मातृत्व

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तिचं बाळं तिच्या गर्भात रुजताना

त्याच्या जन्माआधीचं
जन्माला आलेलं असतं
तिचं वात्सल्य.. तिचं प्रेम
अगदी निरपेक्ष!!!

ते फक्त तिच्याचपाशी असतं
तिच्या प्रत्येक स्पंदनात असतं
तिच्या पोटात असतं
त्याला कुणिचं धक्का लावू शकत नाही!

तिचं प्रेम
कधीच बदलत नाही
कधीच संपत नाही
कधीच उणे होत नाही
कधीच सरत नाही की मरत नाही

आयुष्याच्या प्रवासात नातीगोती
येतात जाता.. उरतात राहतात
त्यांचं प्रेम बदलत राहत
कधी हेतूपुर्वक तर कधी अपेक्षानिशी!
पण तिचं प्रेम मात्र
निरपेक्ष.. निर्हेतुक असत!

हर्ट

प्रकार: 

धन्यवाद अनु.

कधीकधी मातृत्वाचा फार फार हेवा वाटतो. पुरुषांना हा हक्कचं नाही!

बी, सुंदर कविता.

<<तिचं बाळं तिच्या गर्भात रुजताना
त्याच्या जन्माआधीचं
जन्माला आलेलं असतं
तिचं वात्सल्य.. तिचं प्रेम
अगदी निरपेक्ष!!!>>

एकदम छान!