पुणेकर मित्र मैत्रिणिंनो,
दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे.
२३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही.
ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा. वेळापत्रक, शाळेचा पत्ता, इतर लेखनिकांचे संपर्क आणि काही आवश्यक जुजबी माहिती, इत्यादी तपशील प्रत्यक्ष बोलून आणि वैयक्तिक संपर्कातून देता येतील.
परिक्षार्थींना प्रश्न वाचून दाखवणे, त्यांनी दिलेले उत्तर मराठीमध्ये उत्तरपत्रिकेत लिहिणे असे साधारण शालेय पातळीवरील लेखनिकांच्या मदतीचे स्वरूप आहे. ह्या वयोगटासाठी केवळ वाचणे आणि लिहिता येणे ह्या कौशल्यांची गरज आहे.
इच्छूक लेखनिकांनी परिक्षाकेंद्रावर स्वतःच जायचे आहे आणि ह्या सेवेचा कोणताही मोबदला नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. शासनाकडून अशा लेखनिकांसाठी काही नगण्य मोबदला दिला जातो, तो हवा असल्यास आपापल्या पातळीवर प्रयत्न करण्यास हरकत नाही.
लेखनिकांची विविध वयोगटांसाठी, विविध परिक्षांसाठी आणि विविध गावांमध्ये वरचेवर आवश्यकता असते. परिक्षेच्या प्रकारानुसार लेखनिकांच्या मदतीच्या स्वरुपात बदल होतात. ज्यांना ह्या कालावधीसाठी शक्य नाही, मात्र इतर वेळी कधी ते उपलब्ध होऊ शकणार असतील, तरीसुद्धा संपर्क साधावा. त्यांच्या मदतीचा खुप उपयोग होऊ शकेल. परिक्षांव्यतिरिक्तदेखिल ह्या विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम सुरू आहेत, आत्ता तो विषय प्राधान्याचा नसल्यामुळे ते तपशील इथे देत नाही.
मनःपुर्वक धन्यवाद
जिज्ञासा, प्लीज संपर्क बघ आणि
जिज्ञासा, प्लीज संपर्क बघ आणि तुझा नंबर कळव.
सई...उत्तम उपक्रम! उशीर
सई...उत्तम उपक्रम! उशीर झालेला आहे पण अजुन ही काही स्लॉट्स रिकामे असतील तर..
माझ्या अहोआई (साबा) यांना हे काम करायला आवडेल.
दासबोधाच्या समिक्षक असल्याने लेखनाचा सराव ही आहे.
माझा माबो वरिल संपर्क बंद असावा... केदार जाधव यांचा सं.क्र. दिसतो आहे तिथे माझा क्र. दिला तर चालेल का?
@केदार जाधव तुमचा क्र. मध्यस्त म्हणुन वापरला तर चालेल का?
धन्यवाद _/\_
उपक्रमास शुभेच्छा
उपक्रमास शुभेच्छा !
मुंबईसाठी हवे असल्यास कळवावे.
मंडळी, ह्या परिक्षांसाठी
मंडळी, ह्या परिक्षांसाठी लागणारी व्यवस्था झाली आहे, सर्वांचे आभार.
नीरा, धन्यवाद, पुढच्या परिक्षांसाठी पुन्हा गरज लागेल, त्यासाठी आणि सर्वच आवश्यकतांसाठी काही नियमीत व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे, तेव्हा नक्की संपर्क करू.
आशिका, धन्यवाद
मुंबईसाठीही हवे असतात, कळवूच.
धन्यवाद सई , या उपक्र्माची
धन्यवाद सई , या उपक्र्माची ओळख करून दिल्या बद्दल .

आताच २ पेपर लिहून आलो . त्या विद्यार्थ्यांची "पॉजिटीव्ह एनर्जी " पाहून अगदी बर वाटल
आता उद्याची वाट पहाणे . माझ्या मित्राने सांगितलय , दादा उद्या पण तूच ये
आशिका, धन्यवाद स्मित
आशिका, धन्यवाद स्मित मुंबईसाठीही हवे असतात, कळवूच.>>>>>>>> मलाही कळवा.
केदार, खुप छान वाटलं वाचून.
केदार, खुप छान वाटलं वाचून. त्याला तुझ्यातल्या पॉझिटीव्ह एनर्जीची ओळख लागली बघ
नक्की सस्मित.
एम् ए प्रथम वर्षाच्या सायबर सिक्युरिटी विषयासाठी इंग्रजीतून पेपर लिहिण्यासाठी ७ लेखनिक हवे आहेत.
सोमवार, २९-८-१६.
स्थळ - गरवारे कॉलेज.
वेळा अजून समजायच्या आहेत.
कुणाला शक्य असेल तर कळवा.
सई , दक्षिणाच अक्षर अगदी छान
सई , दक्षिणाच अक्षर अगदी छान आहे ग

शनिवारीही मजा आली , मनिमाऊ , दक्षिणा आणखी काही माबोकरही भेटले
पुन्हा एकदा धन्यवाद
केड्या सईचं अक्षर बघ एकदा,
केड्या
सईचं अक्षर बघ एकदा, मग माझं अक्षर म्हणजे शाईतून गांडूळ वळवळत गेलाय असं वाटेल
(अतिशयोक्ती नाही, लहानपणी माझ्या अक्षराला माझा काका असंच म्ह्णायचा)
सईचं अक्षर बघ एकदा, मग माझं
सईचं अक्षर बघ एकदा, मग माझं अक्षर म्हणजे शाईतून गांडूळ वळवळत गेलाय असं वाटेल >> . मी माझ्या अक्षराबरोबर तुझ कंपेअर केल
केदार, ग्रेट! मिनी गटगच झालं
केदार, ग्रेट! मिनी गटगच झालं तुमचं. आणि नेमकी मी नव्हते या वेळेला

आणि हो अरे, दक्षिणाचं अक्षर पूर्वी खराब होतं, आता छान आहे
मनिमाऊ, पोर्णिमा, दक्षिणा, तुमचा कसा होता अनुभव?
मला पण मस्त अनुभव. एकच दिवस
मला पण मस्त अनुभव. एकच दिवस जायला मिळालं याचं थोडं वाईट वाटलं. पुढच्या परिक्षांना सर्व पेपरना जायला जमेल असं काहीतरी करणार आहे मी.
अजून एक म्हणजे शाळा सोडून य वर्ष झाली, अभ्यासा ची उजळणी झाली.
केदार हुशार आहे.
आणि मी पहिल्यापासून 'ढ' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
पण मग तू तुझा पेपर त्याला का
पण मग तू तुझा पेपर त्याला का दाखवत होतीस / तो तुझा पेपर का बघत होता

सई, थँक्स ! पुर्वी गांधिभवन
सई, थँक्स ! पुर्वी गांधिभवन अंधशाळेत जायचे, पण ते मागे राहुन गेलं होतं. तुझ्या धाग्यामुळे परत एकदा उत्साह आला आणि खुप वर्षांनी परत एकदा या उपक्रमात सहभागी होता आलं. खुप छान वाटलं.
माझ्या अक्षराबद्दल न बोललेल बरं. मला मराठी लिहायची कधीच सवय नव्हती. आता कित्येक वर्ष तर एक अक्षरही नाही. त्यामुळे गेले ४-५ दिवस रोज सकाळमधुन पाहुन शुद्धलेखन केलं, पण ते आता नियमित करुन स्वरुपना माझा पेपर पुढच्या वेळेस दाखवायचा आहे. (परवा स्वरुपने माझा पेपर पाहिल्यावर त्यांच्या चेहर्यावर जे काही भाव होते ते अतीच बोलके होते.
त्यामुळेच मी तर चॅलेंज घेतलं आहे)
केदार हा अत्यंत हुशार आणि प्रचंड बडबड्या माणुस आहे. त्याचा उत्साह पाहुन दमलेच मी. दक्षला खुप महिन्यांनी भेटले त्यामुळे खुष झाले. तेवढ्यात आम्ही पटापट शॉपिंगच्या गप्पाही मारुन घेतल्या.
केदार, स्वरुप आणि दक्ष > या वेळचं मिनि गटग थोड्क्यात आटोपलं, पण पुढ्च्या वेळेस कॉफी प्यायला जावुयात रे. अजुन कोणी होतं का, ज्यांना मी ओळखत नव्हते?
मस्त मस्त! शुद्धलेखनाचा
मस्त मस्त!
शुद्धलेखनाचा सराव, अभ्यासाची उजळणी वगैरे भारीच.

दक्षिणा, ब्राव्हो! आणि केदार नुसता हुशार नाही, कंसिस्टंट आणि डेडीकेटेड पण आहे
मनिमाऊ, आम्ही गेलो होतो दोनदा कॉफी प्यायला. पेपरनंतर भेटल्यावर चांगली चर्चा पण होते. पुढच्या वेळी मीसुद्धा असेनच शक्यतो. माबोकर PG पण आलेली शनिवारी. तुझी गॅपनंतर पुन्हा सुरूवात झाली, ही आनंदाची गोष्ट आहे
मला खुप छान वाटलं वाचून. तुम्हा सगळ्यांना थँक्स.
हर्षद, तिथे गेल्याशिवाय परिस्थिती समजणार नाही. सिरियसली.
हार्पेन काही अनुभव शब्दातीत
हार्पेन काही अनुभव शब्दातीत असतात, तिथे हे असले नियम लागू होत नाहीत,
अतरंगी तुमच्या धाग्यात हे
अतरंगी तुमच्या धाग्यात हे सामिल करते आहे त्या बद्दल कृपया माफ करा, कारण कुठे लिहावे हे कळले नाही. पण हा ही एक सामाजीक उपक्रम आहे.
पुण्यात विवीध शाळांमध्ये ८ ते १० वी मध्ये शिक्षण घेणार्या अंध मुलांची परीक्षा सुरु आहे कोरेगाव पार्क येथे संत गाडगे बाबा या शाळेत दुपारी १२ ते ३ या दरम्यान पेपर होत आहेत तर या मुलांना मदतनीस ( बदली रायटर्स ) मिळत नसल्याने परीक्षा देता येत नाहीये. हे विद्यार्थी मराठी माध्यमातुन परीक्षा देत आहे तर मदतनीसांची तातडीने आवश्यकता आहे. मदत करु शकणार्यांनी खालील नंबर वर संपर्क साधा.
किरण तासगावकर यांचा मोबाईल नंबरः८२३७००८६५७ अथवा निशीगंधा, मोबाईल नंबरः- ८४०९०९२०६
हा वरील मेसेज मला वॉटस अप वरुन आला आहे. फोन करुन कुणी खात्री करुन घेतल्यास इथे जरुर लिहावे म्हणजे इतरांना बरे पडेल. मी करु शकत नाही कारण मी बाहेर गावी जात आहे.
Submitted by रश्मी.. on 12 November, 2017 - 17:18
Pages