शिशुपाल. कुंतीच्या बहिणीचा मुलगा, श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ; जेव्हा जन्मला तेव्हा त्याला ३ डोळे आणि चार हात होते. सकाळी सकाळी त्याचा जन्म झाल्यावर त्याचे आई वडील त्याला सोडूनच देणार होते इतक्यात ‘प्रेस स्टार सिक्स टू म्युट, प्रेस पाउंड सिक्स टू अनम्युट’ असली रोजची दरबारातली उभ्या उभ्या बैठकीची अनाउन्समेंट चालू झाली. ‘मै समय हू’ आपल्या धीर गंभीर आवाजात बोलू लागला. म्हणाला की 'याच्या मरणाची वेळ अजून आलेली नाही. कुणा एका व्यक्तीने याला मांडीवर घेतल्यावर याचे जास्तीचे अवयव नाहीसे होतील, पण त्याच व्यक्तीकडून याचा मृत्यूही होईल.'
पुढे देवकी बाळंतविडा घेऊन एकदा नणंदेला भेटायला आली तर कृष्णही गेला बरोबर. तिकडे गेल्यावर मग कृष्णाने हट्ट केला, आय वॉन्ट टू होल्ड द बेबी, आणि काय आश्चर्य! शिशुपालाचे (हो.. हो.. डायपर होता. फालतू जोक करू नका) जास्तीचे अवयव गळून पडले. ते बघून प्रत्येकी एकेका डोक्यात (हा/आ)सू आलंच श्रुतकीर्ती आत्याच्या. आत्याला कृष्णाने वचन दिलं की डोंट वरी, मामाला मारलं तसं मी काही याला लगेहात मारत नाहीये. पण जरा का एका दिवसात याने माझी १०० वेळा खोडी काढली तर मात्र रडीचा डाव खडी, झेंटलमंस प्रॉमिस.
मग पुढे पांडव राजसूय यज्ञ करत असताना कृष्णला भारतरत्न आणि मॅन ऑफ द मॅच हे दोन्ही अॅवॉर्ड एकाचवेळी दिले जातायत बघून सात्विक का कायशा संतापाने शिशुपाल नाही नाही ते बरळला. तो चेडीचा किंग होता पण त्याचं अंकगणित कच्च असावं, किंवा मग कृष्णाने १०० अपराध पण ते कोणत्या बेस मध्ये मोजायचे ते सांगितलं नसावं, किंवा मग सेस्काडेसिमलचा जन्म आपल्या संस्कृतीत झालाय हे आपल्या शास्त्रात लिहायला आणि त्याचा नंतर शोध लावायला आपले लोक विसरले असं तरी असावं. पण लगोलग एक बाउन्सर (नो पन इंटेन्डेड) आला. गेम खल्लास.
टेक टू: अशीच एक व्यक्ती एकामागोमाग एक अपराध करते आहे. अनेकाना दुखावते आहे. बेछूट वार करते आहे. तिचे अपराध मोजायला हा धागा. बघुया नजीकच्या डी डे ला काय होतंय.
नाव : डोनाल्ड ट्रंप. बस... नाम ही काफी है. हौ जाओ शुरू.
इतकं काय काय आहे की कुठून सुरु करावं माहित नाही. पण खाली जे आठवतंय तसं एक एक लिहितो. प्रतिसादांमध्ये आलेलं वाढवत जाईन. प्रतिसादांमध्ये कृपया लिंक आणि ट्रंपच्या तोंडचे शब्द द्या.
१.यु आर डिसगास्टिंग : एका कोर्ट केस मध्ये डिपोझीशन चालू असताना एलिझाबेथ बेक या वकिलाने तिच्या ३ महिन्याच्या बाळासाठी ब्रेस्ट मिल्क काढायला जेव्हा ब्रेक मागितला तेव्हा ट्रंप आणि त्याच्या वकिलाने ऑबजेक्शन घेतले. तिने पर्स मधून ब्रेस्ट पंप काढून दाखवला की खरोखर तिला गरज आहे. तर ट्रंप साहेब 'यु आर डिसगास्टिंग' म्हणून निघून गेले.
http://www.nytimes.com/2015/07/29/us/politics/depositions-show-donald-tr...
२. ब्लड इज कमिंग आउट ऑफ हर व्हॉटएव्हर : मेगन केलीने जेव्हा ट्रंपला सुरुवातीच्या प्रेसिडेंशीअल डिबेट मध्ये त्याने पूर्वी केलेल्या स्त्री विरोधी (मिसॉजनिस्ट) आणि सेक्सिस्ट कमेंट बद्दल विचारले (उदा. स्त्रीयाना डॉग, फॅट पिग, डिसगास्टिंग अॅनिमल इ. म्हणणे) तेव्हा चिडून ट्रंपने मेगन केलीच्या डोळ्यातून रक्त बाहेर येत होतं. ब्लड इज कमिंग आउट ऑफ हर व्हॉटएव्हर. अशी प्रतिक्रिया दिली होती.
http://www.cnn.com/2015/08/08/politics/donald-trump-cnn-megyn-kelly-comm...
३. लहान बाळ आणि ट्रंप : हल्लीच एका मीटिंग मध्ये एक लहान बाळ ट्रंप बोलत असताना कुरकुर करत होतं. आधी किती छान बाळ आहे गुटगुटीत आहे, देशाला अशी पिढी हवी, त्याच्या आईला उद्देशून ठीक आहे करतात मुलं कुरकुर असं ट्रंपने सांगितलं आणि पुढच्या मिनिटाला मी जोक करत होतो म्हणून त्याना बाहेर जायचा रस्ता दाखवला. हा एपिसोड भयानक विनोदी होता. http://www.cnn.com/2016/08/02/politics/donald-trump-ashburn-virginia-cry...
४. ट्रंप आणि पर्पल हार्ट: पर्पल हार्ट हा अमेरिकन सैन्यातील जखमी किंवा शहीद सैनिकांना दिला जाणारा बहुमान आहे. ट्रंपच्या एका सपोर्टरने त्याला मिळालेले (खरखुर) पर्पल हार्ट ट्रंपला दिलं असा दावा ट्रंपने केला (मात्र तो सैनिक ती त्याच्या पर्पल हार्टची एक प्रत आहे असं सांगतो) त्यावर पुढे विनोद करत ट्रंप असही म्हणाला की मला हे कधीपासून हवंच होतं, हे एकदम सोपं झलं मिळवायला. हे अगदीच हीन पातळीवर येऊन केलेलं भाष्य होतं आणि मिलिटरी मधील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे फारसं आवडलेलं नाही. एका सैनिकाने लिहिलेलं वाचलं की मी आर्मीत असूनही मला पर्पल हार्ट कधी मिळू नये असंच वाटतं. अगदीच पोरखेळ करून ठेवलाय पर्पल हार्टचा!
http://www.nbcnews.com/politics/2016-election/trump-jokes-he-always-want...
५. ट्रंप आणि खान: डी एन सी (डेमोक्रेटिक नॅशनल कन्वेन्शन) मध्ये कॅप्ट्न खान या पाकिस्तानी मुस्लिम वंशाच्या शहीद सैनिकाचे वडील बोलले. त्यांनी माझ्या मुस्लिम मुलाने अमेरिकेसाठी बलिदान दिलंय, माझ्या खिशात अमेरिकेच्या संविधानाची प्रत आहे, ही प्रत मी ट्रंपला देऊ इच्छितो. तो मुस्लिमांना सीमा बंद करण्याबाबत भेदभाव करूच कसा शकतो. त्याने देशासाठी कधी काही बलिदान दिलं आहे का? कन्वेन्शनचा हा भाग फारच रोमांचकारी होता. त्यांना बोलवावे का, अशा प्रकारे भावनेला हात घालून मतं मिळवावी हा पूर्ण वेगळा विषय.
या आरोपांना ट्रंपने जे उत्तर दिले त्याने रिप पार्टी आणि सगळेच अवाक झाले. ट्रंप म्हणाला त्याची आई कन्वेन्शन मध्ये काही बोलली नाही कारण त्यांच्या धर्मानुसार बोलू दिलं गेलं नसणार. त्या धर्मात बायकांना बोलू दिलं जात नाही. त्याने काय बलिदान दिलं जा प्रश्न विचारला तर मी टेन्स ऑफ हंड्रेस जॉब दिले. स्वतःचा बिझनेस करणं हे बलिदान कसं? त्यालाच माहित. http://www.nytimes.com/2016/08/03/us/politics/donald-trump-gop.html
६. ट्रंप आणि मेक्सिकन अमेरिकन न्यायाधीश : ट्रंप युनिव्हर्सिटी संदर्भातील केसच्या न्यायाधीशावर ते मेक्सिकन पालकांच्या पोटी अमेरिकेत जन्माला आले आहेत आणि ट्रंपच्या मेक्सिकन वक्तव्यांमुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो असा आरोप केला आहे. एथनिसिटीवर भेदभाव न करणे हे संविधानात आणखी किती स्पष्ट करावं कोणास ठावूक. http://www.theatlantic.com/politics/archive/2016/06/trump-mexican-judge/...
७. ट्रंप आणि मुस्लिम : जोपर्यंत इमिग्रेशनबद्दल (किंवा कशाबद्दल तरी) काय चाललंय हे सिस्टीमला समजत नाही तो पर्यंत मुस्लिम धर्माच्या लोकांचं अमेरिकेत इमिग्रेशन टोटल आणि कम्प्लीट थांबवावे. http://abcnews.go.com/Politics/donald-trump-calls-total-complete-shutdow...
हे ट्रंप कसं करणार हे कोडच आहे कारण कोणाच्या श्रद्धा तपासायचं साधन अजून गवसलं असेल असं भल्याभल्यांना वाटत नाही. पाकिस्तान आणि काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता पासपोर्टवर धर्माचा उल्लेख कुठला देश करत नाही.
८. कामगार आणि कंत्राटदरांचा पगार थकवणे/ न देणे : सुतार, डिशवॉशर, रंगारी आणि त्याचीच बाजू कोर्टात लढवणारे वकील अशा शेकडो माणसांचा पगार ट्रंपने दिलेला नाही. हाच ट्रंप जॉब क्रिएशन आणि जॉब प्रोटेक्शनवर दर मिनिटाला बोलत असतो. http://www.usatoday.com/story/news/politics/elections/2016/06/09/donald-...
९. ट्रंप आणि मेक्सिकन सीमेवरील भिंत.:मी ग्रेट ग्रेट दक्षिण सीमेवर एकदम कमी खर्चिक भिंत बांधीन, आणि त्याचे पैसे मेक्सिको कडून वसूल करेन. कशी आणि कसे हे प्रश्न विचारू नयेत, मिनिटागणित प्लान इथे https://www.donaldjtrump.com/positions/pay-for-the-wall तयार आहेत. फक्त भिंत बांधूनच पुरेल का हे तर अजिबात विचारू नये. http://www.politifact.com/truth-o-meter/article/2016/jul/26/how-trump-pl...
१०. रशियाला एस्पिओनाज करायची खुली ऑफर: रशिया (ज्याने अमेरिकन कागदपत्रे फोडण्यासाठी मदत/ पाठिंबा दिला आहे) आणि जो अमेरिकेचा शत्रू मानला जातो त्याला जे काम अमेरिकेत बेकायदेशीर आहे तेच काम करायला चिथवणे, तेही राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराने! हिलरीच्या मेल सर्वर वरील ३०००० मिसिंग इमेल लिक करण्याची खुली ऑफर ट्रंपने दिल्येय. त्या बदल्यात मिडिया रीवोर्ड करेल ही हमी सुद्धा दिलेली आहे. http://www.nytimes.com/2016/07/28/us/politics/donald-trump-russia-clinto...
११. ट्रंप आणि नाफ्टा, ट्रान्स पॅसिफिक ट्रेड अग्रीमेंट: नाफ्टा म्हणजे अमेरिका-मेक्सिको-कॅनडा मधील फ्री ट्रेड करार, आणि अमेरिकेने केलेले व्यापारी करार जर अमेरिकेच्या फायद्याचे त्याला वाटले नाही तर ते परत करणार आणि जर इतर देशांनी ऐकलं नाही तर करार सरळ मोडीत काढणार. हे करणं कराराच्या टर्म्स प्रमाणे शक्य असलं तरी प्रचंड विरोध आणि न्यायालयीन लढायात जीव जाणारं असेल. हे करायला कॉंग्रेसच्या सपोर्टची ही गरज नसते. तीच गत टीपीपी ची. फायद्याचं काही झालं तर उत्तमच पण त्याचा रेकोर्ड बघता टांगती तलवार आहे. http://money.cnn.com/2016/07/06/news/economy/trump-nafta/
१२. मलेनिया ट्रंप आणि इमिग्रेशन : (कदाचित) भविष्यातील फर्स्ट लेडी अमेरिकेत इल्लिगल व्हिसावर आली की काय? http://www.politico.com/story/2016/08/melania-trump-immigration-donald-2...
१३. ट्रंप युनिव्हर्सीटी : २००५ मध्ये ट्रंपने बांधकाम व्यवसायातील गुपिते शिकवणारे विद्यापीठ काढलं. त्यातून श्रीमंत कसं बनावं, यासाठी ट्रंप स्वतः अध्यापक निवडून त्यांच्या मार्फत शिकवणार. लोकांनी $३५००० पर्यंत पैसे ओतले. ती धूळफेक आणि फसवणूक आहे असं लोकांचं मत बनलं. कोर्ट केस चालू आहेतच. वर उल्लेख केलेला मेक्सिकन अमेरिकन न्यायाधीश ज्याने ट्रंपवर आरोप ठेवून केस चालवायची परवानगी दिली तो याच केस मध्ये होता. http://www.nytimes.com/2016/08/03/us/politics/trump-university-case.html
१४. ट्रंप - कृष्णवर्णीय आणि रेसिस्ट वक्तव्ये: कृष्णवर्णीय लोकांना भाडेकरू म्हणून न ठेवणे, त्याला पाठींबा देणाऱ्या kkk लीडरचा निषेध न करणे, कॅसिनो मधून ब्लॅक लोकांची हाकालपट्टी करणे, मेक्सिकन लोकांना बलात्कारी आणि क्रिमिनल म्हणून संबोधणे, नेटिव्ह इंडियन लोकांचा अपमान, बेघर लॅटीनो, ब्लॅक लोकांना मारणाऱ्या त्याच्या सपोर्टरना उत्तेजन देणे आणि अनेक आहेत. http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-racist-examples_us_56d4...\
१५. ब्युटी पेजंट स्कॅन्डल: https://www.bostonglobe.com/news/politics/2016/04/16/trump/P6jVWXAzaG12O...
१६. चार कंपन्याची दिवाळखोरी : आता पर्यंत ४ कंपन्याची दिवाळखोरी जाहीर झाली आहे. पण तो म्हणतो त्याने नियमाने फॅन्टास्टीक डील केलंय. असेल ही.
१७. इल्लिगल पोलिश कामगारांची पिळवणूक: ट्रंप टॉवर बांधताना २०० अनडॉक्युमेंटेड पोलिश कामगार $५/तास किंवा प्रसंगी फुकट कामाला लावले. त्यांना हार्ड हॅट सारखी सुरक्षा साधने पुरवली नाहीत. कामगार बांधकामाच्या साईट वरच झोपत असतं. कामगार तक्रार करतील वाटल्यावर डीपोर्टेशनची भीती दाखवली. http://www.politifact.com/truth-o-meter/statements/2016/feb/25/marco-rub...
१८. ट्रंप आणि त्याची संपत्ती: तो म्हणतो १० बिलियन पेक्षा जास्त आहे. पण टॅक्स कागदपत्रे काही तो उघड करत नाही. http://www.politico.com/story/2016/05/donald-trump-money-net-worth-223662
१९. अपंग पत्रकाराच्या व्यंगाची नक्कल: कॅम्पेन ट्रेलवर सर्ज कोव्हलास्की या अपंग पत्रकाराची हिडीस नक्कल करून टर उडवलेली. https://www.washingtonpost.com/news/fact-checker/wp/2016/08/02/donald-tr... (धन्यवाद: maitreyee)
२०. वेटरन्स फंड रेज : जानेवारीत ट्रंप वेटरन्स साठी फंड रेज करायला गेला होता आणि ६ मिलियन त्यापैकी १ मिनियान त्याच्या खिशातून टाकले अशी माहिती त्याने दिली. हा केलेला क्लेम खोटा होता. त्याने ६ मिलियन रेज केलेच नाहीत, की १ मिलियन खिशातून दिले. त्याच्या प्रसिद्धी प्रमुखाने मात्र सांगितलं की १ मिलियन रक्कम ट्रंपने खिशातून दिली, जी देखील दिली गेली न्हवती.
त्या नंतर तब्बल ४ महिन्यांनी त्याने ती देणगी दिली.
१९९५ मध्ये की रक्कम जमवताना जेवढी जमेल त्याच्या इतकीच रक्कम ट्रंप देईन कबुल करून त्याने दिली न्हवती, तर फक्त एक त्रितीयांश दिली होती. (धन्यवाद फा) http://www.msnbc.com/rachel-maddow-show/caught-fibbing-trump-scrambles-a...
२१. अमेरिकेवर हल्ला झाला तर जपानची लोकं सोनी टीव्ही बघत बसतील. अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्र देश जपानचं संरक्षण करायची जवाबदारी अमेरिकेची आहे पण ट्रीटी (आर्टिकल ९) नुसार जपान आपलं आरमार विदेशी पाठवू शकत नाही. ते फक्त सोनी टीव्ही बघत बसतील. हाहा
ट्रंपला खरच इतिहासाची जाण नाहीये, आणि अमेरिकेचं ४७,००० आरमार जपान मध्ये तैनात असल्याचं महत्त्व,
http://www.telegraph.co.uk/news/2016/08/05/donald-trump-savages-japan-sa...
२२. पॉल रायनला अनेक दिवस पाठींबा न देणे. आय अॅम नॉट देअर यट, वी नीड स्ट्रोन्ग लीडर्स असं टोलवत ठेवत रिपब्लिकन सभागृहाचा स्पीकर पॉल रायनला जाहीर पाठिबा अनेक दिवस न देणे. याने जीओपी आणि रिप अत्यंत चिडले. शेवटी गेल्या शुक्रवारी पाठींबा दिला ट्रंपने.
पण वीकेंडच्या ट्रंपच्या रॅलीज मध्ये त्यात्या ठिकाणी उभे राहणारे सिनेटर उपस्थित राहिले नाहीत. आणि अनेक रिपनी ट्रंपपासून अंतर ठेवून रहायला सुरुवात केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ट्रंपचा पराभव गृहीत धरून जास्तीत जास्त रिप हाउसमध्ये कसे आणता येतील आणि बहुमत टिकवून ठेवता येईल याचा विचार करू लागले आहेत. अशा बातम्या आहेत.
http://www.cnn.com/2016/08/03/politics/donald-trump-campaign-disarray/
http://www.nytimes.com/2016/08/07/us/politics/donald-trump-gop.html
२३. न्युक आहे तर वापरत का नाहीत? अनेक ठिकाणी बोलताना न्युक आहे तर वापरत का नाही? हे आहेच कशाला मग? मी आयसीस विरुद्ध तर न्युक नक्कीच वापरेन. अशी बेजवाबदार विधानं.
प्रश्न विचारले की मी कदाचित वापरणारपण नाही पण प्रपोजल टेबलवरून काढणार नाही असं सारवासारवीचं उत्तर दिलंय. (धन्यवाद सोनू, सशल) http://www.politicususa.com/2016/08/03/trump-asks-if-nuclear-weapons-the...
पु ढे एडीता अजून...पापाच्या
पु ढे एडीता अजून...पापाच्या घड्यामध्ये भर पडत च आहे अजून्न..(लॉकर रूम टॉक)
हिलरी आज्जिन्च्या रूपाने "कृष्ण" जन्मावा म्हणजे झाले..
http://www.nytimes.com/2016/1
http://www.nytimes.com/2016/10/16/opinion/sunday/if-hillary-clinton-grop...
http://www.nytimes.com/intera
http://www.nytimes.com/interactive/2016/01/28/upshot/donald-trump-twitte...
मला काय वाट्ते सांगू का.
मला काय वाट्ते सांगू का. इलेक्षन ही इश्यूज वरून लढली जावी. ह्या बाबामुळे ती अतिशय उथळ पातळीवर लढली जाते आहे. तेच बरोबर नाही. इ कॉनॉमी डिफेन्स, बिझनेस, देशाची धोरणे, डायवर्सिटी,
रेसीझम ह्यावर ह्याला काही पॉलीसीज वगैरे विचार करून बोलताना ऐकलेच नाही आहे. बाई बाजी करणे हे काही नॅशनल प्लेटफॉरम वरून अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही. सारखे तेच तेच वाचून ऐकून कंटाळा आला. काय भाषा वापरतो? यू कॅन रिप द बेबी आउट ऑफ द वूंब? हे बोलणे? कठीणच आहे.
जर हा म्हणतो त्याप्रमाणे ग्रेट बिझनेस लीडर असेल तर ह्याला गॄप मध्ये कधीतरी कोणीतरी सेन्सिटीविटी,
से. हरास मेंट बद्दल ट्रेनिन्ग दिलेले असले पाहिजे. अमेरिकन कंपनी फार पर्टीक्युलर असतात ह्या बाबत. कारन लॉसूट महाग पड्ते. त्यामुळे बिझनेसचा ओनर अशी भाषा वापरेल व वागेल हे खरेच वाट्त नाही.
टॅक्सेस जाहीर न करणॅ व त्याबद्दल मिरवणे पन बेकार आहे.
मिशेल ह्यांचे भाषण परवाचे ते मात्र फर्स्ट क्कास होते. त्या कधी लढतील विलेक्षण. ह्या प्रतीक्षेत आहे.
प्रिय्य अमितव, अभिनंदन! बस
प्रिय्य अमितव,
अभिनंदन!
बस अब आगे आगे देखिये होता है क्या!
(बिन देअर, डन दॅट! )
Pages