खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोनिका स्वार्थी वगैरे आहे पण जे आहे ते सडेतोड आहे. उगिच सुन म्हणुन त्या गवरी सारखा फालतुपणा सहन करणार नाही. मस्तं सहज वावरते ती सासरी. रोखठोक प्रश्न विचारते. तिची चुक झालेली आहेच पण विक्रांत आणी मानसीमुळे ती बिथरते जे कधीकधी साहजिकच वाटते.

तिला रोखठोक प्रश्न विचारले काल विक्रान्तने, त्याची उत्तरं दिली का?
तिला बिथरायला फक्त निमित्त हवं असतं. मुलांमुळे कितीवेळा बिथरली ती?

हे मैत्रिणी येणं वगैरे उगीच दोन्ही बाजुंनी जास्त दाखवलं आहे. त्या मैत्रिणी विचित्र आणि येड्या आणि ते घरचे पण विचित्र !

मैत्रिणी घरी येणं, खाणं पिणं सगळं स्वाभाविक आहे. पण मोनिका घराच्या लोकांना थोडी तुच्छतेने वागवते. पोहे चहा नको, पिझ्झा कोल्ड कॉफी ला महत्व देते, घरच्यांची ओळख करून देत नाही मैत्रिणींशी ते मला तरी खटकलं.

आणि सविता प्रभुणे तिच्या मैत्रीणींच्या ड्रेस ला वगैरे नावं ठेवताना दाखवली आहे ते पण चूकच आहे. कारण त्यातल्या कुणीच वाईट्ट असे ड्रेस नव्हते घातले.

या शिरेलीत तो एक व्हायोलीनचा रडका पिस सतत वाजवला आहे बॅक्ग्राउंडला. जाम डोक्यात जातोय तो. सतत रडकी भिकार शिरेल आहे याची आठवण करुन देतात बहूतेक. Proud

या शिरेलीत तो एक व्हायोलीनचा रडका पिस सतत वाजवला आहे बॅक्ग्राउंडला.--

खरंच ,. भयानक आहे तो पिस. ह्या सिरिअलसाठी सुट होत नाही.

>>>या शिरेलीत तो एक व्हायोलीनचा रडका पिस सतत वाजवला आहे बॅक्ग्राउंडला.-
ते व्हायोलीन आहे? मला वाटलं कुणी तरी गळ्यातून काढलेला अ सूर आहे तो Uhoh

मॅक्स +१. मला पण ते हाय पिच रडणं वाटतं Proud

बाकी ती आजी हॅरॅस करतेय हो मानसीला. ती जरा स्पष्ट सांगत का नाही की १-२ वर्षं थांबा असं?

मला गीताकाकीचा अभिनय आवडु लागलाय. म्हणजे तो अभिनय वाटतच नाही इतका सहज असतो. मानसीचा सद्गुणांचा पुतळा पहावत नाही. काय ते मेकॅनिकल बोलणे. विक्रांत या सिरिअलमध्ये नसेल तरी चालेल. त्याला काही, कसलाच स्कोप नाही.

मैत्रिणी कालच येऊन गेल्या होत्या ना? Uhoh आज परत?
आणि गीताकाकीच्या नवर्र्याला इतका वेळ का चिकटून बसली होती ती भवानी Lol

मला पण ते हाय पिच रडणं वाटतं >> तेच तर.. रात्रीची कुत्री रडतात तसे काहीसे.

कॉलींग झंपी इकडे अ‍ॅज वेल. Lol

हे देवा ती आजी मानसीच्या का मागे लागलीय हात धुवून?:अओ: मानसीला घरातून हाकलायची एवढी घाई झाली ये तिला.

मोनिकाने माबो वाचल वाटत, आज मैत्रिणीन्ना घरच्यान्शी ओळख करुन दिली.

मानसीचा सद्गुणांचा पुतळा पहावत नाही. >>> पण काल ती जरा मोनिकासारखी वागली आजीशी. थोडी रुड वागली जरा तिच्याशी. अर्थात कारणच तस होत म्हणा.

पण मोनिका घराच्या लोकांना थोडी तुच्छतेने वागवते. पोहे चहा नको, पिझ्झा कोल्ड कॉफी ला महत्व देते, घरच्यांची ओळख करून देत नाही मैत्रिणींशी ते मला तरी खटकलं.>>> +११११ त्या मैत्रिणी चपला घालून रुम मध्ये जातात ते पण नाही आवडल.

kkk3.png

कोणाला ह्या मालिकेचा पहिला प्रोमो आठवतोय का ?
फुलवाल्या मुलीने दिलेलं गुलाबाचं फूल विक्रांत भेंडीच्या ढिगावर ठेवतो आणि प्रोमो संपतो
ह्याचा अर्थ येतोय का लक्षात ?
विक्रांत आणि मानसी ह्यांच्या स्वभावच प्रतीकात्मक रूप होत
दोघंही भेंडी सारखे बुळबुळीत आहेत
joy-smiley-emoticon.gif

इथे कोणी ' तुझ्यात जीव रंगला ' मालिका पाहत का ?
एकदम छान आहे
हिरो हिरॉईन दोघंही मस्त आहेत ,स्मार्ट आहेत ,
सगळ्यांचा अभिनय पण छान आहे
झी मराठीच्या इतर सगळ्या बावळट हिरो हिरॉइन्स पेक्षा राणा आणि अंजली खूप छान आहेत

>>>आणि गीताकाकीच्या नवर्र्याला इतका वेळ का चिकटून बसली होती ती भवानी हाहा--

तो काही वर्षांपुर्वी मस्तंच दिसायचा (वादळवाट). हल्ली मला नाही आवडत. सतत गालांमध्ये लाडु लपवल्यासारखा घोळवत घोळवत बोलतो तो.

झी मराठीच्या इतर सगळ्या बावळट हिरो हिरॉइन्स पेक्षा राणा आणि अंजली खूप छान आहेत>> मी पाहते, मस्त आहेत दोघे अंजली व राणा पण .

त्या मानसीचे तोंड अनेक दिवसात नीट शी न झाल्यासारखे का असते ?

एकदम कचकडी बहुलि वाटते

कोणीतरी तिला एक गोळी फटाफट सकाळी पोट टकाटक द्या

Pages