बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद, सावली . बसतोच आतां ठाण मांडून टीव्हीसमोर.
सिंधुला शुभेच्छा. शी डिझर्वस अ‍ॅट लिस्ट अ सिल्व्हर मेडल !

चीनच्या 'सुप्रिमसी'ला ग्रहणच लागलंय. इंग्लंडने त्यांच्या टॉप जोडीला हरवून ब्राँझ पटकावलं ! तिसर्‍या गेममधे तर चीनच्या जोडीला त्यानी डोकं वर काढूंच दिलं नाहीं !

अरे चीनला झालय काय? मेन्स डबल्स ब्रॉन्झ मॅच हारले ते सुद्धा इंग्लंड कडून!! आणि महिला दुहेरीत पण हारले. महिला एकेरीत चीनचे आव्हान संपुष्टात आले ली झुरेई हारल्यावर. आता पुरुष एकेरीत ली चाँग ने लिन डानला हारवले तर चेन लाँग आला अंतिम सामन्यात तरी त्याची खैर नाही.

सिंधू लगे रहो. आणि हा सामना जिंकून पुढल्या सामन्यात कॅरोलिना मरिनला धूळ चार. कॅरोलिना ही बॅडमिंटनमधली सध्याची सर्वात माजखोर आणि अखिलाडू खेळाडू आहे. तिला एकाच सामन्यात एकदा दोन रेड कार्ड मिळाली होती. शटल परत न करणे, प्रत्येक पॉइंटनंतर मुठी उगारून किंचाळणे असे सर्व प्रकार ती करते.

सिंधुने एकदम एकाग्रता आणी सातत्य राखले पाहिजे. ही ओकुहारा पिछाडी भरुन काढण्यात वाकीब दिसते आहे तिच्चा इतिहास बघता.

फोकस इज मस्ट फॉर सिंधू... बॅगेज न घेता खेळणं इज व्हेरी इंपॉर्टंट.. टेन्शन येतंय च्यायला बघताना !
काय स्ट्रेच आहे तिचा... !

सिंधुच्या डाव्या बाजूला केलेला स्मॅश सिंधुने मागे न परतवतां जरा उशीरा खेळून मनगट वळवून नेटजवळ क्रॉस-कोर्ट ड्रॉपप टाकला ती तिची सर्वांत अप्रतिम खेळी वाटली. कीप अप !

ओकुहारा दमली आहे. सिंधु पॉइण्ट्स किल न करता तिला अजून दमवते आहे.

गोपीचंद अकादमी त्यांच्या एक्स्ट्रीम फिटनेस फोकस आणि ड्रिल्सबद्दल प्रसिद्ध आहे. ते का ते इथे दिसतेच आहे.

ओकुहाराचा गेम सिंधूएवढा नाहिये. सिंधू चुका करून तिला पॉईंट्स देत होती. आता चांगला लीड घेतलन. keep it up Sindhu !!!

ओकुहारा पडतीय सारखी.

जिंकली Happy मॅच बघितली नाही, स्कोअर फॉलो करत होते. मध्येच एक कॉल आला तेव्हा १० पॉइन्ट्स होते कॉल झाल्यावर बघितलं तर मॅच जिंकली सुद्धा. १० च्या पुढे जाउच दिलं नव्हतं ओकुहाराला. भारी भारी. रेकॉर्डेड मॅच बघायला मिळाली तर बघेन नक्की.

Pages