पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा सविस्तर लिहा ना प्लीज. असे आधीच व्हायला हवे होते. जे तळ उध्वस्त झाले ते ताब्यात घेऊन तिथे आपल्या छावण्या उभ्या करायला हव्यात.

लिंक?

जय हिंद!

दणदणीत कारवाई! भारतीय सेना व मोदी सरकारच्या ऐतिहासिक व आक्रमक कामगिरीचे हार्दिक अभिनंदन! एक भारतीय म्हणून अभिमान वाढावा अशी ही घटना आहे.

जय हिंद!

हे खरे तर खुप आधीच व्हायला पाहिजे होते. पण असो देर आए दुरस्त आए. पाकिस्तानला यातून एक संदेश तर गेला आहे की आता भारत पाकच्या कारवायांकडे कानाडोळा करणार नाही. आता जश्यास तसे उत्तर मिळणार.

भारतीय लष्कराचे आणि सरकारचे अभिनंदन!!!

सविस्तर वृत्त लवकरच..

म्हणजे इतक्यात हुरळून जाण्यात अर्थ नाही. वेट अँड वॉच.
पण बातमीने बरे वाटले.

जय हिंद!

हा निर्णय आणि कारवाई केल्याबद्दल भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदी यांचं (करारा जवाब दिल्याबद्दल) अभिनंदन.
पाकिस्तान काय उत्तर देतो यावर आता लक्ष आहे.

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन.

<<

हिंदूस्थानी लष्काराचे हार्दिक अभिनंदन व भारतातील ढोंगी सेक्युलरांना फाट्यावर मारत, इतिहासात पहिल्यांदाच इतके धाडसी पाऊल उचलल्या बद्दल आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे देखिल अभिनंदन.

वन्दे मातरम!

साप विखारी देशजननीचा ये घेउ चावा |
अवचित गाठुनि ठकवुनि भुलवुनि कसाही ठेचावा ||

~ स्वा.वीर सावरकर

दणदणीत कारवाई! भारतीय सेना व मोदी सरकारच्या ऐतिहासिक व आक्रमक कामगिरीचे हार्दिक अभिनंदन! एक भारतीय म्हणून अभिमान वाढावा अशी ही घटना आहे.

त्याच्या बॅक ग्राऊंडला भारत सरकारने बरीच दिशाभुल करणारी स्टेटमेंटस मिडियात दिलेली होती,

जसे की जागतीक स्तरावर पाकिस्तानला एकट पाडु !! ईंडस नदी, व बाकीच्या नद्यांच पाकिस्तानात जाणार पाणीच अडवु वैगेरे !

त्यामुळे पाकिस्तान व हे अतिरेकी काही प्रमाणात गाफिल राहीले, अति आत्मविश्वासात राहीले !

बळीचां आकडा फार मोठा असणार आहे. चार कँपवर हल्ला केलेला आहे. अतिरेक्यासकट त्यांचे हँडलर स्पाँसरना पण उडवलेल आहे.

Operation Surgical Strike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा हा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला होता. >>>>>>हीच महत्वाची गोष्ट आहे. सारे मतभेद विसरुन सर्व पक्षांनी या वेळी एक व्हायला हवेच.

या कारवाईचे भारतीय लष्कारांने व्हिडीओ शुटींग देखिल केलेय, असे वाचले. भारतीय लष्कारांने ही चित्रफित व्हायरल करायला हवी.

व्हायरल कशाला ? अशा कारवायांमधे गुप्तता हवीचं ना.

Operation Surgical Strike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा हा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला होता. >>>>>>हीच महत्वाची गोष्ट आहे. सारे मतभेद विसरुन सर्व पक्षांनी या वेळी एक व्हायला हवेच.>> +१०१

लगेल पाकीस्तानने इन्कार करायल पण सुरुवात केलीये तर प्रसाद म्हणतात त्याप्रमाणे ती चित्रफितच मारा त्यांच्या तोंडावर. ( अर्थात त्याचा जागतीक फोरमला आपल्याविरुध्द काही उपयोग होणार नसेल तरच) Happy

भारत सरकार व लष्कर - सर्वांचे अभिनंदन!!!!!!!

आता हे ईथल्या काही लोकाम्ना पचायला जड जात आहे कारण अचानक सरकार बदलाच नंतर भारतीय सैन्य निडर होऊन पाकिस्तानात घुसुन अतिरेक्यांवर कारवाई करु लागलेल आहे.

व्हायरल कशाला ? अशा कारवायांमधे गुप्तता हवीचं ना.

<<

कारवाई करायच्या आधी गुप्तता पाळायला हवी ना? कारवाई केल्यावर गुप्तता पाळून काय उपयोग ! तसेही ह्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना हिंदूस्थानी लष्कारांने अधिकृतरित्या दिली आहे मग ती चित्रफित व्हायरल करायला काय हरकत आहे?

चला, आता भारताच्या मागे लागलेला दहशतवाद्यांचा ससेमिरा कायमचा मिटला. Wink
उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया |
जो कोणी ह्या बातमीला "सरदारजींची पतंगबाजी" म्हणेल त्याला देशद्रोही समजून Uhoh सरळ विनाचोकशी फासावर लटकवलं पाहिजे. अरे, सरदारजी उगाच खोटं कशाला बोलतील ? Biggrin
http://supersamir.blogspot.in

म्हणजे डिटेल्स कशाला सगळ्यांना दिसले पाहीजेत. पुढील कारवायांच्या वेळी शत्रू सावध नाही का होणार ? मला नेहमी २६\११ आठवतं अशा वेळी, मीडीयाचा अति उत्साह........

ला, आता भारताच्या मागे लागलेला दहशतवाद्यांचा ससेमिरा कायमचा मिटला.>>>>>@ समीर देसाई, तुम्ही मोदी, भारत सरकार, भाजपा वगैरे सोडा हो, पण किमान सैन्याचा व सैनिकांचा तरी अपमान करु नका.

Pages