पुणेकर मित्र मैत्रिणिंनो,
दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.
ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.
परिक्षार्थींना प्रश्न वाचून दाखवणे, त्यांनी दिलेले उत्तर मराठीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिणे असे साधारण शालेय पातळीवरील लेखनिकांच्या मदतीचे स्वरूप आहे. ह्या वयोगटासाठी केवळ वाचणे आणि लिहिता येणे ह्या कौशल्यांची गरज आहे.
इच्छूक लेखनिकांनी परिक्षाकेंद्रावर स्वतःच जायचे आहे आणि ह्या सेवेचा कोणताही मोबदला नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. शासनाकडून अशा लेखनिकांसाठी काही नगण्य मोबदला दिला जातो, तो हवा असल्यास आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्यास हरकत नाही.
लेखनिकांची विविध वयोगटांसाठी, विविध परिक्षांसाठी आणि विविध गावांमध्ये वरचेवर आवश्यकता असते. परिक्षेच्या प्रकारानुसार लेखनिकांच्या मदतीच्या स्वरुपात बदल होतात. ज्यांना ह्या कालावधीसाठी शक्य नाही, मात्र इतर वेळी कधी ते उपलब्ध होऊ शकणार असतील, तरीसुद्धा संपर्क साधावा. त्यांच्या मदतीचा खुप उपयोग होऊ शकेल. परिक्षांव्यतिरिक्तदेखिल ह्या विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम सुरू आहेत, आत्ता तो विषय प्राधान्याचा नसल्यामुळे ते तपशील इथे देत नाही.
मनःपुर्वक धन्यवाद
२७ ऑगस्ट - शनिवार असल्यामुळे
२७ ऑगस्ट - शनिवार असल्यामुळे मी सगळ्या टाइम स्लॉट्ससाठी माझं नाव देवु इच्छिते. नंबर संपर्कातुन पाठवते आहे लगेच.
(पुर्वी गांधिभवन जवळच्या अंधशाळेत खुप वेळा हे काम केल्याचा अनुभव आहे)
सई, तुझा संपर्क बंद आहे.
सई, तुझा संपर्क बंद आहे. तुला माझा नंबर कसा देवु?
सई, तुझ्याकडे माझा नंबर असेल,
सई, तुझ्याकडे माझा नंबर असेल, तर मला वॉट्सअॅप वर संपर्क साध.
त्यावर तुला मी पुण्यातील अभिनव शाळेतील माझे रिलेटीव्ह असलेल्या एका सिनियर शिक्षकांचे नाव/नंबर देतो, ज्यांनी यापूर्वीही बरेचदा अशाप्रकारे अंध विद्यार्थ्यांकरता लेखनिकांची व्यवस्था केली आहे. अर्थातच, पूर्वी लेखनिकाचे काम केलेल्यांचा तपशील ते पुरवू शकतील असे वाटते.
मला जमणार नाही पण अनेकानेक
मला जमणार नाही पण अनेकानेक शुभेच्छा
सॉरी मंडळी, माझा माबो संपर्क
सॉरी मंडळी, माझा माबो संपर्क ब-याच काळापासून बंद आहे, इथे प्रतिसादात लिहिल्यास मीच स्वत: संपर्क करेन.
मनिमाऊ, धन्यवाद
एल्टी, ओके, मेसेज करते.
सई, मला इथे द्यायचा नाही माझा
सई, मला इथे द्यायचा नाही माझा सेल नंबर. तु दक्षुची सई आहेस का? तर तिच्याकडे माझा नंबर आहेच.
शिवाय तिच्या फ्रेंड्स लिस्टमधुन तुला शोधुन मी FB मेसेंजर वर नंबर पाठवु शकते.
खूप चांगला उपक्रम. माझे मराठी
खूप चांगला उपक्रम.
माझे मराठी लेखन सध्या कोंबडीचे पाय स्वरुपातले असल्याने नाही जमणार, पण आईला सांगू का?
आई गणित सायन्स शिक्षीका होती.
माझे मराठी लेखन सध्या
माझे मराठी लेखन सध्या कोंबडीचे पाय स्वरुपातले असल्याने नाही जमणार, >> +१
शुभेच्छा.
हो हो, मी दक्षुची सईच आहे
हो हो, मी दक्षुची सईच आहे
उपक्रमास शुभेच्छा. एक
उपक्रमास शुभेच्छा.
एक शंका:
अशा परिक्षेत उदा. १०वीचा विद्यार्थी असेल, तर ९वीच्या आतील मुले लेखनिक म्हणून अलाऊड असतात, असं काहीसं ऐकलं होतं. ते बरोबर आहे का?
एक व्हॉटसअॅप मेसेज बनवून
एक व्हॉटसअॅप मेसेज बनवून दिला कॉन्टॅक्ट नंबर सहित तर विश्वासू ग्रुप ना फॉरवर्ड करता येईल.(अर्थात फोन नंबर उघड व्हायची तयारी असेल तर.)
मला आवडेल केदार ८३९०३७६००७
मला आवडेल
केदार ८३९०३७६००७
उपक्रमास शुभेच्छा,
उपक्रमास शुभेच्छा, सई.
दक्षुची सई, सो स्वीट.
अका, हो, तसे नियम विद्यापीठीय
अका, हो, तसे नियम विद्यापीठीय परिक्षांसाठी आहेत.
अनु, तसा ग्रुप ऑलरेडी आहे.
केदार, फोन करते रे.
मला २७ अॉगस्टला जमेल.
मला २७ अॉगस्टला जमेल.
ओके सई
ओके सई
येण्यात मलाही आनंद झाला असता,
येण्यात मलाही आनंद झाला असता, पण सध्या अमेरिकेत आहे, म्हणुन नाइलाज आहे, पण सात आठ महीन्यानंतर सम्पर्क साधावा. जरुर येइन.
सई, तुला FB messenger वर
सई, तुला FB messenger वर माझा सेल नंबर दिला आहे.
उपक्रमास शुभेच्छा..
उपक्रमास शुभेच्छा..
उपक्रमास शुभेच्छा,
उपक्रमास शुभेच्छा, सई.
दक्षुची सई, सो स्वीट.>>>>>> +१.
जिज्ञासा, ओके. शुभेच्छांसाठी
जिज्ञासा, ओके.
शुभेच्छांसाठी सर्वांना धन्यवाद _/\_
लेखनिक म्हणून बाबा बऱ्याचदा
लेखनिक म्हणून बाबा बऱ्याचदा जातात. ते सध्या पुण्यात आहेत, त्यांच्या कानावर घालतो.
शुभेच्छा.
अमितव, जरूर सांगा.
अमितव, जरूर सांगा.
अमितव, जरूर सांगा.
अमितव, जरूर सांगा.
दक्षुची सई, स्थळ सांगू शकशील
दक्षुची सई, स्थळ सांगू शकशील का?
मला ऑफिसमुळे जमणार नाही, पण मुलाला विचारते. मी निगडीत रहाते. दक्षु मला ओळखते.
सई, उपक्रमास शुभेच्छा. ऑगस्ट
सई,
उपक्रमास शुभेच्छा.
ऑगस्ट मध्ये काही कारणास्तव जमणार नाही पण नंतर नक्कीच सहभागी व्हायला आवडेल. तुम्हाला संपर्क कसा करता येईल ?
मला नक्कीच आवडलं असतं. पण मी
मला नक्कीच आवडलं असतं. पण मी मुंबैइत आहे.
उपक्रमास शुभेच्छा.
माझी सई, मी पण २७ ऑगस्टला
माझी सई, मी पण २७ ऑगस्टला उपलब्ध होईन. नक्कीच
उपक्रमाला शुभेच्छा.
उपक्रमाला शुभेच्छा.
विनिता, कोरेगाव
विनिता, कोरेगाव पार्क.
दक्षिणा, ग्रेट!
अतरंगी आणि सर्व, धन्यवाद _/\_
Pages