मागच्या महिन्यात योसिमिटी व्हॅली मध्ये जाउन आलो. त्यावेळचे काही फोटो.
सुरवात ग्लेसियर पॉईट पासुन केली. नावाप्रमाणे योसिमिटी व्हॅली च्या सगळ्या बाजुनी डोंगर आहे. त्यतिल एका डोंगरावर ग्लेसियर पॉईट आहे जिथे गाडीने जाता येते. ह्या भागावरुन योसिमिटी फॉल, mount vernon falls, नवाडा फॉल, half dome , आणि बर्याच पर्वत रांगा दिसतात.
फोटो मध्ये दोन पर्वत रांगामधिल योसिमिटी व्हॅली दिसत आहे.
ग्लेसियर पॉईट पासुन सहज करण्या सारख्या काही वॉकिंग ट्रेल आहेत. ह्या ट्रेल मध्ये पर्वत रांगा वेगळ्या अॅगल नी दिसतात.
ग्लेसियर पॉईट वरुन व्हॅली ला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. २ मैल डोंगर उतरुन किंवा ५४ मैल गाडीने प्रवास करुन . जर २ मैल डोंगर उतरुन गेलो जर तिथुन परत यायला डोंगर चढुन यावे लागेल. व्हॅली मधल्या शटल बस सेवा ग्लेसियर पॉईट पर्यन्त येत नाही.
ग्लेसियर पॉईट वरुन mount vernon falls base, mount vernon falls top, नवाडा फॉल, half dome चा view. ह्या चार ट्रेल योसिमिटी व्हॅली वरुन करु शकतो . mount vernon falls base ची ट्रेल दिड तासात (सगळ्यात सोपी ) तर half dome ची ट्रेल १२ तासात पुर्ण होते. half dome ची ट्रेल सगळ्यात अवघड असुन त्यासाठी परमिट लागते. mount vernon falls top ला ३ तास तर नवाडा फॉल ला ५ तास लागतात. capacity प्रमाणे कही जास्त वेळ लागु शकतो.
योसिमिटीच्या दुरवर पसरलेल्या पर्वत रांगा वरील बर्फ. ह्या बर्फामुळे water fall मार्च पासुन जुलै- ऑगस्ट पर्यन्त चालु असतात.
ग्लेसियर पॉईट वरुन व्हॅली ला जाताना tunnel view नावाचा पॉईट.
योसिमिटी व्हॅली : धबधब्या तिल पाणि . water fall च्या पायथ्याशी ह्या पाण्याची खोली ५ फुट असते, त्यानंतर ती १ फुटावर येते. पाण्याचा खोली प्रमाणे कायकिंग, राफ्तिंग , किंवा पाण्यात पाय सोडुन बसु शकतो. ऑगस्ट मध्ये water fall बंद झाल्यावर ह्या सगळ्या activities बंद होतात.
mount vernon falls, ह्या पॉईट वरुन पाण्यात ईद्रधनुष्य खुप छान दिसते. फोटो मध्ये ते खालच्या बाजुला दिसत आहे. ह्या पॉईट वर सेल्फी घ्येण्याचा नादात आतापर्यंत सुमारे २५० लोकानी जीव गमावला आहे
mount vernon falls top . अदल्या दिवशी ग्लेसियर पॉईट वरुन ह्याचे दर्शन घेतले होते. मुलाना mount vernon falls base वर ठेवले असल्याने आजुन ट्रॅकिंग नाही केले.
फोटो सुरेख आहेत पण खूप लहान
फोटो सुरेख आहेत पण खूप लहान दिसताहेत. माझ्या मोबाईलचाही issue असू शकतो.
ऑसम ऑसम ऑसम.. फोटो मोठे करून
ऑसम ऑसम ऑसम..
फोटो मोठे करून टाका प्लीज..
फोटो 6MB चे आहेत आणि
फोटो 6MB चे आहेत आणि मायबोलीवर फोटो टाकण्यासाठी १५०kB ची limit आहे. माझ्या कडचे software दोन पर्याय सुचवत आहे. एक तर फोटो छोटे करायचे नाहीतर quality कमी करायची. quality कमी केली तर ईद्रधनुष्य किंवा बाकी बारकावे नाहिसे होतात त्यामुळे फोटो छोटे करुन टाकले आहेत.
अजुन काही उपाय आहे का?
You can upload photos to
You can upload photos to picasa like sites and embed then here by copying the embed code.
पिकासावरून फोटो टाका. माबोवर
पिकासावरून फोटो टाका. माबोवर सेव करून टाकलेत तर हीच साईज राहील. इतके सुंदर फोटो आहेत, खरेच टाका पिकासावरून. लिंक देते हवी तर कसे टाकायचे त्याची
http://www.maayboli.com/node/43465
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
फोटो मध्ये बदल केले आहेत.
फोटो मध्ये बदल केले आहेत. पिकासावरुन घेतले तरी थोडे ट्रिम करावे लागले . पण आता पुर्वी पेक्षा मोठे दिसत आहेत.
जागा खुपच सुंदर आहे त्यामुळे फोटो पण चांगले आले आहेत. दोन फोटो २००mm च्या झुम ने घेतले असल्याने आणि निट फोकस घेत नसल्याने थोडे clear नाहीत पण प्रत्यक्षात मात्र ही जागा खुप म्हणजे खुप मस्त आहे.
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
सुंदर फोटो... इथे जायचे आहे
सुंदर फोटो... इथे जायचे आहे एकदा..
आजपासून पिकासाचा सपोर्ट बंद झालाय.. दुसरा बेस्ट ऑप्शन काय आहे ?
छान फोटो. मागे अबे, अडम की
छान फोटो. मागे अबे, अडम की मैत्रेयीने पण टाकले होते.
शेवटुन दुसरा धबधब्याचा फोटोच
शेवटुन दुसरा धबधब्याचा फोटोच फक्त बरा आहे. बाकी काही खास वाटले नाहीत. अबे यांनी टाकलेले फोटो अप्रतिम होते त्याच्यी आठवण आली. बस्के, आदम, नात्या यांचेही फोटो मस्त होते.
फोटोज मस्त आहेत! २०१३ मध्ये
फोटोज मस्त आहेत! २०१३ मध्ये गेलो होतो त्याची आठवण झाली.
पहिल्या चित्रातला हाफ डोम (half dome) आहे त्यावर जाण्यासाठी अतिशय रोमांचकारी ट्रेल आहे. त्याचं नावच हाफ डोम ट्रेल आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीनं बुकिंग करावं लागतं.