पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
चित्रं कुठल्याही विषयावर चालतील, पण आंतरजालावर भारतीय संस्कृती / परंपरा, मराठी संस्कृती / परंपरा, मराठी व्यक्ती यांची खूपच कमी प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध आहेत. त्यात आपण या उपक्रमातून काही भर टाकू शकलो, तर खूप छान होईल.
हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली कुठल्याही विषयावरची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
उदा.
टोरांटोची शान. स्ट्रीट कार (क्रमांक ५०५ डंडास वेस्ट स्टेशन ते ब्रॉड व्हू स्टेशन)
टोरांटो , स्ट्रीट कार, सार्वजनिक वाहतूक : (अमितव)
(No subject)
पार्नदॉर्फ, शॉपिंग सेंटर,
पार्नदॉर्फ, शॉपिंग सेंटर, ऑस्ट्रीया
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचाच एक
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचाच एक क्लोजप
फारच जवळ आलात, जरा दूर जा
फारच जवळ आलात, जरा दूर जा
फाउंटेना दे त्रेव्ही , रोम
फाउंटेना दे त्रेव्ही , रोम
बाप्पा के बापू
बाप्पा के बापू
स्काय व्हाईन (Sky vine),
स्काय व्हाईन (Sky vine), फुले, फूल.
भाई की सवारी
भाई की सवारी
याच्यावर कोण बसणार?
याच्यावर कोण बसणार?
फ्लोरिडा कीज मधे एका आर्ट शॉप च्या बाहेरचं स्कल्प्चर.
नको नको त्यापेक्षा आटुरिक्शा
नको नको त्यापेक्षा आटुरिक्शा बरी....
रिक्षात खास असं काही नाही पण ही रिक्षा इथे आम्ही रहातो त्या गावात दिसली. लक्झरी कार्सची रांगेनं शो-रुम्स असलेल्या रस्त्यावर रिक्षा दिसणं म्हणजे नवलच म्हणून फोटो काढला
फूलविक्रेती प्रतीक्षेत फूल
फूलविक्रेती प्रतीक्षेत फूल ग्राहकांच्या
फुले, विक्री, पदपथ, रस्ता
रिक्षाला झब्बू - हॉगवार्ट्स
रिक्षाला झब्बू - हॉगवार्ट्स एक्सप्रेस @ ९ ३/४ प्लॅटफॉर्म
येऊ द्या, ट्रॅक रिकामाच हाय
येऊ द्या, ट्रॅक रिकामाच हाय
स्टेशन आलं आमचं ग्रँड
स्टेशन आलं आमचं
ग्रँड सेन्ट्रल स्टेशन न्यू यॉर्क
येंवा सिटी आपलाच असां
येंवा सिटी आपलाच असां
सेन्ट्रल पार्क, न्यू यॉर्क
सेन्ट्रल पार्क, न्यू यॉर्क
प्रवास करून दमला आसशीला, जरा
प्रवास करून दमला आसशीला, जरा दोन घास खावा
आपलं गरिबांचं खाणं मिळेल का
आपलं गरिबांचं खाणं मिळेल का कुठं?
पिठलं, भाकरी, अन मिर्चीचा खर्डा
गोड-धोड पण खा
गोड-धोड पण खा
कातिल फोटो! झालं आता
कातिल फोटो! झालं आता रेंगाळणार खाण्यापिण्यावर गाडी
बासुंदी पुरी, बटाट्याची भाजी.
आमरस की बारी
आमरस की बारी
बासुंदी झाली हे घ्या
बासुंदी झाली हे घ्या श्रीखंड
फार गोड झालं, मिसळ आणा
फार गोड झालं, मिसळ आणा
ठिकाण नाही ओळखता
ठिकाण नाही ओळखता येत!
बटाटेवडे
हे पण घ्या. रवालाडू
हे पण घ्या.
रवालाडू
सोनमोहर
सोनमोहर
एस पी नो-डी पी
एस पी नो-डी पी
मूगभजी
मूगभजी
आता पुढचा एखादा इंटरेस्टींग
आता पुढचा एखादा इंटरेस्टींग झब्बू येउद्या की संयोजक!
रायगडस्थित महाराजांना मानाचा
रायगडस्थित महाराजांना मानाचा मुजरा...
Pages