ब्रेकअप के बाद

Submitted by Abhishek Sawant on 24 November, 2016 - 10:03

:ब्रेकअप के बाद:
अखेर तो दिवस उजाडला जेव्हा तिचा एक मेसेज माझ्या मोबाईलवर वादळासारखा येऊन धडकला
"अभि आपण यापुढे फक्त फ्रेन्ड्स राहू, मला तुझ्याबरोबर या रिलेशनशिप मध्ये नाही रहायचय"
मी ड्यूटी वर होतो लंच टाइम मध्ये मेसेज वाचला आणि वाईट वाटण्यापेक्षा राग आला. सरळ मोबाईल स्वीच ऑफ केला आणि लंच आटोपून कामाला लागलो. कामात तिचा विचार कटाक्षाने टाळला. ड्यूटी सम्पवून घरी आलो तर बाइसाहेबांचे 12 मेसेज,मी सरळ सरळ इग्नोर केलं आणि फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होईपर्यंत तिचे भरपूर मिस्ड कॉल येऊन गेले. खरतर माझी ही दूसरी गर्लफ्रेंड, मी तसा खूप एकपत्नीव्रता सॉरी एकगर्लफ्रेंडव्रता Biggrin आहे. पहिले रिलेशन 4 वर्ष आणि दूसरे रिलेशन फक्त 4-5 महीने. पहिले ब्रेकअप झाल्यानंतर कधी प्रेमात पडायचे नाही अशी प्रतिज्ञा केली पण "दिल तो पागल है, दिल दीवाना है" अश्या अनेक उक्तिंप्रमाणे माझ्या दिलाने मला धोखा दिला आणि जे नको होत तेच झालं. मग काय दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ मेसेज ,कॉल चालू झाले. दिवसाला १५-२० सेल्फी, एकमेकांसाठी ५-६ karaoke गाणी, २-३ तास वीडियो कॉल चालू झाले. प्रत्येक long distance रिलेशनशीप प्रमाणे
सगळे सोशल नेट्वर्किंग साईट्स आमचे अड्डे बनले. पण शेवटी तिच्या मनात काय आले काय माहिती एके दिवशी अचानक सगळे संपले. मला वाईट वाटले पण मी स्वतः लाच गंडवत होतो कुल रहायचा प्रयत्न करत होतो,मला काही फरक पडत नाही असे मलाच दाखवून देत होतो मग whats app आणि fb वर पोस्ट्स वाढल्या, dp status दर दोन दिवसाला बदलून तिलाही दाखवून देऊ लागलो की मला काही फरक पडत नाही, मला दूसरी मिळाली वैगेरे वैगेरे पण तसे काही नव्हतेच मला खूप एकटं वाटत होते शेवटी लॅपटॉप उघडला आणि आफ्टर ब्रेकअप चेकलिस्ट तयार केली.
1)तिचे सगळे फोटो डिलीट- डन
2) तिचा नंबर डिलीट- डन
3) तिला सगळीकडे ब्लॉक केलं- डन
4) आमचे सगळे convo डिलीट केले- डन
5) परत जिम लावली - डन
6) दररोज ओवर टाइम केला

तरी नॉर्मल व्हायला एक महीना तरी गेला.पण यातून एक गोष्ट कळाली जगात जितके यशस्वी माणसे आहेत ते सिंगल का आहेत.
ब्रेकअप झाल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचा कमी केला आणि कामात जास्तीत जास्त बिझी राहू लागलो . दोन आठवड्यात महिन्याचे काम पूर्ण केले बॉस पण खुश झाला. बिझी राहण्यासाठी जिम जॉईन केली. पुस्तके वाचू लागलो. मित्रांना खूप दिवसातून वेळ दिला ते पण खुश झाले. एकंदरीत सुरुवातीचा त्रास सोडला तर हे ब्रेकअप खूप काही शिकवून गेले.
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले. मी तिला ब्लेम करत नाही पण नकोच होत तर पहिला कशाला रिलेशनशिप मध्ये रहायचे. आमच्या सारखी इमोशनल पोरं पण असतात. असो आता कंपनी मध्ये एक खूपच क्युट मुलगी पण मी ब्रेकअप मध्ये आहे. त्यामुळं आता इथून पुढे नो गर्ल्स.
आधी मूवीमध्ये ब्रेकअपची गाणी बघून मस्त वाटायच. असे रस्त्याने स्लो मोशन मध्ये sad मूड मध्ये चाललोय आणि बॅकग्राउंड मध्ये sad songs दाढ़ी वाढलेली. पण तसे काही झालेच नाही असो पण ब्रेकअप के बाद चा हा वेळ कायम लक्षात राहिल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक, फ्रेडशिप फेज मधे असलेल्या अपेक्षा वेगळ्या, त्यापुढे रिलेशनशिप मधे राहील्यावर नात्याबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या. रिलेशनशिपमधे असताना वेगवेगळ्या प्रसंगातून एकमेकांच्या स्वभावाचे कंगोरे, जीवन शैलीतला फरक -साम्य, विचार करायची पद्धत, ध्येय-उद्दिष्टे वगैरे बर्‍याच गोष्टीं समोर येत रहातात आणि त्यावर 'हे असे कायमचे आवडेल का? तडजोड करता येइल का? बदल व्हायची शक्यता कितपत? ' असा विचारही केला जातो. सुरवातीला नो बिग डील वाटलेली गोष्ट कालांतराने डील ब्रेकर होवु शकते. या सगळ्यात व्यक्ती स्वतःबद्दलही शिकत असते आणि समोरच्या व्यक्तीबद्दलही. शेवटी नाते पुढे चांगल्या पद्धतीने फुलवता येणार आहे की नाही हे रिलेशनशिपमधे राहिल्यावरच कळते. आयुष्यभराचा प्रवास म्हणून नात्याचा विचार करताना हे अगदी नॉर्मल .

Swati...U cant defend such a behaviour of girls. Some boyz are damn serious about relationships. I accepted her with all her good and bad things. Relationships arent a try and buy products.

अभिषेक,
मी मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता लिहितेय. मी स्त्री आहे म्हणून मुलीची बाजू घेवून लिहित आहे असे नाही. मुलाच्य बाबतीतही मी हेच म्हणेन. तुम्ही तिला तिच्या गुण-दोषांसह स्विकारले होते हेच सशक्त नात्यात अपेक्षित असते. पण तरी कुठले दोष /परीस्थिती स्विकारणे शक्य आहे हे व्यक्तीनुसार बदलते. तुम्हाला अमुक एका दोषासह नाते निभावता येणार असले तरी दुसर्‍याला नेमके त्याच दोषासह निभावणे नसेल जमणार . नाते हे विकत घ्यायचे प्रॉडक्ट नक्कीच नाही पण तरी ते छोट्या छोट्या गोष्टींनी फुलते किंवा कोमेजते. नाते तुटल्यावरचा काल क्लेशदायक नक्कीच असतो. पण लग्नानंतर सतत कुरबुरी /तक्रारी /बेबनाव यापेक्षा हे बरे. निराश होऊ नका. तुम्हाला तुमच्या गुणदोषांसह स्विकारणारी जोडीदार नक्की मिळेल.

yep buddy..Dhir sodu nakos..ani there r lots of grls in the world..Ek geli tar kuthe bighadtay..samjayche aplya barobarich nhavati..jitka jast kholat jashil titkach var yayla vel lagel..

Anubhavache bol ahet rao...

Pages