* बर्याच जणांना असे का नाव दिलंय असा प्रश्न पडला असल्याने थोडे त्याविषयी. कॉसमॉस दरवर्षी न चुकता नवरात्राच्या सुमारास फुलते. कुणीही याची झाडे मुद्दाम लावत नाहीत. वर्षभर जमीनीखाली राहुन एकदाच डोके वर काढते व सर्व परिसर केशरी करुन टाकते.
मायबोली प्रायोजीत मिसळ महोत्ववाच्या दिवशी सकाळी उठलो खरा पण डोक्यात वेगळेच विचार चालु होते. त्या तंद्रीतच सिंहगड पायथ्याला एकटाच निघालो. सगळी कडे सध्या श्रावणामासी हर्ष मानसी असाच मोसम असल्याने वाटेत सगळीकडेच हिरवळ होती. पुण्यात सध्या सकाळी धुके, दुपारी कडक उन्ह, संध्याकाळी पावसाचा शिडकावा असे वेगळेच हवामान असताना शनिवार रविवार मात्र एकदम निरभ्र निळेशार आकाश होते.
आठवडाभरापूर्वीच एका ढगाळ दिवशी याच जागी गेलो असतानाचे दृश्य असे काहीसे होते. एक मेंढपाळ आपल्या शेळ्या बकर्या घेऊन फिरत होता.
सध्या घरात एक बर्डफिडर लावला आहे त्यावर रोज कमीतकमी ४ ते ५ Rose Ringed Parakeet येतात.
मी याआधी लिहील्याप्रमाणे Vernal Hanging Parrot (पिचु पोपट) ही भारतात पश्चिम घाटावर आढळणारी Parrot जातीतील एकुलती एक जात. कोकण किनारपट्टीवर तुफान पाऊस पडला की सिंहगड किंवा ताम्हीणीत दिसतात. त्या शनिवारी असाच फिरत असताना अचानक एका झाडावर मला त्यांनी दर्शन दिलेच.
हा आणखी एक. एकाच झाडावर साधारण ७ ते ८ पोपटांचा थवा बघुन मी धन्य झालो होतो.
पण तरीही हवामान ढगाळ असल्याने पुढच्याच शनिवारी परत एकदा इथे यायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे इथे निघलो आणी वाटेत कॉसमॉसने भरलेले ताटवे स्वागतास तयारच होते. साधारण नवरात्राच्या आसपासच फुलणार्या या फुलांमुळे आजुबाजुचा परीसर केशरी होऊन जातो. कॉसमॉसची फुले बघीतली की मला कायम लोणावळा किंवा मुंबईला रेल्वे\लोकलने जाताना तळेगाव मळवली भागातील त्याचे ताटवेच आठवतात.
या निसर्गरम्य वातावरणामुळे त्यादिवशी पक्षी दिसले नाहीत याचे फार दु:ख झाले नाही.
पक्षीनिरीक्षणाकरता निघाल्यावर शक्यतो मी साधी लेन्स सोबत बाळगत नाही त्याची मात्र खंत राहीली होती. शेवटी मोबाईलवर फोटो काधुन ती हौस भागवली. छातीचा कोट केलेला हा किल्ले सिंहगड.
सिंहगडाकडे जाणारा रस्ता असा आकार्षक दिसत होता.
सिंहगडाच्या पार्कींगमधुन दिसणारा किल्ले सिंहगड
घरी परत आल्यावर लक्षात आले की याच भागात मिसळ महोत्सव सुद्धा होता व अनेक मायबोलीकरांना भेटायची संधी हुकली. असो. तरी पण निसर्ग कधी तुम्हाला रेते ठेवत नाही. काहीना काही जरुन देतो. प्रश्न आहे की त्या बदल्यात आपण निसर्गाला काय देतो.
फोटो क्ला-----स!!! आता वाचते
फोटो क्ला-----स!!!
आता वाचते सावकाश...
मस्तच!!!! सगळेच पोपट भारी....
मस्तच!!!! सगळेच पोपट भारी....:)
केपी, मस्तच! पोपटाची जोडी
केपी, मस्तच!
पोपटाची जोडी सुंदर टिपलिये!
सही फोटो रे आणि मनोगत पण. पण
सही फोटो रे आणि मनोगत पण.
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण हे असं तंद्रीत कुठेही पोहोचणं बरं नव्हे.
मस्त रे केप्या!
मस्त रे केप्या!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केपी भारी फोटो आहेत !!
केपी भारी फोटो आहेत !!
फोटो मस्त आहेत!
फोटो मस्त आहेत!
फोटो मस्तच!
फोटो मस्तच!
मस्त फोटो शिर्षक वाचुन आधी
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिर्षक वाचुन आधी थोडा दचकलोच (just kidding re
)
फोटोज मस्तच. सिंहगड पायथा, ओ
फोटोज मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
सिंहगड पायथा, ओ आय विश, आय विश
टायटल पाहून मी देखील दचकले ( आय एम नॉट कीडींग
मस्त!
मस्त!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
फोटो भारीच, लिखाणपण छान.
फोटो भारीच, लिखाणपण छान.
धन्यवाद लोक्स. खर म्हणजे ते
धन्यवाद लोक्स.
खर म्हणजे ते वॉटरमार्क देण्याच्या नादात बर्याच इमेजचा साईज बदलला आहे. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
सिंहगड पायथा, ओ आय विश, आय विश >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावेळी भारतात येशील तेव्हा जाऊया
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त फोटो केप्या..
मस्त फोटो केप्या..
१,३,४ वगळता केपी-स्टँडर्ड
१,३,४ वगळता केपी-स्टँडर्ड नाही जाणवले.
मला कॉसमॉस म्हणजे बॅन्केबद्दल
मला कॉसमॉस म्हणजे बॅन्केबद्दल काहीतरी आहे असे वाटलेले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त रे ............
मस्त रे ............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त... पिचु पोपट तर खासच...
मस्त... पिचु पोपट तर खासच...
तिसरा चौथा फोटो भारीय रे.
तिसरा चौथा फोटो भारीय रे. पुढच्या जन्माच्या वेळी लेन्स घेऊन जा रे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉस्मॉस बद्दल वाचून किसमिस आठवले उगाच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जस्ट ऑसम!!
जस्ट ऑसम!!
धन्यवाद लोक्स. १,३,४ वगळता
धन्यवाद लोक्स.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१,३,४ वगळता केपी-स्टँडर्ड नाही जाणवले.>> माधव धन्यवाद. आय नो. फोटो मोबाईलने काढले आहेत व वॉमा टाकताना साईज गंडला आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
केप्या मस्त रे!
केप्या मस्त रे!
पहिले तीन चार फोटु जबरी...
पहिले तीन चार फोटु जबरी...