पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>युद्धाची इतकी विकृत आतूरता भक्तांतच दिसतेय. युद्धामुळे देशाचे होणारे नुकसान, सैनिकांच्या प्राणाचे मोल हे सेल्फ प्रोक्लेम्ड राष्ट्रभक्तांना कळू नये याचे आशचर्य वाटते.<<<<

हे सगळे देशाची काळजी घेणार्‍या तज्ञांनाही समजत नाही असे म्हणायचे आहे का?

इतर स्ट्रेटेजिक उपायही आहेत. मोदी सरकार किंवा कोणतेही सरकार ते नक्कीच आधी विचारात घेईल>> हे वाचलं नाही का?

>>>>हायला ! म्हणजे आमचे आजोबे पणजोबे देशद्रोहीच होते म्हणायचे ! बिच्चारे ! राष्ट्रभावनेशिवायच जगत होते !

२०१४ मे नंतर अचानक देशभावना जागी झाली ! आमची पिढी किती भाग्यवान !

आणि ते संसद हल्ला ... ते नेम्के कोणाच्या कारकिर्दीत घडले होते ?<<<<

अहिंसा, सत्याग्रह, उपोषणे, पैसे देणे, ह्यापेक्षा वेगळा, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आता! हे वेगळे आहे. एका गालावर मारली की दुसरा गाल पुढे न करता दुसर्‍याच्या दोन्ही गालावर मारणे असा उपाय योजला जात आहे.

Happy

>>>> नताशा | 3 October, 2016 - 23:40 नवीन

इतर स्ट्रेटेजिक उपायही आहेत. मोदी सरकार किंवा कोणतेही सरकार ते नक्कीच आधी विचारात घेईल>> हे वाचलं नाही का?
<<<

वाचलं! उत्तर प्रश्नातच आहे नताशा. मोदी सरकारने ते उपाय विचारात घेतले नाहीत हे गृहीतक ह्या प्रश्नाच्या मुळाशी आहे.

Happy

त्यानंतर हा उपाय योजला गेलेला आहे असे 'दिसते'.

मी सर्जिकल स्ट्राइकविषयी बोलतच नाहीये. तो त्याच्या जागी बरोबरच असेल असं मी धरुन चालते. (मला त्यातले फारसे कळत नाही. त्यामुळे ठामपणे सांगता येत नाही). मी भक्तांच्या "पाकिस्तानाचे तुकडे करु", "लाहोरवर हल्ला करु" अशा टाइपच्या युद्धखोरीविषयी बोलतेय. सरकार म्हणजे एक माणूस नव्हे की त्याच्या मनाप्रमाणे काहीही घडेल. त्यामुळे मला सरकारच्या निर्णयांची फारशी चिंता नाही.

>>>> नताशा | 4 October, 2016 - 00:05 नवीन <<<<

ओके. सहमत आहे. Happy

अहिंसा, सत्याग्रह, उपोषणे, पैसे देणे, ह्यापेक्षा वेगळा, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आता!

काय सांगता ! संसदेवर हल्ला भाजपीय काळातच झाला ना ? आणि ते विमानाने अतिरेकी सोडुन आल्ते ना ?

अहिंसा, सत्याग्रह, उपोषणे, पैसे देणे, ह्यापेक्षा वेगळा, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आता! हे वेगळे आहे. एका गालावर मारली की दुसरा गाल पुढे न करता दुसर्‍याच्या दोन्ही गालावर मारणे असा उपाय योजला जात आहे. >> अब आया उंट पहाड के नीचे Happy

याआधीच्या सर्जिकल स्ट्राइक्समधे आपले जवान तिकडं जाउन आपलेच गाल पुढं करायचे असं जर तुमचं म्हणणं असेल तर तो आपल्या जवानांचा आणि सैन्याचा अपमान आहे.. तेव्हा तुमच्या आधीच्या देशाभिमानाच्या गप्पांना काही अर्थ रहात नाही..

खिक्क

सिंबा

सेना आणि सरकार यांच्या निवेदनात कोणत्ता मुलभूत फ़रक आढळतो आहे तुम्हाला.

डी जी एम ओ ने एक पत्रकार परिषदेशिवाय कसलेच निवेदन दिलेले नाही. इतकेच काय पॅरा सीडीओ चे कोणती युनिट वापरली हे सुद्धा सांगितलेल नाही. पाकिस्तानच्या एकुण येत्या दिवसातल्या प्रतिक्रीया बघुन लागला तर कारवाईचे आपल्या कडे असलेले चित्रण पुरावा म्हणुन दाखवु असे म्हतलेले आहे.

बाकी येणार्‍या बातम्या हे नीवळ्ळ माध्यमंनी किंवा त्यावर भाष्य करणार्‍या तज्ञांनी बांधलेले अंदाज आहेत.तज्ञ हे भारतिय लष्करातिल निवृत्त अधिकारी असले तरी त्यात तफ़ावत आढळु शकते.

ओम पुरी यान्नी केलेले वक्तव्य म टा मधे वाचले. पाक कलाकारान्ना काम करायची परवानगी सरकारने दिलेली आहे, व्हिसा सरकारने दिलेला आहे. त्यामुळे ते कायद्याच्या चौकटीत राहुन काम करत आहेत. येथे पर्यन्त ठिक आहे. मान्य आहे. काही हरकत नाही.

पण सैन्याबद्दल बोलणे खुप चुकीचे वाटले. "शहीद होणार्‍या जवानान्ना आम्ही सैन्यात जायला सान्गितले होते का ? त्यान्ना कुणी जबरदस्ती केली होती का?" म. टा मधे असे विधान केल्याचे वाचले, हे जर खरे असेल तर पुरी यान्ची निर्लज्जपणाची हद्द झाली. निषेधार्ह वक्तव्य.

Oops! There was a problem!
Sorry, but we can't find what you were looking for right now

<<

बेफिजी,
बहुतेक युगपुरुषानी परत एकदा स्वत:च्या वक्तव्यावरुन घुमजाव केलेले दिसतेय कारण वरची बातमी एनडीटिव्हीने उडवलेली दिसतेय.

काँग्रेसचे संजय निरूपम ह्यांनीही 'सर्जिकल स्ट्राईक' खोटा असल्याचे विधान केलेले आहे.

अब आया उंट पहाड के नीचे
<<

२ तारखेची आरती राहून गेली होती ना! ती इथे नको करायला? मग धाग्याशी संबंध असो नसो. Lol

तो केजरिवाल, निरुपम व ढोंगी पुरोगाम्यांनी केलेल्या आरोपांकडे सरकारने सरळ दुर्लक्ष करावे, हे उपटसुंभ म्हणतायत म्हणून ह्या 'सर्जिकल स्ट्राईक' चे पुरावे सरकारने मुळीच देऊ नयेत.

लातोंके भूत बातोंसे नही मानते!

इन्हे लातोंसेही मारना चाहिये!

मैने एक छक्का क्रिकेटके फिल्ड पर मारा था तबसे इनकी हालत बुरी होगयी है!

अब एक छक्का जंगके फिल्डपर भी मारना चाहिये

बडी डरपोक कौम है ये

- इति मियाँदाद

प्रसाद, त्या घुमजावची बातमी ndtv वरच, आशुतोष यांचा खुलासा.
http://www.ndtv.com/opinion/why-kejriwal-wants-pm-modi-to-expose-paks-li...

बहुतेक पाकीस्तनने उचलून धरल्यावर घुमजाव झाले असावे.

ओमपुरीचे म्हणणे मलाही पटते.. वर्षानुवर्षे राजे महाराजे, सरदार इ नी आपण जणू देव देश धर्मासाठी लढतो, आणि इतर जनता अगदी आमच्याच जिवावर जगत असते असे वातावरण करुन ठेवलेले आहे.

सैन्यातील सैनिक त्याचे काम त्याचे प्रोफेशन म्हणून करतो. सैन्याप्रमाणेच गटार साफ करणारे, पोलिस, आग बॉयलर इ जवळ काम करणारे, केमिकलशी संबंधित व्यवसाय इ करतानाही लोक मरतात .. आणि तेही देशासाठी काम करत असतानाच मेलेले असतात . पण त्यांना कधी देशासाठी मेला वगैरे म्हटले जात नाही. सैनिकांपेक्षा इतर अनेक प्रोफेशनात मरणार्‍यांची संख्या कितीतरी पटीनी जास्त आहे आणि हेही सर्व लोक देशासाठीच काम करताना मेलेले असतात, पण त्यांच्या मृत्यूचे आकडे कधी हायलाइट केले जात नाहीत , त्यांच्या मृत्यूला कधी ग्लॅमर मिळत नाही.

आता एकंदर वाचनातुन असं कळतय... इथले काहि लोकं म्हणतिल थोड्या दिवसांनी कि पाकिस्तान म्हणतय ते बरोबर आहे सगळं किंवा सगळ्या बाबतीत पाकिस्तानच बरोबर आहे...

आता एकंदर वाचनातुन असं कळतय... इथले काहि लोकं म्हणतिल थोड्या दिवसांनी कि पाकिस्तान म्हणतय ते बरोबर आहे सगळं किंवा सगळ्या बाबतीत पाकिस्तानच बरोबर आहे... >>>+++११११
सहमत भावना..
पाकड्यां विरुद्ध बोलायला पण नको मग ......

ओमपुरीचे म्हणणे मलाही पटते.>>>>> तरी म्हटले की पुरोगामी साक्ष काढायला कसे आले नाहीत.

सैन्याप्रमाणेच गटार साफ करणारे, पोलिस, आग बॉयलर इ जवळ काम करणारे, केमिकलशी संबंधित व्यवसाय इ करतानाही लोक मरतात >>>>> पोलिसांना शहिदांचा दर्जा दिला जातो. अग्निशमन दलाच्या जवानांना सुध्दा शहिदाचा दर्जा दिला गेला आहे.

आता राहिले गटार साफ करणारे आणि इतर तत्सम धोकादायक ठिकाणी काम करणारे कामगार तर त्यांच्या सुरक्षेविषयी सर्व काळजी घेऊन ते तिथे काम करत असतात. ज्यावेळी अपघात होतो तेव्हा त्याची झळ त्यांना बसते. सैनिकांसारखे त्यांना दुसर्‍या देशाच्या सैन्याकडून, अतिरेकी-नक्षलवाद्यांकडून गोळी घालून ठार करण्यात येत नाही. आणि सैनिक तिथे सीमेवर चोवीस तास आहेत म्हणून इथे बसून कळफलक बडवता आहात हे लक्षात असू द्या.

आता एकंदर वाचनातुन असं कळतय... इथले काहि लोकं म्हणतिल थोड्या दिवसांनी कि पाकिस्तान म्हणतय ते बरोबर आहे सगळं किंवा सगळ्या बाबतीत पाकिस्तानच बरोबर आहे... =११११११
<<ज्यांना युद्ध हवे आहे, त्यांची लढायला जायची तयारी हवीच.>> तयारी तर सगळ्यांनीच ठेवली पाहिजे कारण भारत हा देश सर्वांचा आहे. मोदी विरोधकांचाही आणि भक्तांचाही . ज्यांना आपण निवडून दिलेल आहे त्यांच्या निर्णयाच्या पाठी उभं राहणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे . तिथे कोणाला युद्ध हवाय आणि कोणाला नकोय याचा संबंधच येत नाही

Pages