मला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-)

Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:53

वाढदिवसाला भेट मिळालेले सॉफ्ट पेस्टल कलर, मनासारखे वापरायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे चिडचिड सुरु होती ...मला नाही आवडले ते रंग... मी नाही वापरणार... म्हणून तिला एखाद चित्र रेफरन्ससाठी वापर नी प्रयत्न कर असे म्हटलं.... हा पहिला प्रयत्न Happy

IMG_20160903_143020.jpg

मग आम्हाला खूप मज्जा आली , सो लगे हात दुसरं पण Proud

IMG_20160904_230046.jpg

ह्या जून मध्ये आम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला गेलो , आवडलं ट्रेकिंग ... ही त्याच ट्रेकची आठवण ...
मृग गड
माध्यम : जलरंग

IMG_20160627_194358.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद __/\__ Happy

याला पहिला प्रयत्न म्हणतात? >>> दुसर्‍याच चित्र पाहून केलेला , हा पहिला प्रयत्न आहे... या आधी दोन चित्र काढली होती मनाने पण तिलाच आवडली नव्हती... माध्यम अगदीच नविन असल्याने , how far u go ... याचा अंदाज नव्हता .. तो रेफरन्ससाठी वापरलेल्या चित्राने दिला.... Happy

अनन्या, अतिशय सूंदर चित्र, दूसर्‍यांचि चित्र रेफरन्स साठी वापरून खूप शिकता येत.

आणखी चित्र येवू द्या.

कोणत्या शब्दांत वर्णन करु अनन्या?
केवळ अप्रतिम !!!!!!!!!!

प्रचि २ : दूर जाणारी वाट आणि आकाश एकत्र झालेय.... सुंदर...

प्रचि ३ : आकाश...त्यात दिसणारे ढगोबा.... आकाशात ते विलिन झालेले, तरीहि दिसणारे डोंगर.... अप्रतिम !!!!!!!!!!

वॉव!

दुसरं तर मस्त आहेच. पण पहिल्यातला ३डी एफेक्ट आणि रंगांचे एकमेकात मिसळाणे जास्त आवडले.

नेहमीच्या पेस्टल रंगांपेक्षा हे सॉफ्ट पेस्टल वेगळे असतात का ?

अप्रतीम केवळ अप्रतीम. अर्चना, तुझ्या मुलीला आमच्या तर्फे अनेक शुभेच्छा आणी शाबासकी. दुसरे चित्र अतीशय उच्च दर्जाचे आहे, सगळी छान आहेत, पण हे त्यात कळस आहे.

अनन्या च्या कौतुका बद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद Happy __/\__

नेहमीच्या पेस्टल रंगांपेक्षा हे सॉफ्ट पेस्टल वेगळे असतात का ?>>> हो, हे रंग फळ्यावर वापरतो त्या खडू सारखे असतात पण खूप जास्त ठिसूळ असतात ...तसेच ह्याने चित्र रंगवून झाल्यावर स्प्रे मारून फिक्स करावं लागतं नाही तर टिचकी मारली तरी हे रंग उडतात.
सॉरी , कामात व्यस्त असल्याने खूप उशीर झाला उत्तर द्यायला

अनन्या, अतिशय सूंदर चित्र, दूसर्‍यांचि चित्र रेफरन्स साठी वापरून खूप शिकता येत. >> +१

डेप्थ मस्त जमली आहे.

Pages