:ब्रेकअप के बाद:
अखेर तो दिवस उजाडला जेव्हा तिचा एक मेसेज माझ्या मोबाईलवर वादळासारखा येऊन धडकला
"अभि आपण यापुढे फक्त फ्रेन्ड्स राहू, मला तुझ्याबरोबर या रिलेशनशिप मध्ये नाही रहायचय"
मी ड्यूटी वर होतो लंच टाइम मध्ये मेसेज वाचला आणि वाईट वाटण्यापेक्षा राग आला. सरळ मोबाईल स्वीच ऑफ केला आणि लंच आटोपून कामाला लागलो. कामात तिचा विचार कटाक्षाने टाळला. ड्यूटी सम्पवून घरी आलो तर बाइसाहेबांचे 12 मेसेज,मी सरळ सरळ इग्नोर केलं आणि फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होईपर्यंत तिचे भरपूर मिस्ड कॉल येऊन गेले. खरतर माझी ही दूसरी गर्लफ्रेंड, मी तसा खूप एकपत्नीव्रता सॉरी एकगर्लफ्रेंडव्रता आहे. पहिले रिलेशन 4 वर्ष आणि दूसरे रिलेशन फक्त 4-5 महीने. पहिले ब्रेकअप झाल्यानंतर कधी प्रेमात पडायचे नाही अशी प्रतिज्ञा केली पण "दिल तो पागल है, दिल दीवाना है" अश्या अनेक उक्तिंप्रमाणे माझ्या दिलाने मला धोखा दिला आणि जे नको होत तेच झालं. मग काय दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ मेसेज ,कॉल चालू झाले. दिवसाला १५-२० सेल्फी, एकमेकांसाठी ५-६ karaoke गाणी, २-३ तास वीडियो कॉल चालू झाले. प्रत्येक long distance रिलेशनशीप प्रमाणे
सगळे सोशल नेट्वर्किंग साईट्स आमचे अड्डे बनले. पण शेवटी तिच्या मनात काय आले काय माहिती एके दिवशी अचानक सगळे संपले. मला वाईट वाटले पण मी स्वतः लाच गंडवत होतो कुल रहायचा प्रयत्न करत होतो,मला काही फरक पडत नाही असे मलाच दाखवून देत होतो मग whats app आणि fb वर पोस्ट्स वाढल्या, dp status दर दोन दिवसाला बदलून तिलाही दाखवून देऊ लागलो की मला काही फरक पडत नाही, मला दूसरी मिळाली वैगेरे वैगेरे पण तसे काही नव्हतेच मला खूप एकटं वाटत होते शेवटी लॅपटॉप उघडला आणि आफ्टर ब्रेकअप चेकलिस्ट तयार केली.
1)तिचे सगळे फोटो डिलीट- डन
2) तिचा नंबर डिलीट- डन
3) तिला सगळीकडे ब्लॉक केलं- डन
4) आमचे सगळे convo डिलीट केले- डन
5) परत जिम लावली - डन
6) दररोज ओवर टाइम केला
तरी नॉर्मल व्हायला एक महीना तरी गेला.पण यातून एक गोष्ट कळाली जगात जितके यशस्वी माणसे आहेत ते सिंगल का आहेत.
ब्रेकअप झाल्यानंतर मी स्वतःला वेळ द्यायचा कमी केला आणि कामात जास्तीत जास्त बिझी राहू लागलो . दोन आठवड्यात महिन्याचे काम पूर्ण केले बॉस पण खुश झाला. बिझी राहण्यासाठी जिम जॉईन केली. पुस्तके वाचू लागलो. मित्रांना खूप दिवसातून वेळ दिला ते पण खुश झाले. एकंदरीत सुरुवातीचा त्रास सोडला तर हे ब्रेकअप खूप काही शिकवून गेले.
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले. मी तिला ब्लेम करत नाही पण नकोच होत तर पहिला कशाला रिलेशनशिप मध्ये रहायचे. आमच्या सारखी इमोशनल पोरं पण असतात. असो आता कंपनी मध्ये एक खूपच क्युट मुलगी पण मी ब्रेकअप मध्ये आहे. त्यामुळं आता इथून पुढे नो गर्ल्स.
आधी मूवीमध्ये ब्रेकअपची गाणी बघून मस्त वाटायच. असे रस्त्याने स्लो मोशन मध्ये sad मूड मध्ये चाललोय आणि बॅकग्राउंड मध्ये sad songs दाढ़ी वाढलेली. पण तसे काही झालेच नाही असो पण ब्रेकअप के बाद चा हा वेळ कायम लक्षात राहिल.
मी पहिला...
मी पहिला...
hahaha... manat aanle tr brk
hahaha... manat aanle tr brk up nantr manus ajun successful hou shakto he samjle.... n aamhi matr brk up nantr man ramnvnyasathi kam sodun vachnatch sgla vel ghalvla....
एंजॉय ब्रो ही ब्रेकअप फेज
एंजॉय ब्रो
ही ब्रेकअप फेज मी चिक्कार वेळा अनुभवलीय .. एकीत गुंतलेले मन दुसरीत गुंतवणे हाच यावर सगळ्यात जालीम उपाय आहे. अर्थात ते ओढूणताणून नाही तर नॅचरली गुंतायला हवे. माझे तसे सहज होते ही एक दैवी देणगीच आहे. आणि कमाल म्हणजे नेहमी दुसरीवाली पहिलीपेक्षा सरस वाटते, त्यामुळे मन लागूनही राहते
आता मात्र गेले काही काळ सेटल झालोय. आता ब्रेक अप होईलसे वाटत नाही. झालाच तर कोलमडून पडेन. कदाचित. किंवा कदाचित नाहीही. पण ब्रेक अप झालाच तर मायबोलीकर मारतील याची जास्त भिती वाटते कधीकधी.
मुली आपल्या निर्णयावर ठाम
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले.
याच्याशी सहमत आहे .
रविराज>>> म्हणूनच
रविराज>>> म्हणूनच मायबोलीवरच्या चकरा वाढ्ल्यात
ऋन्मेऽऽष>>> मला लवकर विसरणे जमत नाही. आणि दूसरीच्या भानगडीत पडनाही असे ठरवले आहे. पण आरिजीत सिंग आणि अतिफ अस्लम मंडळी विसरू देत नाहीत.
भाऊ माबोकर तुला मारणार नाहीत काळजी नको.
बाकी मी पण तुझा फॅन आहे हं sportingly घेतोस तू सगळं . लिहीत जा.
आरिजीत सिंग आणि अतिफ अस्लम
आरिजीत सिंग आणि अतिफ अस्लम मंडळी विसरू देत नाहीत. खो खो
>>
वो लम्हे, वो बाते.... वो भिगी भिगी राते!
अतिफ अस्लमचं वेड ऋनेच लावलंय!
hahaha abhishek sir.... same
hahaha abhishek sir.... same here.... pn ya mabo ne khup help keliy mlatri mind divert krayla
म्हणूनच मायबोलीवरच्या चकरा
म्हणूनच मायबोलीवरच्या चकरा वाढ्ल्यात >>> हे मात्र खरेय, आपल्याकडे रिलेशनमध्ये असताना ईतर छंद बरेच मागे पडतात. पर्सनल टाईम कमी होतो. यामागे प्रत्येकवेळी प्रेमात वेडे असणे आणि दुसरे काहीच न सुचणे हे कारण असेलच असे नाही तर कधी कधी नाईलाज वा असुरक्षितताही असते. पहिले कारण असेल तर काही नाही, पण दुसरे असेल तर जेव्हा ते रीलेशन जेव्हा तुटते तेव्हा आपणच आपल्याला नव्याने गवसतो. तो अनुभव एक छान असतो
बाकी आतिफ अस्लमचा विषय काढलाच आहे तर आज एखाद दुसरे गाणे ऐकावेच लागणार. रंग शरबतोंका तर मी गुणगुणायलाही लागलोय
माबोकर तुला मारणार नाहीत
माबोकर तुला मारणार नाहीत काळजी नको.
>>>>
ह्या! मी देईन दोन दणके.... त्याने तिच्यापायी आम्हाला रुमालाचे ब्रॅण्ड्स हुडकवायला लावलेत.
बाकी त्याची पोस्ट +१११११
ब्रेक अप बिक अप सगळे मनाचे खेळ असतात. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचं काही वाटेनासं होतं हे खरं
ब्रेक अप बिक अप सगळे मनाचे
ब्रेक अप बिक अप सगळे मनाचे खेळ असतात. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचं काही वाटेनासं होतं हे खरं>>>> म्हणजे मला अजुन दोन वर्ष तरी ब्रेक अप चा त्रास आहे म्हणायचा.
मुली आपल्या निर्णयावर ठाम
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले.>> असे काही नसते भौ, पोरी सगळे ऑप्शन ओपन ठेवतात. आज ना उद्या यापेक्षा चांगला मिळेल याची खात्री असते. अन का नसावी? आपल्यासाखे शेकडो दिलफेक आजूबाजूला दबा धरूनच असतात.
पोरांचे सगळे याच्या उलट; अजून छप्पन मिळतील म्हणून पोरगा पटलेली छोरी सोडतो असे मी तरी पहिले नाही. खरंतर दुसरे कुणी आपल्याला हिंग लावूनसुद्धा विचारणार नाही याची बहुतेक आशिक मंडळींना खात्रीच असते म्हणाना.
बाकी मुलांचा ब्रेकअप झाल्यावर ठेवून एकटे राहणे हे खूप कमी घडते, तेव्हा अभिषेक, good luck. माझ्या माहितीत ब्रेकअप झालेले असे दोन तीन कठोर तपस्वी विश्वामित्र होते. "जब वी मेट" पाहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या मेनकेच्या शोधात गल्ल्या हिंडताना दिसले.
मुली आपल्या निर्णयावर ठाम
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले.>> असे काही नसते भौ, पोरी सगळे ऑप्शन ओपन ठेवतात. आज ना उद्या यापेक्षा चांगला मिळेल याची खात्री असते. अन का नसावी? आपल्यासाखे शेकडो दिलफेक आजूबाजूला दबा धरूनच असतात. डोळा मारा
पोरांचे सगळे याच्या उलट; अजून छप्पन मिळतील म्हणून पोरगा पटलेली छोरी सोडतो असे मी तरी पहिले नाही. खरंतर दुसरे कुणी आपल्याला हिंग लावूनसुद्धा विचारणार नाही याची बहुतेक आशिक मंडळींना खात्रीच असते म्हणाना. फिदीफिदी >>>>>>>>> +१११
विलभ>>> सहमत भाऊ , पोरिंना
विलभ>>> सहमत भाऊ , पोरिंना आजपर्यंत कोणीच समजू शकले नाही . आणि विश्वामित्र सारखी प्रतिज्ञा वैगेरे कै केली नाही. पण दुधाने तोंड भाजल्यावर आपण ताक पण फुंकुन प्यायला लागतो एवढंच.
असे काही नसते भौ, पोरी सगळे
असे काही नसते भौ, पोरी सगळे ऑप्शन ओपन ठेवतात. आज ना उद्या यापेक्षा चांगला मिळेल याची खात्री असते. >>> अर्थशास्त्रातला मागणी आणि पुरवठ्याचा नियम येथे लागू पडतोय. भारतात मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे. पण ह्या बाबतीत मुलींचा फायदा होताना दिसतोय. त्यांच्या वरनिवडीच्या संधीत वाढच झालीय. 'तू नहीं तो और सही। और नहीं तो और सही।'
आपल्यासाखे शेकडो दिलफेक आजूबाजूला दबा धरूनच असतात. >>> सम्भालो लडको! आगे इससे भी बुरे दिन आनेवाले हैं।
संदेश - स्त्रीभ्रूण हत्या थांबवा!
सचिन सर येणार नाहीत बुरे दिन
सचिन सर येणार नाहीत बुरे दिन आता. मुलांना पण कळायला लागलय आता. जसे मला कळलं आहे.
आणि संत सलमान खान साहेबांनी म्हणून ठेवलेलेच आहे. "तू लड़की के पीछे भागेगा लड़की पैसा लेके भागेगी, तू पैसे के पीछे भागेगा लड़की तेरे पीछे भागेगी"
वे टु गो ब्रो. वेल कम टु द
वे टु गो ब्रो. वेल कम टु द सिंगल्स क्लब. हॅपीली अन मॅरिड नावाची साइट आहे ती बघ आणि तिथून शॉपिन्ग कर. मुली कदाचित ठाम नसतील पण बाया ठामच अस्तात.
मुली कदाचित ठाम नसतील , पण
मुली कदाचित ठाम नसतील , पण बाया ठामच असतात!
>>
क्या बात है!
अर्थशास्त्रातला मागणी आणि
अर्थशास्त्रातला मागणी आणि पुरवठ्याचा नियम येथे लागू पडतोय. भारतात मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे.>> नियम लागू पडतो खरा, पण माझ्या मते तो चुकीच्या ठिकाणी वापरताय.
मागणी मुलांकडून आहे खरी, पण बऱ्याच प्रमाणात ती भावनिक भूक आहे. मुलींना उपजत नातेसंबंध जपायची, अन संभाषणकौशल्याची देणगी असते. नुसते मुलीच्या बोलण्यातील-आवाजातील चढउतार ऐका, अन त्याची तुलना एका मुलाच्या बोलण्याबरोबर करा; लगेच फरक जाणवेल.
एक जीव टाकणारा मुलगा दुरावला, तरी त्यांचे फारसे बिघडत नाही. मनातलं हितगुज करायला त्यांच्यापुढे हज्जार पर्याय असतात. लाडकी आई/बाबा, जवळच्या दूरच्या बहिणी, अन हरतऱ्हेच्या मैत्रिणी, जिथे मिळेल तिथे मुली घडाघडा बोलतील. मन मोकळे झाले, कि पुन्हा पाहिल्यासारख्या होतील.
मुलांचे का कोण जाणे, या बाबतीत नशीब फुटके म्हणायचे. अजूनतरी जवळच्यांसमोर घडाघडा मन मोकळं करणारा मुलगा मला भेटला नाही. एकटेपणाची बोच मुलांमध्ये यामुळे जास्त असावी. म्हणून की काय, कुणीतरी एकूण घ्यायला अन समजून घ्यायला यांना प्रेयसीच लागते. मला तरी आजवर असे जाणवले की जीवश्च-कंठश्च मित्राला जितकी आतली माहिती नसेल तितकी त्याच्या प्रेयसीला असते.
बाकी ब्रेकअप नंतर थोडा वेळ जाऊ द्यावा. त्यानंतर सुध्दा ती मनात डोकावायला लागली, की आपली गत सुद्धा पुढे मागे पिंजऱ्यातल्या मास्तरासारखी होणार, हे पक्के जाणून असा.
मी ह्याबाबतीत खूप विचार केला
मी ह्याबाबतीत खूप विचार केला आहे. जे खरंखर्र्र खर्र प्रेम असतं ना ते कधीच जीवनातून जात नाही. दुसृया बरोबर लग्न करुन यशस्वी संसार मुलेबाळे युरोप्ट्रिप, बंगला दोन कारा इतके केले तरी तो जो आपला सोल मेट आहे त्याच्या बरोबर साधे जगलो असतो तरी ते किती इमोशनली फिजिकली एन्रिचिंग झाले असते. एक एक क्षण सोन्यासारखा ( पन इंटेंडेड) झाला असता हे मरेपरें त राहतेच. तर जे सध्यचे चालू प्रकरण आहे तो नुसता टाइम पास आहे का ते एक आंतरिक कनेक्षन आहे ते ओळखता आले पाहिजे. टाइम पास असेल तर तुटले तरी भरून निघेलच. पन आंतरिक कनेक्षन असेल तर ते वाचवायला खूप जास्त प्रयत्न करायला हवा. आपल्या क्षमतेप्रमाणे.
शाहरुख खान म्हण तो तसे : बडी बडी मुहब्बतोंके जमाने चले गये अब छोटे छोटे लफडोंसे काम चला लो.
रुनम्या कभी अलविदा ना कहना मध्ये सुरुवातीलाच आहे हा डायलॉग काही चुकला असेल तर करेक्ट कर.
कामात जास्तीत जास्त बिझी राहू
कामात जास्तीत जास्त बिझी राहू लागले.>>>> येथे बदल हवा आहे का??? बाकि स्वतः ला थोडा वेळ द्या होईल
नॉरमल..... बी पॉजिटिव येईल दुसरी..
अभिशेक ....सहमत भाऊ , पोरिंना
अभिशेक ....सहमत भाऊ , पोरिंना आजपर्यंत कोणीच समजू शकले नाही
आभिषेक भौ....!!! मला तुमची
आभिषेक भौ....!!! मला तुमची मदत लागनार आहे..., करणार का...?? मला पण ब्रेक अप करायचा आहे..., पण माझ्याकडुन हे घोर पाप होत नाहिये...!! कारण माझ काळिज अजुन दगडाच झालेल नाहीये..., आणि समोरुन पण ब्रेक अप होत नाहीये...!!! खुप कचाट्यात सापडलोय...!!!
Abdul Hamid काळीज दगडाचं
Abdul Hamid काळीज दगडाचं झालं नाही म्हणून काय झालं एक दगड घ्या तो काळजावर ठेवा आणि मेकप करा, मेकप चेहेर्यावर करा. चेहरा स्वतःचाच असो द्यावा मग आपोआप होईल ब्रेकप.
मग असं ब्रेकप साँग देखिल गायला मिळेल.
दिलपे पत्थर रखके मैने मेकप कर लिया
मेरे सजनीने मुझसे फट्से ब्रेकप कर लिया
aila abhi..he story majya
aila abhi..he story majya brekup shi perfect julate..ani ho kitihi jhale tari apan sudhanar naich..tasa mihi atta 3rd process madhe ahech..let c hope for the best
हर्पेन, हे गाणं ज्या सिनेमात
हर्पेन,
हे गाणं ज्या सिनेमात आहे त्यात खरोखर हृद्यावर खल ठेवून वर बत्त्याने कुटण्याचे १-२ सीन्स आहेत.
खरोखर दिलपे पत्थर!
छान
छान
वा अमा शाहरूख खान, पोराचा
वा अमा शाहरूख खान, पोराचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. पिक्चर बघ भावा शाहरूखचे धपाधप. लिस्ट मी देतो हवे तर. हम एक बार जिते है, एक बार मरते है.. प्यार भी एकहीच बार करते है बोलणारा शाहरूख कसा दणकन दुसरीच्या प्रेमात पडतो हे कुछ कुछ होता है मधून शिकण्यासारखे आहे. याऊलट जिथे त्या प्रेमाच्या सच्चाईला तोडच नसेल तिथे अगदी तिच्या भूताच्याही प्रेमात पडायला तुम्हाला मोहोब्बते शिकवून जाईल. प्रेम म्हणजे काही वस्तू नाही जे दुसर्याची झाली तर विसरून जाल, तो दिवा तसाच कायम तेवत राहिला पाहिजे हे तुम्हाला डर किंवा अंजाम शिकवतील. फक्त प्रेमासाठी मरायची तयारी ठेवावी लागेल. पण जर तितकी हिमत नसेल तर मग कभी हा कभी ना सारखी गांधीगिरीही प्रेमात करू शकतो आणि ते देखील सच्चे प्रेम म्हणूनच ओळखले जाते. आणि वयाचे काय घेऊन बसला आहात राव, प्रेम अमर असते ते वयोमानानुसार नष्ट होत नाही तर वाढतेच हे समजून घ्यायला वीर-झारा बघा. किती विविध उहाहरणे दिली आहेत शाहरूखने आपल्याला. काही नाही तर मग कल हो ना हो बघा, ब्रेक अप झालेल्या तुमच्या त्या गर्लफ्रेंडला एखादा नवीन बॉयफ्रेंड शोधून द्या, मग बघा मनाला कसले बेक्कार समाधान मिळते
ऑल द बेस्ट डूड, प्रत्येक सॅनोरीटा नंतर आयुष्यात एक सिम्रन येतेच हे कायम लक्षात ठेवा
मुली आपल्या निर्णयावर ठाम
मुली आपल्या निर्णयावर ठाम नसतात हे आणखी एकदा पटले. मी तिला ब्लेम करत नाही पण नकोच होत तर पहिला कशाला रिलेशनशिप मध्ये रहायचे.>>
च्च! डेटिंग करणार तर हे ब्रेक अप वगैरे होणारच ना! हे दोन्ही बाजूने होते. नात्यामधे मधे काही काळ राहिल्याशिवाय कसे कळणार समोरची व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते. सुरवातीच्या आकर्षणाच्या पलीकडे एकमेकांना जाणून घ्यायला काही काळ लागणार. हे ही एक प्रकारचे कांदे-पोहेच असतात.
वे टु गो ब्रो. वेल कम टु द
वे टु गो ब्रो. वेल कम टु द सिंगल्स क्लब. हॅपीली अन मॅरिड नावाची साइट आहे ती बघ आणि तिथून शॉपिन्ग कर. मुली कदाचित ठाम नसतील पण बाया ठामच अस्तात.>>> बायांच अजून काही माहिती नाही भाऊ
विलभ इथेच तर प्रॉब्लेम आहे मुलं खूप कमी बोलणारे असतात. मुलांना आपण इमोशनल आहे आणि आपण हर्ट झालोय हे दाखवण्याची परवानगी नसते.
अमा, रुन्मेश मी शाहरुख चा फॅन नाही पण ए दिल है मुश्किल मध्ये त्याच्या गेस्ट अपीअरन्स मध्ये फाडू डायलॉग आहे. "एक तरफा मोहब्बत" मस्तच
बोक्याभाऊ इथे प्रत्येक जण दिलजले आहे की काय
च्च! डेटिंग करणार तर हे ब्रेक
च्च! डेटिंग करणार तर हे ब्रेक अप वगैरे होणारच ना! हे दोन्ही बाजूने होते. नात्यामधे मधे काही काळ राहिल्याशिवाय कसे कळणार समोरची व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते. सुरवातीच्या आकर्षणाच्या पलीकडे एकमेकांना जाणून घ्यायला काही काळ लागणार. हे ही एक प्रकारचे कांदे-पोहेच असतात.>>>> रिलेशन काही लगेच चालू होत नाही. पहिला फ्रेंडशिप फेज असते. एक दोन महिन्यात तरी कळतेच ना. असो जाऊदे मुली काय विचार करून रिलेशन साठी तयार होतात काय माहिती. रिलेशन टू रिलेशन स्विच करायच सगळ्यात अवघड काम मला वाटते.
Pages