१२ महिन्यांनी आज म्यागी नामक प्रकार पुन्हा करायला (आणि खायला) घेतला. म्हणून म्हटलं दोन मिनिटातच का खेळ खल्लास करा. घेऊया की चांगली १२ मिनिटे.
स्थळ - किचनकट्टा, दक्षिण-मध्य मुंबई
काळ - मध्यरात्रीचा
आचारी - मी स्वत:
मदतनीस - शेजारच्या पिंट्या
मदतीचे स्वरूप - भांडी धुवून देणे.
साहित्य - पॉर्न
जोक होता हं
साहित्य - कॉर्न , कोंबडीचे अंडे, वाटाण्याची भाजी, मटकीची डाळ (बहुतेक हं, मला डाळी स्वत:हून ओळखता येत नाहीत), म्यागी आणि म्यागीचे मसाले, म्यागीचाच टमाटर सॉस, एव्हरेस्टचे नको नको ते मसाले, कांदा आणि कोणचे तर लिंबाचे लोणचे.
अप्रकाशित साहित्य (म्हणजे जे ऊपलब्ध नव्हते, नाहीतर वापरायला आवडले असते) - फरसाण आणि घरगुती लाल ठेचा.
डायलॉग - जिथे लोकांचे पदार्थ बनवून संपतात तिथे माझे सुरू होतात..
तर वरच्या डायलॉगला अनुसरून डाळ आणि उसळ घरात तयार होती. मात्र त्यात कोलसवायला भात नव्हता. ताजा करून द्यायला आई नव्हती. सोबतीला शेजारच्या पिंट्यालाही काहीतरी खाऊ घालायचे होते. त्यांच्याच घरात पडलेली, एक्स्पायरी डेट संपत आलेली आणि त्यानेच हुडकून आणलेली, एक वेज म्यागीचे, एक चिकन म्यागीचे, तर एक येप्पी म्यागीचे पाकीट हाताशी होते. त्यांचीच मारामारी करून काहीतरी बनवायचे ठरवले.
आमचा फ्रिज कधीही उघडा, त्याचा एक कप्पा जणू खुराडाच असल्यासारखी आठ-दहा अंडी सहज हाताला गावतात. भाताचा प्रकार असता तर मोजून चार वापरली असती पण म्यागीच्या मूळ चवीवर कुठेही अत्याचार करायचे नसल्याने एकच उचलले. तसेही शाकाहारी लोकांचा पत्ता कट करायला एकच पुरेसे होते.
एका टोपात मीठ मसाला कांदा लसून कसलेही संस्कार न करता एवढासा तो अंड्याचा जीव फेटून तळून घेतला. याला आपण प्लेन भुर्जी म्हणू शकतो. त्यात वाटाण्याची भाजी आणि हॉट कॉर्न टाकले. कॉर्न मोजून सातच होते. काजू बदाम सारखे नेमक्या सात घासांना लागू नयेत म्हणून चमच्याने चेचून टाकले.
एकंदरीत पहिल्या टप्प्यानंतरचे चित्र असे दिसायला लागले.
त्यावर कांदा आणि म्यागीचा सॉस सोडल्यावर ते असे झाले.
आता म्यागीच्या नूडल्स बनवायची माझी पद्धत, पुढीलप्रमाणे -
एका मोठ्या टोपात पाणी ऊकळवून त्यात सर्व नूडल्स न मोडता टाका, त्या स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी गाळून फेकून द्या.
मग नवीन टोपात त्या धुतल्या नूडल्स घेऊन त्यात खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे थोडेसे पाणी सोडून त्याला पटकन एक उकळी द्या.
अधनामधना एकेक नूडल चिमटीत पकडून, उचलून पटकन तोंडात टाकत खाऊन बघा. कचकच कमी होत नरम पडायला सुरुवात होताच गॅस काढून टाका.
आता अडमतडम मसाले टाकायची वेळ झाली समजा.
आयत्या वेळी काय टाकावे आणि काय नाय अशी धांदल उडायला नको आणि त्या दिरंगाईत नूडल्स नरम पडायला नकोत म्हणून सारे मसाले असे किचनकट्ट्यावर मांडून घ्या.
मसाल्यांचा गालिचा जेव्हा नूडल्सवर असा पसरतो बस्स तेव्हाच, तोंडाला पाणी सुटायला सुरुवात होते
गॅस चालू न करताच वाफाळलेल्या नूडल्ससोबत ते मसाले छानपैकी ढवळून घ्या. मसाले जितके कमी जाळाल तितके चांगले.
हळूहळू म्यागी आपला रंग पकडायला सुरुवात करते आणि तोंडातल्या पाण्याची पातळी वाढत जाते.
आता शेजारच्या चुलीवरील अंड्याच्या टोपात डाळीचे पाणी टाका. फक्त पाणीच टाका. डाळीचे अतिरीक्त कण टाकाल तर रोजच्यासारखा घरचा डाळभात खाल्यासारखे वाटेल.
त्या मिश्रणाला पटकन एक छानशी उकळी देत त्यात दुसर्या टोपातील नूडल्स सोडा.
जास्त ढवळाढवळ न करता फटकन एक चमचा फिरवून गॅस काढून टाका. वेळ लावाल तर एव्हाना धोक्याची पातळी ओलांडलेले तुमच्या तोंडाला सुटलेले पाणी त्यात पडायला सुरुवात होईल आणि आयुष्यभर ढवळतच राहाल.
म्यागी तयार झाली आहे.
पण ताटात घेतल्याशिवाय मजा नाही.
नूडल्स कमीतकमी तुटतील याची काळजी घेतली असेलच. त्यामुळे खायला काटा द फोर्कच वापराल.
(तसेही चमच्याने म्यागी खाणे म्हणजे हाताने वडासांबार खाण्यासारखे झाले)
गर्रमा गरमच खायाची असल्याने त्यावर गार्निशिंग करत त्याचे फोटो टिपायच्या भानगडीत पडलो नाही. वरच्या चित्रातील ताट किचनकट्ट्यावरून बेडरूममपर्यंत जाईस्तोवर, त्यावर एक लिंबू लोणच्याची फोड येऊन बसली होती.
विशेष टीप -- काय नाय. खायला या
- ऋन्मेष
बन्डु, अंडे आणि तुळस.. उगाच
बन्डु, अंडे आणि तुळस.. उगाच पुन्हा १८५७ चा उठाव व्हायचा
@ म्यागी ग्रिलड सॅन्डवीच .. विचार करता ईंटरेस्टींग वाटतेय. मायोनीज, चीज, सॉस चटण्या चोपडून सुके लागणार नाही याची काळजी घेतले की जमेल मलाही. बघायला हवे पिंट्याला पुन्हा मुहुर्त कधी मिळतो. प्रॉपर ग्रिल करायला त्याची मदत लागेल.
भाज्या हा तर म्यागीचा
भाज्या हा तर म्यागीचा अविभाज्य भाग आहे. म्यागीवाले पाकिटाबरोबर भाज्या देत नाही म्हणून भाज्यांशिवाय नुसते मसाले टाकून म्यागी खाणे म्हणजे शर्टपीसवाले बटणं देत नाही म्हणून बटणांशिवाय शर्ट शिवणे. >>
खुदा जाने के , मै (ऋन्मेषपे) फिदा हुं!
मागे मॅगी वापरून विविध
मागे मॅगी वापरून विविध रेसिप्यांची स्पर्धा मॅगीवाल्यांतर्फे घेण्यात आली होती.
त्यातल्या निवडक रेसिपीज मॅगीच्या पाकिटावर छापलेल्या असत.
तसेच काही मासिकांमध्ये गुळगुळीत पानांवर मॅगीच्या जाहिराती असत त्यात या रेसिल्यांचे कलेक्शन छापलेले असे.
त्यात अश्या मॅगीचे वडे/पॅटीस्/ढोकळा/बर्गर/सॅलॅड/ सँडविच / कर्म/कहाण्या छापलेल्या असत.
कॉर्न मोजून सातच होते.>>>.???
कॉर्न मोजून सातच होते.>>>.??? असे मोजुन सात कॉर्न कसे काय राहु शकतात?
असे मोजुन सात कॉर्न कसे काय
असे मोजुन सात कॉर्न कसे काय राहु शकतात? हाहा>>>> त्यांचा आवडता चित्रपट सत्ते पे सत्ता किंवा हम सात सात है असावा.
त्यांचा आवडता चित्रपट सत्ते
त्यांचा आवडता चित्रपट सत्ते पे सत्ता किंवा हम सात सात है असावा. डोळा मारा>>>>>> मस्करी म्हणून नाही. पण फक्त सातच दाणे फ्रीजात रहाणे शक्य नाही. अनलेस ते कुठल्यातरी कोपर्यात, ट्रे मधे वैगेरे सांडलेले मिळाले असतील तर.
सस्मित गूड क्वेश्चन ..
सस्मित गूड क्वेश्चन .. ईन्फॅक्ट एक्सलंट शंका !
पण त्याचे झाले काय, ते कॉर्न एका थर्माकोलच्या यूज एन्ड थ्रो कपमधून पिंट्या खात आलेला. त्याचवेळी ईथे माझ्या डोक्यात म्यागीचा बेत शिजत होता. त्यात मालमसाला म्हणून घरात उरलेसुरले जे हाताला लागेल ते टाकायचे ठरवल्याने मी हात पुढे करत हाताच्या अंतरावर असलेल्या पिंट्याच्या हातून ते कॉर्न खेचून घेतले. पण दुर्दैवाने पाहतो तर काय. कपात सातच कॉर्न शिल्लक राहिलेले. पिंट्यानेही मग सात कॉर्न माफ म्हणत जास्त आढेवेढे न घेता ते मला देऊन टाकले. आणि अशी झाली सातो कॉर्नाची कहाणी सुफल आणि संपन्न
हा पिंट्या म्हणजे होसुमियाघ
हा पिंट्या म्हणजे होसुमियाघ मधला तर नव्हे ?
एक नंबर ओळखलंत.. या
एक नंबर ओळखलंत..
या पिंट्यामागे तोच पिंट्या आहे.
पिंट्याचे मूळ नाव नाही सांगत पण याच्या मोठ्या बहिणीला मी जान्हवी नाव दिले आहे. कारण तिचा माझ्यासाठीचा फेव्हरेट डायलॉग .. "तुझे आपले काहीही असते हा रुनम्या" .. हा तिचा लहान भाऊ, म्हणून याला मी पिंट्या नाव दिलेय.
विकु, >> पिंट्याचे मूळ नाव
विकु,
>> पिंट्याचे मूळ नाव नाही सांगत पण याच्या मोठ्या बहिणीला मी जान्हवी नाव दिले आहे
आधी मी क्षणभर श्वास रोखला. मला वाटले पिंट्याची बहीणही जान्हवीसारखी वर्षोनुवर्षे प्रेग्नंट आहे
आधी मी क्षणभर श्वास रोखला.
आधी मी क्षणभर श्वास रोखला. मला वाटले पिंट्याची बहीणही जान्हवीसारखी वर्षोनुवर्षे प्रेग्नंट आहे >>>>
अगागागागा !!!!
किती रे फेकशील
किती रे फेकशील
मला तर ही रिसीपी आवडली - अहो
मला तर ही रिसीपी आवडली - अहो जेवायला काय नसताना आणि करून द्यायला कोण नसताना काय मिळेल ते करून खायची तयारी असते मग इतका भारी प्रकार असेल तर वववववाला
घरी कोण नसेल त्यावेळी नक्की करेन असा प्रकार .
विश्या, धन्यवाद नक्की करून
विश्या, धन्यवाद
नक्की करून बघा.
फक्त नूडल्स सेपरेट उकळत्या पाण्यात धुवून गाळून घ्या आणि मसाले आधीपासून न जाळता क्लायमॅक्सला अॅड करा.
हे पथ्य पाळलेत की उरलेला मालमसाला तुम्ही आपल्या आवडीने कुठल्याची रंग च व फ्लेवरचा बनवू शकता ही या म्यागीची खासियत
सस्मित, आधीच कॉर्न फक्त सात. खायचे वांधे. त्यात फेकणार काय
आणि वाटाण्याच्या भाजीचं काय
आणि वाटाण्याच्या भाजीचं काय झालं?
भारीय सादरीकरण.
भारीय सादरीकरण.
(No subject)
ohhh my god!!!!!!!! मॅगी
ohhh my god!!!!!!!! मॅगी अशीही बनवतात हे आज कळलं.
दया अली त्या मॅगीची
ॠन्मेष, तुमच्यासारखी
ॠन्मेष, तुमच्यासारखी लिहीण्याची स्टाईल व डेअरींग असतं, तर शप्पथ मीं माझ्याही रेसिपीज टाकल्या असत्या इथं ! किचन ही काय नुसती कूकरच्या शिट्या ऐकायचीच जागा का आहे ? क्रिएटीव्हीटीला आव्हान व वाव देणारी प्रयोगशाळाच आहे ती !! शिवाय, कुणी तरी बाऊन्सर टाकला म्हणूनच तर 'हूक'सारखा सुंदर फटका व हेल्मेट आले ना क्रिकेटमधे !! ' ही रेसिपी प्रत्यक्ष घडताना पाहिलीय मीं', असं सांगण्याचं भाग्य पिंट्यासारखं क्वचितच कोणाच्या तरी वांट्याला येतं !
<< ईथे चव अपलोड करता येत नाही हे माझे दुर्दैव्य ..>> अहो, तसं शक्य असतं, तर इथल्या बर्याच रेसिपीजवर 'यम्मी !', तोंपासू !', 'स्वर्गीय !' , आत्तांच बघणार करून !' इ.इ. कॉमेंटस आल्या असत्या का !!
ऋन्मेष, प्रस्तावना, साहित्य व कृति वाचूनच पोट भरलंय. म्हणून, प्रत्यक्ष पदार्थ आत्तांच नाहीं चाखत.
Pages