या मोठ्या मोठ्या अपमानांचे काय करावे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 October, 2016 - 16:11

या छोट्या छोट्या अपमानांचे काय करावे? http://www.maayboli.com/node/60577 .. या धाग्यावरून माझ्या आयुष्यात घडलेला हा किस्सा आठवला. पोस्ट मोठी झाली म्हणून नाही, तर छोटे अपमान आणि मोठा अपमान यांची सरमिसळ होऊ नये म्हणून वेगळा धागा काढला आहे Happy

गोष्ट तशी जुनी आहे बरीच. पण स्मरणातून काही केल्या जात नाही.
तेव्हाही माझी एक गर्लफ्रेंड होती. आताची वेगळी. तेव्हाची वेगळी. गफलत नको! मुद्दाम हे सांगितले कारण ते एक गंडलेले रिलेशन होते.
म्हणजे ती मला ईतकी आवडायची की तिला जे आवडेल तसा मी वागायला बघायचो. पोशाख, पेहराव, अगदी लूकही तिला जसा हवा तसा ठेवायला बघायचो. भले मी त्यात माझ्या कम्फर्ट झोनमध्ये नसलो तरीही.

उदाहरणार्थ, शर्टाचे सर्वात वरचे, म्हणजे कॉलरच्या जवळचे बटण लावणे. एकतर रोज आंघोळ करणे आणि आंघोळ झाल्यावर केसांना तेल चापडत चोपडत धारदार कंगव्याने ते विंचरणे. शून्य पॉईंट शून्य एक मिलीमीटरच्या वर दाढी वाढताच तिला पुन्हा गालाच्या आत ढकलणे. असे कैक हास्यास्पद प्रकार मी सो कॉलड प्रेमाच्या नावावर ‘त्याग हेच खरे प्रेम‘ आणि “तिची मर्जी तीच आपली खुशी’ अस्से यमक वगैरे न जुळणारे डायलॉग मारत करायचो.

तर एकदा असेच तिच्या एका मैत्रीणीच्या बहिणीचे, कि बहिणीच्या मैत्रीणीचे लग्न होते. माझ्या गर्लफ्रेंडला आग्रहाचे आमंत्रण होते. पण तिच्या फारसे कोणी ओळखीचे नसल्याने तिने आग्रहाने मला सोबत यायला सांगितले होते. लग्नाचा हॉल तिच्या आणि माझ्या घराच्या बरोबर मध्ये असल्याने, आणि आम्ही दोघे दोन विरुद्ध दिशेने येणार असल्याने थेट हॉलवरच भेटायचे असे ठरवले होते. मी नेहमीसारखा वेळेच्या अर्धा तास आधी तिला आवडणारा चंपक बनून आलो होतो. पण तिचा तासभर कुठेच पत्ता नव्हता. फोन केल्यावर समजले की तिचा साडी घालायचा बेत होता आणि ते तिच्या सवयीचे नसल्याने तिला उशीर होणार होता. मी एवढा वेळ बाहेरच काय थांबायचे म्हणून हॉलच्या आत जाऊन बसूया म्हटले. आत जाऊन पाहिले तर समजले की मुंबईतल्या सगळ्याच मुलींना साडी घालणे सवयीचे नसावे. कारण काही उडाणटप्पू टाळक्यांशिवाय हॉलमध्ये महिलावर्गाच्या नावावर एकही चिटपाखरू दिसत नव्हते.

मग मी एक फॅन (शाहरूखचा नाही हं, तर हवा देणारा फॅन) आणि एक खुर्ची पकडून स्थानापन्न झालो. नव्यानेच घेतलेला मोबाईल काढला. वॉलपेपरवर लावलेला गर्लफ्रेंडचा फोटो एकवार न्याहाळून नेहमीच्या मनोरंजनाला लागलो. म्हणजे आपले मोबाईल गेम्स वगैरे. काही क्षणातच तल्लीन झालो. पण मग थोड्यावेळाने पाठीमागे काहीतरी हालचाल जाणवली. थोडेसे वळून अंदाज घेतला तर एक टवाळखोर पोरांचा ग्रूप मागे येऊन बसला होता. त्यांच्यामुळे मला लागणारा फॅनचा वाराही अडला होता. म्हणून जरा त्रासिक नजर करत पुर्ण मागे वळलो तर त्यातील एका मुलाचे बूट अगदी माझ्या तोंडासमोर आले. मी जरा ऑं वासला असता तर त्याच्या चरणोंकी धूल थेट माझ्या तोंडातच पडली असती ईतके जवळ. म्हणजे एवढावेळ तो मुलगा माझ्या मागच्या खुर्चीवर पाय टांगून बूट माझ्या डोक्याजवळ येतील अश्या पोजिशनमध्ये बसला होता.

क्षणभर वाटले तेच बूट काढून त्याच्या थोबाडात मारावेत. पण सवयीने कंट्रोल केले. फक्त त्याच्या नजरेला नजर दिली. तसे त्याने फारच उद्धटपणे, दटावल्यासारखे, बघतो काय रे अश्या आविर्भावात आपल्या भुवया उंचावल्या. शेजारच्यानेही दात काढले. साल्ला टग्या होता. सोबत टग्यांचाच ग्रूप होता. आरे का कारे करायचा प्रश्नच नव्हता. त्यांनी मनात आणले असते तर मला मंडपाच्या मागे नेऊन धोपटला असता. आणि एकतर हा एरीयाही आपला नव्हता.

नुकतेच लगे रहो मुन्नाभाई पाहून झाला होता. त्यात दाखवलेल्या गांधीगिरीचा आधार घेत, किमान त्यांना खजील करणारे एक हास्य तरी त्यांच्या तोंडावर फेकावे असे वाटून गेले. पण ते ही जर त्यांना रुचले नसते आणि उगाच पंगा घेतल्यासारखे झाले असते, तर कदाचित मागाहून येणार्‍या माझ्या गर्लफ्रेंडलाही याचा त्रास भोगावा लागला असता. म्हणून मग तो विचारही मनातल्या मनातच झटकून टाकला आणि मुकाट्याने जागा बदलायचे ठरवले. मन आणि कान घट्ट करूनच उठलो तरीही पाठीमागून खिदळण्याचा आवाज ऐकू आलाच.

आता मला तिथे दुसरीकडे कुठेही बसायला लाज वाटू लागल्याने मी सरळ वॉशरूमचा रस्ता धरला. तिथे आरसा पाहिला आणि मला जाणवले. त्यांना मला दमदाटी करणे सहज जमावे असा लल्लू चेहरा मी स्वत:च माझा करून ठेवला होता. मनात एक विचार चमकला. केस वगैरे सप्पकन मागे घ्यावे. त्याला एक रबरबॅंड लावावा. शर्टाच्या बाह्या फोल्ड वगैरे करून दंडापर्यंत घ्याव्यात. मनगटात एक चकाकणारे वजनी कडे घालावे. आणि गळ्यातले लॉकेट मागे सरकवत पुन्हा त्यांच्या समोर जाऊन खुर्ची ओढत विजय दिनानाथ चौहानसारखे बसावे.. असे आणि बरेच काही! खूप खूप वाटून गेले. पण तसे काही केलेही असते तरी त्याने गेलेली लाज परत आली नसती. व्हायचा तो अपमान झालाच होता.

त्यानंतर मला तिथे एक क्षणही राहणे अवघड वाटू लागले. गर्लफ्रेंडला फोन केला आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिथून निसटलो. कारण जो अपमान आपल्याला स्वत:च्या नजरेतून उतरवतो त्यापेक्षा मोठा अपमान नसतो.
त्यादिवशी मी आरश्यात स्वत:चे जे रूप पाहिले ते शेवटचे होते.
त्यानंतर माझी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर जी भेट झाली ती शेवटची होती.
काही क्षणातच आम्ही आनंदाने एकमेकांपासून वेगळे झालो.
आणि दुसर्‍या दिवसापासूनच मी आमूलाग्र बदललो.

पण तरीही त्या दिवशी झालेल्या अपमानाची सल अजूनही मनात आहे. पुन्हा अशी वेळ आली तर काय करावे हे आजवर मला समजले नाही. त्यानंतर पुन्हा तशी वेळ आली नाहीये हे ही खरेय. कदाचित हल्ली माझा स्वत:चाच लूक टग्यासारखा झाला असल्याने असावे. पण आजही हा किस्सा ईथे शेअर करताना तितकेच अपमानास्पद आणि गलितगात्र वाटत आहे!

देव न करो ईथे कोणावर अशी वेळ आली असेल. तरीही अनुभव असल्यास काय केले अश्या परिस्थितीत हे नक्की शेअर करा ..
शेवटी अपमान म्हणजे अपमान असतो, छोटा काय आणि मोठा काय, तुमचा नि आमचा सेम असतो!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"कु. ऋ". छान नाव ठेवलंत.
त्याची गर्लफ्रेंड पण गाणे म्हणेलः
"कु ऋ ऋ,,,, कु ऋ, ऋ ऋ
तेरा मेरा प्यार शुरु".

साडी नेसलेली त्याची गर्लफ्रेंड आणि तिच्या नादाने वेशभुषा कराणारा कु ऋ, असे दिसतील, नाचतील का?:
https://www.youtube.com/watch?v=AiN-eAB9rGw

बिपिन आजोबा,
मला नन्ही, मुन्नी, ताई, काकू, आजी, आत्या, मावशी, मामी, अम्मा, अक्का, बाई,माई , पणजी, खापरपणजी असं काहिही म्हटलं तरी चालेल.

फक्त काका/मामा असं काही नको.

मी खरंच स्त्री आयडी आहे.
Happy

मानव, भारी लिंक!

हल्ली 'प्रिमॅरीटल फोटो शूट' लग्नाच्या व्हिडिओ सिडीत इंक्ल्यूड करायची पद्धत सुरू झालीय.
ऋ बाळाचे आणि सूनबाईचे या गाण्यावर नाच करताना करून ठेवले पाहिजे.

@ ऋन्मेssष, हो. खरंच की. ते टोळके नवरे मुलाकडचेच होते.>>> हे आपणांस कसे समजले? <<<आणि मी नवरीमुलीकडचा>>> हे त्या टोळक्याला कसे समजले?

मानव Lol

@ प्रीवेडींग फोटोशूट - नक्कीच करणार. अगदी शाहरूख मोहोब्बते स्टाईल हात फईलाके पोज देणार एकेक. वाटल्यास लग्न साधंसुधं थोडक्यात करणार पण हे जमवणार.

एक आयडीया कम इच्छा आहे माझी की त्या फोटोशूटध्ये मी साडी नेसावी आणि माझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे तेव्हाच्या होणारया बायकोला सूटबूट घालून आमचा एक फोटो काढावा. आणि लग्नाचा फोटो म्हणून तो फेसबूकवर अपलोड करावा.

किंबहुना मागे सेल्फी विथ डॉटर जसे फेसबूकवर चालत होते तसे सेल्फी विथ गर्लफ्रेंड किंवा सेल्फी विथ बायको असा उपक्रम सुरू करायला हवे ज्यात पुरुषाने साडी वा स्कर्टटॉप असा बायकांचा पोशाख परीधान करावा आणि बायकांनी उलटा म्हणजे पुरुषांचा पोशाख घालावा, जे ते असेही न लाजता घालतातच.

अश्याने 'श्या बायकांचे कपडे काय घालायचे' असा जो पुरुषी अहंकार आपण नकळत जोपासतो त्याला नाहीसे करता येईल.

>>शिवेन माझ्या मापाचा >>

आवश्यकता नाही. मंदिरा बेदीचा कित्ता गिरवु शकतोस.

अ सिरियस नोट

>>> पण तरीही त्या दिवशी झालेल्या अपमानाची सल अजूनही मनात आहे. <<<<
खरेच अशी /अशासारखी घटना घडलेली असेल, तर तो सल आयुष्यभर रहातो.
इसवीसन १९७२ मधिल शाळकरि मुलांमधे गैरसमजातुन घडलेल्या भांडणात मला मार खाव लागला होता, मी तयारीत नव्हतोच, पण तो सल अजुनही खुपतो आहे.
हा सल दोन पद्धतींचा असतो
१) अपमान
२) प्रतिउत्तर देता न येणे

पैकी अपमान ही पूर्णतः व्यक्तिगत मानसिक अवस्था आहे, तिच्यावर मात करता येते. तो मूर्ख/नालायक्/नादान /मवाली पोरगा होता असे असल्याने, अपमान झाला असे मानणेच गैर, सबब तो प्रश्न निकालात निघाला. तेव्हा मारामारी होताना तिथे काहि मुली होत्या, त्यांचेसमोर मार खाताना अर्थातच अपमानास्पद वाटणे साहजिक आहे, पण आता विचार करता त्या मुली आजपोत्तुर कुणाच्या काकवा/माम्या/आज्ज्या झाल्या असतील, अन कमरेत वाकुन कुठे तरी काहीतरी त्यांच्या संसारात करीत असतील, जिथे माज्या त्या मारामारीची आठवणही नसेल, असे गृहित धरले की झाले. Wink
मात्र, प्रतिउत्तर देता आलेले नसणे, हा सल मात्र कायमकरता रहातो. याच सलाचा पुढे "सूड भावनेत" रुपांतर होऊ शकते. आता मला त्या मुलाचा चेहरादेखिल आठवत नस्लयाने "सूड"वगैरे बाबी कालबाह्य झाल्यात. पण तेव्हा जागच्याजागी उत्तर देऊ न शकल्याची खंत (उत्तर म्हणजे जागच्याजागी त्यासहि त्याच्यासारख्याच आयमाय वरुन शिव्या घालत तितकाच बदडून काढणे जमले नाही, तिथे आमचे पुणेरी अहिंसक ब्राह्मणी संस्कार आडवे आले होते Angry ) आजही उरात आहे.
यावर उपाय काहीच नाही. तो सल विसरुन जाणे. [अन्यथा या जन्मी तो कार्टा भेटणे शक्य नाही तर पुढल्या जन्मात त्याचे कानाखाली चढवीनच, बदकुन काढीन असा दृढनिश्चय/संकल्प करुन पाणी सोडणे Proud ते जमले नाही तर "शाप देणे" Wink (आता शापावरुन इथे अन्निसवालेही येतिल Lol ) ]

>>>> पुन्हा अशी वेळ आली तर काय करावे हे आजवर मला समजले नाही. <<<<
एकदा दुधाने तोंड पोळल्यावर ताक देखिल फुंकुन प्यावे, तर तशागत वेळच परत येऊ दिली नाही, अन वेळ आलीच तर "मी तयारीत नाही' या सबबीकरता जागा ठेवली नाही.

>>>> त्यानंतर पुन्हा तशी वेळ आली नाहीये हे ही खरेय. <<<<
तरीही, वेळ कुणावर सांगुन येत नसते, आपण आपले तयारीत असलेले बरे. अन त्याच मुळे, १९७२ नंतर आज २०१६ मधेही, मी जोरबैठका मारतो, डंबेल्स उचलतो.. समोरच्याने दोन दिले, तर समोरच्यास किमान एकतरी खणखणीत देता यावाच , इतका खणखणीत की आयमायचे प्यालेले दुध आठवावे, इतपत स्वतःस तयारीत ठेवतो.

अश्याने 'श्या बायकांचे कपडे काय घालायचे' असा जो पुरुषी अहंकार आपण नकळत जोपासतो त्याला नाहीसे करता येईल.>>

सही!
तुला कुठे ठेऊ कुठे नको?

रुन्म्या तुझे धागे म्हणजे निखळ मनोरंजना! डॉ काकु बरोबर मी पण आहे फैन क्लबात तसे बरेच असतील.... काही तासातच हाफ सेंचुरी मारतोस Happy

स्वस्ति, भारी आहे ड्रेस. असा ड्रेस आम्ही दोघांनी घातले की झाले. विचारून बघतो आमच्या हिला, तयार होतेय का ते.

साती, मंजूताई Happy

लिंबूजी, सिरीअस नोट बद्दल धन्यवाद.
पण प्रत्येक वेळी बळ काम करते असेच नाही. समयसूचकता जास्त महत्वाची असते. उदाहरणच द्यायचे झाल्यास सार्वजनिक जागी एका मुलीच्या हातची कचकचीत कानाखाली खाऊन झालीय. माझी चूक नसताना हे विशेष.
सविस्तर किस्सा नंतर कधीतरी. सध्या मोबाईलवर आहे. पण असा अपमान कसा हॅण्डल कराल?

मी साडी नेसावी आणि माझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे तेव्हाच्या होणारया बायकोला सूटबूट घालून आमचा एक फोटो काढावा
>>
हे असं खरंच होत होतं आमच्याकडे. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हळद लागल्यानंतर घोड्यावर मिरवणुक निघायची. नवरदेव असेल तर साडीत आणि नवरी असेल तर शर्ट पँट मध्ये. आमचे वडिल नेसले होते म्हणे साडी. आणि आत्याच्या लग्नाच्या फोटोंत सुटातला फोटो बघितला आहे आत्याचा. ही प्रथा कशी नामशेष झाली, कळलं नाही. आता कुणी तसं करताना दिसत नाही.
तू खरंच असं कर. ट्रेंडसेटर होशील. शिवाय थॉट लीडरशिपचं श्रेयही मिळेल Proud

असे अपमानाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतात. तुम्ही तेंव्हा जो निर्णय घेतलात (त्यांच्या तोंडी न लागण्याचा) तो योग्यच होता असे मी म्हणेन. काही वेळा भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक विचार करून निर्णय घ्यावे लागतात.

खूप खूप वर्षांपूर्वी मी इंग्लंडला असताना एक घटना घडली होती. संध्याकाळच्या वेळी जवळच्या ट्रेन स्टेशनवर बुकिंग ची चौकशी करण्यासाठी म्हणून गेलो. आपल्या पैकी अनेकांना माहित असेल बाहेरच्या देशांत अनेक स्टेशन्स हि अक्षरशः सुनसान असतात. म्हणजे ट्रेन आलेली असते तेंव्हा तेवढ्यापुरती गजबज. निघून गेली कि नंतर पुन्हा भयाण शुकशुकाट. विशेषकरून शनिवारी व रविवारी तर हे प्रमाण अधिक. तसेच हे स्टेशन सुनसान झाले. चिटपाखरु नाही कि कुणाचा मागमूस नाही. मी एकटाच दबकत पावले टाकीत तिकीट खिडकीपाशी आलो. ती बंद होती. ते पाहून मी परत जाण्यासाठी वळतो तोच दोघे सोमालियन तिथे अचानक कुठूनतरी उगवले. पाहताक्षणीच मला त्यांचे तिथे अचानक येणे संशयास्पद वाटले. माझा अंदाज खरा ठरला.

त्यांनी मला विचारले "काय हवे?"

मी म्हणालो "काही नाही बुकिंग करता येते का पाहायला आलो होतो?"

"तुला ट्रेन ने जायचेय का? अरे जा न इथून असाच आत जा. तिकीट लागत नाही. खरेच जा. मी सांगतोय ना. जा बिनधास्त"

ते मला गेट मधून आत विनातिकीट घुसायला सांगू लागले. तितक्यात त्यांच्या जोडीला अजून दोघे आले.

"नाही मला फक्त चौकशी करायची होती" असे म्हणून मी सटकायचं पाहू लागलो.

तर त्यांनी मला आडवे येऊन तिकीट न घेता गेट मधून आत जाण्याचा आग्रहच सुरु केला. आता मात्र मी घाबरलो. पण चेहऱ्यावर तसे अज्जिबात दाखवू दिले नाही. आणि त्यांच्या डोळ्याला डोळा न भिडवता कपाळाला आठ्या घालून तिसरीकडेच पाहत त्यांना न जुमानता तिथून बाहेर पडलो. आणि सुस्कारा सोडला. पाठीमागून फिदीफिदी कुत्सित हसणे आणि काहीतरी प्रोव्होकेटिव्ह बडबड केल्याचे आवाज ऐकू आले. नक्कीच ते चांगले शब्द नव्हते. पण ते पूर्णतः दुर्लक्ष करणे हाच तेंव्हा शहाणपणा होता.

अतुल, अवघड आहे, एकंदरीत सगळीकडेच...
कधीकधी मला वाटते की सगळे जग हेच गुंडमवाल्यांनी भरलेले आहे.
पुरुष असुनही माझी ही गत, तर स्त्रीयांना "जगाबद्दल" काय वाटत असेल, एक त्या स्वतः जाणे नाही तर ब्रह्मदेव जाणे.

>>> पण ते पूर्णतः दुर्लक्ष करणे हाच तेंव्हा शहाणपणा होता. <<< अगदी बरोबर

माझ्यामते प्रत्येकाने वयाच्या एकेका टप्प्यावर आत्मचरीत्र लिहायला हवे. >> आज आत्मचरित्र लिहिले आणि त्यात असे लिहले की, अस म्हणून पुन्हा तेच सुरु करायचे....चालू द्या!!

ऋन्मेष, छान छान नाव घ्यायलापण शिकून घे लग्नापूर्वीच.
गर्लफ्रेन्डवर त्याचा प्रयोग करुन बघ..आणि "माझा महिला पद्य प्रयोग" असा धागा काढुन त्यात महिलांनीच का पुरुषांनी सुद्धा मित्र मित्र भेटले की नाव घ्यायची प्रथा सुरु करण्याबद्दल लिही.

तुला चांगले उखाणे सुचतीलच, तरीही मदत करायला मी तयार आहे, गरज वाटल्यास.

>> अतुल, अवघड आहे, एकंदरीत सगळीकडेच...
>> कधीकधी मला वाटते की सगळे जग हेच गुंडमवाल्यांनी भरलेले आहे.
भरलेले नाही पण सगळीकडे थोड्याफार प्रमाणात असतातच कि हो. चालायचेच.

लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री हळद लागल्यानंतर घोड्यावर मिरवणुक निघायची. नवरदेव असेल तर साडीत आणि नवरी असेल तर शर्ट पँट मध्ये. आमचे वडिल नेसले होते म्हणे साडी. आणि आत्याच्या लग्नाच्या फोटोंत सुटातला फोटो बघितला आहे आत्याचा.
>>>>
साजिरा या प्रथेला __/\__
नक्कीच अशी प्रथा रुळवण्यामागचा हेतू उदात्त असणार.

तू खरंच असं कर. ट्रेंडसेटर होशील. शिवाय थॉट लीडरशिपचं श्रेयही मिळेल फिदीफिदी
>>>
हे थॉट लीडरशिप श्रेय वगैरे आणि ट्रेंडसेटर वगैरे बनायला मी आयुष्यात बरीच छोटीमोठी धाडसे केली आहेत. (घाबरू नका लगेच लेख नाही लिहिणार यावर) त्यामुळे याबाबतीतही मला हे करायला आवडेलच. प्रॉब्लेम फक्त गर्लफ्रेंड (माझ्या होणार्‍या बायकोचा) आहे.

मला तर आताच ईमॅजिन होऊ लागलेय. खच्चाखच पाव्हण्यारावळ्यांनी भरलेला हॉल. आली समीप लग्नघटीका म्हणत भटजी नवर्‍यामुलाला नवरी मुलीला घेऊन या असा पुकारा करतात. आणि आम्ही दोघेही एकदम एंट्री मारतो. सर्व लोकांच्या माना मागे वळतात आणि काय तो आश्चर्याचा धक्का. कधी आयुष्यात पाहिले नव्हते वा ईमीजिनले नव्हते असे दृश्य. कौतुकाने नवरी कशी साडीत नटलीय हे बघावे तर तिथे कधी नव्हे ते चकाचक दाढी केलेला ऋन्मेष दिसतोय. सुटाबूटात आत्मविश्वासाने चालणारी माझी गर्लफ्रेंड. ते बघून आमच्या मित्रमैत्रीणींचा हॉलमध्ये एकच कल्ला. धडाधड लोकांनी आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढलेत. कॅमेर्‍यांचा नुसता फ्लॅश पडतोय, विडिओ घेतले जाताहेत. आमच्या मार्गात मध्ये मध्ये करत सेल्फी घेतले जात आहेत. स्टेजवर पोहोचलो तर पंडीत आपले मंत्र विसरला आहे. पुढचा विधी कोणाशी काय करायचा आहे त्याचा आधीच गोंधळ उडाला आहे. यासर्वातही आपला धर्म आपली संस्कृती तर नाही ना बुडत याचे एक वेगळेच टेंशन त्याला आले आहे.. फुल्ल धम्माल.. अश्या अनुभवात सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनणे कोणाला नाही आवडणार Happy

अतुलजी, आपला अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद. त्याने धागाही वळणावर आला. पण मला या दोन अनुभवांत एक हलकासा फरक वाटतोय. ते म्हणजे आपल्या अनुभवातील ती उपद्रवी माणसे हे गुंड मवालीच असावेत. माझ्या बाबतीत ती कोणाच्या तरी लग्नात आलेली, रस्त्यावर भेटलेली टवाळ पोरे होती. जेव्हा एखाद्या गुंडांच्या तावडीतून सही सलामत सुटतो तेव्हा आपण आपल्या नशीबाला धन्यवादच देतो. त्यांना उलट उत्तर द्यावे वगैरे आपल्या मनातही नसतेच. झाले तर पोलिस कम्प्लेंटचा मार्ग.. पण माझ्या केसमध्ये असे कोणीही सोम्यागोम्याने यावे आणि आपल्याला टपली मारून जावे या टाईपचा फील येण्याची शक्यता असते. आणि ते जास्त अपमानास्पद असते असे मला वाटते.

बाकी ईंग्लंड आणि पाश्चात्य देशही सेफ नाही आहेत तर. तुमचा किस्सा ऐकून मला पुन्हा आमची मुंबई ईतरांच्या तुलनेत सेफ वाटू लागली आहे.

हे नाही केलं तरी सेंटर ऑफ attraction तुम्हीच असणारे तुमच्या लग्नात रे, लोक तुमचेच फोटो काढणार
>>>
कर्रेक्ट !
पण असे केल्यास आमचे लग्नच मार्केटमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनू शकते ना Happy
बाकी हे करण्यामागचा मुख्य हेतू तेव्हाही तोच राहील जो वरच्या एका पोस्टमध्ये नमूद केला आहे.

मानव पृथ्वीकर,
जर मी चुकत नसेल तर पुरुषांनाही म्हणजे नवर्‍यामुलालाही लग्नात नाव घ्यायला लावतात ना ?

Pages