प्रसंग १:
एका कार्यक्रमाला गेलो होतो. खुर्च्या मांडल्या होत्या. कार्यक्रम सुरु व्हायचा होता. काही लोक आले होते ते बसून होते. मी स्टेज जवळील एका खुर्चीवर बसलो. नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये डोके खुपसले. आजूबाजूला फार लक्ष नव्हते. थोड्या वेळात एक स्त्री आली. माझ्या शेजारच्या डाव्या बाजूच्या खुर्चीवर बसली. तिच्या पाठोपाठ एक पुरुष आला. तो माझ्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला. त्यानंतर दोन तीन मिनिटे अशीच गेली. मी माझ्या मोबाईल मध्ये मग्न. मग अजून एक पुरुष आला. त्याने अचानक मला पाठीला हात लावून उठून दुसरीकडे बसायची खून केली. माझ्या नादात मी मग्न असल्याने अचानक मला काही लक्षात आले नाही. काहीतरी असेल समस्या असा विचार करून मी पट्टकन उठलो. एव्हाना जवळच्या सर्वच खुर्च्यांवर लोक बसले होते. मला दुसरीकडे लांबवर जाऊन बसावे लागले. आणि इथेच माझी चूक झाली होती. कारण दुसरीकडे बसल्यानंतर काही काळाने मला खरा प्रकार लक्षात आला. तो नंतर आलेला मनुष्य म्हणजे माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या स्त्री बरोबर आला होता. त्याचा असा समज झाला असावा कि आधी ती स्त्री तिथे येऊन बसली होती व नंतर येऊन मी शेजारी बसलो. म्हणून त्याने मला उठवले व आपण तिथे बसला. मला मनातून खूप चरफड झाली. वास्तविक त्याने त्या स्त्रीला उठवायला हवे होते. किंवा मी तरी त्याला "मी आधी बसलो आहे मी का उठू?" असे विचारायला हवे होते. पण मोबाईलच्या नादात मी तिकडे दुर्लक्ष करून मुकाट्याने दुसरीकडे जाऊन बसलो. एव्हाना कार्यक्रम पण सुरु झाला होता. आता परत तिथे जाऊन त्याला याबाबत विचारणे मला प्रशस्त वाटले नाही. शोभा झाली असती. पण मला आतून खूप अपमान झाल्याची भावना मन कुरतडू लागली. पुढे अखंड तास दोन तास कार्यक्रमाकडे माझे लक्ष नव्हते. चागल्या कार्यक्रमाची वाट लागली. मनाची चरफड झालेल्या अवस्थेत कसाबसा कार्यक्रम संपायची वाट पाहून तिथून निघून आलो. नंतरही बराच काळ हि गोष्ट माझ्या मनात राहून गेली होती.
प्रसंग २:
कंपनीत नवीनच ओळख झालेल्या एका मित्राने त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला बोलवले होते. काही दिवसापूर्वीचीच ओळख असल्याने त्याच्या घरच्यांना मी अजून ओळखत नव्हतो. त्यामुळे मी त्याच्या बरोबरच त्याच्या कार मधून कार्यालयात गेलो. त्याच्या बरोबर अजून दोघेजण होते. आम्हा चौघांशिवाय अजून फार कोणी आले नव्हते. थोड्या वेळात एका छोट्या टेम्पोमधून कार्यक्रमाचे साहित्य आले. मित्र मला म्हणाला "अरे चल ना आपण जरा ते साहित्य उतरून घेऊ". मला थोडे आश्चर्य वाटले. वास्तविक त्याच्या घरच्या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून आलो होतो. पाहूण्यांनाच कसे काय कामे सांगता? पण त्याच्या बरोबर आलेले इतर दोघे पण साहित्य न्यायला मदत करू लागले. आणि हे दोघे म्हणजे पण त्याचे मित्रच असावेत असा माझा समज झाल्याने मी काही बोलू शकलो नाही. थोड्या नाराजीनेच का असेना पण मी सुद्धा त्याला साहित्य कार्यालयात न्यायला मदत करू लागलो. पण नंतर जेंव्हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा माझ्या लक्षात आले कि ते बरोबर आलेले ते दोघे म्हणजे त्याच्या घरचेच होते. एक तर त्याचा सख्खा भाऊच होता. म्हणजे मघाशी यांच्या घरच्या कार्यक्रमात माझा उपयोग त्याने नोकरासारखा करून घेतला होता. मला फार अपमानित झाल्याची भावना मनात घर करून राहिली व मी त्याविषयी काहीच करू शकत नव्हतो.
प्रसंग ३:
अजून दुसऱ्या एका मित्राच्या बाबतीतला हा प्रसंग. त्याची बायको डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती. तो एकटाच राहत होता व ते भाड्याचे घर होते आणि छोटे होते. पण बायको आल्यानंतर बाळ पण असणार व ते घर नंतर अपुरे पडेल म्हणून त्याने दुसरे मोठे घर बघितले होते. तिकडे साहित्य शिफ्ट करायचे होते. त्याने मला मदतीला बोलावले. अर्थात मदत अशी फार लागणार नव्हतीच. कारण साहित्य न्यायला मजूर बोलवले होते त्यांच्यावर लक्ष ठेवणे, काही राहिले आहे का पाहणे इत्यादी हीच काय ती मदत. मी त्याला सगळे करू लागलो. तास दोन तासात मजुरांनी सगळे साहित्य शिफ्ट केले व ते निघून गेले. पण जाताना ते एक दोन छोट्या पिशव्या आणि काही ब्यागा नवीन घराबाहेरच ठेऊन गेले. त्या फक्त उचलून घरात न्यायचे काम होते. मित्राने ब्यागा घेतल्या. आणि हलक्या पिशव्या मला उचलायला सांगितल्या. अर्थात किरकोळ गोष्ट असल्याने मीही फारसे मनावर न घेता त्या पिशव्या घेऊन घरात आणून ठेवल्या. पण नंतर जेंव्हा तो नवीन घरात आणलेले एकेक साहित्य लावू लागला तेंव्हा मला धक्काच बसला. कारण ज्या पिशव्या मला त्याने उचलायला सांगितल्या होत्या त्यात चक्क त्याने आपली चपले व बूट इत्यादी ठेवले होते. आणि ते सगळे सामान त्याने स्वत:च पॅक केले असल्याने (मजूर फक्त शिफ्ट करायला बोलावले होते) त्या पिशवीत चपला आहेत हे त्याला पक्के माहित होते. मला हि गोष्ट मनाला फार लागून राहिली. पण त्याने असे का करावे हे लक्षात येत नव्हते व त्याला मी हे विचारू पण शकत नव्हतो.
आयुष्यात अनेक वेळा आपल्याला अशा छोट्या अपमानास्पद प्रसंगांना न कळत किंवा कधीकधी ध्यानीमनी नसताना अचानक तोंड द्यावे लागते. हे प्रसंग म्हणजे काही खूप मोठा अपमान नव्हे. कधी कधी तर ते आसपास कुणाच्या लक्षात सुद्धा येत नसतात इतके छोटे असतात. पण तरीही बराच काळ मनात टोचत राहतात. त्यामुळे कधीकधी नात्यांवर पण परिणाम होतो. कुठेतरी वाचले होते कि Life is not about what happens to us, but its is about how do we react to it. हे मला खूप पटते. पण अशा प्रसंगी काय करावे? त्या त्या वेळी React झाले नाही तर ते मनात राहते व त्याचा आपल्यालाच त्रास होतो. पण वरील प्रत्येक प्रसंगात जर मी त्या त्या वेळी React झालो असतो तर कल्पना करा अजून किती विपरीत घडले असते.
यावर कोणी मायबोलीकर योग्य सल्ला देऊ शकतील का?
विसरुन जायचं , सिंपल .
विसरुन जायचं , सिंपल .
यातील कुठलाच प्रसंग
यातील कुठलाच प्रसंग अपमानास्पद वाटला नाही.
कालांतराने आपण विसरतो. पण
कालांतराने आपण विसरतो. पण मुद्दा तो नाही. त्या त्या वेळी लगेच विसरता येत नाही. दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही. चांगल्या मूडचा किंवा कार्यक्रमाचा विचका होतो.
मी आपल्या जागी असतो, तर
मी आपल्या जागी असतो, तर वरीलपैकी एकाही प्रसंगांत मला अपमान वगैरे वाटला नसता.
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार घडतो. आपण आपली जागा सोडायची नाही.
हे तिन्ही होऊन गेलेले प्रसंग
हे तिन्ही होऊन गेलेले प्रसंग , त्यावर सल्ला असा काय देणार ?
पहिल्या दोन प्रकरणात तुमची चूक वाटली. पहिला - कुणी उठा म्हटले तर असं कसं निमूट उठलात?
दुसर्या बाबतीत- इतक्या लवकर गेलात तेही फार ओळख नसलेल्या घरच्या समारंभाला. ऑकवर्ड सिच्युएशन होणारच. तिसरा प्रसंग अपमानस्पद वाटलाच नाही.
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार घडतो. आपण आपली जागा सोडायची नाही. >>> Hit it भावड्या !
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार घडतो. आपण आपली जागा सोडायची नाही>>>>>:हहगलो:
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार
पहिला प्रसंग पुण्यात वारंवार घडतो. आपण आपली जागा सोडायची नाही >> बरोबर आहे !! खुर्ची महत्त्वाची
दुसरा प्रसंग - यात अपमान काय
दुसरा प्रसंग - यात अपमान काय आहे?
अहो अमेरीकेत पाहुणेच येतात मदतीला. माणूसबळ कमी असतं, साधी माणुसकी आहे. त्यात मानापमान कसले आणायचे? इथे लोकांना जेवायला बोलावलं तर स्वतःच एखादा पदार्थ घेउन येतात, जाताना डबे भरून घेऊन जातात, शिवाय मागचं आवरून भांडीवगैरेही धुवून किचन आवरून देतात
१- ज्याला लोक "खडूस" म्हणतात
१- ज्याला लोक "खडूस" म्हणतात तसं व्हायचं.
२- परखड पणा हवा, व्यवस्थित शाल्जोडितले मारता यायला हवी.
>>यातील कुठलाच प्रसंग
>>यातील कुठलाच प्रसंग अपमानास्पद वाटला नाही.
मला हा प्रतिसाद इंटरेस्टिंग वाटतोय. कार्यक्रमाच्या चांगल्या जागेवरून कोणीतरी मुर्खाने उठून दुसरीकडे जायला सांगणे, जिथे पाहुणा म्हणून आमंत्रण आहे तिथे नोकर सारखे वागणूक मिळणे, कुणीतरी जाणीवपूर्वक आपल्याला न कळत चपला उचलायला लावणे इत्यादी गोष्टी अपमान नाही कसे म्हणता येईल? पण तरीही काही लोक स्वत:ला शांत ठेवतात व त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ देत नाहीत. मला त्यांचा हेवा वाटतो. आणि हा प्रतिसाद मला तसाच वाटतो. कि हे प्रसंग अपमानास्पद वाटूच नयेत हे उत्तम. पण ते कसे साध्य करता येईल? जरा डिटेल सांगितले तर बरे होईल. धन्यवाद.
मोबाईलचा " नाद खुळा " .
मोबाईलचा " नाद खुळा " . आजुबाजुच्या परिस्थितीचे थोडे भान ठेवावे. एका वेळी एकच काम करावे.
चपलांच्या पिशवी ऐवजी, दुसरे ओझे चालले असते कां ? तेंव्हा ' अपमान ' वाटला नसता कां ? खुळ्या समजुती आहेत ह्या. डोक्याला फार त्रास करुन घेऊ नका.
प्रसंग १ : तुमची चूक
प्रसंग १ : तुमची चूक आहे
प्रसंग २: त्याच्या गाडीतून त्याच्या घरच्यांबरोबरीनं गेलात तेव्हा अपमान वाटला का? मग कार्यक्रमाच्या तयारीत मदत केली तर अपमान का वाटला?
प्रसंग ३: त्यानं तुम्हाला जड बॅग्स उचलायला सांगितल्या असत्या तर तुम्ही हाच किस्सा 'मित्रानं मला जाणूनबुजून जड सामान उचलायला लावलं' अशा कोनात लिहिली असती.
डोक्याला काहीतरी खुराक लावून घ्या म्हणजे अशा फालतू गोष्टींसाठी होणारी कुरतड बंद होइल.
>> पहिला प्रसंग पुण्यात
>> पहिला प्रसंग पुण्यात वारंवार घडतो. आपण आपली जागा सोडायची नाही.
हो तुम्ही कसे ओळखले? हे पुण्यातच घडले आहे. पण हे बरोबर आहे का?
व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे
व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे क्लासेस चालू करा. फरक पडेल.
चिनुक्स, पहिल्या प्रसंगाबाबत अगदी!
दुसर्या आणि तिसर्या
दुसर्या आणि तिसर्या प्रसंगात मला व्यक्तिशः अपमानित असे काही वाटले नाही. अर्थात ते प्रसंग तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि मी तिथे जवळही नव्हतो. हा फरक आहेच.
दुसर्या प्रसंगात त्याने नोकर म्हणून तुम्हाला वागवले असे का वाटले? त्याच्या घरचेही त्याला मदत करत होतेच ना?
ते दोघे मित्रच आहेत असे समजून तुम्ही मदत केली. म्हणजे ते दोघे मित्र म्हणून मदत करत आहेत यात तुम्हाला काही गैर वाटले नाही (किंबहुना त्यामुळे आपणही मदत करावी, असेच तुम्हाला वाटले). मग तुम्ही स्वतः मित्र म्हणून त्याला मदत केलीत यात गैर का वाटले? 'ते दोघे'मित्र नसून घरचेच आहेत हे ज्ञात होण्यामुळे? खरेच कळले नाही. या प्रसंगात कारमध्ये बसतानाच त्या मित्राने सर्वांची एकमेकांना ओळख करून द्यायला हवी होती.
तिसर्या प्रसंगात - घर बदलताना इतक्या सामानाच्या बांधाबांधीत आणि ते इकडून तिकडे व्यवस्थित सेटल करण्याच्या नादात/टेन्शनमध्ये नेमक्या कोणत्या पिशवीत/खोक्यात काय आहे हे लगेच कळणे कठीण असते. त्यामुळे त्या मित्राने जेंव्हा तुम्हाला पिशव्या उचलायला सांगितल्या तेंव्हा त्याला त्यात पादत्राणे आहेत हे क्लिक झाले नसेल, हीही एक शक्यता आहे. आणि जड सामान आणि हलके (वजनाने) सामान यात जड सामान आपण उचलावे आणि हलके तुम्हाला उचलायला सांगून, तुम्हाला कमी त्रास होईल असे बघावे, हाही विचार असू शकतो. जरी पादत्राणे आहेत असे कळले असते तरी मला त्यात काही वाटले नसते (मदत करायलाच मला हक्काने बोलावले होते ना?)
पहिल्या प्रसंगात 'योग्य वेळी योग्य गोष्टीत पुरेसे लक्ष न घातल्याची किंमत' इतकेच म्हणून सोडून द्यावे. (फारतर थोडावेळ पश्चाताप करून घ्यावा.)
तिसरा प्रसंग - तुम्हाला जड
तिसरा प्रसंग - तुम्हाला जड बॅगा उचलायला सांगितल्या असत्या तर परत म्हणाला असता - जड बॅगा मला उचलायला सांगितल्या, स्वतः मात्र हलक्या पिशव्या उचलल्या. एकुणात आम्हाला 'कोतबो' काही चुकलं नसतं.
अहो, आता इथले प्रतिसाद वाचून
अहो, आता इथले प्रतिसाद वाचून तुम्हाला जो अपमान वाटणार आहे त्याची तुम्हाला कल्पना आणि त्याबद्दल मनाची तयारी आहे का?
स्वाती_आंबोळे: अहो, आता इथले
स्वाती_आंबोळे: अहो, आता इथले प्रतिसाद वाचून तुम्हाला जो अपमान वाटणार आहे त्याची तुम्हाला कल्पना आणि त्याबद्दल मनाची तयारी आहे का?
अहो नाही हो. असे म्हणू नका. खरे तर कुठतरी मन मोकळे केल्याचे खूप समाधान मिळत आहे. आणि प्रतिसाद खूप इंटरेस्टिंग आहेत. मी स्वत:वरच खूप हसत आहे काही प्रतिसाद वाचून. हलके वाटत आहे खरेच.
सगळ्यांनी उत्तरं दिली आहेतच,
सगळ्यांनी उत्तरं दिली आहेतच, पण तरिही.
प्रसंग १: तुम्ही मोबाईल वर लक्ष देवून तो माणूस काय म्हणतो आहे हे न विचारता तिथून निघून गेलात. फक्त एक वाक्य बोलला असता त्याच्याशी तर तुम्हाला कळले असते की कारण काय आहे आणि तुम्ही त्याला सांगू शकला असता की ही माझी जागा आहे तुम्ही दुसरी जागा शोधा.
प्रसंग २: मित्राने आग्रहाने बोलावले, त्याच्या गाडीतून नेले म्हणजे तो तुम्हाला आपले मानतो. असे असताना थोडी मदत करण्यात काहीच अपमान नाही. हां आता तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेला आहात आणि त्यांनी तुम्हालाच खुर्चा उचलायला लावल्या तर थोडा अपमान वाटू शकतो. पण माझे तरी म्हणणे आहे की कुठलेही काम करण्यात लाजण्याचे कारण नाही की अपमान वाटण्याचेही कारण नाही. काम केल्यानेच माणूस मोठा होतो. उलट तुम्ही मोठे असून काम केले तर लोक सांगतात की एवढा मोठा माणूस पण आमच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
प्रसंग ३: परत वरच्या सारखेच. तुमच्या मित्राने जड सामान उचलून तुम्हाला हलके सामान दिले यात उलट त्याचा चांगुलपणा दिसतो.
या तिनही प्रसंगांतून एक दिसून येते की तुम्ही खुप छोट्या छोट्या गोष्टींचा खुप जास्ती विचार करून त्यामोठ्या करून घेता. यामुळे तुम्हाला ते समारंभ एंजॉय पण करता येत नाहीत. पहिला आणि दुसर्या प्रसंगांमध्ये तुम्ही असे उलटे विचार केले नसते तर तुम्हाला ते सुंदर झालेले प्रसंग / कार्यक्रम लक्षात राहिले असते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचा त्रागा करण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधता येईल त्याकडे लक्ष द्या. जीवन खुप सुखी होईल.
एक मित्र, थोडं "खरं"
एक मित्र, थोडं "खरं" आत्मचिंतन करा. त्यात स्वतःला असं विचारून बघा कि -
१. तुम्ही वर्णन केलेल्या प्रसंगात तुम्हाला जाणून बुजून अपमानित करण्यात आलं का तुम्हालाच तसं वाटतय आणि बकि जग पुढे निघून गेलय? - त्रयस्थाचं मत विचाराल तर तुम्ही वर्णन केलेल्या एकाही प्रसंगात तुमचा कोणीतरी जाणूनबुजून अपमान केलाय असं वाटत नाही. कोणीतरी आपल्याला उठायला सांगितलं आणि आपलं लक्ष मोबाईल मधे असल्यामुळे आपण उठलो तर तो अपमान नाही. चिनुक्स म्हणाले तसं आपली जागा सोडू नका. कोणी तुम्हाला घरच्या समारंभाला बोलावत असेल तर तिथे थोडी मदत करण्यात कमीपणा अजिबात नाही. उलट जवळचे मित्र न सांगता, आपुलकिनी असं करतात तेव्हा तुम्हाला जवळच्या लोकांसारख बघितलं जात आहे असा विचार करा ना.
२. प्रसंग २ व ३ मधे तुमचं काय नुकसान झालं? - तुमच्या खिशातले पैसे गेले? अती कष्ट झाले आणि नंतर कोणी पाणी सुद्धा विचारले नाही असं काही झालं? उलट दुसर्याला मदत केल्यानी चांगुलपणाच आला. आता कधी तुम्हाला मदत लागली तर तुम्ही त्या मित्रांना बोलावू शकता.
३. तुम्हाला मनातलं व्यक्त झाल्यावर (लिहुन किंवा कोणला सांगून) बरं वाटतय का हा विचार करा - तुमचा स्वभाव मनावर घेण्याचा असला (सेन्सिटिव्ह) तर ह्या दोन उपायांचा फायदा होईल.
तुमची चिडचिड मी समजू शकतो कारण माझा एक मित्र असाच प्रत्येक गोष्ट मनावर घेत असे आणि नंतर मला ऐकवत बसे. तो एक स्वभाव आहे आणि नंतर त्याचा त्रास होत रहाणे कटकटीचं असतं. त्यालाही मी नंतर डायरी लिहायला लावली आणि तो बराच शांत झाला. कधीही असा प्रसंग घडल्यास पलिकडील माणसानी हे जाणून बुजून केलं का आणि आपलं नक्कि काय नुकसान झालं हे प्रश्न स्वतः ला विचारा, आपोआप शांत व्हायला मदत होईल.
त्या पहिल्या कार्यक्रमाच्या
त्या पहिल्या कार्यक्रमाच्या ऑरगानायझर ना पत्र लिहा आणि सांगा की किती खडूस आणी इतरांशी अपमानकारक वागणारे लोक त्यांच्या कार्यक्रमाला येतात. अशा लोकांचा बंदोबस्त करणे ही ऑरगानायझर ची नैतिक जबाबदारी आहे., यापुढे त्यांनी बसण्याच्या जागा नीट न मॅनेज केल्यास तुम्ही त्यांच्यासर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाका .
दुसर्या व तिसर्या उदाहरणात दोन्ही मित्रांना स्पष्टपणे सांगा तुम्हाला काय वाटले ते .
Situation – Behavior – Impact Feedback Tool असे शोधून पहा. एखाद्याच्या बिहेव्यर मुळे तुमच्यावर काय परिणाम होतो ते चिडचिड आदळ आपट न करता सांगणे. पुढच्या वेळेस तुमचे एक्स्पेक्टेक्षन काय राहील हे क्लीयरली सागंणे याची उदाहरणे सापडतील .
तुमचे अधिकांश मित्र असेच तुमचा अपमान करणारे अस्तील तर मित्र बदला
https://www.amazon.com/Trump-
https://www.amazon.com/Trump-101-Success-Donald-J/dp/0470047100
हे पुस्तक वाचा, नक्की उपयोग होइल
कमाल आहे. पहिल्या प्रसंगात
कमाल आहे.
पहिल्या प्रसंगात अपमान वाटला, पण मी तिथेच मोबाईलमधून डोकं बाहेर काढून 'काय त्रास आहे' असे लुक्स दिले असते.
मग पुढे काही बोलायची त्यांची हिंमत झाली नसती.
बाकीच्या दोन्ही प्रसंगात अपमान कळला नाही.
चपलांची पिशवी हलकी असल्याने तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला उचलायला सांगितली असेल.
चपला बिपला उचलणे इतके हलके का वाटते लोकांना.
बिपला विषयी त्यांना काही
बिपला विषयी त्यांना काही प्रॉब्लेम नाही ओ
ईंटरेस्टींग धागा, नंतर,
ईंटरेस्टींग धागा,
नंतर, जमल्यास रात्री सविस्तर लिहेन
नंतर, जमल्यास रात्री सविस्तर
नंतर, जमल्यास रात्री सविस्तर लिहेन >> म्हणजे नवीन धागा???
छोट्या अपमानांचे काय करावे??
छोट्या अपमानांचे काय करावे??
आपला मोठा इगो कमी करावा, छोटे अपमान जादू झाल्यागत नाहीसे होतील. माफ करा स्पष्ट बोलतोय.
पहिल्या प्रसंगात तुमचीच चूक
पहिल्या प्रसंगात तुमचीच चूक जास्त नाहीये का? फोनमध्ये डोकं घालून बसला नसतात तर आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहिलं असतं आणि वेड्यासारखे उठून जागा करून दिली नसतीत.
बाकी दोन प्रसंगांबाबब्त इतरांशी सहमत. मैत्रीखातर असं काही ना काही करावंच लागतं.
आपला मोठा इगो कमी करावा. >>
आपला मोठा इगो कमी करावा. >> +१
Pages