Submitted by नितीनचंद्र on 3 August, 2016 - 23:49
माझे एक नातेवाईक थायलंड टुर वर केसरी द्वारे चालले आहेत. केसरीने अर्थातच टुर व्हिसा देऊ म्हणुन सांगीतले आहे. पण त्याची फारच विचीत्र मागणी आहे.
आपण रजेवर आहात याचे एक कंपनीच्या लेटर हेडवर सही शिक्या निशी पत्र हवे आहे. आजकाल रजेचे अर्ज हे पोर्टलवर असतात. लेखी नसतात. ह्या नातेवाईकांच्या कंपनीचे हेड ऑफिस दिल्लीला आहे सबब असे पत्र पुण्याला तात्काळ मिळणे दुरापास्त आहे.
यावर दुसरा पर्याय केसरीनेच सुचवला आहे की वीसा ऑन अरायव्हल ज्याला रुपये २०००/- खर्च आहे.
केसरीने सुचवलेला पर्याय असल्यामुळे तो योग्य असेलच पण
१. असा वीसा ऑन अरायव्हल थायलंडला मिळतो का ?
२. तो मिळायला किती वेळ लागतो ?
३. काय पेपर्स बरोबर असणे आवश्यक असते ?
४. संभाव्य अडचणी काय असतात.
नातेवाईकांची चर्चा चालु होती. म्हणल विचारव मायबोलीकरांना. त्यांचा काय अनुभव आहे ?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विसा ऑन अरायवल थायलंडला
विसा ऑन अरायवल थायलंडला मिळतो.
अर्ध्या तासाच्या आत मिळतो. (लाईन किती आहे त्यावर अवलंबून.)
किंमत त्यांच्या टूरिजम साईटवर मेंशन केलीय तितकीच. रूपयात १८००-२००० व्हावी.
पासपोर्ट आणि ट्रॅवल डिटेल्स लागतात म्हणजे हॉटेल बुकिंग आणि परतीची डेट असलेला कागद.
(खरं तर फक्त पासपोर्ट आणि व्हिसा फी असली की बास. त्यांना पर्यटक हवेच असतात.)
व्हिसा ऑन अरायवल थायलंडला
व्हिसा ऑन अरायवल थायलंडला मिळतो. वेळ फार नाही, मला वाटतं फार तर अर्धा तास लागला होता. डॉक्युमेंट्स काय लागले होते ते आता लक्षात नाही कारण बरीच वर्ष झाली प्रवास केल्याला पण पासपोर्ट, ज्या देशात रहाता त्याचं रेसिडन्स प्रूफ, हॉटेल बुकिंग वगैरे लागत असावं.
व्हिसा ऑन अरायवल अगदी आरामात
व्हिसा ऑन अरायवल अगदी आरामात मिळतो. मी डिसेंबर २०१५ मध्येच जाऊन आलोय. साधारण अर्धा ते एक तास लागतो (गर्दी आणि तुमची पोचण्याची वेळ यामुळे थोडाफार फरक पडू शकतो). ही Immigration Bureau Thailand ची वेबसाईट (https://extranet.immigration.go.th/voaonline/voaonline/VoaonlineAction.do) आणि आधीच ऑनलाईन अर्ज करून, पीडीएफ अर्ज प्रिंट करून, फोटो लावून तयार ठेवणे चांगले.
तिथे कागदपत्रांबद्दल सर्व माहिती आहेच तरीही हे वाचा:
The Visa on Arrival must be used only on the date of issue
• Must be the citizens of nationalities accordance with Ministry of Interior’s announcement. (यात भारत आहेच )
• Passport must be genuine and over 30 days validity.
• Purpose of touring not more than 15 days.
• Must have confirmed return ticket within 15 days.
• Must notify the address In Thailand that can be verified. (हॉटेल बुकिंग ची प्रत)
• Not under section 12 Immigration Act B.E.2522 (A.D.1979)
• Visa fee in Thai currency only (Cash)/Non-refundable (१००० बाथ मी गेलो तेव्हा होती)
• Having appropriate means of living. (10,000 Baht/person, 20,000 Baht/family) (हे काहीवेळेस प्रत्यक्ष चेक करतात. तेवढी रक्कम बरोबर असू द्यावी.)
रजेचा अर्ज मागणे फार विचित्र
रजेचा अर्ज मागणे फार विचित्र नाही. शेंगेन व्हिसा सा ठी मागितले होते तेव्हा मी एच आर कडून घेतले होते. जरी अर्ज पोर्टल वर असला तरी इमेल केल्यास हे पत्र मिळू शकेल. संबंधित एच आर शी बोलावे लागेल कदाचि त मी हेड ऑ फिस मध्येच काम करते त्यामुळे पिडून घेतले.
पण व्हिसा ऑन अरायवल सोपे आहे त्यापेक्षा असे दिसते आहे.
मी श्रीलंकेला गेलो हुतो तव्हा
मी श्रीलंकेला गेलो हुतो तव्हा इथुनच ऑनलाईनच क्रेडिट कार्डवरून पैसे भरून इ- व्हिसा ( काय काय लोग त्याले विजा पन मंतेत , ते तुमी बगा) काडला हुता. त्याचा प्रिंट आउट काडून न्हेला हुता. शिर्लंकेच्या आन थैलंडच्या प्रोटो कॉल मंदी जास्ती फरक नसंल . ऑनलैन मिळतुय का बगा. मातुर पैशे द्यायलेच लागतीन
परदेशातील काय आणि देशातील
परदेशातील काय आणि देशातील काय तुम्ही कुठल्याही टूर ला निघालात कि ऑफिस मध्ये तुम्हाला रजा काढावीच लागते. आणि रजेच कारण पण कळवाव लागत. यात वेगळं ते काय? ऑफिस कडून सही शिक्यानिशी तुम्ही रजेवर आहेत याच लेटर मिळावं ही त्या त्या व्हिसा कौन्सुलेट ची रिक्वायरमेंट असते. त्यात केसरी काय करणार ?थायलंड ला व्हिसा ऑन अरायव्हल मिळू शकतो . व्हिसा ऑन अरायव्हल तुम्ही त्या देशात पोचल्यावरच मिळतो
म्हणल विचारव मायबोलीकरांना.
म्हणल विचारव मायबोलीकरांना. त्यांचा काय अनुभव आहे ?
व्हय , मिळतूय पोहचल्याव , काय फिकिर करायची नाय , एक पासपोर्ट फोटू आणि सही कराया पेन जवळ ठूवा म्हणाव.......... बाकी केसरी,वीना वाले बघून घेतात ऐन वेळी काय आडल तर
मले एक समजलं नाइ बाप्पा का
मले एक समजलं नाइ बाप्पा का रजेचे पत्र धिल्यावर ऑन अरावलचे २००० रु लागत नाहीत का? वर्च्पोस्धाग्यावरून दिस्तेय की एक तं रजेचा कागद द्या किंवा ऑन अरायवलचे २००० भरा. ऐसन कैसन?
केसरी ट्रान्सपोएटवाल्यांवर
केसरी ट्रान्सपोएटवाल्यांवर कुणी इल्लिगल ह्युमन ट्रान्सपोर्टचा ब्लेम करू नये म्हणून.
की बॉ असा असा माणूस बाकायदा अश्याअश्या संस्थेत नोकरीला आहे आणि तिथून नियमाप्रमाणे सुट्टी घेऊन आम्ही त्याला बाईज्जत परदेश फिरवतोत, अशी काहीतरी संकल्पना असेल.
अन त्याहिले सांगिटलंच नाही की
अन त्याहिले सांगिटलंच नाही की म्या नौकरीले हाये म्हून तं ? मले काय म्हायचं की कुंपणीच्या पत्राले रु २००० पर्याय कसा काय राहीन? ते तं कशे बी गेले तं भरायलेच लागीन ना? नितीन भौ काय तरी गरबड करू र्हायले ...
की बॉ असा असा माणूस बाकायदा
की बॉ असा असा माणूस बाकायदा अश्याअश्या संस्थेत क्युमनोकरीला आहे >> तसे नाही. लोक फेक डॉक्युमेंट बनवून व्हिसा घेतात तसे होउ नये. कंपनीतून पत्र आणले म्हणजे थोडे ऑथेंटिक वा टते नाव बघून निदान कंपनी बद्दल गूगल सर्च करता येतो
कंपनीतून चोरी करुन्/गुन्हा
कंपनीतून चोरी करुन्/गुन्हा करुन अॅबस्काँड होण्यासाठी माणूस परदेशी आलेला नाही ना याची खातरजमा करायला.
कंपनीचं पत्र आहे म्हणजे
कंपनीचं पत्र आहे म्हणजे केसरीवाले हापिशीयली न्यायला मोकळे.
व्हिसा फी सहलखर्चात समाविष्ट असते आणि व्हिसा देणारे अधिकारी तिथे 'स्पॉन्सर' म्हणून केसरीवाल्यांचे किंवा संलग्न थायलंडमधल्या टूर कंपनीचे नाव लिहितात.
जर असे पत्र नसेल तर सरळ तुमचे पैसे तुम्ही भरा, तुमचे स्पॉन्सर तुम्ही असा विश्वामित्री पवित्रा घेता येतो.
एखादा मनुष्य कुठे कामालाच नसेल तर मागाहून जनरली काही ऑफिशीयल कटकटी होत नसाव्यात.
आता मी कुठेच कामाला नाही.
आता मी कुठेच कामाला नाही. मण्ग म्या काय पत्र द्यावे?
काही देऊ नका. केसरीवाल्यांना
काही देऊ नका.
केसरीवाल्यांना तुम्ही अनएंप्लॉय्ड आहात असे लिहून द्या. म्हणजे त्यांच्या फॉर्मात तसे लिहा. वेगळे लिहून द्यायची गरज नाही.
लिहून द्या हो बिन्धास्त, मग त्यांची जबाबदारी कमी होते.
मग तुम्ही इथे कोणी फार मोठे ब्युरोक्रॉट का असा/ नसा!
एनएम्प्लॉईड आहेत असं कास
एनएम्प्लॉईड आहेत असं कास लिहून देता येईल.? आपण आधीच सांगतो मी अशा अशा ठिकाणी जॉब करतो किव्वा नाही . ते विचारातच ना. उद्या तुम्ही जॉब करताय पण रजा आधी अप्लाय न करता असेच ट्रिप वर गेलात तर तुमची नोकरी पण धोक्यात येतेच ना . त्या त्या व्हिसा कौन्सुलेट ची ती रिक्वायरमेंटच असते. त्याशिवाय ते व्हिसा देत नाहीत . तुम्ही रीतसर सगळ्या गोष्टी खऱ्या खुऱ्या सांगून ट्रिप वर गेलात तर तुम्ही पण ट्रिपचा आनंद घेऊ शकता. नाहीतर टेंशन मध्ये ट्रिप करण्यात काय अर्थ ?
एनएम्प्लॉईड आहेत असं कास
एनएम्प्लॉईड आहेत असं कास लिहून देता येईल.? >> बरोबर आहे असे नाही लिहून देता येत. कारण आयटी रिटर्न्स असतात की बरोबर. सोर्स ऑफ इनकम काय? ते विचारू शकतात.
इथे बघा जास्त माहिती आहे.
http://www.thaiembassy.com/thailand/visa-on-arrival.php
कंपनीत एक रजेचे पत्रही मिळू
कंपनीत एक रजेचे पत्रही मिळू शकत नाही काय? कमाल आहे. आणि तसेही रजा घेऊनच जावे लागणार आहे, इथे कंपनीत प्रॉक्झी ठेवणार आहेत काय त्या काळात?
हे खरेतर रजेचे पत्र नसते तर तुम्ही इथे नोकरी करत आहात याचे पत्र असते. सगळ्या कंपन्या हे देतात कहीही कटकट न करता. आमच्या कंपनीत तर आमच्या पोर्टलवर एक वेगळा ऑप्शनच आहे विसा लेटर म्हणुन. माझी मुलगी परदेशी गेलेली तेव्हा मी तिची स्पॉन्सर असल्याने माझ्या कंपनीला मी त्यांच्याकडे कायम नोकरीत आहे असे पत्र द्यावे लागले
आणि विसा फी वगैरे केसरीच्या फीतच असते, फुकट काहीही कोणी देत नाही. नुकतेच माझ्या भावाचे कुटूंबीय वीणा वर्ल्डसोबत थायलंड करुन आले. त्यांना चांगल्या भरभक्कम बॅगा पण दिलेल्या, ते सगळॅ अर्थातच टुर फी मध्ये होते.
Best get a visa on arrival.
Best get a visa on arrival. They just ask passport, return ticket, hotel booking and currency (some times). They don't ask which company you work, show your leave approval..etc
Kesari, Veena etc. are hyped tour operators by Marathi people.
अमा, थायलंडला जायला आय टी
अमा, थायलंडला जायला आय टी रिटर्न्स बिटर्न्स काय लागत नैत.
आता माझं किराणा दुकान हाय,
आता माझं किराणा दुकान हाय, चांगलं चालतंया. पोराच्या भरोशावर दुकान सोडुन मी अन बायडी थायलंडला जाऊ म्हनलं तर मी कोणा कडुन रजेचा अर्ज मंजूर झाल्याचं लेटर आणायचं? माझं पोरगं लिहुन देईन की माझा बाबा आन आय चाललीय फिरायला मला काय प्रॉब्लेम नाय, मी दुकान संभाळन. ते चालन का?
आता माझं किराणा दुकान हाय,
आता माझं किराणा दुकान हाय, चांगलं चालतंया. पोराच्या भरोशावर दुकान सोडुन मी अन बायडी थायलंडला जाऊ म्हनलं तर मी कोणा कडुन रजेचा अर्ज मंजूर झाल्याचं लेटर आणायचं? माझं पोरगं लिहुन देईन की माझा बाबा आन आय चाललीय फिरायला मला काय प्रॉब्लेम नाय, मी दुकान संभाळन. ते चालन का?
जे स्वतःचे किराणा दुकान चालवतात त्यांछ्यासाठी वेगळी प्रोसिजर असेल, जे रिटायर होऊन घरात बसलेत त्यांच्यासाठी वेगळी प्रोसिजर असेल, तुम्ही कशाला ताण घेताय. पोरगं दुकान चालवण्याइतपत मोठं असेल तर द्या त्याच्याकडे दुकान आणि जा बायडीबरोबर... जिन्दगी ना मिले दोबारा...
वीजासाठी रजेचा अर्ज ? काय
वीजासाठी रजेचा अर्ज ? काय वेडेपणा आहे राव .
श्री तेच तर म्हणतोय आम्ही....
श्री तेच तर म्हणतोय आम्ही.... इट इज समथिंग फूलिश.
नविन नियम आला असेल
नविन नियम आला असेल बहुतेक.
तुम्ही डायरेक्ट फोन करुन विचारा इथल्या थायलंड एम्बसी मधे
व्हीसासाठी रजेचा अर्ज मला
व्हीसासाठी रजेचा अर्ज मला अनेक वेळा द्यायला लागला आहे ( थायलंड च्या नाही, किंवा ज्या देशात ऑन अरायव्हल व्हीसा आहे, त्या देशांच्या व्हीसा साठीही नाही ) माझ्या पासपोर्ट वर जर दुसर्या देशाचे चालू वर्क परमीट आहे आणि मी आणखीन एखाद्या देशाच्या व्हीसासाठी भारतातून ( रजेवर असताना ) अर्ज करत आहे, तर माझ्या कंपनीकडून, असे पत्र द्यावे लागले आहे.
पण थायलंड साठी ते द्यावे लागेल असे वाटत नाही.
खुपदा ट्रॅव्हल एजंट्स आपल्याच मनाने एक सबगोलंकार यादी करतात...
वीजासाठी रजेचा अर्ज ? काय
वीजासाठी रजेचा अर्ज ? काय वेडेपणा आहे राव .
हे तर काहीच नाही, युरोप चा विसा घेताना रजेचा अर्ज, पगार, कीती वर्ष कामाला अहे ते कंपनी कडुन पत्र, तुम्ही जेवढे दिवस जाणार आहे त्या सगळ्या दिवसाचे हॉटेल बुकिंग, बॅ़क पासबुक, टॅक्स रीटर्न आणि परतिचे तिकिट लागते . आणी विसा परतीच्या तिकिटाचा दिवसा पर्यन्त्च मिळतो आणि जर विमान रद्द झाले तर वेगळेच टेंशन.
पण थायलंड मध्ये जर विमानानी जाणार असेल तर वीसा ऑन अरायव्हल लगेच मिळतो. आणि पोहोचल्यावर immigration कडे पळत सुटला तर रांगेत पण उभे राहवे लागणार नाही. फोटो त्याचा फॉर्मॅट मध्ये नसेल तर तिकडे परत काढावा लागतो त्यासाठी थाई भात लागतात.
जर बस ने किंवा ट्रेन ने जाणार असेल (मलेशिया किंवा बर्मा मधुन) तर मात्र आधी विसा घ्यावा लागतो.
चीन, ईस्ट युरोप, सिंगापूर या
चीन, ईस्ट युरोप, सिंगापूर या प्रत्येक ठिकीणी कंपनीच्या लेटर्हेड्वर अथ्वा त्यांच्या इ मेल आय डी वरून पत्र मी दिले आहे. यात काय चूक आहे?
तुम्ही नोकरीत आहात असे ङोषित केले असतांना त्याची शहानिशा या प्रकारे होते.
अन दिल्लीहून स्कॅन्ड कॉपे आणायला काय समस्या आहे?
उगीचच हा धागा पळतोय कारण यात चर्चा करण्याजोगे काही नाही
पर्यटन व्हिसासाठी अर्ज
पर्यटन व्हिसासाठी अर्ज केल्यास नोकरदारांना रजा मंजुरीचा पुरावा द्यावा लागतो,/ना हरकत पत्र द्यावे लागते युरोप, अमेरिकेसाठी. पण तिथे व्हिसा ऑन अरायव्हल मिळत नाही.
जिथे व्हिसा ऑन अरायव्हल आहे तिथे जाण्यापूर्वी रीतसर अर्ज केल्यास नोकरदारांकडुन आम्हास रजा मंजुरीचा पुरावा हवाच, पण तडक आगमन झालेच तर मात्र त्याची आवश्यकता नाही. हे "आता आलाच आहात तर 'आत येऊ का?' असे का विचारता? या आता!" असे म्हटल्यासारखे वाटते.
दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे ट्रॅव्हल एजंट्स सबगोलंकार यादी करत असतात हे सुद्धा खरे आहे. निदान बिझिनेस व्हिसा साठी तरी. जिथे व्हिसा देण्यापूर्वी मुलाखत जरुरी असते तिथे, व्हिसा मुलाखतीच्यावेळी ट्रॅव्हल एजंट्सच्या आग्रहावरुन जोडलेली अनावश्यक कागदपत्रे टरा टरा ओढून 'ही नकोत' म्हणुन आपल्याच हाती थोपवली जातात असा अनुभव आहे.
व्हिसा ऑन अरायव्हलसाठी पासपोर्ट आणि परतीचे तिकीट, आणि रहाण्याच्या सोयीचा पुरावा पुरेसा आहे. रहाण्याची सोय ही आपणच बुक केलेले हॉटेल कन्र्फर्मेशन/आपल्या तेथिल वास्तव्यास असलेल्या नातेवाईक/ मित्रांचा पत्ता,फोन नंबर / रेप्युटेड रजिस्टर्ड ट्रॅव्हल एजन्सीचे कन्फर्मेशन चालते. लागणारा वेळ रांगेवर अवलंबून असला तरी केसरी यासाठी तयार असल्याने थांबेल / सोय करेलच.
सगळ्यांबरोबर आपला एक टॅन्जट.
सगळ्यांबरोबर आपला एक टॅन्जट. रिमोट काम करणार असू आणि रजाच घेतली नाही तर काय?
रजा अप्रूव्ह असा काही प्रकारच आमच्याकडे नसतो.
त्या देशात काम करायला जात नाही, पण मुळच्या देशातलं काम मुळच्या देशातील ब्याकेत मोबदला जमा होऊन रिमोटली करणार असू तर काय करायचं.
Pages