याम ब्रेड करण्याकरीता याम आणायला गेले. ते अर्थातच जास्त आणले. मग याम ब्रेड करताना फ्रीज उघडून काही-काही काढताना मटार-मक्याचं फ्रोजन पाकीट नजरेस पडलं. डोक्यात म, य, ब,ल चा बुभूत्कार चालू असल्याने सर्वत्र त्या अक्षरांचे पदार्थ शोधणं वा आपसूक दिसणं होत होतं. मग म्हटलं जास्तीच्या यामचे मटार-मका घालून कटलेट्स बनवूया. अजून एक रेसिपी झाली पाकृ स्पर्धेत पोस्टायला आणि गोड याम ब्रेडच्या पुढून-मागून खायला काहीतरी तिखट-चमचमीत नको? तिसर्या मुख्य घटकाकरीता omnipresent अश्या गुणी बटाट्याचा आधार होताच (बीटही चालले असते पण घरी नव्हते) आणि मग चौथाही पदार्थ घालूच की - म्हणत लसूणी कटलेट्स बनवूया ठरवले. एरव्ही कटलेटस मध्ये आलं-लसूण पेस्ट घालतो, यावेळी फक्त लसणावर भर देऊया - असा विचार केला.
तर साहित्य :
मुख्य :
मका व मटार - १ वाटी प्रत्येकी - थोडे वाफवून
याम - १ नग
बटाटा - २ मध्यम
लसूण पाकळ्या - ३-४ (मोठ्या) वा ५-६ (लहान)
इतर :
आमचुर पावडर - १ ते २ टी स्पून
गरम मसाला - १ ते २ टी स्पून
मीठ, साखर - चवीनुसार
तेल - शॅलो फ्राय करीता
हवा असल्यास रवा - कटलेट्स घोळवण्याकरीता
कृती :
१. याम व बटाटे उकडून किसून किंवा हाताने मॅश करून घ्यावेत.
२. त्यात वाफवलेले मटार व मका घालावे. (पीठ होईल इतपत वाफवू नयेत. दाणे दिसावेत व लागावेत.)
३. लसून पाकळ्या बारीक चिरून घ्याव्यात. मी ते घरी एक लसूण कापायचं बारकं यंत्र आहे ते वापरलंय. तसंही ह्या गोष्टी आणून त्या मी नीट जपून सणासुदीलाच बाहेर काढते. ते काढलेलं यावेळी. (आयत्या वेळी सापडलं ही त्या गणोबाची कृपा!)) तो कापलेला लसून घाला.
४. त्यात आमचुर पावडर, गरम मसाला व मीठ, साखर - आवडीनुसार घालावे.
५. आवडत असल्यास थोडी कोथिंबीरही बारीक चिरून घालता येईल. (कोथिंबीर कापण्याचेही एक (उगीच) यंत्र आहे. पण कोथिंबीर संपली असल्याने त्याला सणासुदीलाही बाहेरची हवा दाखवली नाही!)
६. तर सर्व एकत्र करून कटलेटस वळून घ्या.
७. तवा गरम करा आणि शॅलो फ्राय करून घ्या.
सॉस (मॅगी हॉट अँड स्वीट मस्त लागतो) बरोबर गरमा-गरम खा!
तर दोन पदार्थ एकदम केल्याने जरा दमल्ये. तर आता पुढील स्वयंपाक घर भेट पुढील वर्षी गणपतीत!
मस्त दिसतायत कटलेट
मस्त दिसतायत कटलेट
वॉव, पर्र्फेक्ट म य ब ल...
वॉव, पर्र्फेक्ट म य ब ल... सुपर्ब कल्पना.. कटलेट्स पण यम्मी दिस्ताहेत...
कान्ट गो राँग विथ दीज इन्ग्रेडिएंट्स..
सणासुदीला काढायची यंत्रे..
आणी ती जपून अश्या ठिकाणी ठेवणे कि नंतर आठवतंच नाहीत कुठे ठेवलीत ते...अगदी अगदी
रायगड मस्तच! >>आता पुढील
रायगड मस्तच!
>>आता पुढील स्वयंपाक घर भेट पुढील वर्षी गणपतीत! :rofl:
व्वा... मस्तच....
व्वा... मस्तच....
छान पाकृ.
छान पाकृ.
कटलेट छान आहेत. सोपी आणि
कटलेट छान आहेत. सोपी आणि परफेक्ट मायबोली स्पेशल

मॅगीची आठवण काढल्याबद्दल धन्यवाद
रायगड , तोपांसु पाकृ आणी मस्त
रायगड , तोपांसु पाकृ आणी मस्त हटके आहे. कटलेटस खमंग दिसतायत. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
मस्त!
मस्त!
छान पाककृती.
छान पाककृती.
मस्तं पाककृती. आवडली.
मस्तं पाककृती. आवडली.
वा, छानच जमलेत.
वा, छानच जमलेत.
खूप छान
खूप छान
रायगड ऐकत नाही एकदम लई भारी
रायगड ऐकत नाही एकदम
लई भारी
सुरेख दिसताहेत. आता पुढील
सुरेख दिसताहेत.
आता पुढील स्वयंपाक घर भेट पुढील वर्षी गणपतीत
वा! हे पण छान. रायगडाला फक्त
वा! हे पण छान.
रायगडाला फक्त गणपतीतच जाग येते तर!
रायगड , तोपांसु. भूक लागली.
रायगड , तोपांसु. भूक लागली. डोळ्यात बदाम. उचलून तोंडात टाकावसं वाटतंय. लय भारी.
तोंपासू!! पण ४ पैकी कोणतेही ३
तोंपासू!!
पण ४ पैकी कोणतेही ३ अक्षरांपासून सूरु होणारे पदार्थ घ्यायचे आहेत ना?
तर इथे ४ झालेत.
मस्त दिसतयं! आता पुढील
मस्त दिसतयं!
आता पुढील स्वयंपाक घर भेट पुढील वर्षी गणपतीत >>
मस्त प्रकार.. फोटो तो.पा.सु.
मस्त प्रकार.. फोटो तो.पा.सु.
मस्त आहेत कटलेट्स!
मस्त आहेत कटलेट्स!
हे पण भारीय...
हे पण भारीय...
छानच दिसतायंत कटलेट्स! ट्राय
छानच दिसतायंत कटलेट्स! ट्राय करणार नक्की!
याम म्हणजे नेमकं काय याबद्दल मी अजूनही गोंधळातच आहे! मी 'याम' म्हणून जे काही मिळतं शेंदरी कंद त्याचा पारंपारिक रताळ्याचा कीस करते. असो जे काही कंद आहे त्याचे आता असे कटलेट्सही करुन बघणार!
वॉव! मस्त दिसताएत!
वॉव! मस्त दिसताएत!
मस्त आहेत कटलेट्स
मस्त आहेत कटलेट्स
मी हे कटलेट्स केले..मस्त
मी हे कटलेट्स केले..मस्त झाले.
मी केलेले बदल- उकडलेला बटाटा एकच होता त्यामुळे दोन याम व एक बटाटा वापरला. त्यामुळे का ते माहीत नाही पण मिश्रण जर्रासं ओलसर वाटलं पण रव्यात घोळवल्यावर कटलेट छान झाले. याम जास्त वापरल्याने यामचीच चव जास्त लागत होती..ती खूपच आवडली. आणि मी लाल तिखटही घातलं होतं. बाकी सगळी हीच रेसिपी फॉलो केली.
स्पर्धेच्या थीममध्ये बसवून लिहिलेल्या रेसिपीज काही वेळा ओढून ताणून बनवल्यासारख्या वाटतात पण ही रेसिपी एकदम परफेक्ट आणि वारंवार टी टाईम स्नॅक म्हणून करायला छान आहे. धन्यवाद रायगड!
अरे वा! सनव! धन्यवाद रेसिपी
अरे वा! सनव! धन्यवाद रेसिपी ट्राय केल्याबद्दल!