Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58
भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.
सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.
जयहिंद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्री, अश्यांना अॅडमीन
श्री, अश्यांना अॅडमीन महोदयांनी जबरदस्त इशारा दिलेला आहे. जीवावर उदार होऊन लढणार्या सैनिकांचे श्रेय हिरावून घेऊन नेहमीचेच राजकीय प्रतिसाद देऊ पाहणार्यांचा निषेध!
सर्व प्रथम या धाग्यावर
सर्व प्रथम या धाग्यावर राजकारण मिलिंद जाधव आणि प्रसाद या दोन आयडींनी आणले त्यांच्या पोस्टी पाहून इतर आयडींनी त्यावर रीअॅक्ट केले.
भविष्यात असे करणार्यांवर त्वरीत कारवाई केली जावी
धन्यवाद
>> मारलेल्या अतिरेक्याचे फोटो
>> मारलेल्या अतिरेक्याचे फोटो वायरल झालेले आहेत, त्या मृतदेहाचे फोटो बघता खुप वाईट रित्या भारतीय लष्कराने त्यांना अक्षरशः कापुन काढलेल आहे हे जाणवत
कुठे व्हाट्सप्पवर का? मोदिनी तरुणपणी हातात झाडू घेतलेले फोटो जिथे तयार झाले तिथेच हे पण तयार झाले असावेत. जमल्यास लिंक द्या. लगेच सांगतो मूळ फोटो कुठले आहेत ते.
vaibhavayare12345 >>>>>> +१
vaibhavayare12345 >>>>>> +१
अशा अॅक्शन घेतल्या जाव्यात.कोणाचे सरकार आहे ही बाब गौण आहे.
मारलेल्या अतिरेक्याचे फोटो
मारलेल्या अतिरेक्याचे फोटो वायरल झालेले आहेत, त्या मृतदेहाचे फोटो बघता खुप वाईट रित्या भारतीय लष्कराने त्यांना अक्षरशः कापुन काढलेल आहे हे जाणवत
असे फोटो खातरजमा केल्याशिवाय कृपया पुढे पाठवू नयेत.
भारतीय सैनिक कधीही कुणाच्या
भारतीय सैनिक कधीही कुणाच्या मृत्युदेहाची विटंबना करत नाही. मग ते अतिरेक्यांचे असो अथवा कुठल्या राष्ट्राच्या सैनिकांचे. आजवर कुठल्याही देशाने आपल्या भारतीय सैन्याकडे बोट उचलले नाही. २००१ साली झालेल्या घटने नंतर सुध्दा भारतीय सैन्याने असे काही केले नव्हते.
अशा चुकिच्या फोटोंमुळे आपण आपल्याच सैन्याचा अपमान करत आहे हे काही लोकांच्या लक्षात येत नाही.
आपल्याला सीमेपलिकडे जाऊन अशी
आपल्याला सीमेपलिकडे जाऊन अशी कारवाई करायची वेळ आली ही गंभीर गोष्ट वाटते. ह्या बातमीमुळे आपल्या सैन्याचा अभिमान वाटतो नक्कीच. पण तितकंच असंही वाटतं की ही आनंद साजरा करण्याची बाब नाही! आणि त्या आनंदाचा अतिरेक करून त्याबाबत जोक्स वगैरे फॉरवर्ड करणं, कुठल्या कुठ्ल्या "इनसाईड स्टोरीज"/फोटो शेअर करणं बघून मला कसंतरीच होतंय.
(No subject)
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू
परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटिकोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू
बलवंत उभा हिमवंत
करि हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू
देशाचा दृढ निर्धार
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू........
..................../\........................भारतीय शूर सेनेला सलाम
सुंदर कविता
सुंदर कविता
ह्या कवितेतला 'नंगा' पर्वत
ह्या कवितेतला 'नंगा' पर्वत सद्ध्या पाकव्याप्त काश्मिरात आहे.
भारतीय सैन्याचे आणि भारत सरकारचे अभिनंदन. We are with you.
मारलेल्या अतिरेक्याचे फोटो
मारलेल्या अतिरेक्याचे फोटो वायरल झालेले आहेत, त्या मृतदेहाचे फोटो बघता खुप वाईट रित्या भारतीय लष्कराने त्यांना अक्षरशः कापुन काढलेल आहे हे जाणवत
असे फोटो खातरजमा केल्याशिवाय कृपया पुढे पाठवू नयेत.
>>>>
ओह मी ते जोशमध्ये पाठवले पुढे
अतिरेकी तळांवर हल्ले झाले
अतिरेकी तळांवर हल्ले झाले नाहीत तर हा प्रश्न पाकिस्तानने युनो मधे नेलाच कशाला?
जे झालच नाही त्याची तक्रार?
भारताने याआधीही असे अनेक
भारताने याआधीही असे अनेक Surgical Strikes केलेले आहेत - ज. (नि) विक्रमसिंग, ले. ज. (नि) विनायक पाटणकर आणि अन्यही निवृत्त लष्करी अधिकारी. पण त्याची जाहीर वाच्यता पहिल्यांदाच होत आहे.
-- आणि खरंच पाकिस्तानला आम्हीच ५६ इंचाच्या छातीने धडा कसा शिकवलाय हे देशांतर्गत गरजेपोटी आक्रस्ताळेपणाने मांडणे सुरू झालेय. मग १९४७-४८, १९६५, १९७१ आणि १९९९ चे काय. हाही इतिहास विसरायला हवा.
सगळीकडून समर्थन मिळत असतानाही आताच्या कारवाईचे राजकियीकरण सरकारकडून होताना दिसत आहे.
<<सगळीकडून समर्थन मिळत
<<सगळीकडून समर्थन मिळत असतानाही आताच्या कारवाईचे राजकियीकरण सरकारकडून होताना दिसत आहे.>>
------ सहमत, गुलाल उधळत, ढोल ताशान्च्या सोबत नाचणे... अशा घटना पण साजर्या करण्यासारख्या आहेत का ? कारवाई केली यात आनन्दाने नाचण्यासारखे काही नाही... पण घटने बाबत गाम्भिर्य जरुर असायला हवे.
http://timesofindia.indiatimes.com/india/BJP-for-no-more-bravado-about-s...
सहमत, गुलाल उधळत, ढोल
सहमत, गुलाल उधळत, ढोल ताशान्च्या सोबत नाचणे... अशा घटना पण साजर्या करण्यासारख्या आहेत का ?
<<
नाही,
तुमच्या सारख्या मुठभर लोकांना दहशतवादी मेल्याचे दुख: अपार झाले ह्यात आश्चर्य ते काय? पण तुमच्या सारख्या मुठभर लोकांच्या दुख:वट्यात इतर देशवासयींनी सहभागी व्हावे हि तुमची अपेक्षा जरा जास्तच वाटते.
उरी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा दुखवटा संपूर्ण भारताने अतिशय प्रामाणिकपणे पाळला. (त्यात तुमच्या सारखे आनंद साजरा करणारे ढोंगी पुरोगामी असतील तर ते बोटावर मोजण्या इतके) आता त्याच शहिद जवानांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे व भारतात घूसखोरी करु पाहणार्या दहशतवाद्यांना ठार मारून भारतीय जवानांनी जे धाडसाचे काम केले आहे, त्याचाही आनंद भारतीय सामन्य जनतेने साजरा करु नये असे म्हणने हे ढोंगी पुरोगामीपणाचे लक्षण आहे.
आता अशा बातम्या येत आहेत की
आता अशा बातम्या येत आहेत की ही पण एक 'फेकू'गिरी आहे म्हणून.
खखोदेजा. (भक्तांचा पण बरं )
धागाकर्त्याला
धागाकर्त्याला पाकिस्तानभूमीवरील हल्ला व पी ओ के वरील हल्ला यातील फरक अजून समजलेला दिसत नाही आहे.
<<तुमच्या सारख्या मुठभर
<<तुमच्या सारख्या मुठभर लोकांना दहशतवादी मेल्याचे दुख: अपार झाले ह्यात आश्चर्य ते काय? पण तुमच्या सारख्या मुठभर लोकांच्या दुख:वट्यात इतर देशवासयींनी सहभागी व्हावे हि तुमची अपेक्षा जरा जास्तच वाटते.>>
---- मला दहशतवादी मेल्याचे दु:ख झाले हा निष्कर्ष तुम्ही कुठल्या आधारावर काढला.... ? अगदीच बिनबुडाचे वाक्य आहे.
तुम्ही माझ्या प्रतिक्रिया वाचल्या नसाव्यात. माझा आक्षेप सर्जरीला नसुन या कारणामुळे आपण हुरळुन ढोल, ताशे, गुलाल उधळत आनन्द साजरा करण्याला आहे. अशा कृत्याने घटनेचे गान्म्भिर्य किती कमी आहे हे दिसते.
<<उरी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा दुखवटा संपूर्ण भारताने अतिशय प्रामाणिकपणे पाळला. (त्यात तुमच्या सारखे आनंद साजरा करणारे ढोंगी पुरोगामी असतील तर ते बोटावर मोजण्या इतके) >>
----- प्रसाद पुन्हा एकदा... उरी येथे जवान शहिद झाले याचा मला आनन्द झाला हे तुम्ही कशाच्या आधारावर लिहीले आहे ? जे नाही आहे ते भासवण्याचा प्रयत्न करु नका...
<<आता त्याच शहिद जवानांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे व भारतात घूसखोरी करु पाहणार्या दहशतवाद्यांना ठार मारून भारतीय जवानांनी जे धाडसाचे काम केले आहे, त्याचाही आनंद भारतीय सामन्य जनतेने साजरा करु नये असे म्हणने हे ढोंगी पुरोगामीपणाचे लक्षण आहे.>>
----- मला कुठलेही लेबल लावू नका.... मी ढोन्गी नाही आहे आणि पुरोगामी पण नाही आहे (सान्गणे माझे काम आहे, तुम्ही काय मानायचे ह्याचे तुम्हाला स्वातन्त्र्य आहेच)
मागच्या पानावरची माझी प्रतिक्रिया कट पेस्ट करतो आहे (इतरान्चा गैर-समज व्हायला नको म्हणुन). "कारवाई करुन भविष्यातले हल्ले थाम्बत असतील तर मला आनन्दच आहे. पण हजारोने अतिरेकी तयार होत आहेत (दोन मारले जातात आणि २० तयार होतात), आणि त्यान्ना पाठिम्बा देणारे किव्वा त्यान्च्याबाबत सहानुभुती बाळगणारे (निव्वळ काश्मिरात) लाखो लोक आहेत..... अशा परिस्थितीत निव्वळ लष्करी बळावर फार काळ शान्तता राखता येत नाही."
चर्चेत पारदर्शकता असेल तर चर्चा करण्यात मला आनन्द आहे. निव्वळ (खोटी) लेबले, न लिहीलेले माथी मारल्या जात असेल तर ते खोडायचा सर्वतोपरी प्रयत्न राहिल.
<<<<असे फोटो खातरजमा
<<<<असे फोटो खातरजमा केल्याशिवाय कृपया पुढे पाठवू नयेत.>>>
विकु,
तुम्ही तर पाकिस्तान डेली पेपरचा हवाला आपला अड्डावर दिला होतात कि ये सब झुट है.
पाकिस्तानच्या मते भारताने पाकिस्तानवर चार वेळा युद्ध लादल आणि पाकिस्तानने भारताला चारही वेळा हरवल होत. मुंबई ते उरी सगळे हल्ले भारताने स्वतः स्वतावरच केले आहेत. पाकिस्तानचाच काय अतिरेक्यांचापण ह्यात काही सहभाग नव्हता.
हे सर्व तुम्हाला मान्य आहे तर !!
या हल्ल्याचा सगळ्यात जास्त
या हल्ल्याचा सगळ्यात जास्त आनन्द कोणाला झाला असेल? आंधळ्या भक्तांना, atleast गल्ली, मोहोल्ल्यात तोंड दाखवायची तरी सोय झाली, नाहीतर आधी लोकांनी टोमणे मारून हैराण केले होते,
त्यामुळे अशी over the top reaction येणे साहजिक आहे.
<<<असे फोटो खातरजमा
<<<असे फोटो खातरजमा केल्याशिवाय कृपया पुढे पाठवू नयेत.>>>
------ मिलिन्द, मला पण हे फोटो व्हॉट्स अॅप वर आले होते... १-२ रान्गेत काही मृतदेह, किती मारले गेले त्यान्ची स.न्ख्या.
जगात भारताच्या लाष्कराची प्रतिमा अतिशय उजळ आहे. अजुन भारत सरकारने किव्वा लष्कराने असे चित्र प्रसिद्ध केले नाही आहे. त्याला काही महत्वाची कारणे आहेत. आपण या कारणान्चा आदर करायला हवा. त्यान्ना आधी प्रसिद्ध करु देत, मग तुम्ही करा. अगोदरच प्रसिद्ध करुन आपण त्यान्च्या उजळ प्रतिमेला थोडा धक्का पोहोचवतो. नव्हे त्यान्च्या व्युह रचनेला अनावधानाने छेद देतो.
एक व्यक्ती (मी, तुम्ही अजुन कुणी) खोटी पडली तर चालेल पण भारताची आणि लष्कराच्या प्रतिमेची उजळता कोटी मोलाची आहे. त्या प्रतिमेला धक्का लागता कामा नाही असे मला वाटते.
विकू यान्नी लिन्क दिलेली तुम्हाला खात्री करता येते... त्यात दुसरी बाजू दिलेली आहे, वाचायला काय हरकत आहे ? काही समज गैर समज दुर होतात. दिल्लीत बसलेले राजकारणी लष्कराचे अधिकारी शब्द आणि शब्द विचुन वाचतात. आणि जर लिन्क खोटी ठरली तर त्याने कुणाची विश्वासार्हता धोक्यात येते?
भारताच्या लष्कराने चित्रफीत
भारताच्या लष्कराने चित्रफीत घेतली आहे, त्यान्च्याकडे फोटो आहेत आणि योग्य वेळी ते प्रसिद्ध करतील किव्वा धोरणाचा भाग म्हणुन अजिबात प्रसिद्ध करणारही नाही असे सरकारी माध्यमान्नी जाहिर केले आहे. आपण सर्वान्नी या व्युहात्मक धोरणाचा सन्मान करायला हवा अशी अपेक्षा, सहज पणे करता येण्यासारख्या गोष्टी आहेत.
उदय, या लोकांशी "चर्चा" करून
उदय, या लोकांशी "चर्चा" करून फरक पडेल अशा भ्रमात तुम्ही आहात का?
भारतीय सैन्याने पाकव्याप्त
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात जाऊन तिथले अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
आणि संगणकाचे कळफलक बडवणार्या नवराष्ट्रभक्तांना नवचैतन्य प्राप्त झाले. त्यांच्या कळफलकांत तलवारीची धार , बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे आणि क्षेपणास्त्रे अशी काय काय शस्त्रास्त्रे प्रकटली. ती सगळी घेऊन ते फुरोगाम्यांवर, फेक्युलरांवर तुटून पडले. त्यांनाही आता यांच्यातल्या कोणाचा तरी बळी हवाय.
बरखा दत्तने लष्करी अधिकार्याच्या प्रेस कॉन्फरन्समधून त्याचे वक्तव्य लाइव्ह ट्वीट केले, तेही अवतरणात. त्याचा अर्थ बरखाच पाकिस्तानी लष्कराच्या संपर्कात होती आणि त्यांना या हल्ल्याची सूचना देत होती असा अर्थ लावून गलिच्छ गालीप्रदान, जिवे मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. दसर्याची पाने वाटावीत तद्वत भक्तांनी फेसबुक व्हॉट्सॅपवर त्या ट्विटचा अनर्थ वाटला. मग त्यात आपल्याच अकलेचे दिवाळे निघाले आहे, हे कळल्यावर तिच्या आजीमाजी, असलेल्या नसलेल्या नवर्यांवर गाडी घसरली. तिच्यासोबत अन्य महिला पत्रकारांच्याही. ऐन नवरात्रीत.
इथे मायबोलीवरही तेच चाललेय. कोणी, काय, किती लिहिलं किंवा लिहिलं नाही यावरून देशभक्तीच्या फुटपट्ट्या लावल्या जाताहेत आणि देशद्रोहाची सर्टफुकटं वाटली जाताहेत. धन्य ती देशभक्ती. धन्य तो राष्ट्रवाद.
उदय फोटो व सेंसेटिव्ह माहिती
उदय
फोटो व सेंसेटिव्ह माहिती सोशल मिडीया पसरवु नये या मताचा मी पण आहे.
पण विकु ने जेंव्हा ति लिंक दिली त्या वेळी त्या अर्थ हाच होता की भारत सरकार व सैन्य अधिकारी सर्व खोट बोलत आहेत. पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्र्टाईक सारखी कारवाई करण ह्यांच्याने शक्य होणार नाही.
ठरवलेले ध्येय गाठल्याबद्दल
ठरवलेले ध्येय गाठल्याबद्दल आर्मीचे अभिनंदन.
विजयोन्मादात ढोल-ताशे वाजवणारे, खोटे व्हिडिओ-फोटो व्हायरल करणारे, विनाकारण बरखा दत्तच्या मागे लागणारे आणि सर्जिकल स्ट्राइक झालाच नाही अशा अर्थाचे वक्तव्य करणारे, हे स्ट्राइक कुठल्यशा सीबीआय अधिकार्याच्या आत्महत्येला झाकण्यासाठी केलेली चाल आहे असल्या खोट्या न्युज पसरवणारे, अशा सगळ्यांचा निषेध.
हे स्ट्राइक कुठल्यशा सीबीआय
हे स्ट्राइक कुठल्यशा सीबीआय अधिकार्याच्या आत्महत्येला झाकण्यासाठी केलेली चाल आहे
<<
मराठा मोर्च्याच्या प्रश्नावरुन, संपूर्ण देशाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी, 'सर्जिकल स्ट्राईक' ही भाजपा सरकारचीच एक चाल आहे, असे कुणीतरी (ढोंगी)पुरोगामी कालपरवा टिव्हीवर म्हणत होता.
स्वतः दणकून खोटं
स्वतः दणकून खोटं बोलणार्यांना दुसर्यांच्या खोटे बोलण्याने त्रास का व्हावा? जर दुसर्याने खोटे बोलू नये असे वाटत असएल तर स्वतः तसं न करणं गरजेचं आहे.
तेच म्हणतोय.... चकमक पीओके
तेच म्हणतोय....
चकमक पीओके मध्ये झालीय तर पाकिस्तानचा उल्लेख का केला जातोय?
Pages