शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू"
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू!
आता या तर्हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्त नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?
आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)
[आज हा विषय डोक्यात आला, कारण काल अन आज tonaga मला नमो नमः म्हणतोय, तर तत्काल मी आशिर्वचने टाईप केली, अन त्यावरुन वरील रामायण लक्षात आले]
आपण त्यांचा खोटारडेपणा उघडा
आपण त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडत रहावा, हेच खरे.
<<
दुसर्यांचा खोटारडे पण उघड पाडायच्या नादात, तुमचा स्वत:चा खोटारडेपणा उघड होऊन, आजपर्यंत तुमचे किती अवतार संपले मायबोलीवरुन आणि हा कितवा अवतार आता ??
तुमचे किती अवतार झाले ? ते
तुमचे किती अवतार झाले ? ते मोदींचे १५ लाख तुमच्या किती अवताराना वाटायचे ?
@anilchembur, हे तुमच्या
@anilchembur,
हे तुमच्या साठी.
Runmesh ch Kay mat
Runmesh ch Kay mat yawar?
>>>>>
यावर माझे मत का जाणून घ्यावेसे वाटले मध्येच हे समजले नाही. मी खरे तर अश्या विषयावर मत मांडायला फार छोटा आहे. आणि हा लोकांच्या प्रथापरंपरेचा भावनेचा विषय आहे. त्यामुळे जैसी जिसकी सोच.
एक सहज आठवले, कदाचित याच्याशी संबंधित नसेलही,
आमच्याकडे देवासमोर नाक घासायची पद्धत आहे. मला कोणी मंदिरात देवासमोर नाक घास सांगितले तर मी मस्त मजेत रगडून रगडून घासेन.
याऊलट माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी असला प्रकार नसल्याने तिला याची लहानपणापासूनच सवय नाही. त्यामुळे मागे तिला एकदा असे करायला सांगितले गेले तेव्हा तिला जरा ऑकवर्ड वाटले होते. मग मीच पुढाकार घेत तिला म्हणालो, राहू दे नुसते हात जोड तुझे नेहमीप्रमाणे..
आता एखाद्याला यातून वाटेल की मी देवासमोर माझा अहंकार जपला नाही, तर याऊलट माझ्या गर्लफ्रेंडला मात्र ते कमीपणाचे वाटले.
प्रत्यक्षात मात्र मी कट्टर नास्तिक आहे आणि ती तेवढीच देवभक्त
शेवटी काय तर भावना महत्वाच्या असतात, आणि त्या असतील तर त्या औपचारीकतेच्या पलीकडे जाऊन दिसतात.
कोणी कोरडे हात मिळवतो, तर कोणी कोरडे आशिर्वाद देतो,
मी दगडासमोर नाक घासल्यासारखे केले, पण माझ्या गर्लफ्रेंडने भक्तीभावाने हात जोडले ..
पर्सनली मला देवाच्या पाया पडायला काही वाटत नाही. घरच्यांचे तेवढेच समाधान म्हणून पडतो. शेवटी माझ्यामते तो एक दगडच आहे, तो काय समोरून मला दात दाखवणार नाही की खीखी माझ्यासमोर झुकलास वगैरे.. पण देवळात म्हणा वा सत्यनारायणाच्या पूजेला म्हणा, पुजार्याच्या पाया पडायला कमालीचे अवघडल्यासारखे होते. ते जी देवपूजा करतात त्या देवावरच मुळात विश्वास नाही तर माझ्यालेखी तुमचेही कर्तुत्व असे काही नाही की तुमच्या पाया पडाव्यात. पण तिथेही नाईलाजाने का होईना नकार देत घरच्यांना दुखावू नये म्हणून पडतो, चेहरा कोरडाच ठेवत, त्या पुजार्यालाही आपली नापसंती दर्शवत नाही, कारण यात त्याचाही दोष नसतो, त्याने माझ्यावर पाया पडायची जबरदस्ती केली नसते.
वडिलधार्या लोकांच्या कोणी वयाने मोठा आहे म्हणून पाया पडायची सवय नाही. काका-मामाच्या पिढीतल्यांचे कधी स्वताहून पडत नाही. पण आजीआजोबांच्या वयाच्या लोकांच्या पाया पडायला बरे वाटते. खास करून ते जे बरेचदा आपल्या गप्पा चालू असताना कुठेतरी साईडला असतात.. ते आपल्याला स्पर्श करतात, जवळ घेतात, चार शब्द बोलतात.. तेवढेच त्या लोकांशी एक इंटरअॅक्शन होते.
नमस्कार करुन पुराणात कोणाचं
नमस्कार करुन पुराणात कोणाचं भलं झालय ?
एक बाप व तीन आया यांच्या असंख्यदा पाया पडून शेवटी वनवास, पत्नीविरह हेच नशिबात आले.
कर्ण कुंतीच्या एकदाच पाया पडला व नको ते वचन देऊन फुकट प्राण घालवून बसला.
द्रौपदीनेही हीच चाल उलट वापरून भीष्माचा जीव घालवुन अर्जुन वाचवला.
अतिथीचे चरण धरायला जावून बळी 'बळी' पडला.
हे सगळे नमस्कार त्या चराचरातील परमेश्वरासाठी होते , असे लिंब्याचे म्हणणे आहे का?
असल्या लबाड प्रथेला बळी न पडता सन्मानाने आनंदात जगण्याचेच संस्कार मी पुढच्या पिढीला देईन.
त्यापेक्षा ईद मुबारक सारखे गळाभेट घेणे किंवा ख्रिश्चनी शेक हँडची पद्धत मला जास्त आवडते.
--------------------------------------------------
चराचराला नमस्कार म्हणे.
अ हा व्यक्ती ब ला नमस्कार करत आहे.. उदा राम हा कैकयीला नमस्कार करत आहे.
आता हा नमस्कार जर दोघांच्यातही उपस्थित असलेल्या देव तत्वाने देवतत्वाला केलेला असेल, तर मग कैकयीच्या देहाने त्याचे क्रेडिट घेऊन रामाच्या देहाला भलतासलता आदेश ( किंवा आशिर्वाद ) देणे , हा वेडेपणा नाही का?
नमस्कार जर देवाने देवाला केलेला आहे, तर मग शरीराने शरीराला आदेश ( आशिर्वाद) कशाला द्यायचा म्हणे ?
<<दुसर्यांचा खोटारडे पण उघड
<<दुसर्यांचा खोटारडे पण उघड पाडायच्या नादात, तुमचा स्वत:चा खोटारडेपणा उघड होऊन, आजपर्यंत तुमचे किती अवतार संपले मायबोलीवरुन आणि हा कितवा अवतार आता ?? फिदीफिदी>>
------ त्यान्चे आय डी जाण्याचे कारण त्यान्चा खोटेपणा उघडा झाला असे नाही आहे. जसे त्यान्ना दिसले, जसे मनाला पटले तसेच खरडले.... आता असे खरडणे मायबोलीच्या तत्वात बसत नाही म्हणुन त्यान्ना आय डी गमवावा लागत असेल.
मायबोलीकली-करेक्ट लिहायचे कसब त्यान्च्या लेखणीत कमी आहे असे मला वाटते. असे असले तरी त्यान्च्या लिहीलेल्या विचारात एक पारदर्शकता, प्रामाणिक पणा आहे... जो दुर्मिळ आहे. त्या प्रामाणिक पणाला हात जोडुन नमस्कार.
<<यावर माझे मत का जाणून
<<यावर माझे मत का जाणून घ्यावेसे वाटले मध्येच हे समजले नाही.>>
असल्यामुळे असेल कदाचित.
----- मायबोली सेलेब्रिटी...
त्या उलटा चोर कोतवाल को डाटे
त्या उलटा चोर कोतवाल को डाटे चित्रात तो कोलवाल मस्त ढेरपोट्या आहे, व चोर बिचारा पोट खपाटीला गेलेला आहे.
चोर महाशय कोतवालाचे पाय धरुन
चोर महाशय कोतवालाचे पाय धरुन नमस्कार करण्यासाठी उलटे झालेले आहेत...
------ त्यान्चे आय डी
------ त्यान्चे आय डी जाण्याचे कारण त्यान्चा खोटेपणा उघडा झाला असे नाही आहे. जसे त्यान्ना दिसले, जसे मनाला पटले तसेच खरडले.... आता असे खरडणे मायबोलीच्या तत्वात बसत नाही म्हणुन त्यान्ना आय डी गमवावा लागत असेल.
मायबोलीकली-करेक्ट लिहायचे कसब त्यान्च्या लेखणीत कमी आहे असे मला वाटते. असे असले तरी त्यान्च्या लिहीलेल्या विचारात एक पारदर्शकता, प्रामाणिक पणा आहे... जो दुर्मिळ आहे. त्या प्रामाणिक पणाला हात जोडुन नमस्कार. >>
उदय,
या पोस्टबद्दल तुम्हाला माझ्याकडून एक साष्टांग नमस्कार आणि धन्यवाद!
Uday about mabo celebrity
Uday about mabo celebrity +१
Runmesh tuzi mat bhari asatat mhanun
रीया , इथं कुठे मत विचारत
रीया , इथं कुठे मत विचारत बसलीस.... तो धागाच काढू शकतो ना अजून एक.....
रुन्म्या - अभिनंदन व पोस्टला +१
Pages