या छोट्या छोट्या अपमानांचे काय करावे? http://www.maayboli.com/node/60577 .. या धाग्यावरून माझ्या आयुष्यात घडलेला हा किस्सा आठवला. पोस्ट मोठी झाली म्हणून नाही, तर छोटे अपमान आणि मोठा अपमान यांची सरमिसळ होऊ नये म्हणून वेगळा धागा काढला आहे
गोष्ट तशी जुनी आहे बरीच. पण स्मरणातून काही केल्या जात नाही.
तेव्हाही माझी एक गर्लफ्रेंड होती. आताची वेगळी. तेव्हाची वेगळी. गफलत नको! मुद्दाम हे सांगितले कारण ते एक गंडलेले रिलेशन होते.
म्हणजे ती मला ईतकी आवडायची की तिला जे आवडेल तसा मी वागायला बघायचो. पोशाख, पेहराव, अगदी लूकही तिला जसा हवा तसा ठेवायला बघायचो. भले मी त्यात माझ्या कम्फर्ट झोनमध्ये नसलो तरीही.
उदाहरणार्थ, शर्टाचे सर्वात वरचे, म्हणजे कॉलरच्या जवळचे बटण लावणे. एकतर रोज आंघोळ करणे आणि आंघोळ झाल्यावर केसांना तेल चापडत चोपडत धारदार कंगव्याने ते विंचरणे. शून्य पॉईंट शून्य एक मिलीमीटरच्या वर दाढी वाढताच तिला पुन्हा गालाच्या आत ढकलणे. असे कैक हास्यास्पद प्रकार मी सो कॉलड प्रेमाच्या नावावर ‘त्याग हेच खरे प्रेम‘ आणि “तिची मर्जी तीच आपली खुशी’ अस्से यमक वगैरे न जुळणारे डायलॉग मारत करायचो.
तर एकदा असेच तिच्या एका मैत्रीणीच्या बहिणीचे, कि बहिणीच्या मैत्रीणीचे लग्न होते. माझ्या गर्लफ्रेंडला आग्रहाचे आमंत्रण होते. पण तिच्या फारसे कोणी ओळखीचे नसल्याने तिने आग्रहाने मला सोबत यायला सांगितले होते. लग्नाचा हॉल तिच्या आणि माझ्या घराच्या बरोबर मध्ये असल्याने, आणि आम्ही दोघे दोन विरुद्ध दिशेने येणार असल्याने थेट हॉलवरच भेटायचे असे ठरवले होते. मी नेहमीसारखा वेळेच्या अर्धा तास आधी तिला आवडणारा चंपक बनून आलो होतो. पण तिचा तासभर कुठेच पत्ता नव्हता. फोन केल्यावर समजले की तिचा साडी घालायचा बेत होता आणि ते तिच्या सवयीचे नसल्याने तिला उशीर होणार होता. मी एवढा वेळ बाहेरच काय थांबायचे म्हणून हॉलच्या आत जाऊन बसूया म्हटले. आत जाऊन पाहिले तर समजले की मुंबईतल्या सगळ्याच मुलींना साडी घालणे सवयीचे नसावे. कारण काही उडाणटप्पू टाळक्यांशिवाय हॉलमध्ये महिलावर्गाच्या नावावर एकही चिटपाखरू दिसत नव्हते.
मग मी एक फॅन (शाहरूखचा नाही हं, तर हवा देणारा फॅन) आणि एक खुर्ची पकडून स्थानापन्न झालो. नव्यानेच घेतलेला मोबाईल काढला. वॉलपेपरवर लावलेला गर्लफ्रेंडचा फोटो एकवार न्याहाळून नेहमीच्या मनोरंजनाला लागलो. म्हणजे आपले मोबाईल गेम्स वगैरे. काही क्षणातच तल्लीन झालो. पण मग थोड्यावेळाने पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. थोडेसे वळून अंदाज घेतला तर एक टवाळखोर पोरांचा ग्रूप मागे येऊन बसला होता. त्यांच्यामुळे मला लागणारा फॅनचा वाराही अडला होता. म्हणून जरा त्रासिक नजर करत पुर्ण मागे वळलो तर त्यातील एका मुलाचे बूट अगदी माझ्या तोंडासमोर आले. मी जरा ऑं वासला असता तर त्याच्या चरणोंकी धूल थेट माझ्या तोंडातच पडली असती ईतके जवळ. म्हणजे एवढावेळ तो मुलगा माझ्या मागच्या खुर्चीवर पाय टांगून बूट माझ्या डोक्याजवळ येतील अश्या पोजिशनमध्ये बसला होता.
क्षणभर वाटले तेच बूट काढून त्याच्या थोबाडात मारावेत. पण सवयीने कंट्रोल केले. फक्त त्याच्या नजरेला नजर दिली. तसे त्याने फारच उद्धटपणे, दटावल्यासारखे, बघतो काय रे अश्या आविर्भावात आपल्या भुवया उंचावल्या. शेजारच्यानेही दात काढले. साल्ला टग्या होता. सोबत टग्यांचाच ग्रूप होता. आरे का कारे करायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी मनात आणले असते तर मला मंडपाच्या मागे नेऊन धोपटला असता. आणि एकतर हा एरीयाही आपला नव्हता.
नुकतेच लगे रहो मुन्नाभाई पाहून झाला होता. त्यात दाखवलेल्या गांधीगिरीचा आधार घेत, किमान त्यांना खजील करणारे एक हास्य तरी त्यांच्या तोंडावर फेकावे असे वाटून गेले. पण ते ही जर त्यांना रुचले नसते आणि उगाच पंगा घेतल्यासारखे झाले असते, तर कदाचित मागाहून येणार्या माझ्या गर्लफ्रेंडलाही याचा त्रास भोगावा लागला असता. म्हणून मग तो विचारही मनातल्या मनातच झटकून टाकला आणि मुकाट्याने जागा बदलायचे ठरवले. मन आणि कान घट्ट करूनच उठलो तरीही पाठीमागून खिदळण्याचा आवाज ऐकू आलाच.
आता मला तिथे दुसरीकडे कुठेही बसायला लाज वाटू लागल्याने मी सरळ वॉशरूमचा रस्ता धरला. तिथे आरसा पाहिला आणि मला जाणवले. त्यांना मला दमदाटी करणे सहज जमावे असा लल्लू चेहरा मी स्वत:च माझा करून ठेवला होता. मनात एक विचार चमकला. केस वगैरे सप्पकन मागे घ्यावे. त्याला एक रबरबॅंड लावावा. शर्टाच्या बाह्या फोल्ड वगैरे करून दंडापर्यंत घ्याव्यात. मनगटात एक चकाकणारे वजनी कडे घालावे. आणि गळ्यातले लॉकेट मागे सरकवत पुन्हा त्यांच्या समोर जाऊन खुर्ची ओढत विजय दिनानाथ चौहानसारखे बसावे.. असे आणि बरेच काही! खूप खूप वाटून गेले. पण तसे काही केलेही असते तरी त्याने गेलेली लाज परत आली नसती. व्हायचा तो अपमान झालाच होता.
त्यानंतर मला तिथे एक क्षणही राहणे अवघड वाटू लागले. गर्लफ्रेंडला फोन केला आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिथून निसटलो. कारण जो अपमान आपल्याला स्वत:च्या नजरेतून उतरवतो त्यापेक्षा मोठा अपमान नसतो.
त्यादिवशी मी आरश्यात स्वत:चे जे रूप पाहिले ते शेवटचे होते.
त्यानंतर माझी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जी भेट झाली ती शेवटची होती.
काही क्षणातच आम्ही आनंदाने एकमेकांपासून वेगळे झालो.
आणि दुसर्या दिवसापासूनच मी आमूलाग्र बदललो.
पण तरीही त्या दिवशी झालेल्या अपमानाची सल अजूनही मनात आहे. पुन्हा अशी वेळ आली तर काय करावे हे आजवर मला समजले नाही. त्यानंतर पुन्हा तशी वेळ आली नाहीये हे ही खरेय. कदाचित हल्ली माझा स्वत:चाच लूक टग्यासारखा झाला असल्याने असावे. पण आजही हा किस्सा ईथे शेअर करताना तितकेच अपमानास्पद आणि गलितगात्र वाटत आहे!
देव न करो ईथे कोणावर अशी वेळ आली असेल. तरीही अनुभव असल्यास काय केले अश्या परिस्थितीत हे नक्की शेअर करा ..
शेवटी अपमान म्हणजे अपमान असतो, छोटा काय आणि मोठा काय, तुमचा नि आमचा सेम असतो!
तू एकदम लबाड आहेस बे
तू एकदम लबाड आहेस बे
तिचा साडी घालायचा बेत
तिचा साडी घालायचा बेत होता
>>
एक तर साडी नेसतात आणि दुसरं म्हणजे आता रेडिमेड साडी होती म्हणून 'घालणारच' होती वगैरे पळवाट नको कारण पुढच्या वाक्यात पकडला जाशील <<मुंबईतल्या सगळ्याच मुलींना साडी घालणे सवयीचे नसावे.>>
केस वगैरे सप्पकन मागे घ्यावे.
केस वगैरे सप्पकन मागे घ्यावे. त्याला एक रबरबॅंड लावावा. शर्टाच्या बाह्या फोल्ड वगैरे करून दंडापर्यंत घ्याव्यात. मनगटात एक चकाकणारे वजनी कडे घालावे. आणि गळ्यातले लॉकेट मागे सरकवत पुन्हा त्यांच्या समोर जाऊन खुर्ची ओढत विजय दिनानाथ चौहानसारखे बसावे >> हे फार फनी वाटले
कॉलेज मधे असताना एक "हेत्त
कॉलेज मधे असताना एक "हेत्त काऽय्च नै" मित्र (?) होता. मला ऋन्मेष चा हा धागा पाहून त्याची आठवण झाली.
रीया, मी मराठी व्याकरणाच्या
रीया, मी मराठी व्याकरणाच्या चुकात पळवाटा देत नाही. कबूल करतो. एवढा मोठा अपमान झाला तो न लाजता शेअर केला तर एखादा मराठी शब्दप्रचार चुकला तर त्यात लाजायचे काय. यापुढे काळजीपूर्वक साडी नेसण्यात येईल.
असामी, यात कुठे कसला लबाडपणा दिसला? सांगितले तर बरे होईल. तेवढेच माझ्या वाईट सवयी भाग सहा की सात लबाडपणा टाकता येईल.
फेरफटका,
पण खरंय हे..
यापुढे काळजीपूर्वक साडी
यापुढे काळजीपूर्वक साडी नेसण्यात येईल.
नको रे...तुझं वय काय...तु करतो काय लेका....
चँप
चँप
नको रे...तुझं वय काय...तु
नको रे...तुझं वय काय...तु करतो काय लेका.... >>
असामी, यात कुठे कसला लबाडपणा दिसला? >> असाच एक लेख दिसताच नवा बाफ उघडलास कि.
आता यात कुठे कसला लबाडपणा
आता यात कुठे कसला लबाडपणा दिसला? असा एक बीबी उघडावा म्हणतो, (कसा उघडतात बीबी ते मला माहित नाही, तेंव्हा माझ्यातर्फे कुणितरी उघडा)
एकूण निवडणुकीबद्दलच्या चर्चेपेक्षा हे बरे. म्हंटले तर गंभीर म्हंटले तर गंमत.
अरेरे, तुमच्या जीवनात खूपच
अरेरे, तुमच्या जीवनात खूपच प्रश्ण आहेत.
एक आत्मकथा लिहून प्रसिद्ध का नाही करत? खरच , कोणाला तरी फायदा होइल.
ऋन्मेष, तू खरंच विजय दीनानाथ
ऋन्मेष, तू खरंच विजय दीनानाथ चौहान गिरी करायला हवी होतीस.

गर्लफ्रेंड तशीही गेल्यातच जमा होती.
किमान हा सलतरी राहिला नसता.
आशूजी, साडी नेसण्याचा वयाशी
आशूजी, साडी नेसण्याचा वयाशी काय संबंध?
झंपी, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. हेच लिखाणाला बळ देते. माझ्यामते प्रत्येकाने वयाच्या एकेका टप्प्यावर आत्मचरीत्र लिहायला हवे. हा आत्मपरीक्षण करायचा एक सहजसोपा मार्ग आहे.
साती,
तेव्हा गफ्रे गेल्यातच जमा नव्हती ना. हा साक्षात्कार नंतरचा. त्यामुळे तेव्हा नुसते मास्तर दिनानाथ चौहान बनून राहिलो.
आताची गफ्रे मात्र वेगळीच आहे. अन्याय सहन होत नाही. उलट मीच हल्ली माझ्या शीघ्रकोपी स्वभावावर नियंत्रण मिळवले आहे.
मुलगी शिकली प्रगती झाली, एक मुलगी शिकली की एक कुटुंब शिकते असे म्हणतात. तसेच एक मुलगी धीट झाली की आपसूक तिच्यासोबतचा मुलगाही धीट होतो.
आशूजी, साडी नेसण्याचा वयाशी
आशूजी, साडी नेसण्याचा वयाशी काय संबंध?
>>>>>>हे जर तुला कळलं असत तर अजून काय हवं होतं रे
तसेच एक मुलगी धीट झाली की
तसेच एक मुलगी धीट झाली की आपसूक तिच्यासोबतचा मुलगाही धीट होतो.>>
भारी विचार!

आमच्याघरी प्रत्यक्ष उदाहरण आहे!
तें टोळकं नवर्या मुलाच्या
तें टोळकं नवर्या मुलाच्या बाजूचंच असणार व तुम्हीच सांगितल्यानुसार तुमच्या अवतारावरून तुम्ही 'मुली'कडचे आहांत हें त्याना कळणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे असे अपमान करणं हें अजूनही जपलेल्या लग्नातल्या एका प्राचीन प्रथेचा भाग होता, इतकंच ! फार व्यक्तीगत नका घेवूं हा अपमान !!
भाऊ, हो. खरंच की. ते टोळके
भाऊ, हो. खरंच की. ते टोळके नवरे मुलाकडचेच होते. आणि मी नवरीमुलीकडचा. थोडक्यात मी तिथे अपमान पचवत राडा न घालता आपली प्रथा परंपरा जपत एका मुलीचे लग्न तुटण्यापासून वाचवले ही समाधानाचीच बाब आहे.
{{{ ऋन्मेऽऽष | 21 October,
{{{ ऋन्मेऽऽष | 21 October, 2016 - 08:43 नवीन
आशूजी, साडी नेसण्याचा वयाशी काय संबंध? }}}
तुमच्या वयाला अनुसरुन त्यांना साडी नेसण्याविषयी नव्हे तर याविषयी सुचवायचे असावे (असा माझा अंदाज)
http://www.maayboli.com/node/59359
अरे पब्लिक ऋ ला सिरीयसली
अरे पब्लिक ऋ ला सिरीयसली घ्यायला लागलंय फायनली.
ऋ एक खुन्नस तर द्यायची होती ना भावा. असा कसा बे तु आला परत.
बाकी स्टोरी मस्त लिहिलीस. डॉक्टर काकुंसारखी मी पण तुझी फॅन होणार वाट्टं
सस्मित, तू अगोदरपासून ऋ फॅन
सस्मित, तू अगोदरपासून ऋ फॅन क्लबची मेंबर आहेस असे मी धरून चालले होते.

आम्हीतर एक ब्लॉगपण काढलाय ' कुऋक्षेत्र' नावाचा.
ऋबाळाची सगळी विचारमौक्तिके तिथे गोळा करून ठेवतो.
आम्हीतर एक ब्लॉगपण काढलाय '
आम्हीतर एक ब्लॉगपण काढलाय ' कुऋक्षेत्र' नावाचा.
लिंक प्लीज !
<< आम्हीतर एक ब्लॉगपण काढलाय
<< आम्हीतर एक ब्लॉगपण काढलाय ' कुऋक्षेत्र' नावाचा.>>
[ 'कु' हा 'कुमार' मधलाच ना !
]
साती
साती
यापुढे काळजीपूर्वक साडी
यापुढे काळजीपूर्वक साडी नेसण्यात येईल.
नको रे...तुझं वय काय...तु करतो काय लेका.... >>> Hit it भावड्या
बाळ कु ऋ तुला गफ्रे तरी किती रे एकदाचा आकडा जाहीर कर , अगदी बाळोत्यात असल्यापासुनचा आकडा दिलास तरी चालेल.
आमच्यासाठी तरी कुमारच.
आमच्यासाठी तरी कुमारच.
हर्पेन ही घे लिंक-
हर्पेन ही घे लिंक- कुऋक्षेत्र!
प्लीज वाचून झाल्यावर डिलीट कर हां.
सिक्रेट फॅन क्लब आहे.
नाहीतर भाऊंसारखे 'कुप्रसिद्ध' (म्हणणारे ) लोक येतील तिथे!
सातीकाकूंनी गंडवलं
सातीकाकूंनी गंडवलं
सटल बुलींग (की काऊईंग?)
सटल बुलींग (की काऊईंग?) केलंत.
ओ बिपीन आजोबा, अख्ख्या माबोला
ओ बिपीन आजोबा,
अख्ख्या माबोला माहित्येय की मी ऋन्मेषची फॅन आहे.
बुलिंग्/काऊईंगचा प्रश्नच नाही.
सो टिपिकल ऋन्मेष इश्टाईल..
तुम्हाला काकू म्हणणार्यांनी
तुम्हाला काकू म्हणणार्यांनी बुलींग केलं असं मला म्हणायचं होतं.
Pages