पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
चित्रं कुठल्याही विषयावर चालतील, पण आंतरजालावर भारतीय संस्कृती / परंपरा, मराठी संस्कृती / परंपरा, मराठी व्यक्ती यांची खूपच कमी प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध आहेत. त्यात आपण या उपक्रमातून काही भर टाकू शकलो, तर खूप छान होईल.
हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली कुठल्याही विषयावरची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
उदा.
टोरांटोची शान. स्ट्रीट कार (क्रमांक ५०५ डंडास वेस्ट स्टेशन ते ब्रॉड व्हू स्टेशन)
टोरांटो , स्ट्रीट कार, सार्वजनिक वाहतूक : (अमितव)
.....
.....
......
......
(No subject)
गरमा गरम जिलेबी
गरमा गरम जिलेबी
शंकर-पार्वती, शंकर, पार्वती,
शंकर-पार्वती, शंकर, पार्वती, काळाघोडा महोत्सव, चित्र, प्रदर्शन
कैरीचे फुटं!
कैरीचे फुटं!
डबल पोस्ट!
डबल पोस्ट!
(No subject)
भिकबाळी, बाळी, दागिना,
भिकबाळी, बाळी, दागिना, कानातला दागिना
रोट
रोट
लोकहो, फोटोसोबत शब्दखुणाही
लोकहो, फोटोसोबत शब्दखुणाही द्या.
भातुकली
भातुकली
लोणची, चटण्या, मसाले, पापड,
लोणची, चटण्या, मसाले, पापड, भाजणी व इतर खास भारतीय, मराठी खाद्यसामग्री विकणाऱ्या दुकानाबाहेरची पाटी
मसाले, चटणी, लोणची, पापड, दुकान, विक्री, यादी, पाटी
कॉफी , कॉफी ब्रेक.
कॉफी , कॉफी ब्रेक.
झाडाला आलेला सूर्य! .
झाडाला आलेला सूर्य!
.
गेला अस्तास...
गेला अस्तास...
अजून एक सूर्यास्त - माउई,
अजून एक सूर्यास्त - माउई, हवाई
आकाशाशी स्पर्धा
आकाशाशी स्पर्धा
पटापट फोटो टाका लोकहो. नलिनी,
पटापट फोटो टाका लोकहो. नलिनी, आहेस का आज?
हापुना बीच - कोहाला कोस्ट,
हापुना बीच - कोहाला कोस्ट, बिग आयलंड हवाई
पानी पानी रे...
पानी पानी रे...
सिंडरेला, काल मज्जा आली. आज
सिंडरेला, काल मज्जा आली. आज नाही मी फारवेळ.
कोळी, जाळे
(No subject)
कोलोझीअम, रोम
कोलोझीअम, रोम
ओल्ड फेथफुल - यलोस्टोन
ओल्ड फेथफुल - यलोस्टोन पार्क
सेन्ट पॅट्रिक कथेड्रल
सेन्ट पॅट्रिक कथेड्रल
डिस्नेचा लायटेड कॅसल -
डिस्नेचा लायटेड कॅसल - फ्लोरिडा
मस्त आहे हा फोटो.
मस्त आहे हा फोटो.
व्हाइटस्टोन ब्रिज
व्हाइटस्टोन ब्रिज
(No subject)
Pages