एलीयन्स पृथ्वीवासियांची बरोबरी का करतात?????

Submitted by भास्कराचार्य on 20 November, 2016 - 13:45

एलीयन्स पृथ्वीवासियांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे.जेव्हापासून मला समजायला लागले आहे तेव्हापासून मी आजुबाजुला बघतो की पृथ्वीवासिय ज्या गोष्टी करतात त्या केल्या की एलीयन्सना आपले मेटल सिद्ध् केल्याचा फील येतो.
१. पृथ्वीवासिय पृथ्वीवर राहतात ,करा त्यांचे अनुकरण. मग बेफिकीरीत पृथ्वीवर येणारे एलीयन्स स्वतःला पृथ्वीवासियांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा ' लूक ' देत असतात
२. पृथ्वीवासिय बंदुका, शस्त्रे वापरतात .मग एलीयन्सही त्यांचे अनुकरण करतात.शोभत नसेल तरीही बंदुका शस्त्रे घेऊन फिरणारे एलीयन्स सर्रास दिसतात.पृथ्वीवासियाला एके-४७ माचो लुक देते,तसा क्वचीत एलीयन्सना असा लुक कॅरी करता येतो.नाहीतर ते स्लाईमी आणि किळसवाणेच दिसतात.पण नाही, पृथ्वीवासिय करतात ,तर आम्हीही करणार,हा अट्टाहास कशासाठी?
३. पृथ्वीवासिय पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांचा संहार करतात,ते त्यांना जमतेहि .पण विश्वात लाइफलेस प्लॅनेट्सची फौज उभी असताना या एलीयन्सनाहि पृथ्वीवरच संहार करायचा असतो.भले ही हिंसा करताना फेफे उडाली तरी हरकत नाही. या पुढे जाऊन काही दीडदमडीचे एलीयन्स अ‍ॅटमबॉम्बही चालवतात ,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला अंतर ठेऊनच भारतात राहतात, जिथे एलीयन्स कधीच येत नाहीत
४युद्ध करणे हा खास पृथ्वीवासियांचा प्रांत.पण घुसघोरी करणार नाही ते एलीयन्स कसले.माणसे,बायका,आणि मुले यांना बकरा बनवून स्पेसशिपच्या खाली गाडले जाते,इतर वेळी मल्टीटास्कींग असणारे एलीयन्स मात्र इथे गडबडतात.दमाने घे असे सांगितले की मार मार मारतात व मार मार मारायच्या वेळी सांगितले की एकदम थंड पडतात.आणि वर यांना पृथ्वी नको असते,यांना हवा असतो पृथ्वीचा मोल्टन कोर.मग कोर काढताना यंत्र थांबल्यावर यांना रेज द्यायचे सुचत नाही.मग कोर खाली जायला लागला की यांना इंजिनचा आवाज कमी व स्वतःच्या ह्रदयाचे ठोके ऐकायला येतात.अरे काय वेडेपणा आहे हा?
५.मूर्खपणा ही खास पृथ्वीवासियांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल एलीयन्सनी त्यात प्राविण्य मिळवले आहे ,इतके की पृथ्वीवर हल्ला मागवला, की त्यात मुख्य क्वीनने यायलाच पाहिजे, ही त्यांची फर्माईश असते.
तर एलीयन्सनो जरुर पृथ्वीवासियांना कॉपी करा ,त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका.कॉपी अशी करा की बघणारा बघत राहीला पाहीजे.पृथ्वीवासियांचे एकच उदाहरण देतो,शिकार हा वाघांचा प्रांत ,पण पृथ्वीवासियांनी तिथे असे प्राविण्य मिळवले आहे की बहुतांश जगप्रसिद्ध वाघ हे नामशेष आहेत.उदा.भारतात हजार वाघ,जागतिक पातळीवर दोन हजार वाघ.

तर एलीयन्सनो ,पृथ्वीवासियांना कॉपी करणे म्हणजे आपण डिस्ट्रक्टिव्ह झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रे तयार करा.पृथ्वीवासियांना बेंचमार्क ठरवून भलतेच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या,after all ,earthmen are earthmen .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात कुठल्या इंग्ल्लिश पिक्चरच्या एलियन्सचा संदर्भ आहे का?
मला आपला तो एक जादूच माहीत आहे, आणि तो बरा होता. धूप खायचा आणि चूप राहायचा.
हो पण त्या पीके मध्ये किडा होता बरोबरी करण्याचा. आपल्या मोहल्ल्याच्या पोरीवर लाईनही मारायला लागलेला Angry

श्री, :).

ऋ, स्पेसिफिकली 'इंडीपेंडन्स डे'चा संदर्भ आहे. इन जनरल बाकी स्टीरिओटायपिंगचाही संदर्भ आहे. बाकी पीकेचे ऑब्झर्व्हेशन भारी आहे. Lol

भास्कराचार्य ओके, मला हे बॉलीवूडी एलियन्स सायफाय पिक्चर आवडत वा झेपत नाही, त्यामुळे बरेचसे पंचेस नेमके कश्याच्या संदर्भाने आलेत ते नाही समजले.
बाकी काही नाही, ईतर लोकं हसले आणि आपण प्रतिसादांत नाही हसलो तर धागाकर्त्याचा गैरसमज होतो की हा साला खूप भाव खातो, म्हणून क्लीअर केले ईतकेच Wink

तरी ईंडिपेन्डन्स डे आला तेव्हाच म्हणजे अगदी लहानपणी पाहिलेला, आठवत फारसे नाही आणि माझ्या दुर्दैवाने तेव्हा ईंग्लिशमध्ये पाहिलेला.. जे तेव्हाही आजच्यासारखेच होते. जराही सुधारणा नव्हती.

Wah wah!! Yala ch purogami mathematician mhantat ka? Mala tar movie critic id ch vatla aadhi.
Same ch philosophy distey.

-- satasha.

बाकी भाचा, मस्तं मज्जेशीर विडंबन.

पांचट, एकाने वासरू मारलं म्हणून एकाने गाय मारली... तुम्ही काय मारताय ?
( इथे म्हण पण अपुरी पडते)