आजकाल सगळीकडे सगळे "वेळकाढू" आरक्षण ह्या विषयावर तावातावाने मत मांडत भांडताहेत.
"आरक्षण" कोणासाठी आहे, का आहे, आज ही त्याची गरज का आहे हे मुद्दे विचारात न घेता, केवळ एकाच विचाराने मत मांडणे चालू आहे
"त्यांना आरक्षण दिले आहे तसे आम्हालाही द्या. अन्यथा त्यांचे आरक्षण काढून टाका"
भेंडी!
हे काय गल्लीतील क्रिकेटचा सामना आहे का, "मला लवकर आऊट का केले. जर मग मी आऊट असेल तर मला परत खेळू द्या वा कोणीच क्रिकेट खेळायचे नाही. नाहीतर मी मैदानात धिंगाणा घालेल." असे बोंबलायला.
पण असो, ह्या धाग्याचा विषय आरक्षणाबद्दल जरी असला तरी तो सामाजिक, राजकीय, आर्थिक वा शैक्षणिक पातळीवरील नाहीये तर ह्या धाग्याचा विषय आहे "बस मधील आरक्षण'
प्रत्येक शहराच्या स्थानिक बस मध्ये उजव्या बाजूकडील पहिले ४-५ बाकडे महिलांसाठी आरक्षित असतात. तर काही ठिकाणी बसची संपूर्णतः उजव्या बाजूची रांग आरक्षित असते. माझे घरापासूनचे कार्यालयापर्यंतचे अंतर हे रेल्वेने पार करण्यालायक दूर नसल्याने मी दैनंदिन प्रवास हा सरकारी मालमत्तेच्या बसने(च) करत असतो.
तर मुद्दा असा आहे की, बसने प्रवास करत असताना बसमध्ये चढणाऱ्या मुली राखीव रांगेत जागा शिल्लक असल्या तरीही डाव्या रांगेतील खुर्चीवर ठाण मांडतील वा उजव्या रांगेतीलच मोकळ्या पण अनारक्षित खुर्च्यांवर जाऊन बसतील. बस रिकामी असेल तर ह्याबद्दल कोणाला काहीही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण जेव्हा बसमध्ये गर्दी होऊ लागते. पुरुष, मुले ह्यांची संख्या बसमध्ये वाढायला लागते तेव्हा त्यांना "आरक्षित" जागेवर बसने शक्य होत नाही. त्यांना मुकाट्याने उभे राहूनच प्रवास करावा लागतो. मग भलेही "आरक्षित" खुर्च्या रिकाम्या असल्या तरीही.
राग मात्र तेव्हा येतो जेव्हा अनारक्षित खुर्च्यावरील मुली/स्त्रिया आरक्षित खुर्च्या रिकाम्या असून सुद्धा तिकडे बसत नाही. एकदा न राहवून शेजारी बसलेल्या एका (सुंदर) मुलीला विचारलेच, "का गं बाई, तू तिकडे का बसत नाही. ती खुर्ची तर रिकामीच आहे. तू तिकडे गेलीस तर एखादा माझा मित्र इथे बसू शकेल ना." तर तिचे गॉड आवाजातील स्मित हास्य करत दिलेले उत्तर होते, "मी ती खुर्ची रिकामी ठेवली तर माझी एखादी मैत्रीण आल्या आल्या तिथे बसू शकेल ना"
ऋ का?
ऋ का?
@फिल्मी: ऋ म्हणजे काय ? जर
@फिल्मी:
ऋ म्हणजे काय ?
जर काही विनोद असेल तर मला मात्र नाही समजला. तुम्ही दिलेल्या स्मायलीवरुन अन्दाज लावत आहे की काहितरी विनोदी वाट्लय तुम्हाला.
ऋ म्हणजे मी ट्रेनमध्ये जनरल
ऋ म्हणजे मी
ट्रेनमध्ये जनरल डब्यात चढणार्या महिलांबद्दलही बरेच पुरुषांची अशीच तक्रार असते.
कारण त्यांना जनरल डबा हा पुरुषांचा वाटत असतो
मला पर्सनली ट्रेनच्या तुलनेत बसचा प्रवास फार बोर होतो.
पहिले म्हणजे ती रस्त्यावरून चालते ज्यावर खड्डे असतात. त्यामुळे मळमळायला होते.
दुसरे म्हणजे सारे प्रवाशी एकाच दिशेने तोंड करून बसतात. त्यामुळे समोरासमोर बसलेल्या प्रवाश्यांचे चेहरे न्याहाळायची मजा त्यात नसते.
तिसरे म्हणजे स्पीड रडतखडत असतो त्यामुळे खिडकीतून जोरदार हवेची मजा लुटता येत नाही.
चौथे म्हणजे ट्रेनसारखे दारावर उभे राहायचे थ्रिल बसवाल्यांच्या नशिबी नाही येत.
पाचवे म्हणजे रोज रोज तिकीट काढा. (हल्ली पास निघाले असतील तर कल्पना नाही)
सहावे म्हणजे आपला मित्रांचा ग्रूप असेल तर ट्रेनमध्ये कोंडाळे करून बसता येते तसे बसमध्ये अडचण होते. मान वळवत मागे वळत बोला त्रासदायक ठरते.
अजून बरंच लिहिता येईल.. पण बस्स आता लिहायलाही बोर झाले.. कधीतरी स्वतंत्र धागा काढून लेखच लिहितो
ऋन्म्या ऋन्म्या, विषय काय ,
ऋन्म्या ऋन्म्या,
विषय काय , तू लिहितोस काय!
इथंतरी आरक्षणावर सिरीयसली
इथंतरी आरक्षणावर सिरीयसली लिहायचेय.
<ट्रेनमध्ये जनरल डब्यात
<ट्रेनमध्ये जनरल डब्यात चढणार्या महिलांबद्दलही बरेच पुरुषांची अशीच तक्रार असते.
कारण त्यांना जनरल डबा हा पुरुषांचा वाटत असतो >
हे लिहून मूळ तक्रारीतली हवा काढून घेतली आहे. त्यामुळे पुढे वाटेल ते लिहायचा बेस्टवाला ५० रुपयांचा पास मिळालाय.
भरत अगदी बरोबर, तो मुद्दा
भरत अगदी बरोबर, तो मुद्दा विषयावरच होता. मग सुचेल ते लिहिले
साती, धागा भरकटवा किंवा अवांतर गप्पा असा हेतू नव्हता, किंवा होताच समजा पण ते धागाही सिरीअस मोड मध्ये न काढता गंमतीने काढलेला वाटला म्हणून.
इथंतरी आरक्षणावर सिरीयसली लिहायचेय. >>> हे तुम्ही त्या महिला आरक्षणाच्या धाग्यावर लिहिलेल्या पोस्ट वरून म्हणत आहात का
पण सिरीअसली, बोअर झालेय जिथे तिथे आरक्षण.. मध्यंतरी तांत्रिक कारणांमुळे माबोवर जास्त लिहिता येत नव्हते. तर व्हॉटसप फेसबूक चाळायचो, तर तिथेही सगळीकडे आरक्षण आणि मोर्चा.. आणि इथे आलो तर ईथेही तेच तेच.. बोल्लो जरा हलके व्हावे
नाही, सिरीयसली
नाही, सिरीयसली म्हणत्येय.
म्हणजे आरक्षणावर नुसती झिम्मा फुगडी चालू असते, तेच तेच लोक - तीच तीच मते मांडत असतात.
त्यातून बर्याचदा चर्चेपेक्षा टाईमपासच जास्त असतो.
म्हणून म्हटलं...
बसमधल्या आरक्षणावरतरी काहीतरी नवं आणि सिरीयसली बोलूया.
जेव्हा बसमध्ये गर्दी होऊ
जेव्हा बसमध्ये गर्दी होऊ लागते. पुरुष, मुले ह्यांची संख्या बसमध्ये वाढायला लागते तेव्हा त्यांना "आरक्षित" जागेवर बसने शक्य होत नाही. त्यांना मुकाट्याने उभे राहूनच प्रवास करावा लागतो. मग भलेही "आरक्षित" खुर्च्या रिकाम्या असल्या तरीही.>>> हे पटले नाही. कारण पुरुष त्या खुर्च्यावर बसतात आणि एखादी महिला आली तर काहीजण जागा रिकामी करून देतात काहीजण तसेच बसून रहातात. हा माझा तरी अनुभव आहे.
दुसरे म्हणजे सारे प्रवाशी
दुसरे म्हणजे सारे प्रवाशी एकाच दिशेने तोंड करून बसतात. त्यामुळे समोरासमोर बसलेल्या प्रवाश्यांचे चेहरे न्याहाळायची मजा त्यात नसते.>>>>>>
@चैत्राली, मुम्बईत तरी ब्वा
@चैत्राली, मुम्बईत तरी ब्वा अस्स नाही होत..
बाकी, "ऋन्मेऽऽष" ने मात्र सदर धागा बिनबोभाट्पणे पळवलाय.
मुंबईत कोणे एके काळी
मुंबईत कोणे एके काळी ड्रायव्हरच्या मागची सीट ड्रायव्हरकडे पाठ करून असायची. तिथे बसलेल्या डोक्यांना वर्गात विद्यार्थ्यांपुढे बसलेल्या शिक्षकासारखं वाटत असेल. कहाँ गयी वो बस?
तसंच बेस्टबसेसमध्ये डावीकडची पहिली ४ बाकं रिझर्व्ड असतात. पहिल्या दोन बाकांवरच्या ३ सीट्स अपंगांसाठी. पुढल्या २ बाकांवरच्या ४ सीट्स ज्ये.ना.साठी. उजवीकडची पहिली ६ बाकं महिलांसाठी.
त्यामुळे ज्यांना लांबवर प्रवास करायचाय आणि सीट मिळालेली नाही ते लोक पुढे न जाता मधल्या भागात उभे राहतात.
त्या सीट्सवर बसायला लागलं (उरलेली कोणतीच रिकामी नाही म्हणून ) आणि मग उठावं लागलं (अपंग आणि ज्ये ना पुढल्या दाराने चढतात) की तिथे उभं राहून उतरणार्या सगळ्यांचे धक्के खावे लागतात.
ज्यांना लांबवर प्रवास करायचाय
ज्यांना लांबवर प्रवास करायचाय आणि सीट मिळालेली नाही ते लोक पुढे न जाता मधल्या भागात उभे राहतात.>>
आणि कंडक्टर जबरदस्तीनं पुढं सरका म्हणून डाफरत रहातो
मुंबईत कोणे एके काळी
मुंबईत कोणे एके काळी ड्रायव्हरच्या मागची सीट ड्रायव्हरकडे पाठ करून असायची.
>>>.
येस्स. काल मी पोस्ट लिहिताना मला तीच सीट आठवलेली. माझी आवडीची.
एकेकाळी का पण? हल्ली नसते का? मी शेवटचे त्या सीटवर पाचसहा वर्षांपूर्वी बसलेले आठवतेय..
तसेच डबलडेकर बसमध्ये मागून चढल्या चढल्या खालच्या मजल्यावर तीन तीन च्या दोन आमनेसामने असतात. की या पण असायच्या ?
तसेच आणखी एक जबरदस्त सीट म्हणजे डबलडेकरची वरची सर्वात पुढची सीट.. ड्रायव्हरच्या डोक्यावरची.. आन त्या समोरच्या खिडकीतून सुसाट सैराट आत येणारा झिंगाट बुंगाट वारा.. एक्स्ट्रा पैसे मोजावे लागले असते तरी बसलो असतो तिथेच. अक्षरशा मरायचो आम्ही त्या सीटसाठी
त्या सीटवर एकदा गर्लफ्रेंडबरोबर बसून केस भुरभुर उडवण्याचे रोमँटीक थ्रिल अनुभवायचे आहे..
सध्या मुंबईत डबलडेकर बस कुठे मिळतील? कोणाला काही आयडीया? की वेगळा धागा काढू?
हल्ली तशी उलटी सीट बर्याच
हल्ली तशी उलटी सीट बर्याच दिवसांत दिसलेली नाही.
डबल डेकर बसेस मुंबईच्या दक्षिण टोकाला असतील कदाचित अजून.
आमचा एक मॅनेजर कानपूरहून आला होता. तो रात्री साडेआठ वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर वरून चर्चगेटला जाणारी बस खाली अख्खी रिकामी असली तरी वरच्या मजल्यावर त्या सीटवर मरिन ड्राइव्हचा वारा खायला बसायचा.
डबल डेकर बसेस मुंबईच्या
डबल डेकर बसेस मुंबईच्या दक्षिण टोकाला असतील कदाचित अजून.
>>>
हो फोर्ट परीसरात असाव्यात .. आहेत बहुधा .. मध्यंतरीच मी एका त्या परीसरात कामाला असणार्या मित्राकडे चौकशी केलेली तेव्हा त्याने दोनतीन नंबर सांगितलेले व्हॉटसपवर.. शोधायला हवा तो मेसेज
धाग्यासंबंधित बोलायचे झाल्यास डबलडेकरच्या वरच्या मजल्यावर देखील महिलांना आरक्षण असते का?
कुर्ला वरुन निघणारी ३३२ बस
कुर्ला वरुन निघणारी ३३२ बस आहे डबल डेकर
कुर्ला सांताक्रूझ (आणि
कुर्ला सांताक्रूझ (आणि अर्थातच सांताक्रूझ कुर्ला सुद्धा ३११ आणि ३१३ डबलडेकर असतात
३११ आणि ३१३ डबलडेकर असतात >>>
३११ आणि ३१३ डबलडेकर असतात >>> +१
सार्वजनिक वहातुक व्यवस्था
सार्वजनिक वहातुक व्यवस्था मुद्दामच अपुरी ठेवली आहे कारण की दुचाकी- चारचाकी वहानांची विक्री वाढावी असा आरोप एकदा राजसाहेब ठाकरे यांनी केला होता. नुकताच गोव्याला रहाण्याचा योग आला. कधी काळी तीथे दुचाकी वहानावर मागे बसुन जाणे अशी सार्वजनिक वहातुक व्यवस्था होती ज्यात मागे बसणार्याला सुध्दा हेलमेट दिले जायचे. त्या मोटार सायकलचा रंग पिवळा असायचा आणि त्यालाही लायसन्स होते.
आजही गोव्यात बसमधे उभे रहायला परवानगी नाही कारण बसेस इतक्या मुबलकतेने आहेत की त्याची आवश्यकताच नाही. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे बीन पैशाची फेरी बोट ज्यात ५० दुचाक्या आणि १०० माणसे या किनार्याहुन त्या किनार्याला जातात.
मुंबई - पुणे किंवा अन्य शहरात सार्वजनिक वहातुक व्यवस्थेची वाट लावणार्या सत्ताधार्यांना एकदा धडा शिकवायला हवा जनतेने.
बस असो वा लोकल रेल्वे, सगळ्या
बस असो वा लोकल रेल्वे, सगळ्या ठिकाणी लिहिलेले असतेच की किती प्रवासी बसून आणि किती प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. पण हा नियम सामान्य जनता पायदळी तुडवतातच तर पण माझ्या बघण्यात/ऐकण्यात सुद्धा कधी असे आले नाही की "कंडक्टर वा चालक" ह्यांनी अतिरिक्त प्रवासी भरण्यास मनाई केली.
सरकारी नियमानुसार कोणत्याही गाडीमध्ये नमूद केलेल्या वजनापेक्षा जास्त वजन नेता येत नाही. सरकारी वाहतूक यंत्रणा सुद्धा ह्या नियमास बांधील आहे. पण कोणीच त्याचे पालन करत नाही.
लिफ्ट मध्ये मात्र अतिरिक्त-भार(ओव्हरलोड) झाला तर लिफ्ट स्वतःहून बंद पडत असल्यामुळे तिथे हा नियम कसोशीने पाळण्याशिवाय पर्याय नसतो.