पहिले दान देवाला
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
चित्रं कुठल्याही विषयावर चालतील, पण आंतरजालावर भारतीय संस्कृती / परंपरा, मराठी संस्कृती / परंपरा, मराठी व्यक्ती यांची खूपच कमी प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध आहेत. त्यात आपण या उपक्रमातून काही भर टाकू शकलो, तर खूप छान होईल.
हे लक्षात ठेवा -
१. या धाग्यावरचे नियम इतर झब्बूच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत.
२. ही स्पर्धा नसून खेळ आहे. प्रत्येक चित्राखाली ते नंतर शोधायला सोपं जाईल, अशा काही शब्दखुणा अपेक्षित आहेत. या शब्दखुणांमुळे नंतर वर्गीकरण करणं सोपं होईल.
३. इथे तुमच्याकडे असलेली कुठल्याही विषयावरची प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं, जी तुम्हांला पूर्णपणे प्रताधिकारमुक्त करावयाची आहेत, ती टाकणं अपेक्षित आहे. ती चित्रं नंतर वापरताना, किंवा काही बदल करताना तुमचा नामोल्लेख केला जाण्याचं बंधन, परवानगी घेण्याचं बंधन वापरकर्त्यावर असणार नाही.
४. या धाग्यावरची प्रकाशचित्रं आंतरजालावरील कुणीही व्यक्ती वा संस्था , कुणाचीही परवानगी न घेता, कुठल्याही कारणासाठी (व्यावसायिक / अव्यावसायिक commercial / non commercial) वापरू शकेल (Public Domain).
५. या प्रकाशचित्रांमध्ये कुणीही काहीही बदल करू शकेल.
६. या धाग्यावरची प्रकाशचित्रं पुन्हा वापर करायला सोपं जावं म्हणून मायबोलीवर एक कायमस्वरूपी अल्बम केला जाईल.
७. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊन शकणार नाही.
९. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्ं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
१०. या धाग्यावर प्रकाशित केलेलं प्रकाशचित्र तुम्ही कायमचं प्रताधिकारमुक्त करत आहात, हे लक्षात ठेवा. चित्र प्रकाशित झाल्यावर त्यावर तुमचा काहीही हक्क असणार नाही. तुम्ही ते देवाला दान करता आहात. प्रकाशचित्राखाली ते कुणी दान केलं, याचा उल्लेख असेल.
उदा.
टोरांटोची शान. स्ट्रीट कार (क्रमांक ५०५ डंडास वेस्ट स्टेशन ते ब्रॉड व्हू स्टेशन)
टोरांटो , स्ट्रीट कार, सार्वजनिक वाहतूक : (अमितव)
कृष्णा, ती मिरची मस्तं
कृष्णा,
ती मिरची मस्तं गुरगटून बसल्यासारखी दिसतेय.
ती मिरची मस्तं गुरगटून
ती मिरची मस्तं गुरगटून बसल्यासारखी दिसतेय.>>
अगदी अगदी!!
(No subject)
आता पुरे झाला फोटोसेशन! आम्ही
आता पुरे झाला फोटोसेशन! आम्ही कंटाळलोत, भूकही लागली!
मांजरे, प्राणी
श्री विजयादूर्गा मंदिर :
श्री विजयादूर्गा मंदिर : केरीफोंडा- गोवा.
संत ज्ञानेश्वर मंदीर नेवासा!
संत ज्ञानेश्वर मंदीर नेवासा!
विक्रीसाठी ठेवलेली
विक्रीसाठी ठेवलेली पालेभाजी
लाल माठ, मुळा, शेपू, पालेभाजी
चांदडे - अर्थात चांदिचे नाणे
चांदडे - अर्थात चांदिचे नाणे (एका गाडलेल्या धनात सापडलेले) .
(No subject)
रक्षाबंधन, राखी
रक्षाबंधन, राखी
(No subject)
अशीच एक घाटवाट...
अशीच एक घाटवाट...
वास्तुशांत पूजा
वास्तुशांत पूजा
ही वाट दूर जाते स्वप्नामधील
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.
हे वरील घाट वळण ओळखीचे
हे वरील घाट वळण ओळखीचे वाटतेय!
(No subject)
विष्णुयागाची तयारी.
विष्णुयागाची तयारी.
सोनकीची फुले
सोनकीची फुले
पिकासा अप्लोड बंद झालेय,
पिकासा अप्लोड बंद झालेय, फ्लिकर वरून कसे अप्लोड करायचे कुणी सांगेल का?
चंद्रभागा, पंढरपूर
चंद्रभागा, पंढरपूर
काशी.
काशी.
मित्रांसवे माळावरती पतंग
मित्रांसवे माळावरती पतंग उडवीत फिरताना
गुढी सजवण्यातली आणि
गुढी सजवण्यातली आणि उभारण्यातली मजाच निराळी. त्याच एका कारणासाठी गुढीपाडव्याची आतुरतेने वाट बघते.
नलिनी - गुढी मस्तच !
नलिनी - गुढी मस्तच !
सुवर्णमंदिर : अमृतसर!
सुवर्णमंदिर : अमृतसर!
हर्पेन, धन्यवाद!
हर्पेन, धन्यवाद!
(No subject)
नलिनी, सगळेच फोटो मस्त आहेत..
नलिनी, सगळेच फोटो मस्त आहेत..
मोदक.
मोदक.
मॅगी, धन्यवाद!
मॅगी, धन्यवाद!
Pages