Submitted by अतुल. on 2 November, 2016 - 00:48
ज्यांचे वय साधारणपणे पस्तीशीहून अधिक आहे त्यांना आठवत असेल पूर्वी दुकानांतून सुटी कॉफी मिळत असे. सुटी म्हणजे त्याकाळी कॉफीचा ब्रँड नव्हता. दुकानदारांना होलसेल मध्येच मिळायची. आणि ग्राहकांना ते वजनावर पुडीत बांधून कॉफी देत असत. तिचा स्वाद अफलातून होता कि जो आजही जिभेवर रेंगाळत आहे.
दुर्दैवाने आजकाल ती कॉफी कुठे मिळत नाही. आणि ब्रँड च्या नावाखाली भरमसाठ किमतीला चकचकीत डबड्यातून जी पूड विकली जात आहे, ती कॉफी नसून कॉफी पिणाऱ्याची क्रूर थट्टा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तिला पूर्वीच्या कॉफीची मजा नाही. तो स्वाद नाही. तो कैफ नाही. जे काही आहे ते करपट काहीतरी प्यायल्यासारखे वाटते बस्स. कम्प्लीट फालतू. म्हणे नेसकॅफे. हाड.
असो. इथे कुणाला ती पूर्वीची कॉफी कुठे मिळते (नेटवर) किंवा त्याविषयी काही माहिती असेल तर प्लीज कॉमेंटीतून पोष्टा. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत
वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्ष्मिरोडवर किवळेकरांचे फक्त कॉफिचे दुकान होते, जिथे बीया भाजुन/दळून वेगवेगळ्या दर्जाची कॉफी पावडर मिळायचि. दुकानाबाहेर घमघमाट असायचा.
(आता बहुधा ते दुकान राहिले नाही ) आता फक्त नेस्कॅफे/ब्रु इत्यादीच ब्रॅन्ड अधिराज्य/सत्ता गाजवतात, मी वाट बघतोय, पतंजली केव्हा घेऊन येत्ये कॉफी पावडर.
मध्यंतरी चेन्नईला गेलो होतो
मध्यंतरी चेन्नईला गेलो होतो तेथे अशी बरीच कॉफी बियांपासून बनवून दिलेली कॉफीची दुकाने आहेत. तिथून अर्धा किलो आणली होती बरेच दिवस वापरली अप्रतिम स्वाद होता शेवटपर्यन्त!
अर्थात २५-३० पुर्वी दुकानात कॉफीच्या वड्यादेखिल मिळत. मला आठवतयं.
गुडलक चौकात पण एक दुकान काही
गुडलक चौकात पण एक दुकान काही वर्षापुर्वी असल्याचे आठवतंय, आता आहे का ते बघावे लागेल.
वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत
वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत लक्ष्मिरोडवर किवळेकरांचे फक्त कॉफिचे दुकान होते, जिथे बीया भाजुन/दळून वेगवेगळ्या दर्जाची कॉफी पावडर मिळायचि. दुकानाबाहेर घमघमाट असायचा.
(आता बहुधा ते दुकान राहिले नाही ) > हे दुकान राजाराम पुलाजवळ विठठल मंदीर परिसरात कुठेतरी सुरू होणार होते.
कॉफी ताजी असतानाच दरवळ येतो,
कॉफी ताजी असतानाच दरवळ येतो, नंतर त्याचा आरोमा जातोच
ब्रु आणि एम आर ची कॉफी अजून
ब्रु आणि एम आर ची कॉफी अजून मिळते,फारसा तीव्र अरोमा नसतो पण बरी लागते.
आम्ही चिकमंगळूर हून जयंथी कॉफी आणली होती ती चांगली होती.
केरळा दुकानांमध्ये अजूनही चांगली कडक फिल्टर कॉफी पावडर मिळत असेल असे वाटते.
Rajan Coffee, Aundh road. Or
Rajan Coffee, Aundh road. Or any kerala store.
गुडलक चौकात पण एक दुकान काही
गुडलक चौकात पण एक दुकान काही वर्षापुर्वी असल्याचे आठवतंय, आता आहे का ते बघावे लागेल.>>> हो मिळते
कॉफी दळून मिळण्याचे ठिकाण
कॉफी दळून मिळण्याचे ठिकाण कर्वे रोडला स्वप्ननगरीच्या जवळ आहे. कॉफीमध्ये चिकरी ( चिकोरी) ची पूड कमी अधिक प्रमाणात मिसळली जाते त्याने कॉफीची चव बदलते . या कॉफी दळण्याच्या दुकानात कॉफी + चिकरीचे प्रमाण तुमच्या चवी नुसार बदलून दळून दिले जाते बाकी ती जुनी कॉफी ( बहुधा एम आरच ) ची चव अप्रतिम असे. तिच्या वड्या असत . त्यापुढे ही इन्स्टन्ट कॉफी किस झाडकी पत्ती ! अतुल यानी म्हटल्याप्रमाणे खरी कॉफी ही नव्हेच. खरेच अगदी करपट चव. त्यापेक्षा च्या पिलेला बरा...
cofee vadya nice
cofee vadya nice
गुडलक चौकात पण एक दुकान काही
गुडलक चौकात पण एक दुकान काही वर्षापुर्वी असल्याचे आठवतंय, आता आहे का ते बघावे लागेल.>>> हो मिळते >>>> त्यांच्याकडे वैशाली हॉटेल मध्ये मिळणार्या कॉफीची पावडर पण मिळते.
गुडलक चौकात जो पेट्रोलपंप आहे, त्याच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आहे ते दुकान.
अरे व्वा... क्या बात है एकदम
अरे व्वा... क्या बात है एकदम एकापेक्षा एक माहितीपूर्ण प्रतिक्रिया. जाऊन येतोच एकदा आता गुडलक चौकात आणि कर्वे रोडला.
@अजय अभय अहमदनगरकर... नवीन माहिती माझ्यासाठी. धन्यवाद.
सर्वांचेच खूप खूप धन्यवाद.
कँपात आसाम टी कडे बघा. मी
कँपात आसाम टी कडे बघा. मी बरेच दिवस गेले नाही त्यांच्याकडे डी मार्ट आमच्याकडे झाल्यापास्नं
हो, अशी दुकाने पहिली आहेत,
हो, अशी दुकाने पहिली आहेत, मी जायचे लहानपणी वडिलांबरोबर. मज्जा वाटायची एवढी व्हरायटी बघुन. आणी तो घमघमाट अतिशय रिफ्रेशिंग! डोंबिवली स्टेशनजवळ एक दुकान आहे. नाव लक्षात नाही.
पूर्वी डोंबिवलीत फडके रोड
पूर्वी डोंबिवलीत फडके रोड येथून बाबा माझ्यासाठी कॉफी विथ चीकरी असं combo करून आणायचे. आता बरेच वर्ष मी ब्रु कॉफी पीते म्हणून माहिती नाही मला अजून तिथे आहे का नाही ते दुकान.
मी पहिलेले दुकान डोंंबिवली
मी पहिलेले दुकान डोंंबिवली वेस्टला आहे. चीकरी म्हणजे काय अन्जु?
चीकरी किंवा चकोरी असतो
चीकरी किंवा चकोरी असतो काहीतरी प्रकार (पावडर) . स्वाद आणि वास छान येतो त्याला. ब्रु मध्येपण आहे मिक्स ते. नक्की काय माहिती नाही पण एका कानडी मैत्रिणीने ते फडके रोड दुकान आणि तिथे कॉफीपावडरमध्ये चिकरी मिक्स मिळतं, आम्ही तसं वापरतो असं सांगितलं मग बाबा आणायचे माझ्यासाठी, combo प्रमाण विसरले मात्र.
chicory root
chicory root
Thanx स्वाती.
Thanx स्वाती.
पुर्वी कॉफीच्या आयताकृती
पुर्वी कॉफीच्या आयताकृती वड्या मिळायच्या.. त्याची चव आता मॉलमधे मिळणार्या कॉफीला नाही म्हणजे नाहीच येत..
आजोबा आणायचे चिकोरी कॉफी.
आजोबा आणायचे चिकोरी कॉफी. मस्त दरवळ असायचा. कॉफी नाही बनवली तरी घमघमाट असायचा चिकोरीचा घरात! छान आठवणी..
चिकोरी लिंककरिता थँक्स स्वाती.
पुर्वी कॉफीच्या आयताकृती
पुर्वी कॉफीच्या आयताकृती वड्या मिळायच्या>>> आताही गावातल्या जुन्या किराणा मालाच्या दुकानात अश्या वड्या मिळतात.
म्हणजे पूर्वी ज्या कॉफीच्या
म्हणजे पूर्वी ज्या कॉफीच्या वड्या मिळत त्यात चीकोरीचे प्रमाण जास्त होते म्हणून ती आताच्या कॉफीपेक्षा चवदार होती... असेच ना? कि उलटे?
civet coffee पिउन बघा,भारी
civet coffee पिउन बघा,भारी लागते.
चिकोरीबद्दल नव्यानेच कळले.
चिकोरीबद्दल नव्यानेच कळले. बघितली पाहिजे चव,
माझ्या माहितीप्रमाणे ब्रू
माझ्या माहितीप्रमाणे ब्रू कॉफीत चिकोरीचे प्रमाण जास्त असते आणि म्हणून ती स्वस्तहि असते.
सिव्हेट कॉफी.. म्हणजे सिव्हेट
सिव्हेट कॉफी..
म्हणजे सिव्हेट मांजराच्या शी मध्ये बॉडी टेंपरेचर मुळे थोडी कुक होऊन चांगली चव आलेली कॉफी असते ना?
साउथ मध्ये अशीच मंकी ब्रँड कॉफी पण मिळते.
म्हणजे सिव्हेट मांजराच्या शी
म्हणजे सिव्हेट मांजराच्या शी मध्ये बॉडी टेंपरेचर मुळे थोडी कुक होऊन चांगली चव आलेली कॉफी असते ना?
>>>
यक्क ...
यक्क नाही हो. ती आपल्यापर्यंत
यक्क नाही हो. ती आपल्यापर्यंत येताना नीट स्वच्छ आणि स्टरिलाईझ करुन आलेली असते.(आय पुट इट रादर क्रूडली इन प्रिव्हियस पोस्ट )
आणि टेस्टी म्हणून बर्याच प्रिमीयम रेट मध्ये विकली जाते.
http://www.most-expensive.coffee/
तसेही झाडावरच्या बियांवरही पक्ष्यांनी प्रातर्विधी उरकलेले असतातच ना?