प्रसंग १:
एका कार्यक्रमाला गेलो होतो. खुर्च्या मांडल्या होत्या. कार्यक्रम सुरु व्हायचा होता. काही लोक आले होते ते बसून होते. मी स्टेज जवळील एका खुर्चीवर बसलो. नेहमीप्रमाणे मोबाईल मध्ये डोके खुपसले. आजूबाजूला फार लक्ष नव्हते. थोड्या वेळात एक स्त्री आली. माझ्या शेजारच्या डाव्या बाजूच्या खुर्चीवर बसली. तिच्या पाठोपाठ एक पुरुष आला. तो माझ्या उजव्या बाजूच्या खुर्चीवर बसला. त्यानंतर दोन तीन मिनिटे अशीच गेली. मी माझ्या मोबाईल मध्ये मग्न. मग अजून एक पुरुष आला. त्याने अचानक मला पाठीला हात लावून उठून दुसरीकडे बसायची खून केली. माझ्या नादात मी मग्न असल्याने अचानक मला काही लक्षात आले नाही. काहीतरी असेल समस्या असा विचार करून मी पट्टकन उठलो. एव्हाना जवळच्या सर्वच खुर्च्यांवर लोक बसले होते. मला दुसरीकडे लांबवर जाऊन बसावे लागले. आणि इथेच माझी चूक झाली होती. कारण दुसरीकडे बसल्यानंतर काही काळाने मला खरा प्रकार लक्षात आला. तो नंतर आलेला मनुष्य म्हणजे माझ्या डाव्या बाजूला बसलेल्या स्त्री बरोबर आला होता. त्याचा असा समज झाला असावा कि आधी ती स्त्री तिथे येऊन बसली होती व नंतर येऊन मी शेजारी बसलो. म्हणून त्याने मला उठवले व आपण तिथे बसला. मला मनातून खूप चरफड झाली. वास्तविक त्याने त्या स्त्रीला उठवायला हवे होते. किंवा मी तरी त्याला "मी आधी बसलो आहे मी का उठू?" असे विचारायला हवे होते. पण मोबाईलच्या नादात मी तिकडे दुर्लक्ष करून मुकाट्याने दुसरीकडे जाऊन बसलो. एव्हाना कार्यक्रम पण सुरु झाला होता. आता परत तिथे जाऊन त्याला याबाबत विचारणे मला प्रशस्त वाटले नाही. शोभा झाली असती. पण मला आतून खूप अपमान झाल्याची भावना मन कुरतडू लागली. पुढे अखंड तास दोन तास कार्यक्रमाकडे माझे लक्ष नव्हते. चागल्या कार्यक्रमाची वाट लागली. मनाची चरफड झालेल्या अवस्थेत कसाबसा कार्यक्रम संपायची वाट पाहून तिथून निघून आलो. नंतरही बराच काळ हि गोष्ट माझ्या मनात राहून गेली होती.
प्रसंग २:
कंपनीत नवीनच ओळख झालेल्या एका मित्राने त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला बोलवले होते. काही दिवसापूर्वीचीच ओळख असल्याने त्याच्या घरच्यांना मी अजून ओळखत नव्हतो. त्यामुळे मी त्याच्या बरोबरच त्याच्या कार मधून कार्यालयात गेलो. त्याच्या बरोबर अजून दोघेजण होते. आम्हा चौघांशिवाय अजून फार कोणी आले नव्हते. थोड्या वेळात एका छोट्या टेम्पोमधून कार्यक्रमाचे साहित्य आले. मित्र मला म्हणाला "अरे चल ना आपण जरा ते साहित्य उतरून घेऊ". मला थोडे आश्चर्य वाटले. वास्तविक त्याच्या घरच्या कार्यक्रमाला मी पाहुणा म्हणून आलो होतो. पाहूण्यांनाच कसे काय कामे सांगता? पण त्याच्या बरोबर आलेले इतर दोघे पण साहित्य न्यायला मदत करू लागले. आणि हे दोघे म्हणजे पण त्याचे मित्रच असावेत असा माझा समज झाल्याने मी काही बोलू शकलो नाही. थोड्या नाराजीनेच का असेना पण मी सुद्धा त्याला साहित्य कार्यालयात न्यायला मदत करू लागलो. पण नंतर जेंव्हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा माझ्या लक्षात आले कि ते बरोबर आलेले ते दोघे म्हणजे त्याच्या घरचेच होते. एक तर त्याचा सख्खा भाऊच होता. म्हणजे मघाशी यांच्या घरच्या कार्यक्रमात माझा उपयोग त्याने नोकरासारखा करून घेतला होता. मला फार अपमानित झाल्याची भावना मनात घर करून राहिली व मी त्याविषयी काहीच करू शकत नव्हतो.
प्रसंग ३:
अजून दुसऱ्या एका मित्राच्या बाबतीतला हा प्रसंग. त्याची बायको डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती. तो एकटाच राहत होता व ते भाड्याचे घर होते आणि छोटे होते. पण बायको आल्यानंतर बाळ पण असणार व ते घर नंतर अपुरे पडेल म्हणून त्याने दुसरे मोठे घर बघितले होते. तिकडे साहित्य शिफ्ट करायचे होते. त्याने मला मदतीला बोलावले. अर्थात मदत अशी फार लागणार नव्हतीच. कारण साहित्य न्यायला मजूर बोलवले होते त्यांच्यावर लक्ष ठेवणे, काही राहिले आहे का पाहणे इत्यादी हीच काय ती मदत. मी त्याला सगळे करू लागलो. तास दोन तासात मजुरांनी सगळे साहित्य शिफ्ट केले व ते निघून गेले. पण जाताना ते एक दोन छोट्या पिशव्या आणि काही ब्यागा नवीन घराबाहेरच ठेऊन गेले. त्या फक्त उचलून घरात न्यायचे काम होते. मित्राने ब्यागा घेतल्या. आणि हलक्या पिशव्या मला उचलायला सांगितल्या. अर्थात किरकोळ गोष्ट असल्याने मीही फारसे मनावर न घेता त्या पिशव्या घेऊन घरात आणून ठेवल्या. पण नंतर जेंव्हा तो नवीन घरात आणलेले एकेक साहित्य लावू लागला तेंव्हा मला धक्काच बसला. कारण ज्या पिशव्या मला त्याने उचलायला सांगितल्या होत्या त्यात चक्क त्याने आपली चपले व बूट इत्यादी ठेवले होते. आणि ते सगळे सामान त्याने स्वत:च पॅक केले असल्याने (मजूर फक्त शिफ्ट करायला बोलावले होते) त्या पिशवीत चपला आहेत हे त्याला पक्के माहित होते. मला हि गोष्ट मनाला फार लागून राहिली. पण त्याने असे का करावे हे लक्षात येत नव्हते व त्याला मी हे विचारू पण शकत नव्हतो.
आयुष्यात अनेक वेळा आपल्याला अशा छोट्या अपमानास्पद प्रसंगांना न कळत किंवा कधीकधी ध्यानीमनी नसताना अचानक तोंड द्यावे लागते. हे प्रसंग म्हणजे काही खूप मोठा अपमान नव्हे. कधी कधी तर ते आसपास कुणाच्या लक्षात सुद्धा येत नसतात इतके छोटे असतात. पण तरीही बराच काळ मनात टोचत राहतात. त्यामुळे कधीकधी नात्यांवर पण परिणाम होतो. कुठेतरी वाचले होते कि Life is not about what happens to us, but its is about how do we react to it. हे मला खूप पटते. पण अशा प्रसंगी काय करावे? त्या त्या वेळी React झाले नाही तर ते मनात राहते व त्याचा आपल्यालाच त्रास होतो. पण वरील प्रत्येक प्रसंगात जर मी त्या त्या वेळी React झालो असतो तर कल्पना करा अजून किती विपरीत घडले असते.
यावर कोणी मायबोलीकर योग्य सल्ला देऊ शकतील का?
घराच्या घरी मोबाईल मध्ये डोकं
घराच्या घरी मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्या ऐवजी उगाचच जास्त सोशल बनण्याचा अट्टाहास केला की असे अपमान पदरी येणारच.
त्यापेक्षा व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक, मायबोली इत्यादी ज्ञानगंगांमध्ये डुबक्या मारत आभासी जगात रममाण व्हावं
श्री, तुम्ही आता बीप्सला
श्री, तुम्ही आता बीप्सला उचलताय का?
धागा को त बो त आहे.
साती , बिप्सला ऑलरेडी
साती , बिप्सला ऑलरेडी करणसिंग ग्रोव्हरने उचललयं , आता आम्ही काय त्यांना टेकु लावणार ?
धागाकर्त्याला पण थोडीफार असंबंध प्रतिसादाची सवय व्हायला हवी ना .
सर्वांचे खरेच मनापासून
सर्वांचे खरेच मनापासून धन्यवाद. नाही म्हणजे I really mean it. कारण, तुम्ही तुमचा वेळ माझ्या समस्येवर विचार करण्यासाठी दिलात हेच माझ्यासाठी खूप आहे. मला माझ्यात कुठे सुधारायला हवे या बद्दल बरीचशी माहिती मिळाली.
@maitreyee : हे तिन्ही होऊन गेलेले प्रसंग , त्यावर सल्ला असा काय देणार ?
हे तीन प्रसंग फक्त उदाहरण. पण पुढे असे प्रसंग घडल्यास त्याचा आपल्या मनावर तत्कालीन परिस्थितीत नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये यासाठी काय करावे यासाठी सल्ला.
@अंजली: अहो अमेरीकेत पाहुणेच येतात मदतीला
पाहुण्यांनी मदतीला आपणहून येणे आणि आलेल्या पाहूण्यांना मदत करा म्हणून आपण जबरदस्ती (अप्रत्यक्षपणे) करणे ह्यात फरक आहे हो
@बन्डु १- ज्याला लोक "खडूस" म्हणतात तसं व्हायचं. २- परखड पणा हवा, व्यवस्थित शाल्जोडितले मारता यायला हवी.
पटले हे अगदी. पण त्यासाठी तसा स्वभाव हवा. तसा असता तर हा धागा निघालाच नसता. हा हा हा...
@ jayantshimpi: चपलांच्या पिशवी ऐवजी, दुसरे ओझे चालले असते कां ? तेंव्हा ' अपमान ' वाटला नसता कां ? खुळ्या समजुती आहेत ह्या.
इतर काहीही असते तर खरेच चालले असते. खुळ्या समजुती आहेत हे अगदी मान्य पण काही झाले तरी "कुणाचेतरी जोडे उचलणे" हे आपल्या सर्वांनाच अमान्य असते ना हो?
@सर प्राइज पाहुणे
>> प्रसंग १ : तुमची चूक आहे
हो मान्य आहे मी तसे लिहिले पण आहे
>> प्रसंग २: त्याच्या गाडीतून त्याच्या घरच्यांबरोबरीनं गेलात तेव्हा अपमान वाटला का? मग कार्यक्रमाच्या तयारीत मदत केली तर अपमान का वाटला?
अहो गाडीतून घेऊन जाणे हा पाहुण्यांना सन्मान आहे पण "त्या बदल्यात" तुम्ही त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवत असाल तर गाडीत बसण्याच्या आधी तसे सांगायला नको होते का?
>> प्रसंग ३: त्यानं तुम्हाला जड बॅग्स उचलायला सांगितल्या असत्या तर तुम्ही हाच किस्सा 'मित्रानं मला जाणूनबुजून जड सामान उचलायला लावलं' अशा कोनात लिहिली असती
@अंजली: तुम्हाला जड बॅगा उचलायला सांगितल्या असत्या तर परत म्हणाला असता - जड बॅगा मला उचलायला सांगितल्या, स्वतः मात्र हलक्या पिशव्या उचलल्या
यात माझी चप्पल आहे हे मी घेतो. फारतर ती ब्याग तू घे... असे तो म्हणू शकला असता ना? वाईट वाटले नसते मला. मी त्याच्या ठिकाणी असतो तर माझी चप्पल उचलू दिली नसती.
@ Filmy: व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे क्लासेस चालू करा. फरक पडेल.
हो मला मान्य आहे कि जगाकडून बदल अपेक्षित करण्यापेक्षा मला माझ्यात बदल करावा लागेल
@गजानन: तुम्ही स्वतः मित्र म्हणून त्याला मदत केलीत यात गैर का वाटले? 'ते दोघे'मित्र नसून घरचेच आहेत हे ज्ञात होण्यामुळे? खरेच कळले नाही.
त्याने आपल्या घरच्यांना काम सांगणे हे समजू शकतो. पण मित्रांना कसे काय सांगतो याचे आश्चर्य वाटले होते. पण ते मित्र नसून त्याच्या घरचेच होते हे जेंव्हा कळले आणि घरचा नसूनही सांगितलेले काम निमुटपणे करणारा मी एकटाच, तेंव्हा मुर्खात निघाल्या सारखे वाटले इतकेच.
@धनि:छोट्या छोट्या गोष्टींचा त्रागा करण्याऐवजी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधता येईल त्याकडे लक्ष द्या. जीवन खुप सुखी होईल.
हे खूप मोलाचे सांगितलेत. नक्की प्रयत्न करीन.
@चौकट राजा: असा प्रसंग घडल्यास पलिकडील माणसानी हे जाणून बुजून केलं का आणि आपलं नक्कि काय नुकसान झालं हे प्रश्न स्वतः ला विचारा, आपोआप शांत व्हायला मदत होईल.
रामबाण! मानले आपल्याला. तसे नुकसान काहीच नाही जाणूनबुजून कुणी केले असेल असेही वाटत नाही (पण नक्की सांगू शकत नाही). पण काही असले तरी मन शांत राहते त्याकाळात तरी आणि हेच मला हवे होते!
@मेधा: Situation – Behavior – Impact Feedback Tool असे शोधून पहा
अमूल्य ! यावर https://www.mindtools.com/pages/article/situation-behavior-impact-feedba... हि लिंक मिळाली ती मी वाचून काढतो.
@टण्या: https://www.amazon.com/Trump-101-Success-Donald-J/dp/0470047100 हे पुस्तक वाचा, नक्की उपयोग होइल
हो. अमेरिकेची निवडणूक लढवणार माणूस आहे त्याच्या आयुष्यात तर छोट्या मोठ्या अपमानाचे असले प्रसंग कोट्यवधीने येऊन गेले असतील. हे मला वाचायलाच हवे.
@साती: चपला बिपला उचलणे इतके हलके का वाटते लोकांना
लहानपणापासून ब्रेनवाश झालो असेन किंवा काही म्हणा पण कुणाचे जोडे उचलणे अपमानास्पद वाटते. तसे वाटणे कदाचित चुकीचे असेल. पण मनाला कसे समजावणार.
@सोन्याबापू: आपला मोठा इगो कमी करावा, छोटे अपमान जादू झाल्यागत नाहीसे होतील. माफ करा स्पष्ट बोलतोय.
मला हा फीडबॅक आधी पण मिळाला आहे कि माझा इगो खूप आहे. पण मी कन्फ्युज्ड आहे कि इगो पूर्ण सोडायचा म्हणजे काय? कुणीही कसाही अपमान केला कि काही वाटूनच घ्यायचं नाही का? हे कसे शक्य आहे. पण मला खरेच अशा लोकांचा हेवा वाटतो कि जे अजिबात माइंड करत नाहीत.
@टग्या: आभासी जगात रममाण व्हावं
कधी नव्हे ते गेलो होतो हो. पण आपण नेहमी तर जगापासून अलिप्त नाही राहू शकत. कधी न कधी खऱ्या जगात यावेच लागते.
@श्री: धागाकर्त्याला पण थोडीफार असंबंध प्रतिसादाची सवय व्हायला हवी ना
चिंताच नको सर. सगळे प्रतिसाद मला मदत करत आहेत. संबंधीत वा असंबंधित. हा हा हा...
तुम्ही दिलेली उत्तरे पाहता
तुम्ही दिलेली उत्तरे पाहता वाटत नाही फारसा ईगो असावा आपल्यात. शुभेच्छा आणि धन्यवाद
तुम्ही फारच संवेदनशील आहात
तुम्ही फारच संवेदनशील आहात असे वाटते!
अहो कृष्णाने पत्रावळी उचलली होती पांडवांच्या जेवणावळीत, आणि तो साक्षात परमात्मा, मग तुम्ही साध्या चपला नाही उचलू शकत मित्रासाठी!
ऑन सिरीयस नोट, वरील तीन उदाहरणात काय अपमान ते कळले नाही. आणि जर कोणी खरोखरच अपमान करत असेल, तुम्ही नीट बोलूनही ऐकत नसेल तर इग्नोअर करा आणि सोडून द्या. देव अशा जिवांना काय ती योग्य शिक्षा करतोच! कर्म सिध्दांत का काय म्हणतात ते!
सनव, त्यांना विचारा तरी की
सनव, त्यांना विचारा तरी की त्यांचा देवावर, कर्म सिद्धांतावर विश्वास तरी आहे का?
If these are real facts as
If these are real facts as reported above, let's analyse and understand following...
Misunertstanding occurs lot in human relations, and it may be unavoidable. One reason is simple coincidence, that is, someone has nothing to do it with certain incident but simply happened to be there at the time of the incedent and still is blamed for having caused the incident. Logically this someone is not a causing element of the incident and is misunderstood as having caused the incident or as a causing element of the incident.
मित्रा बरंच लिहयला आलो होतो..
मित्रा बरंच लिहयला आलो होतो.. पण वरचे प्रतीसाद बघता अजुन काय लिहू.. एक प्रसंग सांगतो.
माझा परदेशातला पहिला जॉब सुरू केला. ऑफिस छोटेसेच होते. एका रुममधे माझ्या कलिगचा बर्थडे साजरा झाला. नंतर मॅनेजरने स्वतः सगळ्या डिशेश उचलल्या, साबण लाऊन, धुऊन पुसुन ठेवल्या. माझा टेबल समोरच असल्याने मी मदतीला गेलो तर सुहास्य वदनाने "Its alright.. will manage" पुटपुटला.
नविन होतो, परत जागेवर येऊन बसलो.
असे दोन एक प्रसंग घडल्यावर मग हळूहळु डोक्यावरचे मोठेपणाचे भुत उतरले. पुढे होऊन लागेल ती (शब्द्शः) मदत करायला सुरू कर, लवकरच धागा काढशिल "छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाचे काय करावे!"
(ता. क. काही जाणिवपुर्वक केलेल्या अपमानात लाथोंके भुत बधत नसल्यास मी तरी कुत्सित कटाक्षाने, पुणेरी शालजोडीने, वेळप्रसंगी प्रेमाच्या कोल्हापुरी टाईप शब्दाने तिथेच बदडतो)
१. अपमानापेक्षा जास्त
१. अपमानापेक्षा जास्त कम्युनिकेशन गॅप आहे.नुसते 'काय झाले' विचारले असते तरी गैरसमज टळले असते.(असं होतं, मी एकटी पुणे मुंबई करत असताना मला बरेचदा एका डब्यातून दुसर्या डब्यात सीट बदलण्याची रिक्वेस्ट व्हायची.कारण कुटुंबाला एकत्र बसायचे वगैरे.दुसर्या डब्यात, तेही विंडो सीट बदली विंडो सीट नाही हे सौदे मी ३ दा स्वीकारले आहेत फक्त तोंड उघडून वाईट पणा नको म्हणून, आता नीट विचार करुनच असे बदल करते.)
२. यात अपमान वगैरे नाही, लवकर एकटा जाणारा बरेचदा नुसता चुळबुळत कंटाळत बसून असतो.त्याला असे अॅक्टिव्ह रोल मिळाल्यास 'राबवले' पेक्षा आनंद जास्त असतो अॅक्शन सुरु झाल्याचा.भारतात खास करुन तरुण आणि माणूस आणि एकटा हे कॉम्बि असल्यास तुम्हाला सामान उचलाउचली/हलवाहलवीत गृहीत धरले जाणार हे गृहित धरुन चाला.
३. हे थोडे अपमानास्पद वाटले.पण बर्याच लोकांना 'पिशवीत चपला' चा इतका टॅबू किंवा दुसर्याला घाण वाटेल याची जाणीव नसते. (बरोबर लहान मुले असल्यास चपला हातातच काय, डोक्यावरही घेण्याची तयारी बाळगावी लागते.)
धनि | 20 October, 2016 -
धनि | 20 October, 2016 - 19:58<<++११११
तुमच्यासोबत(च) हे असं का घडलं
तुमच्यासोबत(च) हे असं का घडलं असावं?
एक तर तुमचं वय कमी असेल, किंवा निदान शरीरयष्टीवरुन तुम्ही तसे दिसत असणार. दुसरं म्हणजे तुमचा चेहरा अगदीच "आत्ताच अलिबागहून आल्यासारखा" दिसत असणार. असो. वय तर नैसर्गिक गतीनेच वाढत जाणार, शरीरयष्टीही तुम्ही चटकन बदलु शकणार नाहीतच. निदान चेहरा तरी करारी ठेवा. आलेल्या अनुभवावरुन तुमची परिपक्वता वाढत जाईल. समोरचा काय बोलणार आहे हे तुम्हाला आधीच कळणार असेल तर तुम्हाला त्याच्या बोलण्याने धक्का न बसता उलट त्याला अनपेक्षित अशी तत्काळ प्रतिक्रिया तुम्ही द्याल. असो.
मी मध्यंतरी मंडईजवळ कार घेऊन गेलो असता तिथे एक टेम्पोवाला मला मोठ्याने ओरडून "थांबा, थांबा इथे गाडी लावू नका आम्हाला गाडी लावायची आहे." मीही त्याला तितक्याच आवाजात पुन्हा, "तुम्हीच लावायची मग आम्ही का नाही लावायची?" इतकेच (कुठलाही अपशब्द न वापरता) विचारले. तितक्यानेही तो ओशाळवणा झाला आणि चटकन म्हणाला, "लावा काका तुमची गाडी." अर्थात हा फारच साधा प्रसंग झाला. पुण्यात असे नेहमीच घडते. तुम्हाला सराव व्हावा म्हणून हे उदाहरण दिले इतकेच.
पुर्वी मायबोलीवर एक गृहस्थ
पुर्वी मायबोलीवर एक गृहस्थ होते त्यांचा पण सारखा अपमान व्हायचा, नाही झाला तर ते अपमान होईपर्यंत दंगा करायचे, ते आज असते (म्हण्जे मायबोलीवर असते, म्हंजे ते इथे नाही आहेत अशी माझी एक समजूत, असो) तर त्यांनी नक्कीच उत्तम उपाय सुचवले असते.
यावर कोणी मायबोलीकर योग्य
यावर कोणी मायबोलीकर योग्य सल्ला देऊ शकतील का?>>>> इथे अजुन नविन पदधतीने अपमान कसा होऊ शकतो याची झलक मिळेल तुम्हांला
बाकी तीन ही प्रसंग अपमानास्पद वाटले नाही.नो बीग डील.
तुम्ही फारच संवेदनशील आहात
तुम्ही फारच संवेदनशील आहात असे वाटते! >+१
अशा प्रसंगात तुम्हाला जे अपमानास्पद वाटले त्यावर ते टाळण्यासाठी काय करता आले असते असा विचार करा. शेवटी अनुभवच माणसाला खंबीर , परिपक्व बनवतो , दुनियादारी शिकवतो. त्यासाठी ही लहान लहान ट्युटोरियल्स उपयोगी पडतात!
हिट इट भावड्या आता खरी लढत
हिट इट भावड्या
आता खरी लढत रंगात आली भौड्यानो, तिकडे ऋ चा धागा आला पण (http://www.maayboli.com/node/60581) . हिकडे जास्त प्रतिक्रिया कि तिकडे. होऊ दे खर्च मायबोली आहे घरचं.
आपण बी आहात का?
आपण बी आहात का?
तीनही प्रसंगात काहीएक
तीनही प्रसंगात काहीएक अपमानास्पद वाटलम नाही.
पहिल्यात तर चक्क स्वतःच उठुन गेलात आणी त्यांनी कसा बरे अपमान केला तुमचा? बाकी दोन मित्रत्वात सगळ चालतंय. कदाचित ते मित्र जेवढं तुम्हाला आपलं / जवळचं समजतात तेवढे तुम्ही त्यांना जवळचे समजत नसाल.
आम्ही कुणाकडे गेलो तर स्वतःच मदत करु लागतो कुणी विचारण्या आधीच. असो.
मला तर हा धागा एकदम 'टु बी ऑर नॉट टु बी' वाटला.
प्रसंग १)<<< त्याने अचानक मला
प्रसंग १)<<< त्याने अचानक मला पाठीला हात लावून उठून दुसरीकडे बसायची खून केली. माझ्या नादात मी मग्न असल्याने अचानक मला काही लक्षात आले नाही. काहीतरी असेल समस्या असा विचार करून मी पट्टकन उठलो.>>>>
यात चूक कोणाची? मग अपमान का वाटतोय.
प्रसंग २ आणि ३ मध्ये काहीही अपमानास्पद नाही आहे. आणि जर असे वाटत असेल तर तुम्ही कोणाशीही मैत्री करू नका. कारण मैत्री म्हणजे काय हेच तुम्हाला अजून कळले नाहीए.
असं छोटं मोठं खटकणं/ग्रजेस
असं छोटं मोठं खटकणं/ग्रजेस प्रत्येकाकडे असतात, हे बोलून दाखवत आहेत.
यात धागा कर्त्याला जज/बॅश करण्याची गरज नसावी असे वाटते.
आत्ताच अलिबागहून आल्यासारखा"
आत्ताच अलिबागहून आल्यासारखा" दिसत असणार. असो>>>>>>>>. .kindly think twice before talking anything abt any place....... people from alibaug r much smarter than u......
पहिल्या प्रसंगाचं समजु शकतो.
पहिल्या प्रसंगाचं समजु शकतो. त्याने तुम्हाला विनंती करायला हवी होती. नाही केली तर तुम्ही असे उठुन जायला नको होते, पण ते अनवधानाने झाले तुमच्या कडुन. पुढच्यावेळे पासून लक्ष द्या.
बाकी दोन प्रंसंगा बाबत मन साफ करा.
प्रसंग दोनः अशी मदत करायला मैत्री होउन इतका कालावधी लोटला असला पाहिजे, अथवा इतर लोकांपैकी अजून एखादा मित्र असायला हवा होता, किंवा त्या मित्राने आधी आपल्याल्या तशी मदत केलेली हवी असे नसणारे नियम लावु नयेत.
प्रसंग तीनः मित्राने मुद्दाम त्या वस्तु विसरायला तर सांगितले नव्हते ना मजुरांना. आणि मदत मागताना, जड वस्तू स्वतः उचलाव्यात हलक्या इतरांना सांगाव्यात हे त्याने पाळले. त्याने स्वतःच बूट, चपला पिशवीट भरल्या म्हणजे त्याला असली कामे हलकी वाटत नाहीत, मग तो स्वतः ते उचलायला का टाळेल? जर पिशवी पूर्ण बंदिस्त असती, तुम्हाला आत काय आहे ते कळले नसते तर अपमान वाटला असता का?
तुमची रास कोणती आहे? त्यावर
तुमची रास कोणती आहे? त्यावर पण संवेदनशील स्वभाव डिपेंड असतो...
बच्चा ......... या जगात तू
बच्चा .........
या जगात तू काय घेवून आलास , काय घेवून जाणार आहेस
अपमान वगैरे सारे मिथ्या आहे.. ( पुण्यात पदोपदी होण्याची शक्यता असतेच) ,
त्या महिलेच्या नव-याला तू जागा दिली असेल तर ती त्यालाच शिक्षा नाही का, उलट तो दूसरीकडे बायकोची वट्वट न ऐकता निवांत बसला असता , तू उठून त्याच्या आनंदावर विरजण घातलेस मित्रा
बाकी प्रश्न मित्रांना मदत करण्याचा त्यात कसला आलाय रे अपमान , उद्या दारु प्यायला त्याने बोलविले आणि येताना चकना आण असे सांगितले तर तूला तो अपमान वाटेल का ... नाही ना
हा सगळा अहंपणाचा भाव सोडून द्यावा ..........
बाकि तू सुज्ञ आहेसच ............... मी पळतो
बसण्याच्या बाबतीत माझा एक
बसण्याच्या बाबतीत माझा एक सल्ला आहे. जो मला माझी आई देत असे. कुठेही सांगितल्याशिवाय् बसू नये, किंवा आपल्याला फारच निकड असलि तर कोणाला तरी विचारुन बसावे. म्हणजे
कोणी उठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जरी कोणी उठवायला आले तर ज्याने आपल्याला बसवले होते त्याचा
संदर्भ देता येतो आणिमग अशा वेळेला अॅड्जेस्टमेंट म्हणून अजिबात उठू नये. ज्याला एखादी विशिष्ट जागा हवी असेल त्याने लवकर यावे किंवा आयोजकांनी राखीव जागा म्हणून बोर्ड लावावा. पण अशा गोष्टी विसरुन जाऊन फारसा फायदा होत नाही असा माझा अनुभव आहे. जी टोचणी लागायची असते ती लागतेच. म्हणून वरील प्रमाणे आसन ग्रहण केलयास अपमानाचा प्रश्न येत नाही.
एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला पाहुणे म्हणून बोलावल्यावर कधी कधी बोलावणारा काम सांगतो यावर उपाय माहित नाहि. सहन करणे हाच उपाय किंवा सदर माणसाच्या पुढिल कोणत्याही कार्यक्र्मास न जाणे. कितीही आग्रह केला तरी. केव्हतरी त्याला विचार करावा लागतो. पण मला एक वेगळाच अनुभव आला एखाद्या कार्यक्रमाला जर अगदी लवकर गेलं तर , काही आपल्यासारखेच लवकर आलेले लोक
आगाऊपणे इकडची तिकडची हालवाहलव करू लागतात व आपण कसे न सांगता मदत करणारे आहॉत हे बिरूद ते निर्माण करतात. अशा वेळेला ते आपण मदत करायला गेलो नाही तर जळजळीत नजरेने तुमच्याकडे पाहतात. याला निर्लज्जपणे बसणे हाच उपाय आहे. किंवा काही वेळेला आपल्याला ऐकू येईल अशी बडबडही करतात, " नुसतं लवकर येऊन काय करायचंय काही काम करून मदत नको का करायला ? " वगैरे.
पण आपण शहाणे असाल तर तरीही निर्लज्ज पणे बसून राहा. म्हणजे आगाऊपणाची ही सवय मोडते तरी.
कारण तुम्हाला कार्यक्रमाची व्यवस्था करायला बोलावलेले नसते. हे धरुन ठे वावे. काहि जुन्या पिढीतले लोक असला आगाऊपणा जास्त करतात असा माझा अनुभव आहे. ज्यावेळेला आयोजकांनी पूर्ण कार्यक्रमाचे कंत्राट दिलेले असते तेव्हा तर असले आगाऊ लोक कहर करतात. आपण पाहुणे असल्यास स्वस्थ बसावे किंवा तुम्हाला मदतीसाठी बोलावले असल्यास मात्र जरूर मदत करावी दुसरे कोणी मदत करोत अथवा न करोत.
माझा दृष्टिकोन तरी असा आहे.
वर वर्णन केलेल्या प्रसंगांमधे अपमानित झाल्यासारखे वाटते या विधानाशी मी सहमत आहे.
पहिल्या प्रसंगात चूक तुमची
पहिल्या प्रसंगात चूक तुमची आहे . तुम्ही खुर्चीवरून उठायला नको होते .
दुसऱ्या अन तिसऱ्या प्रसंगात काही अपमानास्पद वाटले नाही .
उलटपक्षी तुम्ही स्वतःहून मित्रास विचारले पाहिजे होते की काही मदत हवी असेल किंवा काही काम असेल तर सांग म्हणून.
आम्ही तर मित्राच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये जेवणावळीत वाढणे , किराणा आणून देणे, पाहुण्यांची व्यवस्था बघणे अशी कामे केलेली आहेत आणि त्यांनीही केलेली आहेत तिथे आम्हाला किंवा मित्रांना कधी कमीपणा वाटला नाही .
तुमचा मदतीला धावून जाण्याचा स्वभाव दिसत नाही . शक्य होईल तितके स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा . मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींची चरित्र वाचा.
मान अपमान ही गोष्ट आपण त्या प्रसंगाकडे कोणत्या नजरेने बघतो त्यावर ठरते .
एकच उदाहरण देतो आपले सगळ्यांचे लाडके राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे .
एका कार्यक्रमात व्यासपीठावर इतर पाहुण्यांसोबत त्यांची वेगळ्या मोठ्या खुर्चीची व्यवस्था करण्यात आली होती पण कलाम साहेबांना ही गोष्ट आवडली नाही त्यांनी इतरांना जी खुर्ची देण्यात आली होती ,तशीच खुर्ची आणायची सूचना केली . हा विडीओ बघा --> https://www.youtube.com/watch?v=oOd_DPnbE0Q
एवढा मोठा माणूस पण आपण कुणी वेगळे आहोत हा अहंभाव त्यांना कधी आयुष्यात शिवला नाही .
त्यांनी इतरांना जी खुर्ची
त्यांनी इतरांना जी खुर्ची देण्यात आली होती ,तशीच खुर्ची आणायची सूचना केली > कलाम फार ग्रेट होते खरच! इतरही अनेक गोष्टी ऐक्ल्या आहेत अशा त्यांच्याबद्दल. --^--.
पण तरीही आपण या गोष्टी आपण्हून करणं ; आणि दुसर्यानी करायला लावणं यात फरक वाटतो मला. आणि जर हे निखळ मनानी , मनमोकळेपणे केलं असेल तर ते इतरही बाबतीत दिसायला पाहिजे. कदाचित असं झालं नसेल म्हणून अपमान वाटू शकतो.
धनि | 20 October, 2016 -
धनि | 20 October, 2016 - 19:58<<++११११
केसी बीसी....
केसी बीसी....
हिम्स आवर अरे
हिम्स आवर अरे
Pages