पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचे म्हणने असे आहे की, तुम्ही लढा (इथे भक्त), आम्ही कपडे संभाळतो.(म्हणजे सर्व तथाकथित पुरोगामी. विचारवंत व निधर्मिवादी)

ज्यांना आपण निवडून दिलेल आहे त्यांच्या निर्णयाच्या पाठी उभं राहणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे . तिथे कोणाला युद्ध हवाय आणि कोणाला नकोय याचा संबंधच येत नाही

बर्र्र !

यापूर्वीच्या युद्धात / राज्यात देशप्रेम नव्हते की कायसे प्रकांड पंडिती स्टेटमेंट इथेच कुणीतरी केले आहे.

जर पूर्वीच्या युद्धांबद्दल आज काही लोकाना प्रेम वाटत नसेल तर आजच्या या घरातल्या घरात खेळलेल्या युद्धाचंही ( ! ) कौतुक काही लोकाना नसण्णं हेही स्वाभाविकच !

<<जर पूर्वीच्या युद्धांबद्दल आज काही लोकाना प्रेम वाटत नसेल तर आजच्या या घरातल्या घरात खेळलेल्या युद्धाचंही ( ! ) कौतुक काही लोकाना नसण्णं हेही स्वाभाविकच !>>

---- सहमत, प्रतिसाद आवडला...

सर्जिकल स्ट्राईक केलेत किव्वा युद्ध केले तर बहुतान्श सर्व भारतिय सरकारच्या सोबत आहेतच... सुरवातीला झाडुन सर्व विरोधी पक्षान्नी पण पाठिम्बा दिलेला होता. सर्व थरातुन पाठिम्बा मिळत असताना "इतिहासात अशा प्रकारचा प्रतिसाद पहिल्यान्दाच दिला गेला आहे" अशी खोटी हाकाटी पिटवायची, राजकारण आणायचे... मग या जबरदस्तीने घुसवलेल्या राजकारणाला उत्तर म्हणुन निरुपम, केजरीवालान्नी पुरावे मागण्याचे राजकारण करायचे.... हे तर होणारच आहे आणि याचा दोष निरुपम किव्वा केजरीवालान्ना नाही देता येणार. इतरान्च्या कामाला कमी लेखण्याचा केलेला खोडसाळपणा, उताविळपणा हा अन्गाशी येणारच.

खोटी हाकाटी पिटवायची, राजकारण आणायचे...
हे वाईट्ट नि अनावश्यक आहे.
पूर्वी जे लढले ते आत्ताइतकेच देशप्रेमी होते. त्यांच्याजवळ अद्ययावत शस्त्र सामुग्री नसल्याने त्यांचा तितकासा प्रभाव पडला नाही.
शिवाय १९४७ साली केलेले करार अपूर्ण नि त्यात बर्‍याच बारीक सारीक गोष्टी दुरलक्षिल्या गेल्याने आता काही करताना आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विचार करावा लागतो.
पाकीस्तानी राजकारण्यांनी हे वेळोवेळी ओळखून असे हल्ले केले व भारताला पेचात पाडले आहे.
आपले राजकारणी १९४७ ते आत्तापर्यंत झोपलेले आहेत. अजूनहि वाटाघाटी करून करार पक्के करावेत. म्हणजे सारखी युद्ध करायची वेळ येणार नाही. मग जरा देशातील गरीबी, अज्ञान, विषमता यांच्याकडे लक्ष देता येईल.

'आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला' हा संदेश जगभरात पोचवणे महत्वाचे झालेले होते. त्याप्रमाणे तो पोचवला गेला. एकेकाळच्या प्रमुख विरोधक श्रीमती सोनिया गांधी ह्यांनीही ह्या कृतीचे समर्थन केलेले आहे व कृती जगभरात पोचवण्याबद्दल हरकत घेतलेली दिसत नाही.

मात्र संजय निरूपम, चिदंबरम आणि केजरीवाल हे बिथरल्यासारखे राजकारण करू लागले आहेत. काँग्रेस पक्षाने दुर्मीळ सूज्ञपणा दाखवत संजय निरूपम ह्यांना फटकारले आहे. असेही म्हंटले आहे की निरूपम ह्यांचे म्हणणे ही काँग्रेसची अधिकृत भूमिका नव्हे.

केजरीवालांना जनताच कधीतरी फटकारेल.

यहाॅं इतना सन्नाटा क्यु है भाई? सगळे पुरावे, कुशंका निरसन झाल्याने अविवेकवाद्यांचं "ओम पुरीफिकेशन" झालंय कि काय?.. Happy

{ओम पुरीफिकेशन : दारु किंवा द्वेषाच्या अंमलाखाली काहितरी स्फोटक, बेजबाबदार विधान करणे आणि सत्य परिस्थिती समोर आल्यावर जाहिर माफि मागणे किंवा मिठाची गुळणी घेउन गप्प बसणे... }

केजरीवालांना जनताच कधीतरी फटकारेल.

जनता की ईतनी जुर्ररत के केजरीवाल को फटकार लगादे ?

वो तो केजरीवाल जी है जो वो खुद ही डीसाईड करेंगे के कब उनको फटकार लगनी चाहीये !!

सर्जिकल स्ट्राइकबाबत पुरावे सादर करावेत की करु नयेत, याबाबत देशभरात सध्या चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि तज्ञ पुरावे देण्याविरुद्ध आहेत.

http://m.maharashtratimes.com/nation/pm-modi-against-hysteria-over-surgi...

दारु किंवा द्वेषाच्या अंमलाखाली काहितरी स्फोटक, बेजबाबदार विधान करणे आणि सत्य परिस्थिती समोर आल्यावर जाहिर माफि मागणे किंवा मिठाची गुळणी घेउन गप्प बसणे.

याला चुनावी जुमला असेही म्हणतात .

<<सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल >>
AS THE Centre works on a roadmap after the surgical strikes, the BJP government in Rajasthan is adding a spiritual line of defence.

On instructions from Chief Minister Vasundhara Raje, the Rajasthan Sanskrit Academy will organise a grand ‘Rashtra Raksha Yagna’ at Shri Mateshwari Tanot Rai temple near the Indo-Pak border on Thursday, to “protect troops from the enemy”. It will be conducted by 21 “patriotic Brahmins”.

Raje will be attending the yagna at the temple located in Jaisalmer — the last along the India-Pakistan frontier here — and is expected to be accompanied by Union Home Minister Rajnath Singh.

A statement issued by the Chief Minister’s Office said Raje will perform the special pooja at the temple in order to boost the morale of troops stationed along the border. “It will also protect the people living along the border, since the longest part of India’s border with Pakistan (1,040 km) falls in Rajasthan.”

Confirming the “Mahayagna”, Academy Director Rajendra Tiwari told The Indian Express on the way to the temple, “The Chief Minister will participate and, as of now, the Union Home Minister is also scheduled to attend.”

प्रचंड मूर्खपणा आहे यज्ञ करण्याचा.हास्यास्पद पण वाटत नाही,उलट उबग येतो अशा बातम्यांचा.

सामान्यान्चे (सिमेवर रहाणार्‍या लोकान्चे) रक्षण करण्यासाठी यज्ञ करण्याची कल्पना शुद्ध मुर्खपणा आहे. मुख्यमन्त्री आणि केन्द्रात गृहमन्त्री पदावर बसलेल्या व्यक्तीन्ना असले प्रकार करणे शोभत नाही... चुकीचा पायन्डा पाडला जातो आहे.

<< It will be conducted by 21 “patriotic Brahmins”.>>
------ जेव्हढे नुकसान पाकपासुन झाले नसेल त्यापेक्षा जास्त नुकसान या व असल्या भम्पक पणा मुळे होते आहे. Angry

एव्हढ्या जलद गतीने आपण मागे जात आहोत हे दर्शवणारी बातमी खोटी असायला हवी (असे मनोमन वाटते) किव्वा त्या बातमीचे प्रेझेन्टेशन चुकले असेल (पत्रकाराने खोडसाळपणा केला का?). बातमी खरी असेल तर खुप वाईट आहे.

<<<सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल >>

हा संबंध.

http://www.ndtv.com/video/news/the-buck-stops-here/operations-in-2013-an...

चिन्मय व इतर,
प्रवीण स्वामी तसेच हिंदू/फ्रंटलाइनचे सर्व रिपोर्टिंग १००% खरे आहे असे मानून (मी फॅक्चुअली खरे असे म्हणत नसून अन-बायस्ड या अर्थाने म्हणत आहे), तुम्ही क्रॉस बॉर्डर स्कर्मिशेस, लोकल ऑप्स आणि केंद्र सरकार, लष्कर, इन्टेलिजन्स यांच्या नियोजनाने केलेला हल्ला जो डॉक्ट्रिनल चेन्ज म्हणुन 'अधोरेखीत' केला जात आहे यात का गल्लत केली जात आहे?

युरो -
बातमीचा बाफशी किव्वा सर्जिकल स्ट्राईक बरोबर काय सम्बन्ध ? योग्य प्रश्न आहे. "सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत... " अशी वर धागाकर्याने विनन्ती केली आहे. पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी यज्ञ आदी प्रकार अत्यन्त मुर्खपणाचे (खुप सौम्य शब्द वापरतो आहे) लक्षण आहे. अत्यन्त चुकीचे आहे आणि त्याने हाती काहीच येणार नाही.

यज्ञ प्रकारामुळे पाकचे हल्ले कमी होणार नाहीत, सिमेवर रहाणार्‍या जनतेचे किव्वा जवानान्चे रक्षण होणार नाही. मुख्यमन्त्री, गृहमन्त्री या अत्यन्त महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीन्नी त्यान्च्याकडे असलेला मौल्यवान वेळ योग्य प्रकारे वापरावा असे मला वाटते. निव्वळ यज्ञ असल्या भोन्दू पणात स्वतः ला किव्वा जनतेला अडकवू नये.

<<ओके भरत आता हे मॅटर राजस्थान सरकार बघणार आहे का? ठीक आहे.>>
----- मॅटर राजस्थान बघणार नाही. पण एका महत्वाच्या राज्याचे (ज्या राज्याची सिमा पाकसोबत सर्वात जास्त आहे - १०५० किमी) मुख्यम्नत्री, केन्द्रात गृहमन्त्री पदावर विराजमान असलेली व्यक्ती भाग घेते आहे... मला तर विजेचा झटका बसलेला आहे.

भारताने इतिहासात प्रथमच अशी कारवाई केली अशी गल्लत केली जात आहे, म्हणून.
यापूर्वीच्या कारवायांत सरकारची इन्व्हॉल्व्हमेंट किती होती, त्यांना त्याची गरज वाटत होती की नाही का हा भाग वेगळा. पण यापूर्वी आर्मीलाच स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव नव्हती, असं खुद्द संरक्षणमंत्री म्हणतात.

हल्ल्यासंदर्भात सरकारी घोषणा होणं , त्यात सरकारचा सहभाग असणं याबाबत कोणी आक्षेप घेतलेला दिसत नाही.

आता या सर्जिकल स्ट्राइकनंतर पठाणकोट, उरी अशा आर्मी, एअरफोर्स च्या बेसमध्ये अतिरेकी कसे घुसू शकतात, सुरक्षा यंत्रणांत कोणत्या त्रुटी राहिल्यात हा प्रश्न विसरला जाऊ नये. पठाणकोटमध्ये नशिबाने भारताची साथ दिल्याने , पूर्वसूचना मिळून फार मोठे नुकसान झाले नाही. तरीही त्यानंतर उरी घडले व १८ सैनिक प्राणांस मुकले.

उदय यज्ञ करणे काय आणि मेण्बत्या लावुन मोर्चे कढणे काय दोनीही गोष्टी सारख्याच आहेत.

Pages