बॅडमिंटन (रिओ ऑलिम्पिक्स)

Submitted by टवणे सर on 11 August, 2016 - 00:45

उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.

पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्‍यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.

महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.

पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्‍या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अ‍ॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंधूचा सामना पहायचा चुकला . जाम हळहळलो !
सिंधूचं अभिनंदन, तिला शुभेच्छा.
गोपिचंदचंही कौतुक. >>>>> + १११११११११११११

अवांतर -
भरतजी, आपण सुचवलेली लिंक वाचली. प्रशिक्षक व खेळाचा शास्त्रोक्त अभ्यास याचं महत्व फार छान अधोरेखित केलंय त्या लेखात. धन्यवाद. फक्त त्यांतील अपर्णा पोपट यांच्या गोपीचंदबद्दलच्या या कौतुकांत उपखंडातील खेळाडूंबद्दलची एक वेदनाही दडलेली दिसली -
" ‘‘In India we are proud of our traditions and I’ve had coaches tell me to desperately hold onto our wristy game. But Gopi broke out of that pattern. He was willing to sacrifice the beautiful strokes because that was the need of the hour. He shattered the myth,’’ she says. It needed a shuttler to boldly drop the cloak of pretty badminton, and he did that." - अपर्णा पोपट.
मनगटी लवचिकता व त्यामुळे खेळात येणारी नजाकत, मोहक कसब याची जादू औरच असते. ती टिकवूनही जागतिक स्पर्धेत वरचढ होणं अशक्य नसतं, असाही एक विचारप्रवाह आहे. बॅडमिंटमधे नंदू नाटेकरपासून, गोयल, पदुकोण, अगदीं स्वतः गोपीचंदपर्यंतची, अशीं उदाहरणंही आहेत. पाकिस्तानी हॉकी खेळाडूनी मनगटी खेळ व शॉर्ट-पासिंग या आपल्या स्वभाविक शैलीचं अप्रतिम प्रदर्शन करत १९८२चा मुंबईतला विश्वचषक युरोपियन संघाना अक्षरशः 'मामा' बनवत जिंकला होता. पण उपखंडातल्या खेळाडूना या लवचिकतेची दैवी देणगीच आहे हें हेरून इतर देशानी 'पॉवर गेम'ची उंची अशा स्तरावर नेली कीं गोपीचंदवर ".. He was willing to sacrifice the beautiful strokes because that was the need of the hour. ", ही पाळी येवून ठेपली. आतां बॅडमिंटन, हॉकी व कांहीं अंशी क्रिकेटही, या खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने पहाताना तीव्रतेने जाणवतं कीं भारतीय खेळाडूना बव्हंशी आपला स्वाभाविक लवचिक खेळ बाजूला ठेवूनच कांहींसं परकं कसब आत्मसात करूनच स्पर्धेत उतरावं लागतं. कदाचित, म्हणूनच त्यांचा खेळ पूर्णपणे बहरत नसावा. बॅडमिंटन व हॉकी या दोन खेळात तर हें प्रकर्षाने जाणवतं. [ शिवाय, खेळातलीही बरीचशी गंमत यामुळे निघून गेली, हे अर्थात माझं वैयक्तीक मत आहेच !]

गो सिंधू गो.. एक नंबर झाली कालची मॅच..

यंदा एकूणच चायनीज वर्चस्वाला धक्का बसलेला आहे... अर्थात हे काही ऑलिम्पिक मधेच घडले आहे असे नाही तर वर्ल्ड सिरिज मधे पण बर्‍यापैकी टफ फाईट होते आजकाल चायनाच्या विरुद्ध....

सायना नेहवालचे सध्याचे कोच गोपीचंद नाहीयेत.. तिने मध्यंतरी कोच बदलले.. त्यामुळे पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बदल घडलेत तिच्या खेळात..

Sindhu lai jabari khelali kal ....mage asunahi nantar pudhe aali ...that's the spirit ...१ st game was tough ...but she made it ....c'mon sindhu u will grab semi also ...let's hope so.

अरे काय तुफान सामना चालू आहे. लिन डानच्या तोडीस तोड खेळतोय हा पठ्ठ्या.
जस्ट टू रिमाइंडः लिन डान बॅडमिंटना ब्रॅडमन, सर्जेई बुब्का, उसेन बोल्ट, ब्योन बोर्ग सगळे कम्बाइण्ड आहे

थर्ड गेमः ११-८ श्रीकांत आघाडीवर आणि आता तो दुसरी गेम जिंकला त्या कोर्टमध्ये खेळेल.

लिनच्या विरुद्ध एव्हडे खेचणे हे जिंकण्यासारखेच आहे.

गेम टाइड ओन १३-१३. लिन बॅक इन फॉर्म.
मी लिनला नेटवर एव्हडे खेळताना कुणाला पाहिले नाही, ली चाँग आणि केन्टो मोमेटो सोडून.

लिन आघाडीवर १६-१४
फार अवघड श्रीकांतला इथून मॅच फिरवणे

Great match. Put doubts in the champion's mind. १९-१७ ला उतावीळ केली. सर्वहिस रिटर्न करताना.

भरत १९-१७ ला नाही. त्याच्या आधी १३-१३ असताना जे दोन पॉइन्ट गमावले त्याने फरक पडला.
टेक अ बाउ, लिन डान. हा पठ्ठ्या तिसरे ऑलिप्मिक खेळतोय, दोनदा जिंकला आहे, दोन वेळा निवृत्त झाला आहे तरी खेळण्याचा जोश अंगात आहे

मस्तच झाली मॅच ! लिनचं अभिनंदन .
श्रीकांत नेटवर छान खेळत होता पण शेवटीं त्याचे तीन 'टॉस' बाहेर गेले तिथं सामना फिरला. श्रीकांतचं 'मॅच टेंपरॅमेंट' खर्‍या चॅम्पियनचं आहे. बॅड लक. त्याचं नांव पुढील कांहीं वर्षं दुमदुमत रहाणार, हें निश्चित. शुभेच्छा.

हार्ड लक श्रीकांत Sad
फार भारी झाली मॅच. विशेषतः दुसरा आणि तिसरा गेम.
तिसर्‍या गेममध्ये श्रीकांतचा अनुभव कमी पडला असं वाटलं एकूण. पण जबरी खेळला तो.

मस्त झाली मॅच!! मला जास्त कळत नाही गेम पण बघायला खूप मज्जा आली. श्रीकांत भारी खेळला. दोघांनीही एकमेकांचा गेम जोखुन स्वतःच्या खेळात बदल केले. बहुतेक शेवटी अनुभव (खेळातला आणि मन भक्कम ठेवण्याचा) कमी पडला.

वेल डन श्रीकांत!! यु मेड वर्ल्ड नं ३ टु वरी फॉर गुड पार्ट ऑफ द गेम!

यु मेड वर्ल्ड नं ३ टु वरी फॉर गुड पार्ट ऑफ द गेम!
>>
लिन वर्ल्ड न> ३ आहे कारण त्याने लंडन ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली आणि दीड वर्षापुर्वी परत आला. चेन लाँग वर्ल्ड नं १ असला तरी कधीच बिग स्टेज प्लेयर म्हणुन यशस्वी नाही. ली चाँग वेई नं२ असला तरी प्रत्येक बड्या स्पर्धेत त्याच्या विरुद्ध लिन डॅन अंतिम सामन्यात उभा ठाकला Sad
त्यामुळे लिन डॅन नं३ असला तरी सर्वार्थाने तो नं१च आहे

लिन वर्ल्ड न> ३ आहे कारण त्याने लंडन ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली आणि ....

Frankly like so many Indians I don't follow the game year-on-year. My interest only during Olympics! :-o
But the way the commentators were talking about him, he seemed to be one of the best players of all time. He decides which tournaments he will play and not the Chinese federation. He changes the speed of the game at his will and this he showed in today's game as well. But Shrikant gave him tough fight and didn't allow him mind control many times.

So in that way Shrikant did do a great job!

Now best luck Sindhu! She is also good!

<< गो सिंधू गो..>> गडकरींच्या 'एकच प्याला'ची आठवण आली ! Wink

'क्वार्टर'च्या फेरींत कुणी तरी त्या 'सिंधु'लाही असंच सांगायला हवं होत,
झोड त्या तळीरामला आणि नवर्‍याला पण !!
a-shahaaNapaNa.JPG

भाऊ Rofl

भाऊ.. Rofl

भाऊ.. Lol

सिंधूची सोडून दुसरी सेमी फायनल आहे त्यात चिनी बाई मागे आहे!
तीच मागच्या ऑलिंपिकला गोल्डमेडलिस्ट होती आणि तिने साईनाला सेमीत हरवलं होतं. (आणि नंतर माज केला होता.. की साईनाला बाय फ्लुक ब्राँझ मिळालं वगैरे..! )

सिंधुची मॅच नेमकी किती वाजतां आहे, तें कुणाला कळलं तर कृपया इथं सांगा. अजिबात चुकवायची नाही आहे ती मॅच, रात्रीं कितीही वाजतां असली तरीही !

Pages