मागच्याच रविवारला गर्लफ्रेंडला घेऊन आर-सिटी मॉल मध्ये गेलेलो. भटकंती करत असताना (खरे तर मी एकट्यानेच खाल्लेला जड पनीर पराठा पचवण्यासाठी) पायपीट करत होतो.
तर चालता चालता एका दुकानात बरीच "हिरवळ" बघून तिकडे वळालो. दुकान कसले आहे ते बघितलेच नाही. हिरवळ आहे म्हणजेच दुकान छानच असणार हे गृहीत होते (पण महागडेसुद्धा असणार हे मात्र लक्ष्यात आलेच नाही). तर "हिरवळी" वरून नजर फिरवत असताना मध्येच "पिवळे" काहीतरी दिसले. आणि ते बघून मग डोक्यात ट्यूब लाईटच्या पांढऱ्या प्रकाशा ऐवजी बल्बचा पिवळा प्रकाश पडला......
ते दुकान सोनाराचे होते. तिथे असलेल्या सगळ्या मुली सोन्याच्या वस्तू बघण्यात गुंग तर त्यांच्या ह्या गुंगीकडे बघण्यात माझ्यासारखे मुले दंग होती. त्या गुंगीच्या दंगेतील रंग लगेच बेरंग झाला जेव्हा एक हिरवळ "मला किनई ह्या तिन्हीही नेकलेस घेऊन देच" असे तिच्यासोबत असलेल्या मुलाला प्रेमाने ओरडली...
आणि लगोलगच, सोनाऱ्याच्या दुकानात स्वतःहून गर्लफ्रेंडला नेल्यावर व त्या मुलाच्या चेहऱ्यावरील उडालेले रंग बघून मला एक चलचित्र माझ्या डोळ्यासमोरून धावताना दिसले. ज्यात मी घरमालकास व कंपनीतल्या कँटीनवाल्यास "पुढच्या महिन्यात ह्या महिन्याचे हिशोब सेटल करेल ना... माझ्यावर विश्वास नाही का.... बस का मग..." असे विनवतोय. नेहमीचीच "व्हिस्की विथ चिकन लॉलीपॉप" ह्या ऑर्डर ऐवजी एखाद्या पुलाखालील टपरीवर अंडाभुर्जी विथ एक्स्ट्रा पाव खातोय ...एखाद्या संध्याकाळी पिझ्झा व कोक ऐवजी मिसळपाव आणि चहा घेतोय... अजूनही बरेच काही वाटलेले.
पण त्या चलचित्रातून मला तिने तिच्या "व्वाव्व" ह्या नेहमीच्याच पठडीतल्या किंचितश्या किंचाळीने जागविले.
गर्लफ्रेंड: "व्वाव्व्ह ! कित्ती मस्त आहे ना"
मी: "तुला आवडलेला दिसतोय. किती असेल रे ह्याची किंमत. तसा महागच वाटतोय, खर्राखुर्रा आहे ना पण."
गर्लफ्रेंड: "ह्या असल्या मोठया मॉलमध्ये सोनार कधी पासून निव्वळ चकाकणारे वस्तू ठेवायला लागले. काहीही विचार न करता कसा रे काहीही बोलत असतोस."
तसे तिचे हे माझ्याबद्दलचे नेहमीचेच वाक्य. मलाच कधी कधी वाटे की कदाचीत तीच विचार करून बोलत नसेल. पण असो. कदाचीत माझे हे विचार मी विचार करून केलेले नसेल. जाऊ देत इतका विचार का करायचा.
मी: "म्हणजे चांगलाच महाग असेल..."
गर्लफ्रेंड: "अर्थातच ! पण किती महाग आहे ते तरी बघू देत"
मी: "असू दे महाग. अगं, तुला आवडला असेल तर घे बिंधास्त"
गर्लफ्रेंड: "अरे बापरे!!! नको. फार नाही तर भयंकर महाग आहे तो"
मी: "बघू. तितकाही काही महाग नाहीये हां.......आणी तुझ्या आनंदापेक्षा महाग आहे काय! "
गर्लफ्रेंड: "अरे, पण नको. त्यापेक्षा दुसरा बघू"
मी: "घे ग. पैसे नको बघूस. आवडलं तर घ्यायचं. क्षमता आहे ना घेण्याची. मग कसला विचार करायचा इतका"
गर्लफ्रेंड: "हम्म. ठीकाय रे. तसे आहेत माझ्याकडे अगोदरचेच २-३ दागिने. त्यांनाच आपण पॉलिश करून चकचकीत बनवूया. नवीन ही दिसतील. आणि आता होऊ पाहणारा खर्च सुद्धा वाचेल...... हो हो आपण असेच करूया. चल आता इथून"
मी: "अगं, घेत असेल तर घे. तसेही क्रेडीट कार्ड वाले ई एम आय चा पर्याय देतातच की"
गर्लफ्रेंड: "नाही म्हटलं ना. चल. आता. इथून."
आता तिने प्रेमात ओरडा दिल्यानंतर निघण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता वा तिला वस्तू घेण्याचा आग्रह ही करता येत नव्हता. मुकाट्याने मी तिच्यासोबत बाहेर आलो.
तिथे मॉलच्या मधोमध मोठी उघडी जागा आहे जिथे नैसर्गिक हिरवळ अंथरलेली असते. (ही हिरवळ व वरील नमूद केलेली हिरवळ ही अत्यंत वेगवेगळी आहे). तर ह्या हिरवळीवर बर्याच जोडप्याप्रमाणे आम्ही दोघे बसलो. सोबत लार्ज स्कुप होताच. नवीन महागडी वस्तू विकत घेण्या ऐवजी असलेली वस्तू नव्याने बनवून वापरण्याची तिची ही कृती बघून मला तिचा अगदी सार्थ अभिमान वाटत होता. पण तिची आवड-निवड बघणे हे सुद्धा माझे आद्यकर्तव्य होते. मी त्यात चूक केली असे उगीचच मनोमन वाटून गेले. तिच्या ह्या आवडीसाठी मला मात्र त्रास व्हायला नको हा तिचा दृष्टोकोन सुद्धा कळत होता. मला काहीतरी माध्यम मार्ग शोधून तिचे आणि माझे सुद्धा समाधान करायचे होते.
मी: "तुला खरंच आवडला होता ना.. मग का नाही घेतलंस"
गर्लफ्रेंड: "ठीक आहे रे.. मला त्याची इतकीही गरज नव्हती."
मी: "इतकी काय अन तितकी काय. गरज असेल तर घ्यावं माणसानं"
गर्लफ्रेंड: "जेव्हा तो वा तसला दागिना घेऊन मिरवावं वाटेल तेव्हा नक्की हौसेने घेईल मी."
मी: "हौसेने ???"
गर्लफ्रेंड: "हो मग. तू घेऊन देशीलच ना ?"
मी: "नाही. बिलकुल नाही"
गर्लफ्रेंड: (जवळपास ओरडतच म्हणाली) "का ???"
मी: "कारण तुला गरज असेल तर मी कसेही तुला ते घऊन देईल पण जर तू निव्वळ हौस म्हणून घेत असेल तर मात्र त्या क्षणाला परिस्थितीनुरूप विचार करून घेईल"
गर्लफ्रेंड: "म्हणजे..."
मी : "जेव्हा कधीही कुठलीही वस्तू विकत घेतो तेव्हा एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारावा जे विकत घेऊ इच्छितो ते गरज आहे म्हणून घेत आहे की हौस म्हणून. जर प्रामाणिक उत्तर गरज असे असेल तर घेऊन टाकावे पण जर का उत्तर हौस असे येत असेल तर मात्र त्रिवार विचार करावा आणि मग ठरवावं"
गर्लफ्रेंड: "हौसेला मोल नसते रे"
मी : "तसे नाही ग बायडे. पण बघ. जेव्हा गरज असेल तेव्हाच जर पैसे खर्च होत असतील तर आपण त्यास "काटकसरपणा" म्हणतो. जेव्हा निव्वळ हौस आहे म्हणून विकत घेत असेल तर त्यास "उधळपट्टी" म्हणतो. पण म्हणजे हौस करूच नये असे नाही तर सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर हौस सुद्धा पूर्ण करता येत असेल तरच ती हौस पूर्ण करावी असे माझे मत आहे"
गर्लफ्रेंड: "म्हणजे मी उधळपट्टी करते असे म्हणायचे आहे का तुला"
मी: "असे नाही काही. पण गरजेच्या वस्तू ऐवजी हौसेच्या वस्तू कोणी विकत घेत असेल तर त्यास मी "मूर्ख" म्हणेल. आणि जो गरज असो वा हौस, दोन्हीही बाबतीत खर्चच करत नसेल तो मात्र "कंजूष"
गर्लफ्रेंड: "मग मी मूर्ख का.. जा तुझे माझ्यावर प्रेमाचं नाही. माझ्यावर तू जे खर्च करतो ते मग हौस आहे म्हणून की गरज आहे म्हणून. मला नाही बोलायचंय तुझ्याशी... "
असे बोलता बोलता उठून ती निघायला लागली. आता मला मात्र हे कळेना तिची समजूत कशी काढू की हनी, मी तुझ्यावर प्रेम करतो. गरज, हौस वा इतर काहीही मोहमायी बाबींपासून प्रेम हे नेहमी वरचढ असते. माझ्या प्रेमाला ह्या असल्या विशेषणात नको गुंतवूस.
आयला! ऋन्मेश अपरिचित कधी
आयला! ऋन्मेश अपरिचित कधी झाला?
@ अपरिचित, माझ्यावर तू जे
@ अपरिचित, माझ्यावर तू जे खर्च करतो ते मग हौस आहे म्हणून की गरज आहे म्हणून.>>> मलाही प्रश्न पडला होता कि आता ह्याचं उत्तर काय असेल?
पण तुम्हीच तो प्रश्न सोडवलात <<< मी तुझ्यावर प्रेम करतो. गरज, हौस वा इतर काहीही मोहमायी बाबींपासून प्रेम हे नेहमी वरचढ असते. माझ्या प्रेमाला ह्या असल्या विशेषणात नको गुंतवूस.>>> छान!!! एक चांगला विचार मांडलायत.
अय्या रुन्मेषचा ट्विन !
अय्या रुन्मेषचा ट्विन !
"मागच्याच रविवारला
"मागच्याच रविवारला गर्लफ्रेंडला घेऊन" -तुम्हारी शैली तो ऋन्मेष जैसी ही है,
"व्हिस्की विथ" - लेकीन बात तुम 'अपरिचीत' कर रहे हो!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ऋन्मेष ने शेवटचं संभाषण नसतं लिहीलं, तर ते त्याच्या मनातले विचार म्हणून टंकून, माबोकरांना प्रश्न विचारला असता, दूध का दूध और पानी का पानी करण्यासाठी.
थोडक्यात ऋन्मेष तो ऋन्मेष. हे म्हणजे सेहवाग-सचिन, शाहरुख खान - शाहीद कपूर सारखं साम्य आहे. (खरं तर दिलीप कुमार-शाहरुख खान म्हणणार होतो, पण ऋन्मेष च्या तुलनेत दुसर्या कुणाला शा.खा. कसं म्हणणार?)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अपरिचीत म्हटले की मल विक्रम
अपरिचीत म्हटले की मल विक्रम स्टारर अपरिचीत सिनेमाच आठवतो व त्यातील एक अजरामर डायलॉगः
गलती कोई बनियान का साइझ नही, स्मॉल, मिडियम, लार्ज.
मेरे लिये हर गलती एक्स्ट्रा लार्ज है!
काय हे...एक व्हर्बल दागिना
काय हे...एक व्हर्बल दागिना घेऊन द्यायचा होता तर इतका भाव का खायचा?
घ्यायच्या वेळी 'हा तुला सूट होत नाहीये, जरा काकू टाईप फॅशन आहे, इथलं कलेक्शनच बोअर आहे, आपण दुसरीकडे बघू' म्हणून दुसरीकडे परवडणार्या जागी घेऊन जायचे.
पुरुष मंडळी प्र्श्न डिप्लोमॅटिकली हाताळायला किती भांडणांनंतर शिकणार?
ऋ स्टाइल. गफे वैगेरे. पुरुष
ऋ स्टाइल. गफे वैगेरे.
पुरुष मंडळी प्र्श्न डिप्लोमॅटिकली हाताळायला किती भांडणांनंतर शिकणार????![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला वाटलं ऋ ने आपला आयडी
मला वाटलं ऋ ने आपला आयडी बदलला .. तर हा निघाला त्याचा लांबचा भाऊ!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुरुष मंडळी प्र्श्न डिप्लोमॅटिकली हाताळायला किती भांडणांनंतर शिकणार? >>
पुरुष मंडळी प्र्श्न
पुरुष मंडळी प्र्श्न डिप्लोमॅटिकली हाताळायला किती भांडणांनंतर शिकणार>>>. हा सिक्सर आहे अनु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
@चौकट राजा, सनव,फेरफटका,
@चौकट राजा, सनव,फेरफटका, सस्मित आणी चनसः अहो कोण आहे हा ऋ ?? माझ्या मागील स्फुट लेखणावर सुद्धा आलेली प्रथम कमेन्ट ह्याच आशयाची होती. लिन्क देत आहे:
बस आरक्षण => http://www.maayboli.com/node/60360
फेबु. २०१३ मध्ये मी पहिल्यान्दा लिहिण्याचा प्रयत्न केलेला. ही त्याची लिन्क
माझी पहिली डेट => http://www.maayboli.com/node/41492
मी ह्या ऋ चे काही लिखाण वाचलेत. छान लिहितात पण त्यान्ची शैली माझ्यसारखीच आहे असे मला तरी वाटत नाही. असो.
@सचिन काळे, धन्यवाद मित्रा.
@टण्या: त्यावरुनच तर मी सदर नाव माझ्या प्रोफायीलला दिलय
@अनु: "इथलं कलेक्शनच बोअर आहे" असे मी म्हणणे म्हणजे दहा शब्द जास्तीचे ऐकणे आहे. एक उदा. देतो "तुला कधीपासुन कलेक्शन कळायला लागलय ?"
त्यामुळे माझ्यासाठी डिप्लोमसी हीच होती की तिला त्यावेळी तरी काहीही बोलु नये. म्हणुन तर तिला बाहेर मोकळ्या वातावरणात नेऊन प्रेमाने बोललो.
तसेही "प्रेमात डिप्लोमसी" हे काही पट्ले नाही बुवा (इथे बुवा मराठी वाक्प्राचारातील शब्द म्हणुन लिहिलाय. आत्याला "बुवा" ह्या नावाने सुद्धा हाक मारली जाते, सबब, स्पष्टीकरण)
@ mi_anu, आपण दुसरीकडे बघू'
@ mi_anu, आपण दुसरीकडे बघू' म्हणून दुसरीकडे परवडणार्या जागी घेऊन जायचे.>>> कल्पना आवडली! नक्कीच वापरून बघेन.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी सद्या अजून एक कल्पना वापरतो. घ्यायचे मनात नसले तरी 'नाही' म्हणायचे नाही. सरळ 'हो घेऊ' म्हणून टाकायचे. ती वेळ तर टळते. नंतर घ्यायचा काळ, वेळ, प्रसंग काही केल्या विविध कारणाने येत नाही. पण 'नाही' म्हणण्याने होणारा तेव्हाचा रुसवा फुगवा तर टळतो.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
Sahaj 2 3 sonyache dagine
Sahaj 2 3 sonyache dagine gheun denara boyfriend?? Purushana badhaya marnyachi kiti haus, sorry garaj aste te disle![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गलती कोई बनियान का साइझ नही,
गलती कोई बनियान का साइझ नही, स्मॉल, मिडियम, लार्ज.
मेरे लिये हर गलती एक्स्ट्रा लार्ज है!
>> हे लै भारी. तसं सुद्धा मॉल मध्ये घेउ नका सोने. चांगल्या सराफाच्या दुकानात जा. ठाणे डोंबिवली मुलुंड कल्याण परिस रात सर्व ज्वेलर्स्ची मिळून एक काहीतरी स्कीम चालू आहे. व चांगल्या प्रतीचा दागिना सुलभ हप्त्यावर घ्यावा. बरे पडते. क्रेडिट कार्डावर तसेही महाग पडेल.
आज दुपारी ऑफिसमधून
आज दुपारी ऑफिसमधून तासाभरासाठी कल्टी मारून गर्लफ्रेंडला मॉलमध्ये नेऊन कॉफी आणि बरंच काही करताना आम्हाला दोघांनाही योगायोगाने एकाच वेळी उचक्या लागत होत्या ज्याला आम्ही काय हा योगायोग, अगदी अमरप्रेम, जनम जनम का नाता, दो जिस्म एक जान वगैरे उगाचच समजत होतो त्यामागचे कारण ईथे होते तर... लोकहो तुमची हौस होते पण आमच्या उचक्यांनी जीव गेला असता.
अपरीचित वॉव !! तुम्हालाही गर्लफ्रेंड आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बट आय एम शुअर, मेरी अंजली तुम्हारी अंजली से खूबसुरत है
@ अपरिचित - ऋन्मेऽऽष चा
@ अपरिचित - ऋन्मेऽऽष चा प्रतिसाद बघितला का वरचा? म्हणूनच लोक तुम्हाला तो समजले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय झालय, गर्लफ्रेंड बरोबर घालवलेल्या वेळाचा कोणी मायबोलीवर पंचनामा मांडला कि त्याला लोक ऋन्मेऽऽष चा धागा समजतात. असले धागे काढण्यात त्याची मोनोपली होती ती तुम्ही मोडून काढलीत कि हो! आणि बरं का, धाग्यात व प्रतिसादातही गरज नसताना शाहरुखशी संबंधित काहीतरी घुसडणे हा पण ऋन्मेऽऽष चा सिग्नेचर पॉइंट आहे.. बघा ना ते " मेरी अंजली और तुम्हारी अंजली..." वगैरे.
तर आता तुम्हाला त्याचे सगळे धागे व त्याचे "मौलिक विचार" ह्याचा फार बारकाईनी अभ्यास करून स्वतःची वेगळी स्स्टाईल तयार करावी लागणार आहे नाहीतर आयडेंटीटी क्रायसिस होईल हे लक्षात घ्या![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चौकट राजा वॉव, निव्वळ
चौकट राजा वॉव, निव्वळ अंजलीवरून तुम्ही राहुल राज आर्यनला ओळखलेत. हीच शाहरूखची आजवरची बॉलीवूडमधली आणि ऋन्मेषची मायबोलीवरची कमाई आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेश अपरिचित कधी
ऋन्मेश अपरिचित कधी झाला?>>>>वाचता वाचता मला पण हेच वाटले होते
अपरिचित <<< मी: "घे ग. पैसे
अपरिचित <<< मी: "घे ग. पैसे नको बघूस. आवडलं तर घ्यायचं. क्षमता आहे ना घेण्याची. मग कसला विचार करायचा इतका"
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
)
गर्लफ्रेंड: "हम्म. ठीकाय रे. तसे आहेत माझ्याकडे अगोदरचेच २-३ दागिने. त्यांनाच आपण पॉलिश करून चकचकीत बनवूया. नवीन ही दिसतील. आणि आता होऊ पाहणारा खर्च सुद्धा वाचेल...... हो हो आपण असेच करूया. चल आता इथून" >>> कुठे मिळाली हो तुम्हाला अशी ग्फ्रे
मला पण आधी रून्म्याचाच डु आयडी वाटला ( काय गंंमत आहे नाही
एक काळ होता जेव्हा लोकं
एक काळ होता जेव्हा लोकं माझ्यात कोणाचा तरी ड्यू आय डी शोधायचे...
आज एक काळ आलाय जेव्हा कोणाला तरी माझा ड्यूआय म्हणून संबोधले जातेय..
वकत बडी चीज है बाबू ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(हा डायलॉग शाहरूखपटातील नाही याची अभ्यासकांनी नोंद घेणे)
ऋन्म्या सईचा येवढा हिट्ट
ऋन्म्या सईचा येवढा हिट्ट सिनेमा आलाय ' जाऊ द्या ना बाळासाहेब' , त्यावर धागा पण आलाय पण तुझी सईवर एकही पोस्ट नाही , शेम ऑन यु.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
वरिल पोस्ट्स वाचुन मला "फिर
वरिल पोस्ट्स वाचुन मला "फिर भी दिल है हिन्दुस्थानी" ह्य चित्रपटातील परेश रावळ ह्यान्चा एक डायलॉग आठवला , त्याच धर्तीवर मला सुद्धा तुम्हा सर्वान्ना ओरडुन सान्गावे वाटत आहे की
"मै ऋन्मेऽऽष नही हु!"
अरे, काय एकट्या ऋन्मेऽऽष लाच गफे असु शकते काय ? x-(
@चौकट राजा: "गफे व तिच्यासोबत घालवलेला वेळ" ह्यावर लिहिणे हे केवळ ऋ ह्य व्यक्तीचीच मोनोपोली असु शकेल. शाखा त्यान्चा आवडता नट असेल ही. पण ह्याच मुद्दयावर लिहिले म्हणजे मी "ऋन्मेऽऽष" होत नाही. पण असो, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आयडेंटीटी क्रायसिस होऊ शकेल.
ह्यापूढे मला ह्याची काळजी घ्यावी लागेल.
सुचनेबद्दल धन्यवाद.
@सोनालिसा: "मै ऋन्मेऽऽष नही हु!"
@श्री: गफे कुठे मिळाली ???? अहो, त्यासाठी मला बरेच काही लिहावे लागेल. पुढे केव्हातरी लिहिले तर तुम्हाला नक्कीच टॅग करेल
आणी
@ऋन्मेऽऽष: मित्रा, बघतोयस ना. मी तुला ओळखत नाही वा तु मला ओळखत नाही. (सर्वाना आपण एकच वाटत आहे, म्हणुन मित्र सम्बोधुन एकेरी बोलतोय.)
तुझे लिखाण वाचले. आवडले. पण मी लिहिलेल्या लिखाणात गफे बद्दल लिहिले म्हणुन ही शैली केवळ आणी केवळ तुझीच आहे असे वाटुन खर्रच आयडेंटीटी क्रायसिस होतोय.
असो, नक्की काय बोलावे हे काही कळेना पण तु शाखा चा मोठा चाहता आहे हे समजल्यावर इतकेच म्हणेल की "जो मज्जा अपनी पहचान बनाने मैं है वो किसी और की परछाई बनने मैं नहीं है"
जो मज्जा अपनी पहचान बनाने मैं
जो मज्जा अपनी पहचान बनाने मैं है वो किसी और की परछाई बनने मैं नहीं है"
>>>>
वाह!
या शाहरूखने आजवर एवढे काही म्हटलेय की त्यांना एकत्र करून बॉलीवूडचा धर्मग्रंथ तयार होईल.
ईथे कोणीही अपरीचित नव आयडी आला आणि ईतर धाग्यांवर फारसा न रेंगाळता धागा काढू लागला तर तो कोणाच कोण तर नाही न हे शोधण्याची प्रथा आहे. मी स्वताही काही काळापर्यंत त्याचा शिकार होतो..मग कुठे जाऊन स्वताची ओळख बनली.. आपण ईथे काही काळ रमलात तर आपलीही नक्कीच बनेल. शुभेच्छा
असो, तुमच्या धाग्यावरून मला एक धागा सुचलाय किंवा काही दिवस डोक्यात रेंगाळणारा विषय उसळी घेत वर आलाय. त्याबद्दल धन्यवाद.
बाकी आपण मला मित्रा बोलू शकता. अरेतुरे जारे कारे सुद्धा करू शकता. मी वयाने माझ्या गर्लफ्रेंडपेक्षाही लहान आहे.
मग कुठे जाऊन स्वताची ओळख
मग कुठे जाऊन स्वताची ओळख बनली.. आपण ईथे काही काळ रमलात तर आपलीही नक्कीच बनेल. >>> हो , ऋन्म्या आमचा लाडका डु आयडी बनला आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असो, तुमच्या धाग्यावरून मला
असो, तुमच्या धाग्यावरून मला एक धागा सुचलाय >>>>> नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईए
मी एक लिखाण हाती घेतलय. आणी
मी एक लिखाण हाती घेतलय. आणी अर्थातच ते लिखाण "अपरिचीत" ह्या नावानेच प्रकाशित होइल.
"तुमच्या धाग्यावरून मला एक धागा सुचलाय" हे वाक्य ऋन्मेऽऽष चे आहे आणी तो बहुधा तसे करेलही. त्यामुळे मी जे लिहिणार आहे ते कोणाचा तरी ड्यु आय डी म्हणुन नसनार तर माझेच असणार आहे.
अरे आधीच एक रुन्मेष जड झाला
अरे आधीच एक रुन्मेष जड झाला होता ते काय पुरेसे वाटले नाही का म्हणून आता त्याला टक्कर देणारा आलाय. वर आणि दोघेही नवीन धागा काढायची धमकी देतायत
उठाले रे बाबा उठाले
मेरे को नई रे
गफे हा शब्द जरी वाचला तरी
गफे हा शब्द जरी वाचला तरी रुन्मेशची आठवन येते
'हा तुला सूट होत नाहीये, जरा
'हा तुला सूट होत नाहीये, जरा काकू टाईप फॅशन आहे, इथलं कलेक्शनच बोअर आहे, आपण दुसरीकडे बघू' म्हणून दुसरीकडे परवडणार्या जागी घेऊन जायचे.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पुरुष मंडळी प्र्श्न डिप्लोमॅटिकली हाताळायला किती भांडणांनंतर शिकणार?>>>>
मी कधी कधी "अगं हे एखाद्या जाड, फॅटी मुलीला चांगलं दिसेल, त्याचं डिजाईनच तसं आहे" असं सांगून लगेच तत्परतेने दुसरा एखादा स्वस्त पीस काढून देतो ......
बायकोला अजून लक्षात आलेलं नाही की असू दे, स्वस्त तर स्वस्त, घेऊन देतोय ते का सोडा असा तिचा अटिट्युड आहे ते माहित नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुन्मेश आणि अपरिचित ह्यांचे
रुन्मेश आणि अपरिचित ह्यांचे संवाद म्हणजे : आपुलाची वावाद आपुल्याशी!