तर मराठी साहित्यात पावसाची सुरूवात आणि लिज्जत पापड यांची मैत्री जगज्ञात आहे.
आता इथे 'नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे' असे पापडीय मटेरियल आल्यावर आमच्यासारख्या लाटणंवालीने पापड न लाटणं ,ही काही होण्यासारखी गोष्टंच नाही.
तर हा पहिला पापड!
हा पापड म्हणजे बेफिकीर यांच्या तरहीचे विडंबन आहे.
त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली म्हणून इथे छापण्याचे धाडस करत्येय.
धन्यवाद बेफिकीरजी!
पुन्हैकवार धागा वाह्यात होत आहे
नुकतीच कीर्तनाला सुरुवात होत आहे
मुरतो जसा जसा तो गुंडाळण्यात गझला
त्यांना विडंबण्या मी निष्णात होत आहे
नजरानजर, उसासे, ताटातुटी, दिलासे
प्रत्यक्ष जे नसे ते शब्दांत होत आहे
कणभर स्वतः बदल रे पाहून थक्क होशी
हा केवढा बदल ह्या विश्वात होत आहे
अपुली लहान बुद्धी, नुसते बघत बसावे
बोलायच्या कढीची खैरात होत आहे
( मूळ गझल- ५९६११)
तर , हा पापड लाटायला पाचच मिनिटे वेळ लागला. कारण बेफिजींच्या शब्दातच मोठी कळा होती, मी फक्त चार दोन शब्द बदलले.
*******************************************
दुसरा पापड!
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
कांदाभजी न वाईन बघ फस्त होत आहे
जाऊन का मरावे गर्दीत धबधब्यांशी
गच्चीवरी सुखाची बरसात होत आहे
कृत्रिम लिपस्टिकांची मातब्बरी कशाला
ओठांवरील लाली, पानात कात आहे
डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली
ती डॉक्टरीण आता पैशांत न्हात आहे
ये पावसा असा तू वेळेवरी हमेशा
दुष्काळ कोरडा रे धंद्यास घात आहे
पावसाला सुरूवात झाल्यावर अनिलचेंबूरना भजी नी वाई फस्तं करायची स्वप्ने पडली.
मग फक्तं आणि फक्तं त्यांच्यासाठी रचलेली ही थोडीशी डॉक्टरी गझल.
इथं वाईन पिल्याने अलामतीवर बिलामत आलीय. पण पहिल्या द्विपदीत 'फस्त' शब्द यायलाच हवा होता म्हणे.
तर हा पापड सहा मिनिटात.
**************************
तर चेंबूर दादा म्हणाले की आता हॅटट्रिकच करून टाका.
ते ओरिजिनल लिज्जत पापडवाले पण एका वेळेस तीन तीन पापड लाटतच असत.
त्यामुळे ही एक
स्वप्नातल्या सुगीची रुजुवात होत आहे
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
चाहूल ही सखीची की भास या मनाचा
का नाद पैंजणांचा कानात होत आहे
हृदयात काहिली जी बाहुंमध्ये निमाली
मन थंडगार ओले रानात होत आहे
हे भेटणे घडीचे मग साथ आठवांची
जाऊ नको प्रिये तू का रात होत आहे
पुसतील साजणाला रे या खुणा कशाच्या
'साती जराजराशी वाह्यात होत आहे'
हा पापड भर ओपिडीत लाटला. मध्येच एक पेशंटपण पाहिला.
त्यामुळे मग याला १९ मिनिटे लागली.
असो.
तर नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे.
मायक्रोवेवात एकेक पापड वीस ते तीस सेकंद गरम करा आणि आपापल्या आवडत्या उष्णपेयांबरोबर रिचवा.
******************
तर, इथे लाटायची प्रेरणा घेऊन बाकीचे लाटणीबहाद्दर आले होते.
या त्यांच्या लाट्या.
अमेय२८०८०७
दुपटी धुवायला 'बा' तैनात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
चोरून वळचणीला जे व्हायचे अता ते
सर्वांसमोर बागा-खडकात होत आहे
******
जाग्याव पलटी
वाढेल फार आता बघ रक्तदाब माझा
जर सोय पापडांची फुकटात होत आहे
वाड्या, गढ्या नि गावे नेली धुवून सारी
म्हणतात लोक ह्याला 'सुरुवात' होत आहे
'पलटी' नको उगाचच सेंटी करू स्वतःला
आनंद 'लाट'ण्याची जर बात होत आहे
तोडीस तोड पापड खाऊन घेतले पण
झाले अजीर्ण... डॉक्टर तेलंगणात आहे
****
भास्कराचार्य |
फ्रेंडशिप मागितली, बॉयफ्रेंड आहे म्हणाली
मनातल्या आकांक्षांचा आज घात होत आहे
याची सुधारित आवृत्ती
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा' म्हणाली
आकांक्षिल्या सुखावर हा घात होत आहे
****
anilchembur
घाला मलाच गोळ्या सेवक-प्रधान बोले
गोरक्ष टोळक्यांची जळवात होत आहे.
****
मुक्तेश्वर कुळकर्णी - यांचे पापड गोल नाहीत, पण चालतंय.
कोणास ठाऊक कुणाला काय होत आहे
मलाही नाही उमजत मला काय होत आहे
****
मानव पृथ्वीकर - यांचे पापड उडदाचे नाहीत, नागलीचे आहेत.
ओझोनच्या थराची तडकून काच गेली
पृथ्वीत मावलेली छाया उडुन गेली
अतीनील किरणांनी केला त्वचाक्षोभ
उबदारशा उन्हाची व्याख्या विरुन गेली
वैश्विक तपमानाची चिंता इथे कुणाला
भाकरी लष्कराची करपून पार गेली
******
आणि भरत. याने की आमच्या भमंनी इतके छान शेर रचले की शेवटी त्यांची एक वेगळी तरही झाली.
तर ही भरतनी रचलेली तरही.
और आने दो!
खमंंग मसाला पापड
खमंंग मसाला पापड
- -
- -
मंडळी. इथे पापड म्हणजे गझलाच
मंडळी. इथे पापड म्हणजे गझलाच लाटायच्या आहेत. मूळ पापडाचं व्रुत्त आणि काफिया = यमक कायम ठेवून.
दर दुसर्या ओळीत ....आत होत आहे यायला हवं
सुरुवात, रुजवात, गुजरात. इ.
बाकी कविताही छान होताहेत. पण
बाकी कविताही छान होताहेत. पण त्या पापडाच्या प्लेटमध्ये बसत नाहीत.
ठीक हाय जी!
ठीक हाय जी!
अस्स होय.. धन्स भरत.. बघतो
अस्स होय.. धन्स भरत..
बघतो आता लाटून..तरी पण गोल करायच्या नादात खाली चिटकतोय..!
घुमे गंध अत्तराचा नाकात आज आहे
श्रूंगार उगा का हा आरश्यात होत आहे
न सरले वय अजुनी आशा डोळ्यात आहे
ओलांडली जरी साठी बोहला मनात आहे
हा गंध अत्तराचा नाकात आज
हा गंध अत्तराचा नाकात आज आहे
श्रूंगार का उगा हा आरश्यात होत आहे.
अचे - अरश्यात असे करावे लागेल
अचे - अरश्यात असे करावे लागेल त्यापेक्षा 'ऐन्यात' लिहा
मी पण ऐन्यात सांगायलाच आले
मी पण ऐन्यात सांगायलाच आले होते.
छानच !
छानच !
भारी पापड!"
भारी पापड!"
सगळेच भारी आहेत. माझाही एक
सगळेच भारी आहेत.
माझाही एक प्रयत्न-
रुममध्ये बसून अभ्यास होत नाही,
कसे करावे इंजिनिअरींग या विचारात आहे.
'भाद्रपदातले' पापड विक्राळ
'भाद्रपदातले' पापड
विक्राळ क्रुर कुत्रे लाडात येत आहे
नुकतीच भादव्याला सुरुवात होत आहे
प्रेरणा- संध्याकाळच्या व्हिस्कीवरचा हा प्रतिसाद
साती | 24 August, 2016 - 17:01 नवीन
कृष्णा,
'भाद्रपदातले' धागे -
'पुण्यात कुत्र्यांच्या मेटिंगसाठी योग्य केंद्र सुचवा.'
(No subject)
रात्रीस पार करुनी प्रभात होत
रात्रीस पार करुनी प्रभात होत आहे
उधळण बघ ढगांची नभात होत आहे
उंदीर लागले हे पोटात खेळू खोखो
कळ सोस ही जराशी हा भात होत आहे
अक्का माझे पापड गोल झालेत का
अक्का माझे पापड गोल झालेत का बघ ना जरा
फाटकावूया मिळुनी लोकांस या
फाटकावूया मिळुनी लोकांस या अडाणी
गोरक्षणाचे कार्य जोरात होत आहे
नरेंद्र अन कलबुर्गी बघ पानसरे ही गेले
पुरोगामी या जनांचा निःपात होत आहे
पहिला पापड गोल नाही. दुसरा
पहिला पापड गोल नाही.
दुसरा गोल नाही , बराच गोलसर आहे ; पण उडदाचा नाही.
आप्रेशन करून टाका की मंग,
आप्रेशन करून टाका की मंग, हाकानाका
Pages