्यानंतरही का खेळत बसलेत हे अनाकलनीय.. >>> कॅप्टन लोकांना बरेच अंडरकरंट्स माहीत असतात. २००१ चे हायलाइट्स पाहा. दादा का डिक्लेअर करत नाहीये यावर सर्व कॉमेण्टेटर्स ने टीका करून झाली. तरीही तो खेचत राहिला व शेवटी पिदवून पिदवून वॉ ला वाट पाहायला लावून लावून मग डिक्लेअर केले. ऑसीज जाम वैतागले होते, त्याचा परिणाम काय झाला ते दिसले
वॉ ने स्वतः ते मान्य केले आहे की त्याला दादाच्या त्या टॅक्टिक्स ने जाम उचकावले होते. १६ मॅचेस आधी सलग जिंकल्यानंतर ऑलरेडी ऑलमोस्ट जिंकलेली गेम पूर्ण फिरली व उलट त्यालाच आशेने बघावे लागले भारतीय पॅव्हिलियन कडे की हा कधी डिक्लेअर करतोय. तेथेही आधी गांगुली बराच वेळ पुढे येउन नुसताच उभा होता
,,<< कॅप्टन. लोकांना बरेच
,,<< कॅप्टन. लोकांना बरेच अंडरकरंट्स माहीत असतात.>>खरंय. शिवाय, त्याना अनुभवावर आधारलेलं स्वतःचं मत असतं व त्यावर पॅव्हिलीयनमधे जाणकारांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. अर्थात, प्रत्येक प्रेक्षकालाही स्वतःचं डोकं चालवून त्या निर्णयाची योग्यता/अयोग्यता ठरवण्याचा अधिकार आहेच. कारण, तशा 'इन्व्हॉल्व्हमेंट'मधेंच तर प्रेक्षकांचा खरा आनंद साठवलेला.असतो.
जयंत यादव ने एक मस्त ऑप्शन
जयंत यादव ने एक मस्त ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. त्याची बॉलिंग हि हरयानाच्या सीमर फ्रेंडली विकेट्स वर विकसित झालेली असून तिथे प्रभावी स्पिन कसा करायचा हे तो शिकला आहे हे ओव्हरसीज दौर्यांच्या द्रुष्टीने आशादायक गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध तिथे त्याची बॅटींग बघता बाहेरही खेळण्याची क्षमता राखून आहे असे दिसते.
भाऊ, मस्त आहे चित्र
भाऊ, मस्त आहे चित्र
भाऊ! बेस्ट. असामी, जयंतच्या
भाऊ! बेस्ट.
असामी, जयंतच्या बॉलिंगवर सध्या जास्त काम केले पाहिजे असे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट म्हणावेसे वाटते. आज त्याला रूटची मिळालेली विकेट ही रूटचा लॅप्स इन कॉन्सन्ट्रेशन होता. बट अदरवाईज त्याची लाईन आणि लेंग्थ अजिबात चांगली नव्हती. ही वॉज व्हेरी एक्स्पेन्सिव्ह बीकॉज ऑफ धिस रीझन. शिकेल हळूहळू, पण ही शुड नॉट लूज हिज बॉलिंग मोजो इन सर्चिंग फॉर बॅटींग ऑप्शन्स. पठाणच्या उदाहरणामुळे कोणाही नवीन बॉलरबद्दल अशा गोष्टीची भीती वाटते.
Pages