केसरीने थायलंडला प्रवास

Submitted by नितीनचंद्र on 3 August, 2016 - 23:49

माझे एक नातेवाईक थायलंड टुर वर केसरी द्वारे चालले आहेत. केसरीने अर्थातच टुर व्हिसा देऊ म्हणुन सांगीतले आहे. पण त्याची फारच विचीत्र मागणी आहे.

आपण रजेवर आहात याचे एक कंपनीच्या लेटर हेडवर सही शिक्या निशी पत्र हवे आहे. आजकाल रजेचे अर्ज हे पोर्टलवर असतात. लेखी नसतात. ह्या नातेवाईकांच्या कंपनीचे हेड ऑफिस दिल्लीला आहे सबब असे पत्र पुण्याला तात्काळ मिळणे दुरापास्त आहे.

यावर दुसरा पर्याय केसरीनेच सुचवला आहे की वीसा ऑन अरायव्हल ज्याला रुपये २०००/- खर्च आहे.

केसरीने सुचवलेला पर्याय असल्यामुळे तो योग्य असेलच पण

१. असा वीसा ऑन अरायव्हल थायलंडला मिळतो का ?
२. तो मिळायला किती वेळ लागतो ?
३. काय पेपर्स बरोबर असणे आवश्यक असते ?
४. संभाव्य अडचणी काय असतात.

नातेवाईकांची चर्चा चालु होती. म्हणल विचारव मायबोलीकरांना. त्यांचा काय अनुभव आहे ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी विसा परतीच्या तिकिटाचा दिवसा पर्यन्त्च मिळतो आणि जर विमान रद्द झाले तर वेगळेच टेंशन. >> are you sure? मला दहा दिवसाच्या भेटीसाठी ३ महिन्याचा दिला होता तसेच रजेचा अर्ज पण मागितला नाही. रजा मी व्हिसा मिळाल्यावर घेतली. हे दिल्ली मधे.

अहो जाऊ द्या हो.
का डोकं फोडताय?
थायलंडवाले हे काहिही विचारत नाहीत.
केवळ केसरीवाले विचारतात.
नितिनचंद्रांच्या नातेवाईकांनी आपापसात चर्चा करण्यापेक्षा 'हे असे का ' हे केसरीवाल्यांनाच विचारावे हे उत्तम!

मागे मिपावर अजयाने युरोपमधल्या एका टूर पॅकेजविषयी लिहिलं होतं.
त्यात एकटी स्त्री ट्रॅवलर म्हटल्यावर (भारतातल्या) टूर कंपनीने तिच्या नवर्‍याचे ' ना हरकत' प्रमाणपत्र मागवलं होतं असं स्मरतंय.

त्यात एकटी स्त्री ट्रॅवलर म्हटल्यावर (भारतातल्या) टूर कंपनीने तिच्या नवर्‍याचे ' ना हरकत' प्रमाणपत्र मागवलं होतं असं स्मरतंय.
>> हे मात्र खरेच लागत नाही. मी मायनर चाइल्ड च्या कागदपत्रांबरोबर डेथ सर्टिफिकेट जोडले होते. अदर पेरेंट म्हणून. पण मला काहीच विचारले नाही स्पाउस बद्दल. इंटर्व्यू पण नाही. पेपर्स इन विसा आउट. आणि तिथून डिपार्चर च्या पुढे २० दिवस हातात होते.

ट्रान्झिट मध्ये जेव्हा आपण on arrival visa घेतो तो काही वेगळा असतो का?

मागच्या वर्षी एकदा फ्लाईट लेट झाल्याने मला हॉन्ग्कॉन्ग मध्ये १२ तास थाम्बावे लागले होते, तेव्हा फक्त पासपोर्ट दाखवुन १५ दिवसान्चा on arrival visa मिळाला होता. काही चार्जेस नव्हते.

अमा, हे ऑफिशीयल एंबसीकडून व्हिसा मागवायच्या पद्दतीबद्दल लिहिलंच नाहीये.
ट्रॅवल एजन्सीच्या मूर्खपणाबद्दल लिहिलंय.
तिथले बिनडोक त्या त्या देशाचे असे काहिही नियम नसताना अशी विचित्र कागदपत्रे मागतात.

आजच सकाळी हे नातेवाईक थायलंडला पोहोचल्याचा मेसेज आलाय. आता अनुभ लिहतो दिवसभरार्त किती वेळ लागला विसा ऑन अरायव्हल साठी.

मागच्या वर्षी एकदा फ्लाईट लेट झाल्याने मला हॉन्ग्कॉन्ग मध्ये १२ तास थाम्बावे लागले होते, तेव्हा फक्त पासपोर्ट दाखवुन १५ दिवसान्चा on arrival visa मिळाला होता. काही चार्जेस नव्हते. >>> ते पुष्कळदा तुमची एअरलाईन अ‍ॅरेंज करते.
हाँगकाँग मध्ये ऑन अराइव्हल १४ दिवसांचा विजा / स्टँप फुकट मिळतो.

दिवाळीनंतर मी पण केसरीने जात आहे सोबत फॅमिली आहे विसाच्या नियमावली मधील एक नियम असा आहे की 20000 थाई बाथ सोबत असने जरूरी आहे ..त्याएवेजी फोरेक्स कार्ड नेल तर चालेल का. ?

Pages