तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
आमच्या ' मदतनीस' ताईंना काल
आमच्या ' मदतनीस' ताईंना काल पण नाही मिळाले पैसे. काल टर सुट्टी घेवून सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ पर्यंत त्यांच्या घरातले तीन जण वेगवेगळ्या ठिकाणी रांगेत उभे होते. सगळे मिळून फक्त दिड हजार बदलायचे आहेत त्यांना.
आज आल्या तर म्हणताहेत आता उभं रहायची हिम्मत नाही. डाळ- तांदूळ आणि पीठ आधीच माझ्याकडून नेलं आहे अजून नेतिल.
केदार१२३, छान केलेत.हे जेश्चर
केदार१२३,
छान केलेत.हे जेश्चर महत्वाचे.
आता पैसे नसल्याने रोज जे येणं
आता पैसे नसल्याने रोज जे येणं जाणं इलेट्रिक रिक्षाने करायची त्या ऐवजी चालत. बरं आहे तिचा तेवढाच आपोआप व्यायाम. रोजचे ७+ किमी चालणं..
(No subject)
आज सकाळी सव्वा नौ वाजता एच
आज सकाळी सव्वा नौ वाजता एच डी एफसी शाखेत रांगेत उभी राहिले. सिनीअर मॅनेजर व अजून एक बाई व इतर स्टाफ हजर होता. त्यांनी चार लायनी केल्या एक पैसे काढायला/ डिपॉझिट करायला, एक एक्स्चेंज व एक सिनीअर सिटिझन.एक हाय व्हॅल्यू कॉर्पोरेट लोकांसाठी असावी. मग कूपन्स दिली. त्या अनुसार एकेकाला आत सोडले. माझा नंबर एका तासात आला. आत गेल्यावर एसी. व गर्दी नाही. एक सि. सि पुढे होत्या व मला चेअर वर बसायला सांगितले. तिचे झाल्यावर मला आठवड्याचे असे २४ ००० मिळाले. ११ दोन हजाराच्या नोटा व बाकी २००० शंभर मध्ये. पॅन कार्ड मी घेउन गेले होते पण ओन अकाउम्ट आहे तर ब घितले नाही.
थर्ड पार्टॅ कॅश डिपॉझिटला अजून काही फॉर्म व व्हॅलिडेशन मागत होते.
एक बाई बाहेर बसोन सर्वांचे आयडी प्रूफ चेक करत होती. व मगच आत सोडत होते. एका बाईच्चे खूप कॅश होती कंपनीची तर तिला कंपनीचे पॅन कार्ड मागित ले. ते नाही म्हणून तिची धावपळ चालू होती. इमेल वर प्रूफ मागितले. एकंदर सिस्टिमॅटिक कारभार. मी बरोबर वर्तमान पत्रे, हॅट घेउन गेले होते. पण फार उन्हात बसायची वेळ आली नाही.
पैसे आहेत म्हणून मी सिझलर खायला गेले मॉल मध्ये. तिथे मात्र २००० चे सुटे दिले नाहीत. हॉटेल कमालीचे रिकामे होते नेहमीच्या मानाने. इथे डेबिट कार्ड पेमेंट केले. टिप अॅड करून. बिग बझार मध्ये सुटे देत आहेत असे एकाला विचारल्यावर कळले. पण मग ऑनलाइनच खरेदी करीन असा विचार करून तिथे गेले नाही.
क्रॉसवर्द मध्ये ५० रु. चा आउटलुक चा अंक घेतला जेवताना वाचायला. तर तिथे आधीच कार्ड अप ग्रेड केले होते तो मुलगा म्हणे पॉईंट अॅड जस्ट करतो. पैसे आजिबात देउच नका. इथे ही कॅशलेस.
महत्वाचे म्हणजे. बँकेतून ऑफिसात परत येताना जो रिक्षावाला भेटला तो अतिशय खूष होता ह्या सर्व प्रकारावर. आठ दिवसात सर्व नॉर्मल होईल म्हणा ला. हा एकूणच छान माणूस निघाला. चार मुले नीट वाढवून संस्कार करून मोठी केली आहेत. चाळीत राहूनही मुलांना शिव्या माहीतही नाहीत म्ह टला ,
बायकोला मंगळसूत्र घेतले आठ वर्शा पूर्वी ते ही ज्वेलरच्या तिथे एटीएम होते तिथूनच पैसे काढले म्हटला.
चांगला संसार करणे हीच एक प्रकारची तपस्या आहे असे त्याला म्हणून मी त्याला एक्सॅ क्ट चेंज दिली व ऑफिसात परत आले. हे उत्तर भारतीय बंधू.
आता कॅ श डिपॉझिट करायचे बाकी आहे. बँकेतील माहिती नुसार ४५०० रु . चे एक्स्चेंज एकदाच शक्य आहे. परत परत नाही. बायका मॅनेजर एकदम फर्म व पोलाइट बोलत होत्या. सर्व नियम समजावून सांगत होत्या. व्हेरी इम्प्रेसिव्ह. ह्यांनी एटीएम बंद ठेवून चेक ने पैसे काढायचेच ठेवले आहे. त्यामुळे तो एक गोंधळ बंद आहे तिथे.
आज सेन्सेकस परत वर आला आहे. शांत पणे प्रोसेस नुसार व्य वहार केल्यास त्रास मिनिमाइज होईल.
फायनली मदतनीस ताईंना आज पैसे
फायनली मदतनीस ताईंना आज पैसे मिळाले. १० रुपये आणि १०० मध्ये - दिड हजार. आज पण त्या दोन ठिकाणी कामावर गेल्या नव्हत्या. आमच्या घरी काम उरकून सव्वा नवाला रांगेत उभं राहिल्या. तीन वाजता पैसे मिळाले.
हो. बहूतेक ठिकाणी एटीएम बंद
हो. बहूतेक ठिकाणी एटीएम बंद आहेत. माझा त्याचमूळे घोळ होतोय. एक अकाउंट एसबीआय मध्ये आहे. तिथे अजूनही भल्या मोठ्या रांगा आहेत. त्यात बाहेर डिपॉझीट, एक्सचेंज आणि काढणे तिन्ही साठी एकच रांग.
दुसरं अकाउंट येस बॅंकेत. यांच्याकडे गर्दी नाहीये अजिबात पण कॅश पण खूप लिमिटेड येते. कॅश नसताना टोकन पण देत नाहीत जी रांग लावता येत नाही. आणि नेमके एटीएम बन्द. त्यामूळे पैसे काढायचे वांधे.
Reporting from Goa, रात्री
Reporting from Goa,
रात्री लँड झालो, प्रीपेड टॅक्सी वाल्यानी जुन्या नोटा घ्यायला नकार दिला, कालच संध्याकाळी मिळालेल्या 2500 मधले 1300 त्याच्या डोक्यावर घातले.
टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला ,थोडे नाटक केले तर घेतात ते जुने नोटा.
सकाळपासून असेच दिसतेय, आधी नाही म्हणतात, मग पैसेच नाही म्हंरल्यावर जुन्या नोटा घेतात.
पेपर मध्ये बोंबाबोंब होती पण, पणजी मध्ये प्रॉब्लेम कमी झालाय , पण इंटेरिअर्स मध्ये खूप प्रॉब्लेम होतोय असं म्हटलेले
>>> मी सिझलर खायला गेले मॉल
>>> मी सिझलर खायला गेले मॉल मध्ये <<<< सिझलर काय आहे?
मोदीकृपेने पैशांची नोटांची टंचाई असतानाही बाहेर खायला गेलात? नोटांची बचत नै करायची?
>>> क्रॉसवर्द मध्ये ५० रु. चा आउटलुक चा अंक घेतला जेवताना वाचायला <<< मोदीकृपेने पैशांची नोटांची टंचाई असतानाही? नस्ते वाचले जेवताना तर काय घास गिळला गेला नस्ता काय? (मला खूप पूर्वी होती सवय, पेपर /वाचायला घेतल्याशिवाय जेवणच जायचे नाही, पण मग मुद्दामहुन सवय मोडून काढली, आता क्यान्टिनमधे कोण देणार पेपर वाचायला? आमच्या इथला मिसळ वाला मात्र आवर्जुन देतो.. ते ही फुक्कट )
>>>> क्रॉसवर्द काय आहे?
Crossword क्रॉसवर्ड -
Crossword क्रॉसवर्ड - पुस्तकांचं दुकान असतं ना.. स्टेशनरीही मिळते ...
चला, फक्त माबोवरचा एकच ग्रुप
चला,
फक्त माबोवरचा एकच ग्रुप नाही तर काही पेपरवालेही म्हणत आहेत की सरकारची तयारी कमी पडली.
Yet, despite the inconvenience caused, the public has so far been largely supportive of the demonetisation move. They hope that it will fight corruption. But if the cash flow isn’t normalised soon and queues at banks and ATMs remain long, this supportive mood could quickly flip. It isn’t clear that the government has prepared adequately for the demonetisation effort. Even accounting for secrecy, it could have taken steps such as increasing the flow of Rs 100 notes and quietly recalibrating ATMs for the new notes, that would have mitigated public hardship.
http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/indias-new-strik...
http://blogs.timesofindia.indiatimes.com/toi-editorials/high-stakes-gamb...
हा निर्णय चांगला असेलही, कळेलच लवकर. तो मोदींनी आणला की आरबीआय ने की कुठल्या पक्षाने यावर मला काहीही म्हणायचं नाही. तयारी नीट केली असती तर इतकी गैरसोय झाली नसती हे मान्य करायला लोकांना काय जड जातय हे कळत नाहीय. काहींना गैरसोय होतेय हे देखील काही लोक मानायला तयार नाहीत लोकांनी अनुभव लिहून सुद्धा. मला गैरसोय होतेय आणि गैरसोय होत असणारे लोकही दिसत आहेत. नीट तयारी केली असती तर हे टाळता आलं असतं. नियम केलाय तर पाळावा लागणारच. पण सुधारणा हवी म्हटलं तर त्यात नेमकं काय चूक आहे?
सरकारने माना की कॅश कम होनेसे हो रही है दिक्कत अशी बातमी दाखवत आहेत. चला. सरकारनेही मानलं. आता तरी माबोवाले मानतील का?
हे नक्की काय चालू आहे
हे नक्की काय चालू आहे ?
एसबीआय बॅकेने मल्याचे १२०१ कोटी रूपये कर्ज माफ केले.त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांचे,कॉर्पोरेट कंपन्यांचे एकंदर ४८,००० कोटी रूपये कर्ज माफ केले.
निषेध..निषेध..निषेध..
आग लावा ह्या मोदी सरकारच्या बदमाशीला,आग लावा ह्या ढोंगीपणाला,आग लावा ह्या गोबेल्स टाईप प्रचाराला ..
'नोटबंदी' योजना काळा पैसे वाल्यांवर कडक कारवायी करण्यासाठी काढली म्हणे.देशभक्त असाल तर रांगा लावा.सहन करा.तिकडे सिमेवर जवान मरताहेत तुम्हाला ४ तास रांगेत ऊभ राहाता येत नाही हा गोबेल्स थाटात प्रचार करायचा व मागील दाराने मल्यासारख्या देशद्रोह्यावरच कर्ज माफ करून टाकायच.बड्या कंपन्या,कॉर्पोरेट सेक्टरने घेतलेली कर्जे माफ करायची.ह्या रीझर्व बॅकेने जाहीर केलेल्या 'विलफुल डीफाॅलटर्स' नी बुडवलेल्या कर्जाची रक्कम १६ लाख कोटीच्यावर जाते. ते खरे देशद्रोही आहेत.ती कर्जे जी आज 'एनपीए' म्हणून ओळखली जातात ह्या बदमाशांनी बुडवल्यामुळे बॅका बुडण्याची परिस्थिती आलेली आहे.सरकारला तर ह्या चोरांवर कारवायी करायची नाही.सरकार त्या बड्या चोरांचेच आहे.
त्यामुळे काय करा.एनपीए माफ करा.त्यांचेच सरकार आहे.लोकांचा पैसा बॅकेत आणा.तोच पैसा घेऊन परत ह्या कॉर्पोरेट चोरांना बॅकेतून परत कर्ज द्या.तुमच्या आमच्या खिशातून पैसे घ्या तेच पैसे कॉर्पोरेट सेक्टरच्या खिशात टाका.ते परत कर्ज बुडवायला मोकळे.काळापैसे जमवणार्यासाठी आता १०००रु च्या नोटाएवजी २०००रुपयाची नोट तयार.
एसबीआयने एकंदर ६३ 'विलफुल डीफाॅलटर्सचे' ४८,००० कोटी रूपये माफ केले आहेत (as on 30 June 2016)
चला आता आपलेच श्रमाचे पैसे बॅकेत भरण्यासाठी तासनतास लाईन लावूया,दररोजच्या जगण्यासाठी पैसे काढण्यासाठी एटीएम समोर लाईन लाऊया..
तिकडे लंडन मध्ये विजय मल्या खूष,विलफुल डिफॉलटर्स खूष...
With efforts to recover its dues hitting a virtual dead-end, the State Bank of India (SBI) seems to be have started a clean-up of its balance sheets by writing off loans worth about Rs 7,016 crore owed to it by more than 60 of its top 100 wilful defaulters.
While 63 accounts in the list have been fully written off, 31 have been partially written off and six have been shown as non-performing assets (NPAs), reveal documents accessed by DNA. As on June 30, 2016, SBI has written off Rs 48,000 crore worth bad loans. The documents, however, don't specify the entry time of these "write-offs''.
Prakash Reddy
http://www.dnaindia.com/india/report-sbi-writes-off-loans-of-63-wilful-d...
dt 16 N0v 2016
निषेध..निषेध..निषेध.. आग लावा
निषेध..निषेध..निषेध..
आग लावा ह्या मोदी सरकारच्या बदमाशीला,आग लावा ह्या ढोंगीपणाला >>>> +१
@शाम_भागवत
@शाम_भागवत
recovery process of these
recovery process of these accounts will continue till resolution of these accounts.
हे त्या बातमीतलं शेवटचं वाक्य. मला नाही वाटत write off करणं म्हणजे कर्ज माफ करणं .
रात्री ११.३० वाजता ATMमधून
रात्री ११.३० वाजता ATMमधून २००० रु. (१०० च्या नोटा) घेऊन आलो. पुढे-मागे कोणी काळा पैसावाले असावे का याचा अंदाज घेतला, पण सगळे एरीयामधिलच लोक दिसले. श्या! काळा पैसा असणारे नक्की कसे दिसतात ते बघायला मिळणार की नाही
ते गोंडस नाव आहे फक्त. बाकी
ते गोंडस नाव आहे फक्त. बाकी हिशेब तोच.
अर्थात तात्पुरता बुद्धिभेद करून लोकही हो हो म्हणणार आणि मग हे हळूच कर्जमाफी करून चुपचाप बसणार. मजा आहे
Banks prefer to never have to
Banks prefer to never have to write off bad debt since their loan portfolios are their primary assets and source of future revenue. However, toxic loans, or loans that cannot be collected or are unreasonably difficult to collect, reflect very poorly on a bank's financial statements and can divert resources from more productive activity. Banks use write-offs, which are sometimes called "charge-offs," to remove loans from their balance sheets and reduce their overall tax liability.
Read more: Why do banks write off bad debt? | Investopedia http://www.investopedia.com/ask/answers/070815/why-do-banks-write-bad-de...
Follow us: Investopedia on Facebook
Zee News पर बैंको मे Line मे
Zee News पर बैंको मे Line मे खडे सब लोग खुश हैं Aaj Tak पर लोगो को थोडी तकलीफ हो रही है, और NDTV पर लाइन मे खडे लोगो की मौत हो जा रही है.
- whatsapp वरून साभार
आमच्या घरी काम उरकून सव्वा
आमच्या घरी काम उरकून सव्वा नवाला रांगेत उभं राहिल्या. तीन वाजता पैसे मिळाले. >> बापरे
मी नवी मुंबईत तीन वेळा लाईनत होतो..एकदा (११ नोव्हे) जुन्या नोटा बदलून घ्यायला, नंतर (१५ नोव्हे) एटीएममधून नवीन नोटा काढायला आणि आज चेक वटवून नवीन नोटा घ्यायला. प्रत्येक वेळी २० ते ३० मिनीटे
लागली. आयसीआयसीआयमध्ये आता नोटा बदलून मिळत नाहीत.
तो वरचा विनोद ज्याने कुणी
तो वरचा विनोद ज्याने कुणी बनवला आणि शेअर केला तो निर्दयी असला पाहीजे.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/retired-teacher-dies-after-stan...
सपनाजी, लोकसत्ता सरकारविरॉधी
सपनाजी, लोकसत्ता सरकारविरॉधी वृत्तपत्र आहे, त्यामुळे त्यात येणार्या बातम्याकडे लक्ष देऊ नका. देशासाठी पाच पन्नास माणसे मेली तरी हरकत नाही, स्वत: आदरणिय वंदनीयांनी 'आत्माहुती द्यायला लागली तरी हरकत नाही' असे विधान केले आहेच (अश्रु वगैरे ढाळत). त्यामुळे अशा लिंका देऊ नका. 'पांचजन्य' किंवा 'साप्ताहिक विवेक' काय म्हणतंय या बाबतीत किंवा पावटे मंडळींना त्रास नाही ना झाला याकडे लक्ष द्या फक्त.
नमो नमः !
NDTV वाले पण कुठून बातम्या
NDTV वाले पण कुठून बातम्या आणतात कोण जाणे
In Gujarat, Bribe Of Rs 2.9 Lakh Paid In New Rs 2,000 Notes, Two Arrested
http://m.ndtv.com/india-news/in-gujarat-bribe-of-rs-2-9-lakh-paid-in-new...
काल ही माझ्याच वया चे एक
काल ही माझ्याच वया चे एक गृहस्थ लायनीत उभे राहुन पैसे भरायच्या काढायच्या प्रयत्नात हार्ट अॅटेकने वारले. भायंदरची घटना आहे. उत्तरेत एका माण सा ने दोन दिवस एटीएम मधून पैसे काढण्यात अपयश आले म्हणून फ्रस्ट्रेट होउन स्वतःच्या मुलांना मारले. अश्यांच्या साठी तरी ही छोटी गैरसोय नाही.
ह्या दोन बातम्या आजच्या टाइम्स मध्ये वाचल्या.
त्यापेक्षाही अजून एक मोठी भीती आता मनात बसली आहे की बजेट मध्ये काय करतील? देशाला गरज आहे ह्या नावाखाली पीएफ एल आयसी मधले आपले सेविन्ग तरी सुरक्षित आहे का? जे काय थोडी बहु त सुरक्षितता होती ती ही काढून घेतली जात आहे. जितका डेटा डिजिटल होत जात आहे तितका तो मॅनि प्युलेट करणे सोपे जाणार सेंट्रली.
ज्या सहकारी बँका अजून संगणकीकृत झालेल्या नाहीत तिथे जुन्या नोटा भरून नेता लोक्स, एफ डी, डीडी बॅक डेट करून बनवून घेत आहेत. म्हणजे झालाच पांढरा पैसा.
कांडला पोर्ट ट्रस्त मध्ये दोघांनी २.९ लाख लाच २००० रु च्या नव्या नोटां मध्ये मागवली व ती मिळाली पण त्यांना अरेस्ट केले आहे असे वाचले.
Zee News पर बैंको मे Line मे
Zee News पर बैंको मे Line मे खडे सब लोग खुश हैं Aaj Tak पर लोगो को थोडी तकलीफ हो रही है, और NDTV पर लाइन मे खडे लोगो की मौत हो जा रही है.
- whatsapp वरून साभार>>
खरं तर एन डी टी व्ही वर ३१ डिसेंबर पर्यंत बॅन लावला पाहिजे.
देशद्रोही कुठले!
(फेसबुकचं चांगभलं!)
सपनाजी, लोकसत्ता सरकारविरॉधी
सपनाजी, लोकसत्ता सरकारविरॉधी वृत्तपत्र आहे, त्यामुळे त्यात येणार्या बातम्याकडे लक्ष देऊ नका. देशासाठी पाच पन्नास माणसे मेली तरी हरकत नाही, स्वत: आदरणिय वंदनीयांनी 'आत्माहुती द्यायला लागली तरी हरकत नाही' असे विधान केले आहेच (अश्रु वगैरे ढाळत). त्यामुळे अशा लिंका देऊ नका. 'पांचजन्य' किंवा 'साप्ताहिक विवेक' काय म्हणतंय या बाबतीत किंवा पावटे मंडळींना त्रास नाही ना झाला याकडे लक्ष द्या फक्त. >>
विठ्ठलजी, मी कुठल्याही गोटात नाही. तुम्हाला ज्यांना ऐकवायचे थेट त्यांना ऐकवा. मी चांगल्या निर्णयाबद्दल मोदीजींचे कौतुकही करणार आणि सध्या नागरिकांचे जे हाल होताहेत त्याबद्दल दोषही देणार. या दोन्हीसाठी कुणी मला देशद्रोही किंवा भक्त ठरवले तर त्यांना सरळ इग्नोर करत राहणार.
http://m.businesstoday.in/sto
http://m.businesstoday.in/story/4-lakh-trucks-stranded-on-highways-post-...
अक्ख्या भारतवर्षात 4 लाख ट्रक अडकले,
तशी किरकोळच घटना,
नॉर्थ इस्ट 5 लाख चहामळा मजुरांचे आठवड्याचे पगार अडकले
महाराष्ट्र 8 दिवस बाजार समित्यांसाजे व्यवहार बंद आहेत.
शेतकरी अडते सोडुन द्या, हमाल, स्वच्छता कर्मचारी हे सगळे रोजंदारी वर काम करतात या ठिकाणी. परिणाम 8 दिवस उत्पन्न नाही.
गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी या महिन्याचा पगार रोख मागीताLया आहे, पैसे काढायला रांगेत उभे राहिलो तर सरकारी कामावर परिणाम होईल म्हणतात
Watching NDTV, ZEE News etc.
Watching NDTV, ZEE News etc. is very boring. Now a days I watch only music channels. Full time pass.. Ude dil befikare
Thank god our office is having ICICI ATM. I am very happy with the service provided by ICICI for their customers. I just spend 30 mins to deposit 7000 & withdraw 4000 by cheque. (You may feel I leave below BPL)
सिम्बा किती रडताय?
विरोधी पक्ष संसदेत असलेली संधी वाया घालवणार अस दिसतय. मोदी आता सुसाट सुटलेत.
ज्या ब्यांकेत दहा मिनिटात
ज्या ब्यांकेत दहा मिनिटात पैसे मिळताहेत त्यांची नावे आणि कुठली शाखा हे कळवा प्लीज. मी चालले नवीन अकाउंट उघडायला जनता ब्यांकेत. ऑनलाईन पैसे स्विकारत असतील तर अकाउंट अॅक्टीवेट झाल्याबरोबर पैसे पण काढीन.
.
.
Pages