जाऊ द्या ना बाळासाहेब

Submitted by बेफ़िकीर on 11 October, 2016 - 23:52

एक गुणी परंतु मनाची पकड घेण्यात फसलेला चित्रपट असे माझे 'जाऊ द्या ना बाळासाहेब' ह्या चित्रपटाबद्दल मत आहे. तसेच, विनोदनिर्मीतीवर चुकून जरूरीपेक्षा अधिक लक्ष दिल्यासारखे झाल्यामुळे ऐन गंभीर प्रसंगी प्रसंग, पात्रे, संवाद ह्यांचा मूड एकदम पालटवणे खूपच अवघड झालेले दिसत आहे. त्यामुळे स्वतःच तयार केलेल्या पिंजर्‍यात अडकल्यासारखी अवस्था झाल्याचे वाटले. फार पूर्वी एक झुंज नावाचा मराठी चित्रपट आलेला होता. त्यातील दुर्गुणी पित्याला त्याचा सद्गुणी मुलगा धडा शिकवतो व त्याचे गर्वहरण करतो असे कथानक त्या चित्रपटात होते. जाऊ द्या ना बाळासाहेब साधारण त्याच धर्तीचा चित्रपट आहे.

गरसोळी गावातील राजकारण्याचा मुलाला आपल्या पित्याच्या राजकारणातील फोलपणा समजतो व पीडितांच्या खर्‍या समस्या कळतात. ह्या समस्यांच्या निराकरणासाठी तो पित्याचे छत्र नाकारून स्वतःची एक स्वतंत्र मांडणी करतो. हे करत असताना त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातही स्वागतार्ह बदल होत राहतात. एका मुलीशी प्रेम जुळते. चांगले सोबती भेटतात वगैरे वगैरे! समांतररीत्या एका नाटकाची निर्मीती सुरू असते व नाटक प्रेक्षकांसमोर जाऊन पडते. मात्र ह्या नाटक पडण्याला नायक एक वेगळीच कलाटणी देतो आणि ठसा उमटवतो.

ज्या बाबींची तोंडभरून स्तुती करायला हवी ती म्हणजे गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर आणि प्रत्येक सहभागी कलाकाराचा अस्सल अभिनय! अपवाद दोनच, मोहन जोशी आणि रीमा लागू! इतर प्रत्येकाने ग्रामीण बाज, भाषेचा टोन, देहबोली, अडाणीपणा कपल्ड विथ आत्मविश्वासाचे नेहमी दिसून येणारे काँबिनेशन, मन गलबलून जाईल अश्या प्रसंगी दाखवलेली घालमेल हे सगळेच स्तुतीस पात्र आहे. गिरीश कुलकर्णीने सर्व मार्गांनी चित्रपट स्वतःच्या खिशात घातलेला आहे. सईचे रूप ह्या चित्रपटात अतिशय लोभसवाणे आहे. मला व्यक्तिशः सर्वाधिक आवडली ती गिरीश कुलकर्णीची देहबोली आणि संवाद! अगदी अचूक साधता आलेले आहे त्याला हे सगळे!

कथेचा बराचसा भाग विनोद निर्मीतीतून प्रेक्षकांना हसवत राहतो. समांतरपणे बाळासाहेब आणि त्यांचे वडील ह्यांच्यातील सत्य-असत्याचा संघर्ष उभा राहतो. पण पुन्हा तेच लिहितो की विनोद निर्मीतीवर इतके लक्ष पुरवले गेले आहे किंवा विनोद निर्मीती इतकी परिणामकारक झाली आहे की बहुसंख्य प्रेक्षक पुढील विनोदी प्रसंगाकडेच डोळे लावून बसतात. संघर्षाचा प्रसंग काहीसा दुर्लक्षिला जातो. ह्याचे दुसरे कारण हेही असू शकेल की मोहन जोशी ह्या अभिनेत्याच्या एकंदर वावराचाच आता ओव्हरडोस झालेला आहे. तोच तोच मुद्राभिनय, तीच देहबोली आणि सगळे तेच ते! बरं, असेही नाही की ह्या भूमिकेला ते एकटेच समर्थपणे पेलू शकणारे अभिनेते आहेत. मराठीत इतर कित्येक असे अभिनेते असतील. कदाचित हुकुमी एक्का म्हणून मोहन जोशी असावेत असे वाटते. शिवाय, मोहन जोशींशी संघर्ष करताना बाळासाहेबांच्या तोंडी असलेले संवाद हे रडक्या लहान मुलासारखे आहेत हे आणखी विचित्रच! 'आम्ही ना जा, बघ मला जेवताना बोलतात' वगैरे सारखे संवाद दहा वर्षाच्या मुलाला शोभतील. तेवढा संघर्षाचा भाग सोडला तर गिरीश कुलकर्णी प्रत्येक प्रसंगात एकदम चपखल! रीमा लागू ह्यांच्या रुपाने एक महत्वाचे पात्र पूर्णपणे वाया घालवण्यात आलेले आहे. ह्याही जागी एखाद्या नवीन चेहर्‍याला वाव मिळाला असता तर बरे झाले असते. एके दिवशी अचानकच आपल्या चिरंजिवांना 'ही वाट सोडू नका' वगैरे चांगले सल्ले देणारी आई एरवी मंजूळा नाचणारणीकडे जाणार्‍या आपल्या मुलाला का काही बोलत नसे? तसेच, थेट बारमालकाला फोन करून 'माझ्या मुलाने किती ड्रिंक घेतले आहे' असे विचारून कसे गप्प बसत असे? धड पात्राची भूमिकाही समर्थनीय नाही आणि भूमिका करणारे पात्रही रटाळ! असो!

सत्याने असत्यावर मिळवलेला विजय हा 'आजवर असत्याने मिळवलेल्या विजयांपेक्षा' खूप अधिक प्रभावी व लाऊड दाखवला जाणे हे सामान्य प्रेक्षकाच्या मनासाठी आवश्यक असते. येथे हा विजय फारच सपक झालेला आहे.

शेवटचा संवाद 'नाना पाटेकरसारखा होतो की काय' अशी भीती मनात येत राहते. ह्याचे कारण एकदोनदा क्रांतीवीरमधील शेवटचा संवाद ऐकणे ठीक आहे हो? प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक नायक असाच भाषणे देत सुटला तर बोअरच होणार की? पण नाही. होते असे की एकवेळ नाना पाटेकरच्या वळणावर गेले असते तरी चालले असते भाषण, अशी वेळ येते. ह्या प्रसंगाला उभे करण्यातच गोची झालेली आहे. तेथे नायक ढसढसा रडणे हे नायकाच्या आत्तापर्यंतच्या वावराला शोभतही नाही आणि ती कथेची गरजच कुठे आहे असेही मनात येते. तेथे अपेक्षित असते हे एक सणसणीत भाषण! ज्यात भ्रष्टांना टोले लगावलेले असतील, खर्‍या समस्या समोर आणल्या जातील असे भाषण! पण परिस्थिती अशी होते की नाटक कसे पडते हे दाखवतानाच विनोदाची इतकी (जी नैसर्गीकच आहे, त्याशिवाय नाटक कसे पडेल म्हणा) साथ घेतली गेली आहे की त्यानंतरचे हे भाषण अचानक संपूर्ण कलाटणी देणारे बनवताना दमछाक झालेली आहे. आणि ती दमछाक अयशस्वीही झालेली आहे.

तरीसुद्धा, प्रत्येक पात्र स्वतंत्ररीत्या अत्यंत परिणामकारक झालेले आहे, पुन्हा, तेच दोन अपवाद सोडून!

संवाद, अभिनय, विनोद निर्मीती ह्या सर्वांना पैकी गुण द्यावेत असे वाटते. कथानक ठीकठाकच!

बाकी गीते आणि संगीत - ह्याबद्दल काय बोलावे? एक तर असलेली गीते अनावश्यक आहेत आणि संगीत काहीच्या काही लाऊड आहे. गीतांचे बोल कळत नाहीत आणि गरजही कळत नाही. त्यातून कथा पुढेही जात नाही. आजकाल असे काहीच्या काही संगीत आणि गीते देण्याची लाट आलेली आहे की काय कोण जाणे!

गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर, तसेच, बाळासाहेबांचे दोन जिगरी दोस्त ह्या सर्वांना मात्र एक पसंतीची कडक सलामी!

==============

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !
गिरीश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर साठी बघायला हवा .
आणि हो ,' बेबी ब्रिंग ईट ऑन ' अन , ' डॉल्बीवाल्या ' ने डोक्याची पार मंडई करुन ठेवलीय. Proud
मोना डार्लिंगचे लिरिक्स वैभव जोशीचे आहेत.

मी काल जाणार होते बघायला पण १०.४५ चा सकाळचा शो त्यात घरातल्या बेबी साहेब उठल्या पण नव्हत्या. मग राहून गेले. नेटफ्लिक्सां पे देखेंगे कभी तो.

परीक्षण चांगले लिहीले आहे बेफि. मोहन जोशी बद्दल व रिमा बद्दल अनुमोदन. परवा वीकांताला जुना १९८१ वाला कल युग बघितला त्यात रिमा कायच्या काय तरूण बघोन एकदम कसेतरी झाले. तेच तेच पालक बघून वैताग आला आहे मला.

बेफींना काही बाबतीत अनुमोदन.
परंतु कलाकारांच्या चांगल्या अभिनयामुळे मला चित्रपट खूप आवडला.
गीतांबद्दल प्रचंड अनुमोदन. ते शेवटचे शांत गाणे सोडल्यास बाकी धांगडधिंगा अज्जिबातच आवडला नाही.

परीक्षण आवडले. मला ट्रेलर मधे रीमा लागू धमाल वाटली होती. पिक्चर बघणार आहेच.

केवळ ट्रेलर वरून अंदाज लावताना थोडा लगे रहो मुन्नाभाई सारखी थीम वाटली होती. स्वतःच्या विश्वात असलेला नायक एका ट्रिगर वरून बदलतो अशी. आता वरचे वर्णन वाचून ते नाटक व वास्तव याच्यातही काहीतरी कॉमन थीम दाखवायचा प्रयत्न असावा (रंग दे बसंती मधे जो अगदी चपखल दाखवला होता).

परीक्षणाबद्दल धन्यवाद, बेफि. या पिक्चरबद्दल उत्सुकता होतीच. पिक्चर बघणार आहेच अर्थात Happy

मोना डार्लिंग मस्त लिहीलं आणि गायलं आहे. बाकी गाण्यांत 'ब्रिंग इट ऑन' चांगलं वाटलं.

ये गंगनाम लाव की कडक Proud

आरं अजय अतुल लाव!
This is the sound of Ajay Atul..

हे ब्रिंग इट ऑन बेबी..

पोर्र जमली येशीवरती
चर्चा बोरिंग झाली,
चल रे भावड्या पार्टी ला मग पारावरती आली, (X2)
टपरी मागे रचली क्वार्टर
भावड्या ला मग बसला स्टार्टर
चल रे पिंट्या मिटवू आपल्या
डिस्को डान्सिंग खाजेला
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला…. (X2)

आर्र वऱ्हाडी नसून
वराती मंदी हा घुसतो नाचाया
अन झिंगुन-झिंगुन नाचला हा
निसतं लागुदे वाजाया (X2)
आला मिरुवणुकीत भावड्या
कधी दांडिया खेळतुया भावड्या
हंडी फोडाया वर गोविंदा
खाली नाचुन घेतोय भावड्या
टांगा पलटी सुटले घोडे
प्यांट फाटुन तुटले जोडे
गिरक्या घेतो करून सदरा
देतो सोडून लाजेला
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला…. (X2)

आला DJ बी रंगात
खेटून-खेटून लावतो आयटम
भावड्या भरून गल्लास
करतो खल्लास TOP to BOTTOM (X2)
आला Recharge मारून भावड्या
कसा लेझीम खेळतोय भावड्या
बसला दमून कडाला पिंट्या
त्याला खेचून ओढतोय भावड्या
लात घालून म्हणला SORRY
पिंट्या डार्लिंग आपली यारी
ढोलासंग ताशा जैसा
आपला हाय एक दुजेला
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला…. (X2)

Are you ready? म्हणतो भावड्या
लील्ला-लील्ला गातो,
काय बी कर पण वाजीव ब्राझील
DJ त्याला भ्येतो… DJ
बाचाबाची घालून राडे
डान्स भारी अप्पुडी पोडे
माऊलीच DJ version
याच्या घरच्या पूजेला
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….(X2)

बोलाव म्हणजे बोलाव
हे भावड्या hit it भावड्या..hit it ...

भावड्या… mind blowing भावड्या
भावड्या… नाचुन घे भावड्या

भावड्याने पार कल्ला केलाय Proud

अगं मनात माझ्या आली
साधी नितळ भावना
किती Alone राहू आता
चल Couple होउना
बघ तरी गोडीत..
लक्झरी गाडीत..
आलोया मै हूँ DON
बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)

अगं आली तू गावात, बाराच्या भावात
गेलंय सारचं भान
अन कॉलेजात भेट झाली तुझी
मला भेटून वाटलं छान
वळखपाळख वाढली म्हनुन
लागली तुझीच गोडी..
अगं प्रपोज माझं तू अपोझ करून
कशी गं जमल जोडी
होतो म्या किडकिडा
हाडं बी काडीची..
गुटखा खावून वाट लागली बॉडी ची
येडयागबाळ्याला रानी
तुच प्रीत दावली
तुझ्यावानी रानी मला
एक नाही भावली..
फालतू पणा बी ग्येला
नवी रीत घावली
तुझ्या मागं मागं रानी
म्या बी जिम लावली
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान
अन करतोय झुंबा
मी मारतुय बोंबा
न हालत झाली घान!

बेबी ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ओन
आलिंगनाला…(X4)

ATKT मधी झालोया पास
अन Daddy म्हणला बास
तरी तुझ्यामुळे आलोया
कालेजाला मला लावला येगळा क्लास
शेजार गावाच्या आईच्या भावाच्या
लेकीचा झालाय त्रास
आणि येता जाता मला खाता-पिता
कसा होतोया तुझाच भास
करून खर्च लगीन लावू थाटात
आन तू तर साधा हात देईना हातात
एकजीव झाल्यावानी राहू दोघ जोडीन
राहू दोघ जोडीन म्या दारू-बिरू सोडीन
एने झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन
बँक लोन काढून म्या EMI फेडीन
घेऊन मिठीत साखर वाटीत
वाढलं माझी शान

बेबी ब्रिंग इट ऑन
आलिंगनाला…(X4)
ब्रिंग इट ऑन
आलिंगनाला…(X4)

ब्रिंग इट ऑन…..
आलिंगनाला

ब्रिंग ईट ऑन बेबी Proud

श्री, हे राहीलं Proud

ये गंगनाम लाव की कडक
आरं अजय अतुल लाव!
This is the sound of Ajay Atul..

हे ब्रिंग इट ऑन बेबी..

हा गाण्याचा प्रकार अजय अतुल यांची मोनोपॉली आहे! They have tried doing marathi EDM.. जमलंय एकदम! डॉल्बी वाल्या जास्त आवडलं मला.

>>> पोर्र जमली येशीवरती
चर्चा बोरिंग झाली,
चल रे भावड्या पार्टी ला मग पारावरती आली, (X2)
टपरी मागे रचली क्वार्टर
भावड्या ला मग बसला स्टार्टर
चल रे पिंट्या मिटवू आपल्या
डिस्को डान्सिंग खाजेला
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला….
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला डीजे ला… <<<<

हे वाचू लागलो, अन मनामधे "ऐलमा पैलमा गणेश देवाऽ, माझा खेळ मांडियेला, करिन तुझी सेवा" याचीच चाल घोळू लागली....! Proud

पेमेंट झाल्या-झाल्या राणी दोन गुंठे काढीन>> NA झाल्या झाल्या... असं आहे ते Happy

या दोन्हीपेक्षाही 'वाट दिसूदे' आणि गोंधळ ही दोन गाणी मला जास्त आवडली. त्यात खरे अजय-अतुल दिसतात असं माझं वैम.
'मोना डार्लिंग' ही एक कन्सेप्ट आहे. गाण्याचे लिरिक्स नुसते वाचले तर वाटेल काय आहे यात, नुसते शब्दापुढे शब्द? पण गाणं ब्रिलियंटली लिहिलं आहे. हॅट्स ऑफ टु वैभव जोशी फॉर धिस सॉन्ग.

चित्रपटाची जी कथा / पटकथा असते त्यावर दिग्दर्शक आणि टिम चर्चा करत नाहीत का ? आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना सहज लक्षात येणार्‍या गोष्टी त्यांच्या नजरेतून कशा सुटतात ? बहुतेक चित्रपटांची हिच (रड)कथा असते हल्ली.

म्होरल्या गणपतीत "ब्रिन्ग इट ऑन" आणि "डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे ला" दोन गाणी फिक्स
क्वार्टर आणि स्टार्टर चा कॉन्सेप्ट लयच माहितीपूर्ण आहे. पट्टिच्यांना सांगणे न लगे

लख्खं पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
भवानीचा !!

लख्खं पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
भवानीचा !!

मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला ह्या कहाणीचा

लख्खं पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ( X2)

ईज तळपली
आग उसळली
ज्योत झळकली आई गं
ह्या दिठीची काजळकाळी
रात सरली आई गं

बंध विणला
भेद शिणला
भाव भिनला आई गं
परदुखाची आच जीवाला
रोज छळते आई गं

हे माळ कवड्याची घातली गं
आग डोळ्यात दाटली गं
कुंकवाचा भरुन मळवट ह्या कपाळीला

लख्खं पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ( X2)

आई राजा उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
तुळजापुर तुळजा भवानी आईचा
उधं उधं उधं उधं

माहुरीगडी रेणुकादेवीचा
उधं उधं उधं उधं

आई अंबाबाईचा
उधं उधं उधं उधं

देवी सप्तश्रूंगीचा
उधं उधं

बा सकलकला अधिपती गणपती धावं
गोंधळाला यावं

पंढरपुर वासिनी विठाई धावं
गोंधळाला यावं

गाज भजनाची येऊ दे गं
झांज सृजनाची वाजु दे गं
पत्थरातुन फुटलं टाहो ह्या प्रपाताचा

(खरयं ह्यात खरे अजय अतुल दिसतात.)

सई मायबॉलीवूडची एक शापित राजकन्या आहे. तिच्या ग्लॅमडॉल बोल्ड एण्ड ब्यूटीफूल इमेजमुळे तिच्यातला अभिनय प्रेक्षकांकडून नेहमीच दुर्लक्षला जातो. तिने गेल्या काही चित्रपटांपासून तो अभिनय आपल्या बाह्य सौंदर्याचे आवरण फाडून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. पण लोकं म्हणजे लोकं असतात. सहज नाही स्विकारत. पण तरीही जर या परीक्षणात मोजो आणि रीला यांना रटाळ म्हणतामा सईच्या अभिनयाचे कवतुक होत असेल, तर तिने ते आवरण टरकवायला सुरुवात केली आहे असे म्हणू शकतो. आशयघन मराठी चित्रपटांना ग्लॅमर मिळवून द्यायचे काम आपली सई करणार हा माझा विश्वास सार्थ ठरतोय. तिथे तो मराठी कौबक सुपर्रस्टार स्वप्निल आणि ईथे ही सई, मराठी चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व योग्य चेहरे करत आहेत ईतकेच म्हणेन. जास्त सविस्तर चित्रपट बघितल्यावरच बोलू शकतो.

तिच्या ग्लॅमडॉल बोल्ड एण्ड ब्यूटीफूल इमेजमुळे >>>> Rofl
जास्त सविस्तर चित्रपट बघितल्यावरच बोलू शकतो.>>> इथेच बोल /लिहि बाबा.. नविन धागा नको काढु प्ल्लीज्ज.

माझ्या विनंतीला मान देऊन ऋन्म्याने त्याचे (सईबद्दलचे) मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी मायबोली मंडळातर्फे त्याचे आभार व्यक्त करतो . Proud

शापित राजकन्या Lol
ते काही माहित नाही, पण या सिनेमात नक्कीच सईने खूपच गोड काम केलं आहे. तिची हिरॉईन इमेज संपूर्ण पुसून ती केवळ आणि केवळ 'करिष्मा'च वाटते याद वाद नाही.

सविता प्रभुणे >> आहेत, पण या 'त्या' पॉप्युलर, सध्या 'खुलता कळी खुलेना' मध्ये काम करणार्‍या सविता प्रभुणे नाहीत. त्याच नावाची वेगळी अभिनेत्री आहे ही.. प्रोमोज पाहिले असतील, तर "बाळासाहेब, बाळासाहेब..." संवाद म्हणणार्‍या त्या याच. अफलातून काम केलं आहे त्यांनीही.

आहेत, पण या 'त्या' पॉप्युलर, सध्या 'खुलता कळी खुलेना' मध्ये काम करणार्‍या सविता प्रभुणे नाहीत. त्याच नावाची वेगळी अभिनेत्री आहे ही.. प्रोमोज पाहिले असतील, तर "बाळासाहेब, बाळासाहेब..." संवाद म्हणणार्‍या त्या याच. अफलातून काम केलं आहे त्यांनीही. >> हो "त्या" नाहीच . "ह्या" आय एल एस लॉ ला बॅचमेट होत्या आणि प्रोमोमधे बघून एकदम कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले.. Happy

सई आणि ग्लॅमडॉल??? आर यू सिरीयस?

डॉल शब्द बाहुली या अर्थाने घेतला तर पूर्वी ठकी नावाची लहान मुलींची खेळण्यातील पिढ्यान् पिढ्या टिकणारी दणकट लाकडी बाहुली होती तिच्याशीच सईची तुलना होऊ शकते

वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे

संग सोबतीची साथं मंग दिवाभीत रातं
आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे
वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे

हिरव्या गाण्याचं दान दिलं त्यानं
वसाडाचं रानं झालं जी
आरं मातीच्या पोटात आस्मानच बळ
माऊलीची लाज राख जी

या मिणमिणत्या दिव्याला तू साकडं घालं
या तळमळत्या जीवाला दे जाणीव खोलं
दे धगधगत्या इखाराला मायेची ओलं
या रखरखत्या भुईला दे घामाचं मोलं

केली निंदणी पेरणी उधळून जिंदगानी
कुणब्याचं सारं रानं आबादान हसू दे

वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे

हो भल्याची पुण्याई उभी तुझ्या मागं
जरा निगतीन वाग जी
आर्र ढळून इमान लागू नये डागं
दिल्या सबुदाला जाग जी
या सळसळत्या वादळाला आलं उधाणं
गा लखलखत्या आभाळाचं चांदणं गाणं
या रनरनत्या उन्हानं चेतवलं भानं
घे कोसळत्या पावसाची अनादी तान

मन शुध्द निरमळ सत्वाचा परिमळ
या अरुपाचं रूपं आरशात दिसू दे

वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे

संग सोबतीची साथं मंग दिवाबीत रातं
आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे
वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे
वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे

( अजय अतुलच्या खजान्यातलं अजुन एक रत्नं )

श्री, माझ्या पोस्टमागे आपली विनंती होती हे आपण ईथे खुलेआम सांगितलेत या आपल्या धाडसाचे कौतुक करतो. आपणही बोल्ड (आणि ब्यूटीफूल.!) आहात.

वाट दिसूदे>> जबरदस्त गाणं.. ऐकलं की रोमांच उमटतात! आधी हळूवार असलेलं गाणं मग बीट पकडतं तेव्हा अमेझिंग वाटतं ऐकायला. फारच सुरेख कॉम्पोझिशन आहे या गाण्याची.

श्री, काही शब्द चुकलेत. बदलशील का?
दिवाबीत रातं>> दिवाभीत
हे धगधगत्या इखाराला >> दे
या लखलखत्या आभाळाचं चांदणं न्यारं>> गा लखलखत्या आभाळाचं चांदन गानं
या रगरगत्या उन्हानं चेतवलं भानं>> रनरनत्या
हे कोसळत्या पावसाची अनादी काळ>> घे कोसळत्या पावसाची अनादी तान
व्हई शुध्द निरामय सत्वाचा परिमळ>> मन शुद्ध निरमळ

Pages