अंडी घालण्यासाठी कासवं किनार्यावर येतात आणि अंडी घालून समुद्रात परत जातात. अंडी शाबूत राहिली, तर त्यांतून पिल्लं बाहेर येतात आणि आपापली समुद्रात जातात.

घटस्फोटीत जानकी. तिचा ड्रायव्हर यदू. कासवांची पिल्लं वाचावीत म्हणून धडपडणारे दत्ताभाऊ. बाबल्या. रस्त्यावर वाढलेला परशू. स्वतःत हरवलेला तो अनामिक तरुण.
त्या तरुणाची वेदना समजून घेणारी, एकमेकांशी काहीही नातं नसणारी ही माणसं आणि अलिप्त, अहिंसक कासवं.
सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'कासव'ची पहिली झलक -
कासव
दिग्दर्शन - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
निर्मिती - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर
सहनिर्माते - डॉ. मोहन आगाशे
कथा - पटकथा - संवाद - सुमित्रा भावे
छायालेखन - धनंजय कुलकर्णी
संकलन - मोहित टाकळकर
ध्वनिलेखन - अनमोल भावे
संगीत - पार्श्वसंगीत - साकेत कानेटकर
गीतरचना - सुनील सुकथनकर
स्वर - सायली खरे
कलादिग्दर्शन - सुमित्रा भावे, संतोष संखद
वेशभूषा - सुमित्रा भावे, सोनाली संखद, माधवी तोडकर
कलाकार - इरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, डॉ. मोहन आगाशे, देविका दफ्तरदार, संतोष रेडकर, ओंकार घाडी
डॉ. प्रकाश लोथे आणि अलका लोथे यांच्या देणगीची चित्रपटनिर्मितीसाठी मदत झाली.
फ्रेम्स कसल्या झक्कास दिसतात
फ्रेम्स कसल्या झक्कास दिसतात , मायबोली आणि ' कासव' टीमला शुभेच्छा !
गाणं चांगलं आहे पण हिंदी घेण्यामागे काही विशेष कारण होतं का ?
मस्त वाटला टिझर. गाणे आणि तो
मस्त वाटला टिझर. गाणे आणि तो पक्ष्यांचा आवाज - समुद्राबरोबर अगदी तिथे त्या किनार्यावर घेवून जातोय.
सगळ्या टीमला शुभेच्छा.
सुरेख आहे टीझर! गाणंही खूप
सुरेख आहे टीझर!
गाणंही खूप आवडलं आणि गाणारीचा खरखरीत आवाजही.
कोंकण तर छानच टीपलंय.
एकंदर सिनेमाबद्दल उत्सुकता जागवणारं टीझर आहे.
छान आहे टीजर. 'कासव' टीमला
छान आहे टीजर. 'कासव' टीमला शुभेच्छा.
सगळ्या फ्रेम्स भारी! समुद्र
सगळ्या फ्रेम्स भारी! समुद्र सुंदरच
'कासव' टीमला शुभेच्छा.
फ्रेम्स फार सुंदर आहेत!!
फ्रेम्स फार सुंदर आहेत!!
वाह, सुरेख सर्वच. 'कासव'
वाह, सुरेख सर्वच.
'कासव' टीमला शुभेच्छा.
मस्तच. Waiting for movie
मस्तच. Waiting for movie release
सगळ्या फ्रेम्स भारी! समुद्र
सगळ्या फ्रेम्स भारी! समुद्र सुंदरच >> + १००
उत्सुकता वाढली आहे खुपच.
cinematographerनी कमाल केली
cinematographerनी कमाल केली आहे. देवगडचा किनारा अप्रतिम टिपला आहे.. विशेष करुन लाटांचे क्लोजअप्स मस्तच... कासवच्या सगळ्या टीमला शुभेच्छा!
Wow, Good luck team. Release
Wow, Good luck team. Release date please.
गाणं मस्त, आवाज मस्तच; कोकण
गाणं मस्त, आवाज मस्तच; कोकण झकास;
इरावती हर्षे, आलोक राजवाडे तर आहेतच आवडते...
पण टीझर विशेष आवडला नाही.
कासव टीमला शुभेच्छा! वेगळा
कासव टीमला शुभेच्छा!

वेगळा विषय निवडायचे धाडस कौतुकास्पद आहे. मनात टीझर पाहून कथा कशी असेल याचे एक कल्पनाचित्र निर्माण झाले तशीच कथा प्रत्यक्षात साकारली आहे का, याची उत्सुकता आहे. टीझरसाठी वापरलेले गाणे, त्यातून सूचित होणारा अर्थ, निसर्गचक्रानुसार कासवांचा अनादि जीवनक्रम आणि दिशा शोधणारी माणसे... ही लय प्रत्यक्षात कशी उतरली आहे हे पाहाणे इंटरेस्टिंग ठरावे.
छान झलक! इरावती हर्षे किती
छान झलक!
इरावती हर्षे किती दिवसांनी दिसते आहे.
सुरेख आहे टिझर ..समुद्राची
सुरेख आहे टिझर ..समुद्राची विविध रुपं असणार्या सगळ्याच फ्रेम्स आवडल्या. चित्रपट पाहायला आवडेल !
nice
nice
releasing when ?
releasing when ?
व्वाह..अगदी सुन्दर जमलय!
व्वाह..अगदी सुन्दर जमलय! इरावती हर्षे आवडती.
सगळ्या टीमला शुभेच्छा!
आज संध्याकाळी मुंबईत पार
आज संध्याकाळी मुंबईत पार पडलेल्या 'झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात' 'कासव'ला सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट छायालेखन, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे चार पुरस्कार मिळाले.
सर्वोत्कृष्ट संकलन - मोहित टाकळकर
सर्वोत्कृष्ट छायालेखन - धनंजय कुलकर्णी
सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - इरावती हर्षे
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि केरळ इथल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत 'कासव' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
याच पुरस्कार सोहळ्यात 'नदी
याच पुरस्कार सोहळ्यात 'नदी वाहते'ला विशेष लक्षवेधी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
नीरजा पटवर्धन आणि संदीप सावंत यांचं हार्दिक अभिनंदन
अरे वा, मस्तच! श्री, अकु +१
अरे वा, मस्तच!
श्री, अकु +१
अरे वा मस्तच.
अरे वा मस्तच.
कासव आणि नदी वाहतेच्या विजेत्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
कासव आणि नदी वाहतेच्या
कासव आणि नदी वाहतेच्या विजेत्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.>>>>>>>>>+१
अरे वा मस्तच.
अरे वा मस्तच.
कासव आणि नदी वाहतेच्या विजेत्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.__________+१
'कासव'ला यंदाचं सुवर्णकमळ.
'कासव'ला यंदाचं सुवर्णकमळ.
भारीच की. कासवच्या टिमचे
भारीच की. कासवच्या टिमचे अभिनंदन.
नदि वाहतेचे वाचले नव्हते. नीरजा तुमच्या टीमचे पण अभिनंदन व शुभेच्छा!!